वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १/८ पृ. २२-२४
  • मी माझ्या पालकांच्या आज्ञेत का असले पाहिजे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी माझ्या पालकांच्या आज्ञेत का असले पाहिजे?
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते बंड का करतात
  • बंडखोरपणा मूर्खतेचा का आहे
  • “स्वैराचार” यासाठी मोठी किंमत
  • माझे पालक मला का समजून घेत नाहीत?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • मी माझ्या ‘आईवडिलांचा मान’ का राखावा?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • मला माझ्या पालकांकडून अधिक स्वातंत्र्य कसे मिळवता येईल?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९५
g95 १/८ पृ. २२-२४

तरुण लोक विचारतात. . . .

मी माझ्या पालकांच्या आज्ञेत का असले पाहिजे?

स्टॅन याचे देव-भिरू पालकांद्वारे संगोपन करण्यात आले. परंतु वयाच्या १६ व्या वर्षी त्याने बंड पुकारले. स्टॅन स्पष्टीकरण देतो: “मी लोकांना भेटावे आणि त्यांनी मला स्वीकारावे अशी माझी इच्छा होती. इतरांकडे असणाऱ्‍या सर्व गोष्टी माझ्याकडे असाव्यात असे मला वाटत होते.” मादक पदार्थांचा विक्रेता बनणे हा स्टॅनच्या ध्येयामागील हेतू होता. स्वाभाविकपणे, त्याचे काम आणि घरी आणत असलेली सर्व रक्कम याबाबत त्याला लबाडी करावी लागणार होती. “माझी सदसद्‌विवेक बुद्धी मरण पावली होती,” स्टॅनला आठवते.

जॉन याचा वयाच्या ११ व्या वर्षी खिस्ती या नात्याने बाप्तिस्मा झाला. तो मान्य करतो, “परंतु सत्य माझ्या अंतःकरणाप्रत पोहंचले नव्हते; माझ्या कुटुंबाने माझ्याकडून त्याची अपेक्षा केल्याने मी बाप्तिस्मा घेतला होता. मी माध्यमिक शाळेत प्रवेश केल्यानंतर स्वैराचारी बनत गेलो. रॉक संगीताने सुद्धा माझ्यावर अनिष्ट प्रभाव टाकला. समुद्र किनाऱ्‍यावर होणाऱ्‍या खेळामध्ये मी समाविष्ट झालो आणि बायबल तत्त्वाने मार्गदर्शित नसलेल्या तरुणांबरोबर समुद्र किनाऱ्‍यावर पुष्कळ वेळ घालवू लागलो. तेथे मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ होते.” हे सर्व होण्याआधी त्याच्या पालकांचे घर त्याने सोडले आणि त्याने आत्मसात केलेली जीवनशैली त्याला जे काही शिकविण्यात आले होते त्याच्या अगदी विरोधात होती.

ते बंड का करतात

तरुणांनी त्यांच्या मर्यादा अजमाविण्याचा प्रयत्न करणे आणि स्वावलंबनाच्या प्रमाणात प्रगती करणे हे त्यांच्यासाठी सामान्य आहे. परंतु बंडखोर, अपमानकारक आणि आत्मघाती वर्तन ही संपूर्ण वेगळी बाब आहे. हे कशामुळे चिथावले जाते? निरनिराळ्या प्रकारची अनेक कारणे आहेत. जॉन स्पष्ट करतो, “तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्ही मजा करण्यासाठी संधी शोधत होता. चांगली वेळ घालवण्याची तुमची इच्छा होती.” तथापि, जीवनातील अनुभवाच्या कमतरतेमुळे तरुण प्रत्येक वेळी उत्तम निर्णय घेत नाहीत. (इब्रीयांस ५:१४) त्यामुळे संवेदनशील पालक त्यांच्या मुलांवर वाजवी नियम लादतात—काही तरुण जबरदस्तीचा तीव्रपणे विरोध करतात.

दुःखदपणे, अनेक तरुणांनी त्यांच्या देव-भिरू पालकांकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा धिक्कार केला आहे. (इफिसकर ६:१-४) येशूने सांगितले, की ख्रिस्ती विश्‍वास हा जीवनाचा “अरूंद” आणि “संकोचित” मार्ग असेल. (मत्तय ७:१३, १४) म्हणून अनेकदा, इतर शाळासोबती करत असलेल्या गोष्टी ख्रिस्ती तरुण करू शकत नाहीत. अनेकजण देवाचे नियम कठीण नाहीत याबद्दल गुणग्राहकता बाळगतात आणि निर्बंधांचा स्वीकार करतात. (१ योहान ५:३) खरोखरच, अशाप्रकारचे नियम विवाहापूर्वी गर्भावस्था, मादक पदार्थांचा दुरुपयोग आणि लैंगिक संक्रमणाद्वारे होणारे रोग यासारख्या समस्यापासून तरुणांचे संरक्षण करतात. (१ करिंथकर ६:९, १०) परंतु काही तरुण अशाप्रकारे विचार करण्यास नकार दर्शवितात; त्यांच्या जीवनशैलीला बायबलचे नियम निर्बंधित करतात असे त्यांना वाटते.

तरुणाला जेव्हा वाटते, की त्याचे पालक प्रशासन, खेळ आणि मनोरंजन याबाबतीत अतिशय कठोर आहेत अशावेळी विशेषतः वैमनस्य निर्माण होऊ शकते. एक तरुण मुलगी खेद व्यक्‍त करते, “माझे पालक आमच्याबरोबर फारच कडक वागतात असे मला वाटते.” इतर ख्रिस्ती पालक अनुमती देतात त्या गोष्टींना करण्यास तुम्ही स्वीकृती देत नाही तेव्हा खरोखरच ते निराशाजनक ठरू शकते. (कलस्सैकर ३:२१) काही तरुण त्यांचे नैराश्‍य अवज्ञा करण्याद्वारे अभिव्यक्‍त करतात.

त्याउलट, काही तरुण त्यांचे पालक कोणत्याही ईश्‍वरी तत्त्वांना आदर दाखवित नसल्याकारणाने अवमार्ग आचरतात. जॉन म्हणतो, “बाबा मद्यपी होते; ते प्रमाणाबाहेर पीत असत आणि त्यामुळे आईचे आणि त्यांचे भांडण होत असे. आम्ही त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी अनेकवेळा स्थानांतर केले.” मद्यपी आणि मादक पदार्थांचा गैरवापर करणाऱ्‍या व्यक्‍ती त्यांच्या मुलांच्या गरजांची पुरेशी काळजी घेऊ शकत नाहीत. अशाप्रकारच्या घरांमध्ये तरुणांसाठी अपशाब्दिक तंटे आणि मानखंडना दैनंदिन भाग बनू शकते.

पालकांनी त्यांचा त्याग अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून इतर तरुण बंड करतात. बंड हे जणू त्यांच्या पालकांचे लक्ष वेधण्याचा मार्ग आहे—किंवा त्यांना दुःख देणे. टेलर ही श्रीमंत कुटुंबातील मुलगी म्हणते, “मला जितके मागचे आठवते त्याप्रमाणे माझे पालक सभोवताली कधीही नव्हते, मी एकुलती एक होते आणि तरीदेखील माझे पालक माझ्या सभोवताली अगदी अल्प काळ असत, ते मला नेहमीच पुष्कळ पैसे देत असत.” देखरेखीच्या कमतरतेमुळे टेलरने रात्रीच्या क्लब्स्‌ला उपस्थित राहण्यास आणि मद्यासक्‍त होण्यास सुरवात केली. तिला मद्य प्राशन करून गाडी चालविल्याबद्दल अटक करेपर्यंत तिला समस्या होती याची तिच्या पालकांना जाणीव झाली नाही.

शिवाय, अशाप्रकारची परिस्थिती आहे जिचे वर्णन पौलाने ख्रिश्‍चनांच्या गटाला असे विचारण्याद्वारे केले: “तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला?” (गलतीकर ५:७) अनेकदा, कुसंगती ही एक समस्या आहे. (१ करिंथकर १५:३३) एलिजाबेथ नामक एक किशोरी म्हणते, “मी कुसंगतीमध्ये समाविष्ट झाले.” ती मान्य करते, की समवयस्कांकडून येणाऱ्‍या दबावामुळे तिने, “धुम्रपान आणि मादक पदार्थांचा गैरवापर करण्याचे सुरु केले.” ती पुढे म्हणते: “जारकर्म हा एक नित्यक्रम होता.”

बंडखोरपणा मूर्खतेचा का आहे

कदाचित, तुम्हा स्वतःला निराशेच्या—किंवा अन्यायी परिस्थितीमध्ये असल्याचे देखील आढळून येईल. यामुळे तुमच्या पालकांचा अवमान करण्याचा आणि केवळ तुम्हाला जे काही करावयास आवडते ते करण्याचा मोह होईल. परंतु धार्मिक पुरुष म्हणून ईयोबाला ताकीद देण्यात आली, “आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नको. संभाळ, दुष्टतेकडे वळू नको.”—ईयोब ३६:१८-२१.

द्वेष आणि उपहासात्मक वर्तणूक यामुळे तुमचे पालक प्रतिक्रिया दाखवतील; परंतु ती सुखावह असणार नाही. ते बहुतेककरून तुमच्यावर अधिक निर्बंध लादतील. तसेच अपायकारक वर्तणूकीमुळे तुमच्या पालकांना अपार दुःख होईल. (नीतीसूत्रे १०:१) ते प्रेमळपणाचे आहे का? त्यामुळे तुमची परिस्थिती खरोखरच सुधारेल का? तुमच्याकडे अन्यायी तक्रारी असल्याचे वाटत असल्यास त्या मुद्याविषयी त्यांच्याशी बोलणे हा एक समंजसपणाचा मार्ग आहे.a तुमच्या बरोबर व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये काही तजवीज करण्याची त्यांची इच्छा असेल.

तुमच्या कार्यांचा परिणाम देवावर होऊ शकतो हा विचार करण्यासाठी दुसरा एक मुद्दा आहे. तुम्ही विचाराल, ‘देवावर?’ होय, तुमच्या पालकांच्या विरोधात बंड पुकारणे हे स्वतः देवाच्या विरोधात बंड पुकारण्यासारखे आहे; कारण तुम्ही तुमच्या पालकांचा आदर करा अशी आज्ञा देणारा तोच आहे. (इफिसकर ६:२) देवाला अशाप्रकारच्या अवज्ञेमुळे कसे वाटते? बायबल इस्राएल राष्ट्राविषयी सांगते: “किती वेळा तरी त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली.” त्याचा परिणाम? “त्यांनी . . . त्याला [देवाला] दुःख दिले!” (स्तोत्र ७८:४०) हे साहजिकच आहे, की तुमचे पालक फारच कोंडीत ठेवणारे आहेत असे वाटत असल्याने तुम्ही त्यांच्यावर नाराज व्हाल. परंतु तुमच्यावर प्रेम करणाऱ्‍या आणि सर्वकाळ जगावे अशी इच्छा बाळगणाऱ्‍या—यहोवा देवाच्या हृदयाला खरोखरच दुःख देण्याची तुमची इच्छा आहे काय?—योहान १७:३; १ तीमथ्य २:४.

“स्वैराचार” यासाठी मोठी किंमत

यामुळे आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे ऐकणे हे गरजेचे आहे आणि त्यासाठी एक उत्तम कारण आहे. “स्वैराचार” याच्या खोट्या अभिवचनाद्वारे मूर्ख होऊ नये. (पडताळा २ पेत्र २:१९.) काही तरुणांना त्यांच्या गैरवर्तनामुळे शिक्षा दिली जात नाही असे दिसते. परंतु स्तोत्रकर्ता इशारा दिला: “दुष्कर्म्यांवर जळफळू नको; अन्याय करणाऱ्‍यांचा हेवा करू नको. कारण ते गवताप्रमाणे लवकरच कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.” (स्तोत्र ३७:१, २) बंडखोर तरुण तथाकथित स्वैराचार यासाठी अनेकदा मोठी किंमत मोजतात. बायबल गलतीकर ६:७ मध्ये म्हणते: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”

सुरवातीला वर्णन केलेल्या स्टॅन याचा विचार करा. त्याने आशा केल्याप्रमाणे तो त्याच्या बंडखोर मित्रांमध्ये लोकप्रिय झाला. त्याला आठवते, “मला स्वीकरले असे वाटले.” तथापि, थोड्या काळातच परिस्थितीमध्ये लाक्षणिकरीत्या बदल होऊ लागला. तो म्हणतो, “माझ्यावर गोळी झाडण्यात आली तसेच कैद करण्यात आली होती आणि आता मी करागृहात जात आहे. माझ्याविषयी मी स्वतःला विचारू शकतो, ‘याचा मला काही लाभ झाला का?’ ”

“स्वैराचार” यासाठी असलेल्या जॉनच्या शोधाबद्दल काय? मादक पदार्थ बाळगल्यामुळे अटक केल्यानंतर त्याला खिस्ती मंडळीमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तो कुमार्गामध्ये अधिकच वाहवत गेला. “पैश्‍यांसाठी मी कार चोरी केल्या,” जॉन मान्य करतो. “मी अतिहिंसक होतो.” जॉन याने गुन्हेगारी मार्गाने पुष्कळ पैसे कमावले. परंतु त्याला आठवते, “मी ते सर्व उधळून टाकले. अविश्‍वसनीय प्रमाणात आम्ही मादक पदार्थांचा वापर करत होतो.” जॉन, मारामारी, चोरी करत नसताना किंवा मद्य पीत नसताना देखील पोलिसांपासून दूर पळत होता. “मला अंदाजे ५० वेळा अटक करण्यात आली. सामान्यपणे ते माझ्यावर सबळ आरोप लावू शकले नाहीत; परंतु एकदा मला एका पूर्ण वर्षासाठी अटक झाली.” होय, स्वैराचारी पुरुष झाल्याने जॉनने स्वतःला “सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी” यामध्ये फसल्याचे आढळले.—प्रकटीकरण २:२४.

एलिजाबेथ हिच्याबाबतीत हेच म्हटले जाऊ शकत होते. जगीक मित्रांबरोबरील अनिर्बंध सहवासामुळे तिला कारावास भोगावा लागला. ती मान्य करते: “मी गर्भवती देखील झाले—परंतु माझ्या मादक पदार्थांच्या सेवनामुळे मी बाळ गमावले. मादक पदार्थ माझे जीवन होते—नशेमुळे येणाऱ्‍या अत्यानंदासाठी मी जगत होते. परिणामी, माझ्या अपार्टमेंटमधून मला घालवून देण्यात आले. मी माझ्या पालकांच्या घरी जाऊ शकत नव्हते आणि यहोवाची मदत मागण्यासाठी सुद्धा मला लज्जा वाटत होती.”

तरुणांनी ईश्‍वरी तत्त्वांना धिक्कारल्यामुळे केवळ दुःखद परिणामांना त्यांना सामोरे जावे लागल्याची यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. बायबल ताकीद देते: “तुम्हाला योग्य वाटणारा मार्ग मृत्यूकडे नेऊ शकतो.” (नीतीसूत्रे १४:१२, टुडेज इंग्लिश व्हर्शन) तुम्हाला अन्याय्य वाटणाऱ्‍या निर्बंधासंबंधाने—पालकांच्या विरोधात बंड पुकारण्याऐवजी—चर्चेद्वारे त्यांच्याबरोबर योग्य नातेसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे हे बुद्धिमत्तेचे आहे.

गैर वर्तुणूकीमध्ये पूर्णपणे समाविष्ट झालेले; परंतु त्याची उशिरा जाणीव झालेल्या तरुणांबद्दल काय? पालक आणि देव यांच्यासोबत असणाऱ्‍या त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मार्ग आहे का? आमचा पुढील लेख या प्रश्‍नांची चर्चा करील. (g94 12/22)

[तळटीपा]

a याच्या एकवाक्यतेत अनेक लेखांमध्ये मदतदायी माहिती पुरवली आहे. उदाहरणार्थ, “तरुण लोक विचारतात . . . .”जानेवारी ८, १८८५, ऑगस्ट ८, १९९२ [इंग्रजी] आणि नोव्हेंबर ८, १९९२ या आमच्या अंकातील सावध राहा! लेखांमध्ये पहा.

[२३ पानांवरील चित्र]

पालकांच्या विरोधात बंड केल्याने तुम्हाला अधिक “स्वैराचार” मिळेल; परंतु त्याच्या परिणामांचा तुम्ही विचार केला आहे काय?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा