वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १/८ पृ. ३१
  • साक्षीदारांचे सद्‌गुण पाळक कबूल करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • साक्षीदारांचे सद्‌गुण पाळक कबूल करतो
  • सावध राहा!—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • राज्य सभागृहे सर्वांसाठी खुली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
सावध राहा!—१९९५
g95 १/८ पृ. ३१

साक्षीदारांचे सद्‌गुण पाळक कबूल करतो

ऑस्ट्रेलियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

सन १९९१ मध्ये न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथील यहोवाच्या साक्षीदारांचे कॉनडोब्लीनचे राज्य सभागृह आगीमुळे नष्ट झाले. काही आठवड्यांनंतर, एका स्थानिक अँग्लीकन पाळकाने आपल्या चर्चमधील पत्रात “उपासनेच्या ठिकाणाच्या नुकसानाबद्दल” सहानुभूती व्यक्‍त केली. त्याच्या पत्रात पुढे असे म्हटले गेले:

“आमच्या आणि त्यांच्या आचरणामध्ये स्पष्ट विविधता असली, तरी त्यांच्या विश्‍वासाच्या आचरणाचे पैलू चांगले असल्याचे मला वाटत असल्यामुळे मी पुष्कळ वर्षांपासून त्यांची प्रशंसा केली आहे.” यापैकीचे काही सकारात्मक पैलू कोणते होते?

पहिले: “ते विश्‍वासाच्या शिकवणीला फार महत्त्व देतात. याच कारणास्तव, ते प्रत्येक आठवडी दोन किंवा तीन प्रसंगी एकत्र भेटतात.” हे खरे आहे—यहोवाचे साक्षीदार हा वाचणारा, शिकवणारा आणि प्रचार करणारा धर्म आहे. दर आठवडी त्यांच्या तीन सभा असतात.

पाळकाचा दुसरा मुद्दा असा होता: “ते . . . लोकांच्या घरी नियमितपणे सुवार्तिकेच्या भेटी देतात. . . . ऑस्ट्रेलियात, धर्म नाही असे म्हणणाऱ्‍या लोकांचा समूह (३८,४१,०००) हा सर्वात मोठा तिसरा गट आहे हे आपण जाणावे अशी त्यांची इच्छा आहे. JW लोकांना त्यांचा विश्‍वास स्वतःजवळ ठेवण्यास समाधान वाटत नाही, तर इतरांसोबत त्याची सहभागिता करण्याची त्यांची इच्छा असते.” सुवार्तेचा प्रचार करून यहोवाच्या साक्षीदारांनी मत्तय २४:१४ अणि मार्क १३:१० ला प्रतिसाद दिलाच पाहिजे हे त्यांना माहीत आहे.

तिसरा मुद्दा: “रस्त्यावरील दुकाने आणि इतर निधी साठवण्याच्या प्रयत्नांद्वारे ते समाजाकडून निधी गोळा करत असल्याचे आढळून येत नाही. [त्यांच्या] स्वतःच्या समाजातून हा निधी मिळतो.” “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या” आणि “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे,” असे बायबल म्हणते. यास्तव ते कोणतीही वर्गणी गोळा करत नाहीत. दान पेट्या त्यांच्या सभागृहांमध्ये चटकन नजरेत न भरणाऱ्‍या ठिकाणी उपलब्ध असतात.—मत्तय १०:८; प्रेषितांची कृत्ये २०:३५.

त्यांनी उल्लेखलेला शेवटचा स्तुतीयोग्य पैलू कोणता होता? “ते कमीतकमी वेळेमध्ये आणि पैशांमध्ये आपल्या उपासनेची स्थळे बांधतात. . . . गम बेंड लेक रोड जवळील ठिकाणाला भेट देऊन . . . स्थानिक JW लोकांना . . . नवीन राज्य सभागृह बांधत असलेले पाहण्याची तुमची इच्छा असेल. त्या कामाला त्यांना तीन दिवस लागतील असा अंदाज ते लावतात.” मग त्याने त्याच्या चर्चच्या सदस्यांना कोणता सल्ला दिला?

“मी वर सुचवलेले चार मुद्दे तुम्ही वाचावेत आणि तुमच्या विश्‍वासाच्या दृश्‍य आचरणाबद्दल विचार करण्यास ते तुमची मदत कशी करू शकतात हे स्वतःला विचारावे असा सल्ला मी देतो. . . . मी असे सुचवीन की, उल्लेखिलेल्या चार मुद्यांच्या संबंधात JW च्या तुलनेत, सामान्य अँग्लीकन आणि ख्रिस्ती पाळक निष्क्रिय असल्याचे आढळतील.”

तुम्हाला एखाद्या राज्य सभागृहाला भेट देऊन, यहोवाचे साक्षीदार कशी उपासना करतात आणि ते काय विश्‍वास करतात हे पाहण्याची इच्छा असल्यास, मनात कोणताही संदेह न बाळगता तुम्हाला जवळ असणाऱ्‍या राज्य सभागृहास भेट द्या किंवा तुम्हाला सर्वात जवळ असणाऱ्‍या सभागृहाच्या पत्त्यासाठी आम्हाला लिहा. (g95 1/8)

[३१ पानांवरील चित्र]

कॉन्डोबलीन, न्यू साऊथ वेल्स येथील राज्य सभागृह

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा