तरुण लोक विचारतात . . .
मी व्यसनाधीन झालो आहे! मी जुगार खेळणे कसा थांबवू शकेन?
“मी १३ वर्षांचा होतो, तेव्हापासून जुगाराच्या यंत्राबरोबर खेळू लागलो,” असे डेवीड कबूल करतो. “मी अशा स्थितीपर्यंत पोंहाचलो की मनोरंजनाच्या दुकानात जुगाराच्या यंत्रावर जुगार खेळल्याशिवाय मला पुढील रस्ता ओलांडता येत नव्हता.” पूर्वी जुगारी असलेला थॉमस नावाचा आणखी एकजण म्हणतो, “माझी सवय चालू ठेवण्यासाठी मी माझ्या मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर आणि कामकऱ्यांबरोबर खोटे बोलू लागलो. मी कशावरही जुगार खेळू लागलो.”
डेवीड आणि थॉमस दोघेही ख्रिस्ती म्हणून वाढले होते. दोघेही जुगारीच्या व्यसनाधीन झाले—घातक जुलूमाला बळी पडले. संशोधक म्हणतात की युवकांना जुगारीमध्ये आकर्षित करणाऱ्या कावेबाज कृत्याला आज युवकांची भयंकर संख्या बळी पडली आहे. टाईम मासिक म्हणते: “जुगारावर संशोधन करणारे म्हणतात की अमेरिकेमधील अंदाजे, जबरदस्तीने खेळणाऱ्या ८ दशलक्ष जुगाऱ्यांपैकी, पूर्ण १ दशलक्ष युवक आहेत.” काहींचा असा विश्वास आहे की अमेरिकेमध्ये, ४ ते ६ टक्क्यांपासून सर्व युवकांना जुगारीचा रोग लागला आहे.
ह्या वाईट सवयीच्या अनेक प्रकारांचा युवक पाठलाग करतात. जपान मध्ये, लहान मुलांना पैज लावण्यास मना करणारे कडक नियम असूनही, मायीनिची डेली न्यूज नुसार, युवकांची “घोड्यांची शर्यत खेळणे तसेच पैज लावून जुगार खेळणे यातील उपस्थितीमध्ये उल्लेखनीय वाढ होत आहे आणि त्याचा वाढता कल भीतीजन्य बनत आहे.” लॉटरी खेळणे, खेळाच्या कार्यक्रमावर पैज लावणे, व पत्ते खेळणे यासर्व गोष्टी पैज लावण्याच्या ह्या आकांक्षेच्या स्वाधीन होण्याचा युवकांमधील हा प्रचलित मार्ग आहे.
जुगारीचे व्यसन —त्याचे परिणाम
गॅम्बलर्स ॲनॉनमस नावाची एक संस्था जी जुगाऱ्यांना त्यांच्या सवयीवर मात करण्यास मदत करते, त्या संस्थेचे एक सदस्य गॉर्डन मूडी असे म्हणतात: “सुरवातीला, [जुगार] हा एक नवा सुंदर अनुभव असतो, जसे की कशाचा तरी शोध लावणे किंवा प्रेमात पडणे. . . . सहजपणे खेळणे आनंददायक व आकर्षित आहे.” (क्वीट कंपलसीव गॅम्बलींग) होय, लागोपाठ यशाचा अनुभव घेणे व ॲड्रनलाईनमुळे आनंदाची शिरशिरी येणे अनेकांसाठी चेतना देणारे असते. पण नेहमीच तुमचा हेतू सफल होणार नाही. परिणामी, तो जुगारी हरतो. आणि आता कर्ज व आर्थिक हानी ही त्याच्या समस्यांची नुसती सुरवात होते.
खेळाचे हे व्यसन, व्यसनाधीन करणाऱ्या एका वस्तूप्रमाणे, अगणित आध्यात्मिक, मानसिक आणि नैतिक हानी करू शकते. गॉर्डन मूडी म्हणतात त्याप्रमाणे ते तुमच्यामध्ये, “कावेबाजपणा जो . . . परिणामी, तुम्हाला एक दास बनवेल” ते उत्पन्न करू शकते. प्रेषित पौलाच्या शब्दांची आम्हाला आठवण करून दिली जाते: “आज्ञापालना करिता ज्याला तुम्ही स्वत:स गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे गुलाम आहा हे तुम्हाला ठाऊक नाही काय?” (रोमकरांस ६:१६) ह्याच वचनाचे भाषांतर जे. बी. फिलिप्स अशा प्रकारे करतात: “ज्याच्या आज्ञा पाळावयाचे तुम्ही निवडता, त्याच्या अधिकाराखाली तुम्ही येता.” तुम्ही ज्यावर संयम ठेवू शकत नाही अशा जुलमी सवयीच्या अधीन होण्याची जरा कल्पना करा!
एका युवकाने त्याच्या सवयीला भागविण्यासाठी नेहमी लबाडी, कावेबाजपणा, आणि चोरी यांचा अवलंब केल्यामुळे, त्याच्या कौटुंबिक नातेसंबंधाला देखील त्रास सहन करावा लागतो. ब्रिटिश मासिक यंग पिपल नाउ असे परीक्षण करते: “तुम्ही प्रेम करत असलेल्या लोकांना व जे तुम्हावर प्रेम करतात अशांसाठी तुम्ही एक चोर, एक खोटारडे, आणि लोढणे झाला आहात हे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा स्वतःविषयीचे तुमचे चांगले मत वाईट होते.” यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही जेव्हा, द हावर्ड मेंटल हेल्थ लेटरने असा अहवाल दिला की सक्तीने खेळणाऱ्या जुगाऱ्यांचा “अतिशय खिन्नता, अस्वस्थ करणाऱ्या चिंता,” यांच्याकडे कल जातो व “पचनांच्या समस्या, निद्रानाश, डोके दुःखी, मानसिक ताण, अस्तमा, पाठ दुःखी, आणि छातीत वेदना,” या सर्व शारीरिक समस्या त्यांच्यात असतात.
तथापि, या सर्वांमधील नाशकारक परिणाम म्हणजे, एखाद्याच्या आध्यात्मिकतेची हानी. पवित्र शास्त्र लोभ आणि द्रव्याच्या लोभाचा धिक्कार करते. (१ करिंथकर ५:१०, ११; १ तीमथ्य ६:१०) कोणत्याही व्यसनाप्रमाणेच, सक्तीने जुगार खेळणे “देहाची आणि आत्म्याची अशुद्धता” आहे. (२ करिंथकर ७:१) तुम्ही जितके जुगार खेळाल, तितकेच तुम्ही तुमच्या विवेकाचा आणि देवाबरोबर असलेल्या तुमच्या नातेसंबंधाचा नाश करता.—पडताळा १ तीमथ्य ४:२.
त्याग करण्याची इच्छा
ह्या दुर्गुणासारख्या सवयीच्या पकडीला तुम्ही कसे सोडवू शकाल? सर्वात प्रथम, त्याग करण्याची तुमची खरोखरची इच्छा असली पाहिजे. लीझ हॉजकीनसन त्यांच्या ॲडिकशन्स ह्या पुस्तकात अशा म्हणतात की, “व्यसनाधीन झालेला जोपर्यंत बदलू इच्छित नाही तो पर्यंत व्यसनावर मात करता येणे शक्य नाही.” याचाच अर्थ “वाईटाचा द्वेष” करण्यास शिकणे, जुगारीचा तिरस्कार करणे होय. (स्तोत्रसंहिता ९७:१०) ते कसे? त्याच्यातून येणाऱ्या सुखाचा नव्हे तर, त्याच्या परिणामांचा विचार करणे. “पापाचे क्षणिक सुख भोगणे”—कोणतातरी खेळ जिंकण्याचा आनंद मिळविणे—व अनंतकालचे जीवन गमावणे योग्य असेल का? (इब्रीकरास ११:२५) ह्या गोष्टींवर विचार केल्याने त्याग करण्याचा निश्चय करण्यास तुम्हाला मदत होईल.
तथापि, संशोधक लीझ हॉजकीनसन असे लिहितात: “कोणत्याही प्रकारचे व्यसन इतके रुजलेले असू शकते की ते काढून टाकणे एखादा अवयव काढण्यासारखे आहे.” परंतु येशू म्हणाला: “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.” (मत्तय ५:२९) देवाबरोबर तुमच्या नातेसंबंधाला जी गोष्ट घातक आहे तिला तुमच्या जीवनामधून काढून टाकली पाहिजे!
आत्मसंयम विकसित करणे असा याचा अर्थ होतो. प्रेषित पौलाच्या वारंवार होणाऱ्या इच्छांना त्याने त्याच्यावर ताबा मिळविण्यास परवानगी दिली असती, परंतु त्याच्या इच्छांचा गुलाम होण्यास त्याने नकार दिला. तो म्हणाला: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथकर ९:२७) तुमच्या इच्छांना तुमच्यावर ताबा मिळवू न देता तुम्हीही स्वतःबरोबर लढण्यास शिकले पाहिजे.
समस्येच्या मुळाशी जाणे
तथापि, ह्या युद्धावर विजय मिळवण्यासाठी इच्छाशक्ती पेक्षा आणखी काही जरूरीचे आहे. व्यसन नेहमी मुळावलेल्या समस्यांना प्रतिबिंबित करतात. सक्तीने जुगार खेळणाऱ्या डीक नावाच्या व्यक्तीने म्हटले: “माझे बालपण फार असाधारण होते. माझ्या कुटुंबामध्ये अजिबात प्रेम नव्हते. . . . माझा नेहमी अपमान केला जात असे. स्वतःविषयी माझे चांगले मत नव्हते.” ह्या तणावाच्या परिणामातून बाहेर पडण्याचा त्याच्या जवळ केवळ एक मार्ग होता व तो म्हणजे जुगार खेळणे.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामधील अनेक व्यसनांचा संबंध, मुलांना देण्यात येणारी वाईट वागणूक आणि दुर्लक्ष यासारख्या मानसिक आघाताबरोबर येतो. कोणतीही परिस्थिती असली तरी, तुमच्या समस्येच्या अगदी मुळाशी गेल्याने त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. स्तोत्रकर्त्याने अशी प्रार्थना केली: “हे देवा [यहोवा न्यू.व.] माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्याठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.” (स्तोत्रसंहिता १३९:२३, २४) एका प्रौढ ख्रिश्चन व्यक्तीसोबत, कदाचित मंडळीतल्या वडिलांबरोबर, तुमच्या अस्वस्थ विचारांबद्दलची चर्चा केल्याने, तुम्ही जुगार का खेळता व तुमच्या विचारांना आणि वर्तणूकीच्या नमुन्याला बदलविण्यासाठी तुम्ही काय करावे हे समजण्यास कदाचित तुम्हाला मदत मिळेल.a
“काहीतरी उत्तम”
क्वीट कंपलसीव गॅम्बलींग या पुस्तकानुसार, त्याग करणे म्हणजे, “ह्या झगड्यामध्ये पहिलेच पाऊल समस्येच्या विरूद्धतेत लढणे होय.” तुमच्या राहणीमानात देखील जोरदार बदल करण्यास हवेत. फिरून पुन्हा त्याच सवयीकडे जाण्याचे टाळण्यासाठी, तुम्ही पूर्वीच्या जुगारी साथीदारांना टाळले पाहिजे, आणि जुने जुगारीचे अड्डे जसे की करमणुकीचे ठिकाण, पैज लावून खेळण्यात येणारे बिल्यर्ड खेळ आणि अशाच इतर काही ठिकाणी जाणे टाळा. (नीतीसूत्रे १३:२०) याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही स्वतःला एकलकोंडी करायचे. (नीतीसूत्रे १८:१) ख्रिस्ती मंडळीमध्ये सुदृढ आणि सहकार्य देणारे मित्रत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करा. फायदेकारक कामात, आध्यात्मिक कार्यात, आणि हितकारक मनोरंजनात स्वतःला मग्न ठेवा.
तथापि, हॉजकीनसन याची आठवण करून देतात की व्यसनाधीन झालेली व्यक्ती, “व्यसनाला पूर्ण करण्याच्या विचारापेक्षा जीवनामध्ये आणखी काही तरी आहे—याच्या पलिकडे काहीतरी उत्तम आहे असे तिला कळते—तेव्हाच ती ही लढाई जिंकू शकते.” तर मग, पवित्र शास्त्र जी आशा देते त्यापेक्षा उत्तम काय असू शकेल?
रॉडी नावाच्या एका गृहस्थाला त्याच्याबाबतीत खरेच असे जाणवले. तो स्वतःबद्दल असे वर्णन देतो की त्याने किशोर वयात जुगार खेळण्याची सुरवात केली, तो २५ वर्षांसाठी “पूर्णपणे व्यसनी जुगारी” होता. रॉडीने—घोड दौड, कुत्र्यांची शर्यत, फुटबॉल खेळाच्या अंतिम परिणामावर जुगार खेळणे, करमणुकीच्या ठिकाणी जाऊन जुगार खेळणे यासारखा सर्व प्रकारचा जुगार खेळून पाहिला होता. परंतु त्यानंतर तो यहोवाच्या साक्षीदारांकडून शिकलेल्या देवाच्या वचनातील सत्याचा अवलंब करू लागला. रॉडी म्हणतो, “केवळ तीन महिन्यात, एक विलक्षणीय रूपांतर घडले.” त्याने जुगार खेळण्याचे सोडून दिले, आणि आज तो ख्रिस्ती मंडळीमध्ये एक वडील या नात्याने काम करत आहे.
तथापि, कदाचित, तुम्हाला पवित्र शास्त्राच्या शिकवणींचे थोडेफार ज्ञान असेल. लेखाच्या सुरवातीला नमूद केलेल्या डेवीड आणि थॉमस प्रमाणेच, आतापर्यंत तुम्ही पवित्र शास्त्राचे सत्य आपलेसे करण्यास अयशस्वी झाला असाल. असे आहे तर, “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून” घेऊन पवित्र शास्त्राचा गंभीरपणे अभ्यास का करत नाही? (रोमकरास १२:२) ते जे काही शिकत होते त्याचा अवलंब करण्यास व खरा विश्वास आणि खात्री वाढविण्यास सुरवात केल्यावर डेवीड आणि थॉमस जे सक्तीने जुगारी बनले ते यावर मात करू शकले. तुम्हीही करू शकता!
पवित्र शास्त्राच्या अभ्यासाचे तुम्ही स्वतःहून अवलंबन केल्याने भवितव्यासाठी असलेली पवित्र शास्त्राची आशा—जुगारापेक्षा काही तरी उत्तम—तुमच्यासाठी अधिक वास्तविक अशी होईल. त्याचबरोबर, देवासोबत एक व्यक्तिगत नातेसंबंध जोडण्यासाठी तुम्हाला मदत होईल. यास्तव, तो तुमच्या भावना ओळखतो या आत्मविश्वासाने, मदतीसाठी मोकळ्या मनाने त्याला “निरंतर प्रार्थना” करू शकता. (१ थेस्सलनीकाकर ५:१७; स्तोत्रसंहिता १०३:१४) सक्तीने खेळाव्या लागणाऱ्या जुगाराविरूद्ध लढण्यासाठी लागणारी शक्ती तो तुम्हाला तुमच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नांना प्रतिफळ देण्याद्वारे देईल.—गलतीकर ६:९; फिलिप्पैकर ४:१३. (g93 8/8)
[तळटीपा]
a मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील अनेकजण असा विश्वास करतात की व्यसनयुक्त सवय सोडण्यासाठी व्यवसायिक सल्ल्याची गरज आहे. जर एखादी ख्रिस्ती व्यक्ती पवित्र शास्त्र तत्त्वांच्या विरूद्ध नसलेली उपचारपद्धती निवडते, तर हा पूर्णपणे व्यक्तिगत निर्णय आहे.
[२५ पानांवरील चित्र]
त्यांची सवय भागविण्यासाठी जुगारी नेहमी लबाडी, कावेबाजपणा, आणि चोरी यांचे अवलंबन करतात