वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-4 पृ. ३२
  • “सहिष्णुतेचा धडा शिकणे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सहिष्णुतेचा धडा शिकणे”
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • मिळती जुळती माहिती
  • स्वातंत्र्यांचे संरक्षण—कसे?
    सावध राहा!—१९९९
  • सहिष्णुता एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत
    सावध राहा!—१९९७
  • सहनशील असणं म्हणजे नेमकं काय?
    सावध राहा!—२०१५
  • देव किती सहनशील आहे?
    सावध राहा!—२००२
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
gbr13-4 पृ. ३२

“सहिष्णुतेचा धडा शिकणे”

आम्ही २०व्या शतकाच्या शेवटाजवळ येत असता, १९१४ पासूनच्या हिंसक इतिहासातून सर्वसामान्यपणे मानवजातीने कोणते धडे शिकलेत का? द युनेस्को कुरियरसाठी एक लेख लिहित असताना, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक, ॲण्ड कल्चरल ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल, फेडेरिको मॉयोर हे इतके आशावादी नव्हते. “ज्या जगाचा उदय पाहता येतो . . . तो मनापासून आवेश प्रेरित करत नाही. स्वातंत्र्याच्या सुगाव्याने द्वेषाच्या निखाऱ्‍यांना पुन्हा प्रज्वलित केले आहे: धार्मिक मूलतत्त्वे, राष्ट्रीयवाद, वंश आणि मानववंशासंबंधी कलुषितपणा, ज्यूविरोधवाद. . . . जुने व्यवस्थिकरण कोसळल्यामुळे सर्व प्रकारच्या नव्या स्वयंकर्तृत्त्वासाठी क्षेत्र मोकळे झाले आहे, ज्यामध्ये काही अती गोंधळलेले आहेत—व हिंसेची पोकळी जोमाने वाढत चालली आहे.”

हिंसा इतक्या जोमाने का वाढत चालली आहे? केवळ धर्मभेद वा मानव-वंशभेदांमुळे लोक एकमेकांचा द्वेष करून खून का करतात? पूर्वीच्या युगोस्लावियात, भारतात, उत्तरेकडील आयर्लंडमध्ये, अमेरिकेत किंवा जगाच्या कोणत्याही भागात असो, चुकीच्या माहितीचे शिक्षण हेच याचे मूळ कारण आहे. परस्पर सहिष्णुता व आदर शिकण्याऐवजी, लोक त्यांच्या पालकांकडून, त्यांच्या शाळांतून, सर्वसामान्य समाजातून अविश्‍वास व द्वेष करण्याचे शिकलेत.

फेडेरिको मॉयोर पुढे म्हणतात: “गरिबी, भूक आणि लाखो मानवजातींचे दुःख, या असहाय गोष्टी आम्हाला सहन करावयास लावणाऱ्‍या त्या साशंक सहिष्णुतेचा आपण तिटकारा करू या. असे केल्यावर, दयेच्या आणि बंधुत्वाच्या सूर्यप्रकाशाच्या ऊबेला आम्ही सामोरे जाऊ.” ह्‍या उदात्त भावना आहेत. परंतु आमच्या प्रकाशमय म्हणविणाऱ्‍या जगाचा मूलगामी अंधकारमय आत्मा बदलविण्यासाठी कोणते व्यावहारिक माध्यम अस्तित्त्वात आहे?

यशयाने, २,५०० वर्षांपूर्वी यहोवाचे हे शब्द लिहिले: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून [यहोवा, न्यू.व] शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.” (यशया ५४:१३) “देव प्रीती आहे” यामुळेच, त्यापाठोपाठ जे त्याच्या तत्त्वांनुसार वास्तविकपणे जीवन जगतात ते युद्ध नव्हे तर शांती; द्वेष नव्हे तर प्रीती; असहायता नव्हे तर सहिष्णुता शिकतील.—१ योहान ४:८.

लोकांना, शांती, प्रेम व सहिष्णुतेकडे निरविणाऱ्‍या शिकवणी कोण चेतवित आहेत? त्यांच्या राष्ट्रीय उगमाकडे दुर्लक्ष करून ऐक्यतेत राहणारे कोण आहेत? असे कोण आहेत ज्यांना पवित्र शास्त्राचे शिक्षण मिळाले आहे, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन द्वेषाच्या भावनेपासून प्रेमाच्या भावनेत बदलला आहे? यहोवाच्या साक्षीदारांची जगव्याप्त ऐक्यता का आहे याचा शोध काढण्यासाठी त्यांच्या शिकवणी आणि चालीरितींचे परीक्षण करण्यास आम्ही आपल्याला शिफारस करत आहोत.—योहान १३:३४, ३५; १ करिंथकर १३:४-८. (g93 9/8)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा