वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. २९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रिस्क्रिपशन औषधांचा दुरुपयोग
  • खरेदीचे वेड
  • “टीव्ही पाहणारे असंख्य चिमुकले”
  • पायांचे दुखणे
  • स्त्रिया आणि आत्महत्या
  • एड्‌सचे “जागतिक केंद्रस्थान”
  • एडस्‌—मला काही धोका आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—२००३
  • मानवी दुःख
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. २९

जगावरील दृष्टिक्षेप

प्रिस्क्रिपशन औषधांचा दुरुपयोग

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियाच्या राज्यात, मेल्बर्नचे वृत्तपत्र हेराल्ड सन म्हणते की, “ऑस्ट्रेलियन लोक दर वर्षी औषधांसाठी ३ अब्ज डॉलर खर्च करतात आणि प्रिस्क्रिपशन वेदनाशामक औषधांचे त्यांना अधिकाधिक व्यसन जडत आहे.” व्हिक्टोरियाच्या आरोग्य मंत्र्यांनी इशारा दिला, की “प्रिस्क्रिपशन औषधांचा गैरवापर नकळत आपल्यासाठी एक समस्या बनत आहे आणि बेकायदेशीर औषधांसारखीच ही औषधे देखील आरोग्याकरता आणि जीवनाकरता विषारी ठरू शकतात.” अधिकाधिक लोक आता अनेक प्रिस्क्रिपशन मिळवण्याकरता ‘एका डॉक्टरकडून दुसऱ्‍या डॉक्टरकडे’ जात आहेत, या अहवालांबद्दलही त्यांनी चिंता व्यक्‍त केली. काही गोळ्या जमा करून त्यांची पूड करून रक्‍तप्रवाहात अंतःक्षेपित केल्या जातात. एका सर्वेक्षणानुसार, योग्य औषधी वापराव्यतिरिक्‍त वेदनाशामक औषधे घेणाऱ्‍या लोकांची टक्केवारी १९९३ मध्ये ३ टक्के पासून १९९५ मध्ये १२ टक्के इतकी वाढली.

खरेदीचे वेड

आयर्लंडमध्ये, मनोविकृत खरेदी “आता व्यसन म्हणून ओळखली जाते आणि मद्य, अंमली पदार्थ, जुगार व जेवणाच्या विकारांप्रमाणे त्यासही गंभीर भावनिक आणि मानसिक खूळ मानले जाते ज्यास पेशेवाईक मदत लागते,” असे द आयरिश टाइम्स म्हणते. हे खूळ लागलेले लोक अनावश्‍यक वस्तू खरेदी करण्यात भरमसाट पैसा खर्च करतात. “कपड्यांची खरेदी करण्याच्या शिरशिरीमुळे शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन स्रवते ज्यामुळे त्यांना संपन्‍न असल्यासारखे वाटते.” मनोविकृत खरेदी करणाऱ्‍याला अंमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या व्यक्‍तीप्रमाणेच शिरशिरी मिळवणे जास्त कठीण होते.

“टीव्ही पाहणारे असंख्य चिमुकले”

इटलीतील २१,००० कुटुंबांच्या एका सर्वेक्षणातून असे प्रकट झाले की, बहुतांश इटालियन मुले टीव्हीवर अवलंबून आहेत. ला रिपब्लिका या वृत्तपत्राने असे सांगितले, “टीव्ही पाहणारे असंख्य चिमुकले” आपल्या जीवनाच्या पहिल्या वर्षापासूनच रिमोट कंट्रोल वापरायला शिकतात. तीन ते दहाच्या वयोगटातली ४० लाखांपेक्षा अधिक इटालियन मुले दररोज अडीच तास टीव्हीसमोर जादूने भारल्याप्रमाणे स्तब्ध राहतात. सहा ते आठ महिन्यांच्या बालकांनाही टीव्हीचा नाद लागला आहे याबद्दल मानसिक आरोग्य तज्ज्ञांना काळजी लागली आहे.

पायांचे दुखणे

जर्मनीतल्या फेडरल असोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या आरोग्य सेवेने केलेल्या आकडेवारींनुसार, त्या देशातील निम्म्या रहिवाश्‍यांना पायांसंबंधीचा त्रास आहे. “अनेक लोक आपल्या पायांची नीट काळजी घेत नाहीत किंवा अतिशय घट्ट अथवा स्वास्थ्याकरता अनुचित असलेली पादत्राणे घालून आपल्या पायांवर अत्याचार करतात,” असे वृत्त नॉसआउइशी नॉई प्रेस्स या वृत्तपत्राने दिले. नियमितपणे उंच टाचेचे किंवा नीट बसत नसलेले बूट घातल्यास गुडघ्यांचे, कमरेचे किंवा पाठीचे दुखणे होऊ शकते. ॲथलीट्‌स फुट आणि मायकोसिससारखे बुरशीमुळे निर्माण होणारे रोग देखील दिवसेंदिवस व्यापक होत चाललेत. फेडरल असोसिएशन ऑफ फिजिशियन्सने सुचवलेला एक प्रतिरोधक उपाय म्हणजे, “पायांच्या बोटांमधला सगळा साबण स्वच्छ धुऊन पाय कापडाने पुसून कोरडे ठेवावेत.”

स्त्रिया आणि आत्महत्या

“दर वर्षी ब्रिटनमध्ये ४,५०० आत्महत्या होतात: प्रत्येक स्त्रीमागे पाच पुरुष,” असे लंडनचे द टाइम्स वृत्त देते. परंतु गेल्या चार वर्षांमध्ये १५ ते २४ वयोगटातील तरुण स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण उल्लेखनीयरित्या वाढले आहे. साऊथॅम्पटन विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी एका संभवनीय कारणाविषयी स्पष्टीकरण दिले: “एकीकडे तरुण स्त्रिया आपल्या नोकऱ्‍यांवर कार्यक्षम राहू इच्छितात तर दुसरीकडे त्या कौटुंबिक जबाबदाऱ्‍या देखील स्वीकारतात. मध्यम वर्गीय स्त्रिया [बालकांच्या माता] बाळांची काळजी घ्यायला दाई ठेवत आहेत जेणेकरून त्यांना आपल्या नोकऱ्‍या करता येतील. नंतर मात्र त्यांना दुःख होते आणि दोषी वाटते. आई बनण्याची त्यांना स्वाभाविक इच्छा असते तर बाहेर जाऊन पैसे कमवले पाहिजेत असे त्यांचे मन त्यांना सांगत असते.” या सर्व ताणतणावांमुळे आणि दबावांमुळे त्या आत्महत्या करण्यास अधिक प्रवृत्त होत असतात असे प्राध्यापकांचे ठाम मत आहे.

एड्‌सचे “जागतिक केंद्रस्थान”

भारत म्हणजे “नाशाकडे जाणाऱ्‍या एक्सप्रेस्स ट्रेनसारखा आहे” व तो अति वेगाने “मानवजातीला पछाडलेल्या सर्वात भीषण पीडेचे जागतिक केंद्रस्थान बनत आहे,” असे लंडन येथील थेम्स वॅली विद्यापीठाने घेतलेल्या नवीन अभ्यासातून निष्पन्‍न झाले. त्याचप्रमाणे, संयुक्‍त राष्ट्रे एड्‌स कार्यक्रमाचे मुख्य डॉ. पीटर पायो यांनी एड्‌सच्या ११ व्या आंतरराष्ट्रीय सभेत म्हटले, की एड्‌स विषाणूची लागण झालेल्या सर्वात जास्त लोकांचे राष्ट्र म्हणून भारत अचानक वर आला आहे—त्याच्या ९५ कोटी लोकसंख्येतील ३० लाखांपेक्षा अधिक लोकांना एड्‌सची लागण झाली आहे. इंडियन एक्सप्रेस्स वृत्तपत्रानुसार, भारतामध्ये लैंगिकरित्या क्रियाशील असणाऱ्‍या २२.३ कोटी पेक्षा अधिक पुरुषांपैकी १० टक्के पुरुष नियमितरित्या वेश्‍यांकडे जातात असा एका अभ्यासाचा अंदाज आहे. शहरी भागांमध्ये काम करणाऱ्‍या वेश्‍यांना एड्‌सची लागण झाल्यास त्यांना पुन्हा त्यांच्या गावी पाठवले जाते जेथे हा रोग अज्ञात आहे आणि शहरांपेक्षा तेथील वैद्यकीय सुविधा कमी असल्यामुळे रोगाची वाढ वेगाने होत आहे. सन २००० पर्यंत, भारतामध्ये ५० ते ८० लाख एचआयव्ही पॉझिटिव्ह लोक असतील आणि एड्‌सची पूर्ण वाढ झालेली १० लाख प्रकरणे असतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा