वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g94 ४/८ पृ. १६
  • नीटनेटका पाणबुड्या पक्षी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नीटनेटका पाणबुड्या पक्षी
  • सावध राहा!—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • “जंगलातला सर्वात सुंदर पक्षी”
    सावध राहा!—२०००
  • भव्य स्तंभ
    सावध राहा!—२००७
सावध राहा!—१९९४
g94 ४/८ पृ. १६

नीटनेटका पाणबुड्या पक्षी

“नीटनेटका” हे पाणबुड्याचे अगदी उचित वर्णन देते. त्याचा अर्थ, ‘नीट व ठाकठीक स्वरुप असलेला व हालचाली व पद्धतींमध्ये जागृत व जिवंतपणा असलेला.’ तुम्हाला अधिक सभ्य स्वरुपाचा शब्द हवा आहे तर, तुम्हाला त्याचे सिंक्ल्स सी. गुलॅरीस हे लॅटिन नाव वापरता येईल.

प्रथम, इंग्लंडच्या उत्तरेकडे, खळखळ वाहणाऱ्‍या ओढ्याच्या पाण्यातील मोठ्या खडकावर बसलेला मी त्याला पाहिले. चोचीच्या टोकापासून शेपटीच्या टोकापर्यंत त्याची लांबी केवळ १८ सेंटीमीटर होती. त्याने गर्द चॉक्लेटी पिसांचा निर्मळ पोषाख घातला होता. त्याच्या चोचीच्या खालून छातीच्या अर्ध्या भागापर्यंत त्याच्यावर एक स्वच्छ पांढरे लाळेरे होते. ते खडकावरील ओल्या हिरव्या शेवाळ्याच्या अगदीच विरुद्ध होते.

धबधब्याची गर्जना व पाण्याच्या उसळण्याकडे दुर्लक्ष करून, त्याच्या नावाप्रमाणेच, पायांना बिजागरी असल्याप्रमाणे उभे राहून हा पक्षी त्याचे डोके बुडवत होता व वाकवत होता. अचानक त्याने पाण्यात सूर मारला व तळाशी “उडत” गेला. मग अन्‍नाच्या शोधात तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालू लागला. कोशांतील किडे, पाण्यातील भुंगेरे, पाण्यातील लहान किडे, कोळी, डिंभक व माशी किंवा पतंगांची डिंभे व कधीकधी लहान माशे हे त्याचे अन्‍न आहे. असे करत असताना, पाणबुड्याच्या डोळ्यांची तिसऱ्‍या पापणीने रक्षा केली जाते. जमिनीवर असताना, डोळ्यावर ही पापणी फडफडत असताना कधीकधी दिसते. त्यामुळे तो पक्षी जणू डोळा मारत आहे असे वाटते.

पाणबुड्याच्या पाठीचा तिरकस आकार असा असतो की ज्यामुळे, वाहणाऱ्‍या पाण्याचा प्रवाह त्याचे डोके खाली ठेवण्यात मदत देते. त्याच्या शरीराच्या नैसर्गिक तरंगण्याच्या शक्‍तीच्या उलट प्रयत्न करण्यात मदत करण्यासाठी तो त्याच्या पंखांचा उपयोग देखील करतो. वेळोवेळी हवा घेण्यासाठी तो पाण्याच्या वर येतो व पाण्यावर तरंगतो किंवा त्याचे पाय पातळ कातडीने जोडलेली नसतात तरी, तो पोहतो. तो परत त्याच्या खडकावर येतो तेव्हा, ओढ्यात जाण्याआधी तो जितका निर्मळ होता तसाच दिसतो!

मी न्याहाळत असलेल्या पाणबुड्याचा अन्‍नाचा शोध नक्कीच संपला होता. तो त्याच्या पिल्लांना खाऊ घालण्यास परतला होता. त्याचे शेवाळीने तयार केलेले घरटे सुरेख घुमटाकाराचे असते. सुकलेल्या गवताच्या धाग्यांनी, ते खडकांवर, झाडांच्या मुळ्यांखाली व खडकांच्या खाचेत किंवा लोंबत्या नेचाच्या खाली शिवलेले असते. परंतु, ते घरटे इतक्या चांगल्या तऱ्‍हेने लपले जाते की त्याच्याखाली उभे राहून देखील ते तिथे असल्याची जाणीव होत नाही. मी काही काळासाठी या पक्ष्याच्या घरट्याचा शोध घेतला परंतु ते व्यर्थ ठरले.

मग, मी पाहातच होतो एवढ्यात, एका झटक्यात तो पाणबुड्या सरळ धबधब्यात उडाला! धबधब्याच्या पाठीमागे पाहण्यासाठी मी हळूहळू ओढ्याच्या किनाऱ्‍यावरून चालू लागलो. धबधब्याच्या मागील बाजूच्या खडकावरील एका चिरेत त्याने घरटे बांधले होते. त्याच्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी या पक्ष्याला पाण्यातून उडत जाताना पाहणे किती आकर्षक दृश्‍य होते!

ह्‍या नीटनेटक्या लहान पाणबुड्याने माझा दिवस अविस्मरणीय बनवला.—सौजन्याने. (g94 3/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा