वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 १/८ पृ. २५
  • जगाचे भाग नाहीत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगाचे भाग नाहीत?
  • सावध राहा!—१९९५
सावध राहा!—१९९५
g95 १/८ पृ. २५

जगाचे भाग नाहीत?

जर्मनीमधील सावध राहा! यांच्या प्रतिनिधीकडून

“जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) येशूने या शब्दांद्वारे त्याच्या अनुयायांना राजकारणातील बाबींमध्ये संपूर्ण तटस्थता स्पष्ट केली. तथाकथित ख्रिश्‍चनांना या तत्त्वाची आवश्‍यकता आहे काय?

ख्रिस्ती धर्मजगताचा भूतपूर्व जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक (जीडीआर) राज्यातील समावेश याविषयीच्या मुद्रण अभिप्रायाचा विचार करा आणि हा समावेश १९९० मध्ये हे राज्य बरखास्त होऊन कम्युनिस्ट शासन येईपर्यंत होता.

• “शांतीदायक क्रांतीचा उगम असल्यामुळे जीडीआर मधील ल्यूथर्न चर्चला क्षणिक गौरव प्राप्त झाले असले तरी, त्याच्या लोकांचे प्रमाण जलदरीतीने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या मजबूत आधारासाठी आणि स्टॅसी (राज्य सुरक्षा सेवा) यासाठी खास जागा राखून ठेवल्याचे अनेकांना दिसून आले.”—डाय झाएट, नोव्हेंबर १९९१.

• “चर्च कामगार आणि पॅरिशचे रहिवासी यांचा स्टॅसी मधील समावेशामुळे विविध प्रांतीय ल्यूथर्न चर्च . . . गोंधळून गेले आहेत.”—इव्हँझलाइच कॉमेंटरी, जानेवारी १९९१.

• “पाळक राजकारणामध्ये क्रियाशील असल्याकारणाने ते पूर्वीप्रमाणे त्यांच्या लोकांकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी [ल्यूथर्न] चर्चचे पुढारी ऐकतात.”—श्‍युट्‌डॉयची झीट्यूंग, जानेवारी १९९०.

• “व्हिटझर्स [फिडरल रिपब्लिक जर्मनीचे भूतपूर्व राष्ट्रपती] म्हणाले, की ल्यूथर्न चर्चने जर्मनीच्या दोन्ही राज्यांच्या नातेसंबंधामध्ये नेहमीच सहकार्याची भूमिका बजावली होती.”—व्हिट्‌झर्स स्टूयंगा, जानेवारी १९९२.

ल्यूथर्न चर्चसाठी राजकीय लुडबूड यासाठी कोणतीही सीमा नव्हती. “वस्तुतः प्रत्येक [प्रॉटेस्टंट] चर्चच्या गटावर स्टॅसी प्रतिनिधींचा परिणाम झाला आहे,” असा अहवाल द युरोपियन या वृत्तपत्राने दिला. मॅनफ्रेट स्टॉल्प याचे द युरोपियन वृत्तपत्राने “कम्युनिस्ट अधिकाऱ्‍यांबरोबर बोलणी करणारा प्रॉटेस्टंट चर्चचा प्रमुख,” असे वर्णन केले आहे. स्वतःच्या संरक्षणार्थ तो म्हणतो, “आपले ध्येय साध्य होण्यासाठी मी दियाबलाशी देखील हस्तांदोलन केले असते.”

पाळक आणि इटलीमधील माफीया यांच्या नजीकच्या नातेसंबंधाविषयी गार्डीयन या इंग्लडच्या वृत्तपत्राने अहवाल सादर केला. त्याने म्हटले: “चर्च आणि कोसा नॉस्ट्रा हे फार काळापासून शांतीने एकत्रित असल्यामुळे चर्चवर गुन्हेगारीतील साथीदार असा आरोप वारंवार केला आहे.”

टोरोन्टो स्टार या वृत्तपत्राने रशियन कर्मठवादी पाळकांचे भूतपूर्व केजीबी याबरोबर असणाऱ्‍या सहकार्यावर लेख प्रकाशित केला. अहवाल म्हणतो: “कम्युनिस्ट राज्याबरोबर चर्चचे सहकार्य उघड झाल्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम झाला. . . . या संदर्भातील केजीबी अहवाल दाखवतो की, चर्चच्या वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनी केवळ स्वतःच्या तत्त्वांशी विश्‍वासघात केला नाही तर धार्मिक नेत्यांचा स्वेच्छेने अनादर करण्यास देखील ते तयार होते.”

ख्रिस्ती धर्मजगताचे चर्च राजकारणामध्ये लुडबूड करत आहे परंतु खरा ख्रिस्ती विश्‍वास येशूने जगाचे भाग न होण्याच्या सल्ल्यास जडून राहतो. (g95 1/8)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा