आमच्या वाचकांचे मनोगत
स्तनाचा कर्करोग “स्तनाचा कर्करोग—प्रत्येक स्त्रीचे भय.” ही मालिका प्रकाशित केल्याबद्दल खूप आभारी आहे. (एप्रिल ८, १९९४) मी स्वतःची तपासणी वेळोवेळी केली व सहज वाटले की माझ्या गाठी खूप घट्ट आहेत. मला अनिश्चित असे वाटल्याने मी त्याबद्दल काहीही केले नाही. तरी देखील लेख वाचल्यानंतर मी रुग्णालयात गेले व मला कर्करोग झाल्याचे समजले. माझ्यावर शस्त्रक्रिया करण्याची योजना करण्यात आली होती. मी तुमचे अतःकरणपूर्वक आभार मानते.
टी. वाय., जपान
शस्त्रक्रियेच्या दिवसापासून मी कर्करोगाबद्दल काही वाचू शकले नाही. म्हणून नियतकालिक प्रकाशित झाल्याचा मला आनंद होत नव्हता. परंतु बहुतेक वेळा अवेक! च्या सर्व प्रती मी पहिल्या पृष्ठापासून शेवटच्या पृष्ठापर्यंत संपूर्ण वाचत असे व त्या रात्री मी थोडे वाचेन व मला भीती वाटली तर वाचन थांबविन असे ठरविले. मी ते वाचण्याचे थांबवू शकले नाही. ते खरोखर खूपच चांगले लिहिले होते, खूपच माहितीयुक्त व काळजी वाहणारेही होते.
जी. के., अमेरिका
खरोखर, जीवनास धोकादायक असणाऱ्या आजाराला तोंड देण्याच्या आमच्या भयाला यहोवा कसे जाणतो हे पाहण्यास या लेखाने मला मदत दिली. लोकांनी तसा विचार केला, तर ते कमकुवत व अल्पविश्वासू आहेत असे मला नेहमी वाटत असे. यहोवाकडे सखोल दया आहे हे पाहण्यास या लेखाने मला खरोखरच मदत दिली.
के. जी., अमेरिका
एखादे नियतकालिक कोणाशी बोललेच असेल तर त्या अंकाने मजशी बोलणी केली असे मी म्हणेन. मी व माझे पती बिछान्यावर बसलो असताना माझ्या स्तन-विकाराच्या शस्त्रक्रियेची सर्व बिल्स् आमच्या भोवती होती. ते बिल्स् भरण्यासाठी मी चेक वर चेक काढतच होते तेव्हा पोष्टमनने येऊन अवेक! हे नियतकालिक मला दिले. मी त्याच दिवशी तो लेख नेहमी पेक्षा अधिक आस्थेने वाचला. या लेखांद्वारे धैर्य प्राप्त होणाऱ्या सर्व स्त्रियांच्यावतीने मी तुमचे आभार मानते.
इ. जे., अमेरिका
शहरे मी १६ वर्षांची आहे व शहरांबद्दलची मालिका वाचून मी खूपच रोमांचकारी झाले. भूगोलाच्या तासाला आम्हास आमच्या आवडीच्या विषयावर एक लहान भाषण देण्यास सांगण्यात आले होते. मी माझे भाषण, “असे शहर जे लोकांनी व्यापलेले होते” (जानेवारी २२, १९९४) या लेखावर आधारित ठेवले. मी ज्यावेळेस वर्गामध्ये ते मोठ्याने वाचले, तेव्हा प्रत्येकाने टाळ्या वाजवून माझी वाहवा केली. भूगोलाबद्दलची माझी समज वाढविण्यास मदत दिल्याबद्दल मी आभारी आहे.
टी. आर., जर्मनी
“आम्ही स्वतः शहर बांधू” या लेखामध्ये तुम्ही म्हटले: “१९०० मध्ये संपूर्ण जगभरामध्ये फक्त लंडन या शहरामध्ये एक दशलक्ष लोकसंख्या होती.” (जानेवारी ८, १९९४) परंतु नंतरच्या लेखात तुम्ही म्हटले: “१८०० च्या दशकात (इंडो, जिला आता टोकीयो म्हणतात) येथे दशलक्षापेक्षा अधिक प्रमाणात लोकसंख्या होती.” तर कोणते बरोबर आहे?
एस. टी., जपान
लंडनबद्दलचे ते विधान खरोखर चुकीचे आहे. ते १९८५ आवृत्तीवर “जगाचे इलस्ट्रेट ॲटलास” (ऱ्यान्ड मीकनेली व कंपनी) यावर आधारित होते. तथापि, “द वर्ल्ड ॲलमानक १९९३ चे वस्तुस्थितींचे पुस्तक” हे अनेक शहरांमध्ये १९०० पर्यंत एक दशलक्षापेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेच बरोबर असल्याचे सूचित करते. गोंधळाबद्दल क्षमा असावी.—इडी.
निरक्षरता काही मनोरंजक लेख वाचल्यानंतर नेहमी तुम्हाला लिहून आभार मानण्याची माझी इच्छा होती. परंतु “निरक्षरतेची साखळी तोडणे” (फेब्रुवारी २२, १९९४) या मालिकेने सरतेशेवटी हे करण्याची मला खात्री पटविली आहे. पुढच्याच आठवडी मी अशा स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करणार आहे जिला लिहिता वाचता येत नाही. मी हे कसे करणार हे मला माहीत नव्हते पण आता मला माहीत झाले आहे. याबद्दल मी आभारी आहे. अगदी योग्य क्षणी हे लेख प्रकाशित झाले आहेत!
एम. ए. सी., इटली