पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन
“नवा करार” यहूद्यांविरूद्ध आहे का?
एका अमेरिकन सुवार्तिकाने एकदा असे म्हटले: “संघटनात्मक चर्चने त्याच्या इतिहासाच्या बहुतेक काळात पाप केले आहे आणि यहूद्यांच्या विरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांसाठी न्यायाच्या दरम्यान पुष्कळ जाब द्यायचा आहे.”
यहूद्यांचा विरोध, हा इतका लांब आणि विचित्र इतिहास २० व्या शतकापर्यंत तसाच चालत का आला आहे? काहीजण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने, म्हणजेच ज्याला “नवा करार” म्हणतात त्याला दोष देतात. उदाहरणार्थ, हार्वड डिविनीटी स्कूलचे वरिष्ठ अधिकारी, ख्रिस्टर स्टेनडेल, यांनी असा दावा केला: “की . . . नव्या करारातील म्हणी, यहूद्यांविरूद्धचा द्वेष याला ‘ईश्वरी’ अधिकृत अनुज्ञा आहे जी प्रचलित व सर्वसामान्यपणे स्वीकारली जाणारी वास्तविकता आहे.” याला सर्वसामान्यपणे स्वीकारले जात असले तरी, ते खरोखरच सत्य आहे का?
येशूच्या मरणाचा दोष कोणास दिला जात होता?
यहूद्यांविरूद्ध असलेला “नवा करार” याच्या पुराव्यासाठी एका उताऱ्याचा म्हणजे मत्तय २७:१५-२५चा नेहमी संदर्भ घेतला जातो. तेथे आम्हाला असे सांगितले जाते की यहूदी जमावाने येशूला खिळून टाकण्याची मागणी रोमी सुभेदार पंतय पिलाताला केली, ते असेही ओरडू लागले: “त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलाबाळांवर असो.” तर मग, पहिल्या शतकातील सर्वच यहूदी येशूच्या मरणासाठी जबाबदार होते आणि चिरकालापर्यंत यहुद्यांना “ख्रिस्ताला मारणारे” असे संबोधले जावे असे नवा करार येथे शिकवत आहे का?
सर्वात प्रथम, येशूच्या सेवाकार्याच्या वेळेस बहुतेक यहूद्यांची प्रतिक्रिया काय होती? “नवा करार” प्रकट करतो की यहूदी जमावासोबत येशू खूप परिचित होता, विशेषकरून गालिलामध्ये जेथे त्याने जास्त प्रमाणात त्याची सेवा केली. (योहान ७:३१; ८:३०; १०:४२; ११:४५) त्याच्या अटकेच्या आणि न्यायदंडाच्या केवळ पाच दिवसांआधीच, एका यहूदी जमावाने मशीहा म्हणून यरूशलेमेत त्याचे स्वागत केले.—मत्तय २१:६-११.
तर मग, येशूला, कोण ठार मारू इच्छित होते? “नवा करार” यात असे लिहिले आहे की येशू मुख्य याजक आणि अनेक परुशी व सदूकी यांच्यासोबत अपरिचित नव्हता कारण त्याने त्यांचा दांभिकपणा उघड केला होता. (मत्तय २१:३३-४६; २३:१-३६)a प्रमुख याजक कयफा हा येशूच्या विरोधकांमधला मुख्य होता. येशूने मंदिरामधील सराफांचे चौरंग उलथून टाकले तेव्हा त्याला व्यक्तिगत आर्थिक हानी झाली यात काही संशय नाही. (मार्क ११:१५-१८) यासोबतच, येशूचा यहूदी जमावाबरोबरचा परिचय कालांतराने रोम्यांकडून विरोध आणि त्याच्या सत्तेच्या व्यक्तिगत हानीकडे निरवू शकत होता याबद्दल कयफा घाबरत होता. (योहान ११:४५-५३) यास्तव, मुख्य याजक आणि इतर धार्मिक नेत्यांनी येशूला मारण्याचा कट केला व न्यायासाठी त्याला रोमी न्यायालयाकडे सोपवून दिले. (मत्तय २७:१, २; मार्क १५:१; लूक २२:६६–२३:१) यहूदी जमावासोबतच्या येशूच्या परिचयाने त्याला त्याच्या मृत्यूकडे निरविले हे किती उपरोधक आहे!
येशूच्या लोकप्रियतेचा विचार करता, एक यहूदी जमाव त्याच्या मृत्यूसाठी इतका आरडाओरडा कसा करेल? येशूला आधार देणारे बहुतेककरून गालिली होते, म्हणून जो जमाव त्याला ठार मारू इच्छित होता ते कदाचित यहूदी असू शकतील. गालिली लोक मायाळू, नम्र, आणि प्रामाणिक स्वभावाचे होते, परंतु यहूदी लोक गर्विष्ठ, श्रीमंत, आणि खासकरून यरूशलेमेत उच्च शिक्षित होते. सार्थपणे, मत्तय प्रकट करतो की “मुख्य याजक व वडील” यांनी जमावाला चेतवले होते. (मत्तय २७:२०) अशा प्रकारे चेतवण्यासाठी, त्यांनी जमावाला कोणती असत्य गोष्ट सांगितली असावी? येशूच्या परीक्षेच्या वेळी आणि पुन्हा येशूच्या न्यायाच्यावेळी समोर मांडलेली हीच ती असत्य गोष्ट होती का की तो मंदिराचा नाश करणार होता?—मार्क १४:५७, ५८; १५:२९.b
समाजाची जबाबदारी
जर हा यहूदी जमाव पूर्णपणे यहूदीयांचा नव्हता तर, काही ५० दिवसांनंतर, यरूशलेमेमध्ये, सप्ताहांच्या सणाला जमलेल्या यहूदीयांच्या मोठ्या लोकसमुदायाशी बोलताना प्रेषित पेत्र असे का म्हणाला की: “तुम्ही त्याला [येशूला] धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले”? (प्रे. कृत्ये २:२२, २३) येशूच्या न्यायदंडाकडे निरविणाऱ्या घटनांशी जवळजवळ बहुतेकांचा संबंध येत नव्हता हे पेत्राला नक्कीच माहीत होते. तर मग, पेत्राचा असे बोलण्याचा काय अर्थ होता?
शास्त्रवचनांनुसार, एक अज्ञात रक्तपात, केवळ त्या खुन्यावरच नव्हे तर जो समाज त्याला न्याय देण्यास अयशस्वी होतो त्यालाही दोषी ठरवतो. (अनुवाद २१:१-९) उदाहरणार्थ, रक्तपाताचा दोष असणाऱ्या एका गटाला शिक्षा देण्यास अपयशी झाल्याने, बन्यामिनाच्या सर्व कुळाचा रक्तदोषी म्हणून न्याय करण्यात आला होता. त्या कुळातील अनेक लोक खुनामध्ये थेटपणे सहभागी नसले तरी, हा गुन्हा सहन केल्यामुळे, ते त्याकडे दुर्लक्ष करून सूट देत होते आणि अशारीतीने काहीप्रमाणात जबाबदार होते. (शास्ते २०:८-४८) खरोखर, असे दिसते की, “मौनता संमती दर्शविते.”
याचप्रकारे, पहिल्या शतकातील यहूदी राष्ट्राने त्यांच्या रक्तदोषी पुढाऱ्यांच्या गुन्ह्याला मुकाट्याने संमती दिली. मुख्य याजक आणि परूश्यांच्या खुनी कृत्याला सहन केल्याने, संपूर्ण राष्ट्र जबाबदार ठरले. या कारणास्तव, पेत्राने त्याच्या यहूदी श्रोत्यांना पश्चाताप दाखवण्यासाठी याचा उल्लेख केला यात काही संशय नाही.c
येशू हा मशीहा आहे याचा धिक्कार केल्याचे कोणते परिणाम होते? येशू यरूशलेम शहराला संबोधून म्हणाला: “तुमचे घर [मंदिर] तुम्हांवर सोडले आहे.” (मत्तय २३:३७, ३८) होय, देवाने त्याचे संरक्षण त्यांच्याकडून काढून घेतले, आणि यानंतर रोमी सैन्याने मंदिरासकट यरुशलेमेचा नाश केला. एखाद्या माणसाने त्याची सर्व मालमत्ता उधळून टाकल्यानंतर त्याच्या कुटुंबाला होणाऱ्या परिणामांबद्दल ज्याप्रमाणे वाटेल त्याचरीतीने ज्यांनी येशूच्या मृत्यूची मागणी केली होती त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ईश्वरी संरक्षण गमावल्याचे वाटले असेल. या अर्थाने येशूचे रक्त त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवर आले.—मत्तय २७:२५.
तथापि, “नवा करार” यामधील कोणतीच गोष्ट असा दावा करत नाही की भवितव्यातील यहूद्यांची पिढी येशूच्या मृत्यूचा खास दोष सहन करील. उलटपक्षी, त्यांचा कुलपिता अब्राहाम याच्या प्रेमामुळे, ख्रिश्चन बनण्याची पहिली संधी देऊन देवाने यहूद्यांना खास अनुग्रह दाखवला. (प्रे. कृत्ये ३:२५, २६; १३:४६; रोमकरास १:१६; ११:२८) अखेरीस जेव्हा ही संधी गैर यहूद्यांकरता प्राप्त करून देण्यात आली तेव्हा राष्ट्रीय उगमाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबतचा संबंध देवाने थांबवला. पेत्राने म्हटले: “‘देव पक्षपाती नाही,’ हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) प्रेषित पौलाने नंतर लिहिले: “यहूदी आणि हेल्लेणी यांच्यामध्ये भेद नाही.” (रोमकरास १०:१२) तर मग, देवासमोर गैर यहूद्यांचे जे स्थान होते तेच स्थान यहूद्यांचे देखील होते, आणि आजही तेच आहे.—पडताळा यहेज्केल १८:२०.
ख्रिस्ती धर्मजगतात यहूदी विरोधक का आहेत?
यास्तव, असे दिसते की “नवा करार” यहूद्यांचा विरोधक नाही. उलटपक्षी, “नवा करार” एका अशा व्यक्तीच्या शिकवणींचा अहवाल देतो जो यहूदी म्हणून जगला आणि मरण पावला आणि त्याच्या यहूदी शिष्यांना मोशेच्या नियमाच्या ध्येयाला आदर देण्याचे शिकवले. (मत्तय ५:१७-१९) परंतु जर “नवा करार” दोषी नाही तर, ख्रिस्ती धर्मजगतामध्ये यहूद्यांचा इतका विरोध तसाच चालू का आहे?
स्वतः ख्रिश्चनत्वामध्ये काही दोष नाही. यहूदाच्या काळातील खोट्या ख्रिश्चनांनी “देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप,” दिले त्याचप्रकारे, संपूर्ण इतिहासात ख्रिश्चन असल्याचा दावा करणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या नावाला फाजील धर्माभिमान आणि कलुषितपणा यामध्ये फरफटत नेले आहे. (यहूदा ४) यास्तव, ख्रिस्तीधर्म जगतातील यहूद्यांचा विरोध, नावाने केवळ ख्रिश्चन असणाऱ्या लोकांच्या कलुषित मतामुळे होत आहे.
चित्तवेधकपणे, येशूने स्वतः भाकीत केले होते की त्याच्या नावाने अद्भुत कृत्ये केल्याचा अनेकजण दावा करतील परंतु ते त्याचे मित्र नसून—‘अनाचार करणारे’ असतील. (मत्तय ७:२१-२३) यांच्यातील अनेकांनी त्यांच्या द्वेष आणि कलुषितपणाला समर्थन देण्यासाठी “नवा करार” याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तर्क करणारे लोक त्या पोकळ ढोंगीपणाला पाहू शकतात.
खोट्या ख्रिश्चनांना यहूद्यांबद्दल असलेल्या त्यांच्या विरोधाचे उत्तर देवाला द्यावे लागेल. परंतु जशा बनावट नोटा खऱ्या नोटांच्या अस्तित्त्वाला अमान्य करीत नाही, त्याचप्रकारे खोट्या ख्रिश्चनांचे अस्तित्त्व कोणत्याही प्रकारे या वास्तविकतेला कमी करत नाही की निश्चितपणे, खरे ख्रिश्चन आहेत, ते असे लोक आहेत जे त्यांच्या कलुषितपणासाठी नव्हे तर त्यांच्या प्रेमासाठी विख्यात आहेत. तुमच्या जवळपास असणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात अशा लोकांबरोबर ओळख का करून घेऊ नये बरे? (g93 8⁄8)
a पहिल्या शतकातील यहूदी इतिहासकार जोसेफ बेन मथायास (फ्लेवीयस जोसेफस) असा अहवाल देतात की ह्या कालखंडामध्ये, रोमचे प्रतिनिधी वर्षातून जवळजवळ एकदा तरी इस्त्राएलच्या मुख्य याजकांना नियुक्त करीत व काढून टाकत असत. ह्या वातावरणात, मुख्य याजकत्व भाडोत्री कार्यालयाच्या निकृष्टावस्थेप्रत पोंहचले ज्याने समाजाच्या अगदी बिकट तत्त्वांना आकर्षित केले. द बॅबीलोनियन तालमुद यांच्यातील काही मुख्य याजकांच्या नैतिक कृत्यांचा लेखी पुरावा देते. (पेसाहीम ५७अ) याचप्रकारे, परुश्यांच्या दांभिकतेकडे असलेला कल याबद्दलही तालमुद अहवाल देते. (सोताह २२ब)
b वास्तविकपणे येशू त्याच्या विरोधकांना म्हणाला: “तुम्ही हे मंदिर मोडून टाका, आणि मी तीन दिवसात ते उभारीन.” (योहान २:१९-२२) परंतु योहान दर्शवितो त्याप्रमाणे, येशू, यरूशलेमेत असणाऱ्या मंदिराला संबोधून बोलत नव्हता, तर तो आपल्या “शरीररूपी मंदिराविषयी” बोलला होता. अशाप्रकारे येशू त्याचे अपेक्षित मरण आणि पुनरूत्थानाची तुलना एका इमारतीला पाडणे व पुनर्बांधणी करणे यासोबत करत होता.—पडताळा मत्तय १६:२१.
c अशाचप्रकारच्या जबाबदारीकडे आधुनिक दिवसात लक्ष देण्यात आले. नाझी जर्मनीचे सर्वच नागरिक थेटपणे रानटी कृत्यात सहभागी नव्हते. तरीसुद्धा, जर्मनीने एका समाजाची जबाबदारी ओळखली आणि नाझी संकटाला बळी पडलेल्यांचा बचाव करण्याचे स्वतःहून निवडले.
[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]
ख्रिस्तीधर्म जगतातील यहूद्यांचा विरोध, असे लोक आचरतात जे केवळ नामधारी ख्रिश्चन आहेत
[२७ पानांवरील चित्र]
येशू किंवा त्याच्या शिष्यांनीही यहूद्यांच्या विरोधाला चेतवले नाही