तणावाचा सामना करण्यासाठी तुमच्या मुलांना मदत करा
“अनेक मुलांना बोलावे असे वाटते तेव्हा त्यांना—शारीरिकरीत्या किंवा मानसिकरीत्या—घरात कोणीच भेटत नाही.”—डिप्रेशन—व्हॉट फॅमिलीज शूड नो.
कुटुंबाला एक भावनात्मक प्रयोगशाळा असे योग्यपणे म्हटले आहे. ते एक संशोधन केंद्र आहे जेथे एखादे मूल जीवनाबद्दलच्या त्याच्या विश्वासांचे परीक्षण करते, परिणामांचे निरीक्षण करते, व विशिष्ट निष्कर्षास पोंहचते. दबावपूर्ण वातावरणाऐवजी एका आरोग्यदायी वातावरणात त्यांची मुले अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रयोग करत आहेत याची खात्री पालक कसे करू शकतात?
ऐका
द चाइल्ड इन क्रायसिस हे पुस्तक पालकांना आर्जवते: “तुमच्या मुलासोबत निरंतर बोलत रहा.” पालक आणि मूल यांच्यामधील जीवनरेषेप्रमाणे, कुटुंबामध्ये काही दुखःदायक घटना झाली असेल तेव्हा खासकरून बोलणे महत्त्वपूर्ण आहे. जी दुःखीत घटना झाली त्याच्या विपरीत परिणामाचा तो अनुभव घेत नाही म्हणूनच तो शांत आहे असे कधीच गृहीत धरू नका. ते मूल कदाचित चिंतांना दडपून टाकत असेल व शांततेत त्रास सहन करत असेल, जसे एका सात वर्षाच्या मुलीने केले जिचे तिच्या पालकांच्या फारकतीनंतर सहा महिन्यात ३० पौंड वजन वाढले.
“बोलणे” या शब्दाचा अर्थ होतो की त्यात दोन किंवा तीन भाष्यकर्ते समावलेले आहेत. यास्तव, सर्वच बोलणे पालकाने करू नये. घरामध्ये त्यांच्या मुलाची मर्यादेच्या बाहेर उद्धट वागणूक वाढू लागली तेव्हा रिक आणि सू यांनी सल्ला मिळवला. संपूर्ण कुटुंबाची भेट घेतल्यानंतर, सल्लागाराने काही तरी परीक्षले. तो म्हणाला “पालकांनी नेहमी लांब आणि अतिशय मोठे स्पष्टीकरण करून सर्वांचा सुज्ञतेने अभ्यास केला, आणखी पुढे, पालकांचा संभाषणावर मक्ता मिळवण्याचा कल होऊ लागला, आणि मी पाहू शकलो की ते मूल अधीर होऊन वाढत होते.” मुलाला स्वतःला व्यक्त करू देणे फायदेकारक आहे. (पडताळा ईयोब ३२:२०.) समस्या वाढल्यावर जर तो बोलू शकत नाही तर नंतर तो त्याच्या वर्तनातून व्यक्त करू शकतो.—पडताळा नीतीसूत्रे १८:१.
शिक्षेची गरज असते तेव्हा बोलणे महत्त्वपूर्ण आहे. चुकीच्या सुधारणूकीबद्दल मुलाला कसे वाटते? ती शिक्षा त्याला का दिली हे तो समजू शकतो का? मुलाला कसे वाटले पाहिजे हे केवळ सांगण्यापेक्षा, त्याच्या हृदयात काय आहे ते शोधून काढा. त्याच्याबरोबर तर्क करा जेणेकरून तो योग्य निष्कर्षास मार्गदर्शित होऊ शकतो. “काळजीपूर्वक विचारासाठी योग्य सल्ला द्या, परंतु तुमच्या मुलाला मनन करू द्या,” असे इलेन फॅन्टल शिंमबर्ग लिहितात.
भावना मान्य करा
काही पालक अशा प्रकारच्या वाक्यांनी बोलणे दाबून टाकतात जसे की: “तुझे रडणे बंद कर.” “तुला असे वाटता कामा नये.” “तू विचार करतोस तितके काय ते वाईट नाही.” मुलाच्या भावना मान्य करणे फार उत्तम आहे. “मला असे दिसते की तू कशाने तरी दुःखी झाला आहेस.” “तू खरोखर उदास वाटतोस.” “मला माहीत आहे तू नाराज असशील.” अशाद्वारे तुमचे बोलणे चालू राहील.
हाऊ टू टॉक सो किड्स वील लिसन ॲन्ड लिसन सो किड्स वील टॉक हे पुस्तक ह्या बाबतीत योग्य निरीक्षण करते: “एखाद्या मुलाच्या उदास भावनांना जितके तुम्ही दूर साराल, तितकेच तो नकारात्मक विचारांना टाळण्यास असमर्थ होतो. जितक्या आरामात तुम्ही नकारात्मक भावना स्वीकारता, तितक्या सोप्यारितीने मुलांना ते वाईट विचार टाळता येतील. मला वाटते तुम्ही असे म्हणू शकता की जर तुम्हाला एक आनंदी कुटुंब हवे आहे, तर दुःखीत करणाऱ्या अनेक अभिव्यक्तींना परवानगी देण्यास तुम्ही तयार असाल.”—पडताळा उपदेशक ७:३.
दुसऱ्यांचा अनुभव स्वतः घ्या
मेरी सूझन मिलर अशा लिहितात की: “बहुतेक प्रौढ, मुलाचे जग त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतात यामुळे त्यांना स्वतःच्या जीवनापेक्षा इतरांचे जीवन चिंतादायक असेल याची कल्पना करणे देखील कठीण वाटते.”
होय, पालक स्वतः जेव्हा मोठे होत होते तेव्हा त्यांनी अनुभवलेले दुःख आणि चिंता ते अगदी सहजपणे विसरून जातात. यास्तव, त्यांच्या मुलांना ज्या चिंता वाटतात त्यांना ते क्षुल्लक मानतात. एका पाळीव प्राण्याचा मृत्यू, एखाद्या मित्राचा मृत्यू, नव्या ठिकाणी राहण्यास जाणे या गोष्टींचा सामना करणे कसे वाटत होते याची पालकांनी आठवण करावी. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लहानपणची भीती कोणती होती, मग जरी ती अयोग्य असली तरी त्याची आठवण करावी. आठवण करणे दुसऱ्यांचा अनुभव स्वतः घेण्याची गुरूकिल्ली आहे.
योग्य उदाहरण मांडा
तुमचे मूल तणावाला कसे हाताळते ते, विस्तारीत प्रमाणावर तुम्ही पालक या नात्याने कसे हाताळता यावर अवलंबून आहे. तणाव कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही हिंसेचा अवलंब करून करता का? असे असल्यास, तुमचे मूल त्याचा तणाव त्याच प्रकारे व्यक्त करत असेल तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका. मानसिकरीत्या तुमचा तीव्रतेने भंग झाला आहे तर तुम्ही शांतपणे ते सहन करता का? मग तुम्ही तुमच्या मुलाने मनापासून बोलणारा आणि विश्वासू असावे अशी मागणी कशी काय करू शकता? तुमच्या घरामध्ये दबावपूर्ण भावना इतक्या लपवून ठेवल्या जातात का, की त्यांना मान्य करून सोडवण्याऐवजी कबूल केल्या जात नाहीत? तर मग तुमच्या मुलाच्या शरीरावर आणि मनावर होणाऱ्या वाईट परिणामांना पाहून घाबरून जाऊ नका, कारण तणावाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न, सहसा त्याच्या अभिव्यक्तीच्या तीव्रतेलाच वाढवतो.
तणावाने गच्च भरलेल्या ह्या जगात मुलांना वाढवणे पालकांसाठी खास आव्हान सादर करते. पवित्र शास्त्राच्या अभ्यासाने अनेकांना ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत केली आहे. याचीच आम्ही अपेक्षा करतो, कारण पवित्र शास्त्राचा लेखक कौटुंबिक जीवनाचा देखील स्त्रोत आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, “देवाचे ज्ञान रास्त आहे हे खऱ्या ज्ञान्यांच्या कृत्यांवरून पटते.” (मत्तय ११:१९, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) पवित्र शास्त्रीय तत्त्वांना जीवनात लागू केल्याने, पालकांना हे कळून येईल की शास्त्रवचने “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६. (g93 7⁄22)
[१० पानांवरील चित्र]
हितकर दळणवळण तणाव कमी करते
[११ पानांवरील चित्र]
मुलगा दूध सांडतो, मोठा भाऊ त्याला टोमणे देतो, परंतु पिता समजूतदारपणे त्याला सांत्वन देतो