“धुम्रपानाची दुर्गंधी येते”
अलीकडच्या वर्षांमध्ये आरोग्य सेवेच्या कॅलिफोर्निया विभागाने धुम्रपानाविरूद्ध एक उत्साहपूर्ण शैक्षणिक मोहीम चालू ठेवली आहे. हा संदेश मोजका व सडेतोड आहे व तो संपूर्ण राज्यातील जाहिरातींच्या फलकावर प्रकट होतो. त्यातील काही संदेश कोणते आहेत? “धुम्रपान करणारे व्यसनी आहेत. तंबाखूचे कारखाने लोकांना पुढे लोटणारे आहेत. धुम्रपानाची दुर्गंधी येते.” “धुम्रपान करणाऱ्यांनी सोडलेला धूर धुम्रपान न करणाऱ्या ५०,००० लोकांना या वर्षी ठार मारील. धुम्रपानाची दुर्गंधी येते.” दुसरा एक जाहिरात फलक सिगारेटच्या पाकीटावरील चित्राखाली म्हणतो, “आता खरीदे करा. पैसे नंतर भरा.” होय, तुमचे जीवन गमावण्याची किंमत तुम्हाला भरावी लागेल. स्पॅनिशमध्ये एक चिन्ह असे म्हणते, “मी म्वीरो पोर फुमॉर.” ती शब्दांवर केलेली कोटी आहे ज्याला असे वाचता येऊ शकते, “मला धुम्रपान करण्याची तीव्र इच्छा आहे” किंवा “मी धुम्रपानामुळे खरोखरच मरणाच्या पंथास लागलो आहे.” अर्धी कवटी अर्धे मुख याचे चित्र ही कल्पना अगदीच स्पष्टपणे दाखवते.
लोकांना तंबाखू आणि निकोटीन पासून परावृत्त करण्यासाठी “मृत्यू” नावाचे सिगारेट ब्रॅन्ड ही एक वेगळी युक्ती वापरली जाते. या काळ्या पाकीटावर एक कवटी आणि दोन आडवे ठेवलेल्या हाडांचे चिन्ह आहे आणि त्यावर हा संदेश लिहिला आहे, “सिगारेट व्यसनी व कमजोर करणारे आहेत. तुम्ही धुम्रपान करीत नसाल तर त्याची सुरवात करू नका. करत असाल तर, सोडून द्या.”
जाहिरात फलक शॉक उपचाराच्या इतर युक्त्या आधीपासून धुम्रपान करणाऱ्यांवर काही प्रभाव पाडतात का हे सांगणे अतिशय कठीण आहे. परंतु, मागील सहा वर्षांमध्ये, “कॅलिफोर्नियातील तंबाखूचा वापर राष्ट्रीय सरासरीपेक्षा तीन पटीने म्हणजे, २७ टक्क्यांनी कमी झाला आहे.” (द वॉशिंग्टन पोस्ट नॅशनल विकली एडीशन) भित्तिपत्रकाची ही मोहीम संभाव्य धुम्रपान करणाऱ्यांना देखील या घातक सवयीपासून मागे वळवू शकते. निश्चितच जे ख्रिस्ती असल्याचा दावा करतात त्यांनी या अशुद्ध, स्वार्थी सवयीला टाळलेच पाहिजे. प्रेषित पौलाने लिहिले: “तेव्हा प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.”—२ करिंथकर ७:१. (g95 1/8)