वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२००१
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९५
  • आत्महत्या—तरुणांवर शाप
    सावध राहा!—१९९८
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९४
सावध राहा!—१९९५
g95 १/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

पुनर्जन्म “तुम्ही याअगोदर जिवंत होता का? तुम्ही पुन्हा जिवंत असाल का?” या सर्वोत्तम लेखांच्या मालिकेबद्दल आभार. (जून ८, १९९४) मृतांच्या स्थितीबद्दलची वास्तविकता या लेखांमध्ये अगदी सहज आणि तर्कसंगत पद्धतीने मांडली आहे. या विषयासंदर्भातील सत्य कोणी शोधत असल्यास तुम्ही जे लिहिले आहे ते त्याला स्वीकारावेच लागेल याची मला पूर्ण खात्री आहे.

एफ. पी., इटली

माजी मुष्टियोद्धा “मी ज्यावर प्रेम करत होतो त्याचा द्वेष करण्याचे मी शिकलो” या लेखाबद्दल मी तुमची फार आभारी आहे. (जून ८, १९९४) माझ्या पतीच्या काही वैद्यकीय समस्या समजण्यासाठी ऑब्दीलिओ नंझ यांच्या कथेने आम्हाला मदत केली. माजी मुष्टियोद्धा असल्याने ते देखील नैराश्‍याचा सामना करत आहेत. खरोखर, माझ्या पतीचे मार्ग परिवर्तन करण्यास यहोवा देवानेच मदत केली!

एस. एस., अमेरिका

वेदना मालिश करणे हा माझा पेशा आहे आणि “वेदनारहित जीवन शक्य आहे का?” (जुलै ८, १९९४) या लेखाबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो. या माहितीच्या प्रस्तुतीकरणातील आणि संशोधनातील सुक्ष्मदृष्टी, संतुलितपणा आणि बुद्धिमत्तेने मी अगदी भारावून गेलो. हा लेख तज्ज्ञ, रोगी आणि इतरांना एक अमूल्य मदत ठरेल. मालिश करण्याच्या पद्धतींचा वापर केल्याने मी वेदनेविरुद्ध कायम लढा देत आहे आणि जुनाट वेदना नसणाऱ्‍या देवाच्या राज्याच्या त्या दिवसाची मी वाट पाहत आहे.

डी. टी., डेन्मार्क

या लेखांनी मला अधिक सांत्वन दिले. माझ्याप्रमाणेच दररोजच्या वेदनांना सामोरे जाणाऱ्‍यांबरोबर मी याची सहभागिता केली.

एम. जी., अमेरिका

मी पलंगावर पडून तुम्हाला लिहित आहे आणि स्लीपड्‌ डिस्क्स्‌ (पाठीचा आजार) यामुळे मागील अडीच वर्षांपासून मी अंथरुणावर खिळून होते. “पाठदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात का?” या अत्युत्तम लेखाबद्दल आभार. (जून ८, १९९४) तुम्ही जणू प्रत्यक्ष माझ्याशी बोलत आहात असे वाटल्याने मी वाचन करताना अक्षरशः रडले. इतर कोणी इतक्या स्पष्टपणे ही समस्या समजू शकेल यावर माझा विश्‍वासच बसत नाही.

बी. एच., इंग्लड

दहा दिवसांपुर्वीच माझ्या पाठीवर शस्रक्रिया करण्यात आली त्यामुळे अचूक माहितीबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझ्या वेदनेची कारणे समजण्यासाठी या लेखाने मला मदत केली. देण्यात आलेले सल्ले फारच उपयोगी आहेत आणि मला आशा आहे की, शस्रक्रिया टाळण्यासाठी पुष्कळजण त्यांचा वापर करतील.

के. जी., हंगेरी

आत्महत्या “तरुण लोक विचारतात . . . आत्महत्या हे उत्तर आहे का?” (एप्रिल ८, १९९४) हा लेख मी भावनांच्या उत्कटतेने वाचला. माझे वय २० वर्षे असून सध्या मी पूर्ण वेळेची सेविका आहे. परंतु मी आत्मघाती होते त्याला फार काळ लोटला नाही. यहोवाने मला मदत केली आणि त्याच्या बाहुपाशाद्वारे मला कायम संरक्षण देत आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या मैत्रिणींपैकी एकीने मला सांगितले, की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तिच्यासाठी व्यावहारीक सल्ला शोधत होते ज्याद्वारे ती नैराश्‍यापासून मुक्‍त होऊ शकेल. या लेखाने माझ्या प्रार्थनांचे उत्तर दिले.

ए. के., इटली

मागच्याच आठवड्यात माझ्या मनामध्ये आत्महत्येचा विचार फारच प्रबळ होता. ख्रिस्ती वडील आणि त्यांची पत्नी निकटचे हितचिंतक बनले आणि या संबंधाने त्यांनी मला मदत केली. नैराश्‍यावर असणारे तुमचे अनेक लेख माझ्याकरीता जीवन रक्षक आहेत.

डी. जे., अमेरिका

या लेखाबद्दल मला तुमचे अंतःकरणपूर्वक आभार मानायचे होते. मला आठवते की इतर आधीच्या लेखाने कधीही याप्रमाणे माझ्या भावना उद्युक्‍त केल्या नाहीत. मला काही वर्षांपूर्वी आत्महत्या हा एक पर्याय—जणू असह्‍य परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग वाटत होता. परंतु पालकांच्या आणि मित्रांच्या साहाय्याने मला असे कळून आले, की जगण्यासाठी माझ्याजवळ एक सर्वोत्तम कारण होते—मी जगावे असे यहोवाला वाटते.

एम. व्ही., अमेरिका

मला हा लेख आकलनक्षम आणि उत्तम प्रकारे लिहिण्यात आल्याचे आढळले. आत्महत्येच्या विचारामध्ये गुंग होणाऱ्‍या प्रत्येकाला मदत करण्यासाठी ही एक अमूल्य मदत आहे असे मला वाटते. समाविष्ट असणाऱ्‍या उदाहरणांनी मी रोमांचित झालो.

एल. एस., अमेरिका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा