जगावरील दृष्टिक्षेप
नवे व पुन्हा उद्धवणारे आजार
जागतिक आरोग्य संघटना (WHO) इशारा देते, की नवीन रोगांचा समावेश असलेल्या आजारांचा उद्रेक लाखो लोकांच्या जीवनाला धमकावत आहे. सर्वात नाटकीय उदाहरण एड्स रोगाचे आहे. हा रोग एका अशा विषाणूमुळे होतो जो वास्तविक पाहता दहा वर्षांआधी माहीत देखील नव्हता. आणखी एक नवा रोग आहे हॉन्टा-वायरस पलमनरी सिन्ड्रोम. याचा शोध अलीकडेच अमेरिकेच्या नैऋत्यात लागला. आशियात एका नव्याच लक्षणांचा पटकी रोग उद्भवला आहे. दक्षिण अमेरिकेत हेमोऱ्हॅजिक तापाचे दोन प्रकार निर्माण झाले आहेत आणि हे दोन्ही प्राणघातक आहेत. १९९३ दरम्यान उद्भवलेल्या सुपरिचित आजारांच्या उदाहरणांमध्ये लॅटिन अमेरिकेतील पटकी रोग, केनियातील पीतज्वर, कोस्टा रिकातील गुडघेमोडी ताप व रशियातील घटसर्प रोग यांचा समावेश आहे. अशाप्रकारचे नव्याने व पुन्हा उद्रेक होणाऱ्या रोगांना ओळखून त्यांच्यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला विश्वव्यापी केंद्रांची जरूरी भासत आहे. (g94 12/22)
धुम्रपानाला चेतवणाऱ्या शर्यती
पारंपारिकपणे, युरोपियन राष्ट्रांनी फॉर्म्युला वन ग्रॅण्ड प्रिक्स या सुप्रसिद्ध कार शर्यतीचा करमणूकीचे साधन म्हणून उपयोग केला आहे. परंतु, या शर्यतींचे व्यवस्थापक आता जपान व चीन यासारख्या आशियाई राष्ट्रांमध्ये त्या चालू करण्याचा विचार करत आहेत. का बरे? तंबाखूच्या जाहिरातींवर युरोपने लावलेल्या कडक नियमांमुळे. तंबाखूचे कारखाने या शर्यतीचे मुख्य प्रस्तुतकर्ते आहेत, यास्तव कारच्या शर्यती ठळकपणे तंबाखूच्या जाहिरतींचे प्रदर्शन करतात. जपानच्या आशी इवनींग न्यूजनुसार तंबाखूचा एक कारखाना “दोन गटांना पैसे पुरवून वार्षिक पुष्कळ अब्ज येन खर्च करतो.” युरोपात शर्यतीत असताना शर्यतीच्या कारवरील जाहिरातींना मिटवून किंवा झाकून टाकावे लागले. अलीकडेच फ्रेंच ग्रॅण्ड प्रिक्स ही शर्यत सिगारेटच्या जाहिरातीमुळे जवळजवळ रद्दच करण्यात आली. आशियाई राष्ट्र, जेथे सर्व प्रौढ पुरूषांतील ६० टक्के पुरूष धुम्रपान करतात, सिगारेटची जाहिरात करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे असे मानले जाते. (g94 12/22)
एवरेस्ट शिखरावर पूर्ण स्वच्छता
युनेस्को सोर्सेस या नियतकालिकानुसार, एवरेस्ट शिखर केवळ जगातील सर्वात उंच शिखर नव्हे तर जगातील “सर्वात उच्च कचरास्थळ” म्हणून देखील प्रसिद्ध आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये, गिर्यारोहकांनी एवरेस्टवर ऑक्सिजनच्या बाटल्या, तंबू, सबंध शरीर मावेल अशा झोपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या पिशव्या व खाण्याच्या वस्तुंची पाकिटे अजागळपणे टाकून दिली आहेत. खालच्या उतरणावरचे दृश्य पाहिले तर जिकडे तिकडे उडणारे टॉइलेट पेपरचे तुकडे दिसतात, एवरेस्ट तळ शिबिराकडे जाणाऱ्या मार्गाला आता “टॉइलेट पेपर मार्ग या नावाने ओळखले जाते.” डोंगराच्या माथ्यावरील कचऱ्याचे प्रमाण आश्चर्यकारक आहे. युनेस्को सोर्सेसने लिहिले, “ज्या लोकांचे एव्हरेस्टविषयी ते अजूनही मानवी अडथळ्याच्या पलीकडले एक जंगल असे स्वप्न आहे त्यांना अशा दृश्यांचे फोटो पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसेल.” या पर्वताला अशा कुरूप गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी, नेपाळ सरकारने या वर्षी संपूर्ण स्वच्छतेच्या अनेक मोहिमांची व्यवस्था केली आहे. (g94 12/22)
बीयरची विपुलता—अन्नाची कमतरता
एल युनिवर्सल या व्हेनेझुएलाच्या वृत्तपत्रानुसार, व्हेनेझुएलामध्ये, सहा वर्षांची व त्याहूनही कमी वयोमानाची ७,२६,००० मुले, अपुऱ्या आहारामुळे त्यांच्या वयोमानानुसार जेवढी उंची हवी त्यापेक्षा बुटकी आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी, की २३.८ टक्के म्हणजेच ४ पैकी १ मूल त्या वयोगटातील आहे. मुलांना देण्यासाठी तेथे पुरेसे पौष्टिक अन्न नसले तरी त्या राष्ट्रामध्ये बीयरची विपुलता आहे असे दिसते. एल युनिवर्सल असा अहवाल देते, की लॅटिन अमेरिकन राष्ट्रांपैकी, व्हेनेझुएला बीयरचा वापर करण्यामध्ये सर्वात अग्रस्थानी आहे. १९९१ मध्ये व्हेनेझुएलाच्या प्रत्येक व्यक्तीने सरासरी ७५ क्वार्टस् बीयर प्राशन केले होते. (g94 12/22)
डोळ्यात धूर
ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय दृष्टी संशोधन केंद्राचे संचालक प्राध्यापक रॉबर्ट ऑगस्टीन असा दावा करतात, की त्यांच्याकडे सिगारेटच्या धुरातील रसायनामुळे मोतीबिंदू झाल्याचे निर्विवाद पुरावे आहेत. एक अभ्यास दाखवतो, की धुम्रपान करणाऱ्यांना जे धुम्रपान करत नाहीत त्यांच्यापेक्षा दोन किंवा तीन पटीने मोतीबिंदू होण्याची शक्यता आहे. सिगारेटच्या धुरामधील रसायन पहिल्यांदा शरीर शोषून घेते, परंतु मग ते डोळ्याच्या काचेतून अधिकतर आम्ल व पाणी काढून टाकणाऱ्या ‘पंप्सचा’ नाश करतात. डोळ्यातील कोशिका सुजतात व त्या फुटल्यामुळे मोतीबिंदू तयार होतो. “मला याची पूर्णपणे खात्री पटली आहे. सिगारेटच्या धूरातील काहीतरी काचेतील पंप्सचे कार्य थांबवत आहे यात काही प्रश्नच नाही,” असे स्पष्टीकरण प्राध्यापक ऑगस्टीन देतात. (g94 12/22)
मेंदूचा व्यायाम
“कमी स्मरणशक्ती बहुधा नशीबाचा नव्हे तर निकृष्ट प्रशिक्षणाचा प्रश्न आहे,” असा डाक मॉगॉटसीन हे आरोग्यविम्याचे एक जर्मन प्रकाशन अहवाल देते. निष्क्रियतेमुळे जसे स्नायू झिजून जातात त्याचप्रमाणे, जर मेंदूची थोडीच कसरत केली तर त्याला देखील गंज चढतो व माहिती साठवण्याची त्याची क्षमता कमी होते. ही समस्या मुख्यत्वे वृद्ध जनांची आहे का? मुळीच नाही! तेच नियतकालिक पुढे असे विवेचन मांडते की, “विचार करण्यास किंवा जरूरीपेक्षाही अधिक विचार करण्यास आम्हाला सोपे करून दिले जाते,” परंतु तरीही काही तरुण त्यांचे मन कार्यमग्न ठेवत नसल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीला गंज चढण्याचा मोठा धोका आहे. यासाठी काय मदत करू शकते? मन आणि स्मरणशक्तीला उत्तेजित करणारे मानसिक खेळ जसे की आकडे व मुळाक्षरे असलेली अक्षरांची कोडी सोडवणे या मेंदूच्या व्यायामाची शिफारस ते नियतकालिक करते. तसेच, “शब्दकोडे देखील मदतदायी ठरू शकतात.” (g95 1⁄8)
एड्स आफ्रिकेचा नाश करत आहे
जागतिक आरोग्य संघटनेने लावलेल्या अंदाजानुसार संपूर्ण जगभरात एड्सच्या १ कोटी ५० लाख पेक्षा अधिक असणाऱ्या रूग्णांपैकी १ कोटी रूग्ण आफ्रिकेतच आहेत. तो जगातील सर्वात वाईटरीतीने पछाडलेला प्रदेश आहे. एड्स साथीवर मात करण्यासाठी ज्या उपचारांचा वापर केला जात आहे ते “सतत वाढत राहणाऱ्या नदीवर बांधलेले वाळूचे लहान बंधारे” यांच्याप्रमाणे आहेत असे प्राध्यापक नेथन क्लुमेक यांनी वर्णन केले. ली मॉन्डे या पॅरिस दैनिकात प्रकाशित केलेल्या मुलाखतीत प्राध्यापक क्लुमेक म्हणाले, की आफ्रिका प्रांताच्या प्रमुखांना आफ्रिकेत हे विषाणू जो नाश आणणार आहेत त्याची अजूनही पूर्णपणे जाणीव झालेली नाही. या खंडाच्या १० टक्के लोकांना एड्सची लागण होईल असा अंदाज प्राध्यापक क्लुमेक यांनी १९८७ मध्ये लावला तेव्हा अनेकांना वाटले, की ती अतिशयोक्तीच होती. आज असा अंदाज लावला जातो, की आफ्रिकेच्या २० ते ४० टक्के लोकसंख्येला कोठूनही या घातक विषाणूची लागण होईल. (g95 1⁄8)
अतिमच्छीमारी समुद्र रिकामा करते
“‘समुद्रात भरपूर मासे आहेत’ अशी एक म्हण आहे. पण ती खोटी आहे,” अशी नोंद द इकॉनॉमिस्ट करते. “समुद्रात भरपूर मासे आहेत खरे परंतु स्वार्थाकरता याचा अयोग्यरीतीने वापर केला जात आहे.” १९८९ मध्ये त्याचा उच्चांक गाठल्यापासून जगाची सागरी मासेमारी कमी होत चालली आहे. त्याचे कारण अगदी सोपे आहे: “अंडी घालणारे मासे समुद्रात खूपच कमी प्रमाणात आहेत. कोळी भांडवलावर अवलंबून आहेत. मत्स्य पुर्नउत्पादनासाठी लागणारे मासे देखील ते पकडत आहेत.” संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेनुसार, जगाच्या १७ सर्वात मोठ्या सागरी मत्स्यक्षेत्रांपैकी १३ क्षेत्रांच्या गंभीर समस्या आहेत—त्यातील ४ क्षेत्र व्यापारी दृष्ट्या रिकामे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. प्रकृष्ट तंत्रज्ञान—जसे की सोनार व उपग्रह दळणवळण—कोळ्यांना सर्वात दूर क्षेत्रांमध्ये मासे शोधण्यास तसेच मासेमारी जेथे अधिक उत्पादक आहे त्या विशिष्ट ठिकाणी पुन्हा येण्यास शक्य करून देत आहे. फुटबॉल मैदानाइतक्या प्रचंड मासेमारबोटी व त्याहूनही मोठमोठे जाळे अधिक प्रमाणात मासे पकडतात. द इकॉनॉमिस्ट म्हणते, की या उधळपट्टीला सरकारे जबाबदार आहेत कारण काही राष्ट्रांच्या ३७० किलोमीटरर्सच्या किनारपट्टीवर, म्हणजे त्यांचे प्रभुत्व असल्याचा ते दावा करतात त्या पाण्यात जगाची ९० टक्के मासेमारी होते. सरकारे इतर राष्ट्रांच्या मासेमारी ताफ्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये येऊ देत नाहीत; परंतु देशांतर्गत ताफ्यांना आणखी बोटी व साधनसामग्री आणू देण्यास परवानगी देतात; शिवाय ते त्यांना सार्वजनिक निधी देऊन देखील मदत करतात. (g95 1⁄8)
ट्रेन्समधील टॉईलेट-पेपर रोल संदेश
अधिक आधुनिक साधनसामग्री येईपर्यंत, कोणत्याही इटालियन ट्रेनमध्ये कोणतीही तातडीची परिस्थिती आल्यावर अधिकाऱ्यांना कळवण्याचा एकच मार्ग राहील व तो म्हणजे: एक चिठ्ठी लिहून ती टॉयलेट पेपर रोलमध्ये घालून वेगाने जाणाऱ्या रेल्वेतून पुढील येणाऱ्या स्टेशनवर बाहेर फेका आणि तो रोल कोणाला तरी सापडेल व अधिकाऱ्यांना कळवले जाईल ही आशा ठेवा. “जितकी जुनी रेल्वे तितकीच जुनी ही पद्धत” असे रेलरोड नियम अधिकृत सूचित करतात. इटालियन राज्य रेल्वेचे एक अधिकारी म्हणतात, “ही पद्धत अजूनही कार्यक्षम, सिद्ध झाली आहे,” तरीसुद्धा ते जाणतात की “रेल्वेतील दळणवळण ही एक गंभीर समस्या आहे.” एखाद्या प्रवाश्याची तबीयत अचानक बिघडल्यावर, बाँबसारखी धोकादायक वस्तू असलेले सामान सापडल्यावर, आक्रमण किंवा चोरी झाल्यावर “राज्य रेल्वेचा कर्मचारीवर्ग शक्तिहीन होतो,” कारण त्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असे कोरीरा डेलला सेरा हे इटालियन वृत्तपत्र म्हणते. दळणवळणाची समस्या सोडवण्यासाठी, इटालियन राज्य रेल्वेचा नजीकच्या भवितव्यात भुयारी विद्युत पोर्टेबल टेलिफोन स्वीकारण्याचा हेतू आहे. (g95 1⁄8)
झोपण्याच्या उत्तम सवया
“अनेक लोकांसाठी निद्रानाश उत्पादक असू शकते, परंतु शरीराला जितक्या झोपेची आवश्यकता आहे ती न दिल्यामुळे ते कदाचित अनुत्पादक बनेल,” असे ब्राझिलियन नियतकालिक इकसॉमी म्हणते. मज्जातंतुशास्त्रज्ञ रूबेन्झ रेमाऊन स्पष्टीकरण देतात: “एखाद्या व्यक्तीला जितक्या तासांच्या झोपेची गरज आहे ते त्याचे शरीर विसरणार नाही. उलट, शरीर ते नेहमी लक्षात ठेवील आणि अचानक बिल सादर करील म्हणजेच, ज्याला स्मृतिचा प्रमाद, एकाग्रतेच्या समस्या व विचार करण्याची मंद क्षमता असे म्हणता येईल अशा गोष्टी त्या व्यक्तीठायी दिसू लागतात.” जादा चिंता टाळण्यासाठी, “कामात असताना कामाबद्दलच्या समस्या सोडवा किंवा त्यांच्याबद्दल विचार करा,” अशी शिफारस डॉ रेमाऊन करतात. तुम्ही आराम करावा व उत्तमप्रकारे झोपावे म्हणून, नियमित व्यायाम, मृदू संगीत, मंद प्रकाश व चांगले विचार आवश्यक आहेत असे इकसॉमी सुचवते. (g95 1⁄8)
षंढांची पूजापद्धती
भारतात दहा लाखापेक्षा अधिक षंढ असल्याचा अहवाल मुंबईचे इंडियन एक्सप्रेस देते. यापैकीचे, केवळ २ टक्के या अवस्थेत जन्मले होते. उरलेल्यांना जबरदस्तीने तसे बनविण्यात आले. एक्सप्रेस नुसार देखण्या मुलांना भुलवून किंवा पळवून नेऊन भारतातील अनेक षंढ बनविणाऱ्या ठिकाणी नेले जाते. तेथे या मुलांवर एक विधी केला जातो ज्यामध्ये ‘राजपुत्राला शोभेल अशा वागणूकीचा’ समावेश आहे आणि शेवटी त्यांच्या अंडकोषाला काढण्यात येते. त्यानंतर या नव्या बनवलेल्या षंढाला एखादा वृद्ध षंढ दत्तक घेतो व त्यांच्यामध्ये “माय-लेकीचा” संबंध प्रस्थापित होतो. या षंढांना स्त्रियांची नावे दिली जातात आणि तेव्हापासून ते स्त्रियांप्रमाणेच वागतात व पोषाख करतात. बहुतेक षंढांना एखाद्या अध्यक्षीय देवता असलेल्या पूजापद्धतीखाली संघटित केले जाते. संपूर्ण भारतात पुष्कळ मंदिरे आहेत जेथे षंढांचा आदर केला जातो व वार्षिक सणादरम्यान ईश्वरी व्यक्ती म्हणून त्यांना पूजले जाते. (g95 1⁄8)