आमच्या वाचकांचे मनोगत
खेळणी “पालकांनो—तुमच्या मुलांसाठी बुद्धीमत्तेने खेळणी निवडा,” हा लेख मी अलीकडेच वाचून काढला. (सप्टेंबर ८, १९९४) पालक या नात्याने मी या माहितीची गुणग्राहकता बाळगली. परंतु मी एक सावधगिरीचा इशारा देऊ इच्छितो. थोडेसे पाणी असलेल्या बादलीमध्ये लहान मुल बुडू शकते, या गोष्टीची कृपया वाचकांना चेतावणी द्यावी.
ई. व्ही., अमेरिका
या स्मरणिकेची कदर केली जाते.—संपादक
माझा मुलगा आणि मी त्याला खेळणे विकत घेऊन देण्याच्या बाबतीत चर्चा करत होतो. ते खेळणे त्याच्यासाठी योग्य नाही, असे मला वाटत होते. तो लहान असल्यामुळे माझ्या या विचाराशी सहमत होण्यास त्याला अवघड गेले. आम्ही या गोष्टीविषयी बोलत असताना आलेल्या टपालाकडे पाहिले, त्यामध्ये अलीकडचाच अवेक! अंक होता. “तुमचे मुल कोणत्या खेळण्याशी खेळत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?,” हे शीर्षक पाहून आम्ही दोघेही चकित झालो. तो या लेखांनी प्रभावीत झाला आणि माझ्या विचारांना समजू लागला.
डब्यू. एफ., अमेरिका
या लेखांबद्दल आभार. मी १३ वर्षांची असून मला घराबाहेरील गोष्टी म्हणजे कला, हस्तकला आणि पियानो वाजवण्यात रस आहे. मी लहान असताना माझी खेळणी मी स्वतः बनवत असे. व्हिडियो गेम्सपेक्षा अशाप्रकारच्या गोष्टी बनवणे मला आवडते कारण असे केल्याने मी काहीतरी साध्य केल्याची भावना माझ्याठायी निर्माण होते. अशा गोष्टी करण्यात किती मजा आहे हे समजण्यास या लेखाने इतर मुलांना मदत केली असेल, अशी माझी आशा आहे.
के. एस., अमेरिका
डोळ्याची शस्त्रक्रिया “रेडियल केरोटोटोमी—काय आहे?,” या लेखाला मी मोठ्या आस्थेने वाचले. (सप्टेंबर २२, १९९४) याचे कारण म्हणजे काही महिन्यानंतरच माझ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मी या स्पष्ट माहितीची फार कदर करतो. माझ्या नेत्ररोगचिकित्सकांनी दिलेल्या माहितीपेक्षा ही माहिती अधिक विस्तृत होती.
जी. के., इटली
पाणघोडा “बचावासाठी पाणघोडा,” या विषयाला प्रकाशीत केल्याबद्दल आभार. (सावध राहा! ऑक्टोबर-डिसेंबर १९९४) एका हरिणाला वाचवणाऱ्या पाणघोड्याबद्दल वाचल्यानंतर मी फारच प्रभावीत झालो. विशाल दातांचे प्रदर्शन करण्यासाठी स्वतःचा प्रचंड जबडा उघडणारा पाण्यातील एक विशाल प्राणी, असा या प्राण्याच्या बाबतीत माझा आतापर्यंत समज होता. हा प्राणी आवडतो असे कदाचित मी म्हटले नसते; परंतु या लेखाने माझे मत परिवर्तन केले.
वाय. एच., जपान
पिडित मुले तुमची मालिका “मुलांसाठी कोणती आशा?” (मे ८, १९९४) वास्तविकतेला धरून आणि फारच उत्तमप्रकारे लिहिण्यात आली आहे. भयानक अनुभव आणि प्राणघातक रोग त्याचप्रमाणे जगण्यास अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक मुले पीडित आहेत, हे सर्व वाचून मला अगदी गहिवरुन आले. परंतु मुलांसाठी असणाऱ्या त्या खऱ्या आशेबद्दल वाचल्यानंतर मला फार आनंद झाला. ही आशा देवाचे राज्य मानव जातीवर राज्य करील तेव्हा पूर्ण होईल.
डी. जी., पापुआ न्यू गिनी
विचार स्वातंत्र्य बहुतेकवेळा नको त्या विचारांवर विचार करुन मी माझ्या मनाला भरकटण्यास मुभा देते. त्यामुळे “बायबलचा दृष्टिकोन: बायबल विचार स्वातंत्र्याचा निषेध करते का?,” हा लेख वाचल्यानंतर मी आश्चर्यचकित झाले. (जून ८, १९९४) एखादी व्यक्ती हेतुतः वाईट गोष्टींबद्दल विचार करते तेव्हा यहोवा देवाच्या दृष्टीने हे पाप ठरते, या गोष्टीची मला पूर्वी कल्पना नव्हती. असा स्पष्ट सल्ला दिल्याबद्दल यहोवाचे आभार, यामुळे माझे कपटी विचार दूर होण्यास मला मदत मिळेल!
जे. पी., फिलिपाईन्स
तणाव “बायबलचा दृष्टिकोनः—तणावाचा सामना करण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट साहाय्य करू शकते?” या लेखाबद्दल शतशः आभार. (सप्टेंबर ८, १९९४) ख्रिश्चन या नात्याने मला वाढविण्यात आले; परंतु किशोरावस्थेत सत्याचा मी त्याग केला. मला परत येऊन तीन वर्षे झाली आहेत; पण आता मी एका अविश्वासू व्यक्तीबरोबर विवाहबद्ध आहे. केलेल्या चूकीबद्दल मी सारखा विचार करते आणि मी अनुभव घेत असलेल्या या प्रचंड तणावास हेच कारण आहे, हे मी समजून घेत नाही. गतकाळातील गोष्टींवर विचार करणे व्यर्थ आहे, हे समजण्यास मदत केल्याबद्दल आभार. आता मला भवितव्याचा विचार करण्यास हवा.
आर. एल., अमेरिका
‘सर्व वयोगटातील लोक तणावाचा अनुभव घेतात,’ असे आपण म्हटले. मी २१ वर्षांची असून तीव्र तणावाने पीडित आहे. मी आठ महिन्यांमध्ये स्नायुंच्या आकुंचनामुळे येणाऱ्या आजारासाठी आणि तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी दोन वेळा इस्पितळामध्ये गेले. तणाव असण्यास मी फार लहान आहे, असे डॉक्टरांनी मला प्रत्येक वेळेस सांगितले. अखेरीस तुमच्या लेखांनी मला आराम मिळाला.
व्ही. पी., अमेरिका
भूगोलाचा पाठ मी ११ वर्षांची मुलगी आहे आणि मला “टिटिकाका तळ्यातील तरंगते द्वीप,” हा लेख फार आवडला. (जून २२, १९९४) टिटिकाका या द्वीपावर लोक राहतात का?, असा प्रश्न भूगोलाच्या तासाला शिक्षकांनी विचारला. माझ्या सर्व वर्गमित्रांनी नाही, असे उत्तर दिले. मी अवेक! वाचले होते त्यामुळे मी होय, असे उत्तर दिले. मला हे कसे ठाऊक झाले असे माझ्या शिक्षकांनी मला विचारले; त्यामुळे साक्ष देण्यास मला एक उत्तम संधी प्राप्त झाली.
एस. बी., इटली