तुमच्या मुलांमधील तणावाची चिन्हे ओळखणे
“तणावाच्या भावना क्वचितच कारण नसताना उद्भवलेल्या असतात: त्या बहुधा विशिष्ट घटना किंवा परिस्थितींच्या प्रतिक्रिया असतात.”—डॉ. लीलीयन जी. कॅट्झ.
अंधाऱ्या धुक्याच्या रात्री विमान उडवत असताना वैमानिक कोठे जात आहे हे तो कसे पाहील? उड्डाण घेण्यापासून ते उतरवण्यापर्यंत तो संकेतांवर अवलंबून असतो. वैमानिक बसतो त्या मोठ्या विमानाच्या जागेत आजूबाजूला शेकडो साधने असतात आणि प्रत्येक साधन महत्त्वपूर्ण माहिती देते व संभाव्य धोक्यांबद्दल वैमानिकाला जागृत करते.
आमच्या या तणावाच्या जगात वाढणे हे वादळातून विमान चालवण्याप्रमाणे आहे. पालक त्यांच्या मुलांचे बालपणापासून ते प्रौढतेपर्यंत असणारे उड्डाण अडचणीविना कसे करू शकतात. पुष्कळ मुले त्यांच्या तणावाबद्दल सांगत नसल्यामुळे पालकांनी चिन्हांना ओळखण्यास शिकले पाहिजे.
शरीर “बोलते”
मुलाचा तणाव बहुधा शरीरातून कळवला जातो. मानसिक व शारीरिक प्रतिक्रिया ज्यामध्ये पोट बिघडण्याच्या समस्या, डोकेदुःखी, थकवा, झोपेच्या तक्रारी आणि मलविसर्जनाच्या काही तक्रारी गोवलेल्या आहेत त्या काहीतरी बिघडले आहे याची चिन्हे असतील.a
अधिक एकलकोंडेपणाच्या काळामुळे शॅरनची ऐकण्याची क्षमता तिने गमावली. ॲमी शाळेत जाई तेव्हा तिच्या आईपासून दूर राहण्याच्या भीतीमुळे तिच्या पोटात गोळा येत असे. जॉनच्या पालकांमधील तीव्र भांडण पाहिल्याच्या मानसिक ताणामुळे त्याला मलावरोधाचा त्रास होत होता.
दहा वर्षाच्या ॲशलीबरोबर लैंगिकरीत्या गैरवागणूक केल्यामुळे तिला शारीरिक परिणाम अनुभवावे लागले. ती आठवून म्हणते, “मला आठवते की [बलात्कारानंतर] मी आजारी असल्यामुळे एका आठवड्यासाठी शाळेला जाऊ शकले नाही.” व्हेन युवर चाईल्ड हॅज बीन मॉलेस्टेड हे पुस्तक स्पष्ट करते: “शारीरिक त्रास अनुभवल्याच्या ओझ्यामुळे मूल रोगी बनते.” अशा यातनेच्या संभाव्य चिन्हांमध्ये शारीरिक हानी, मल विसर्जनाच्या वेळी दुखणे, पुनः-पुन्हा अनुभवणारी पोटदुखी, डोकेदुखी, आणि अस्थी किंवा स्नायूंचे दुखणे या गोष्टी आहेत ज्यांचे कोणतेही स्पष्ट कारण नाही.
आजार मानसिक व शारीरिक प्रकारचे असतील तर, पालकांनी या चिन्हांकडे गंभीरपणे पाहायला हवे. डॉ. ॲलिस एस. होनीग अशा म्हणतात, “मूल लबाड बोलत आहे किंवा नाही ही महत्त्वाची गोष्ट नाही. परंतु मुळाशी असणारी समस्या अधिक महत्त्वाची आहे.”
शब्दांपेक्षा कृत्ये जास्त बोलतात
वागणूकीमधील अचानक बदल ही बहुधा मदतीसाठी एक हाक आहे. गीवींग सॉरो वर्डस् हे पुस्तक असे म्हणते: “एका चांगल्या विद्यार्थ्याला नापासाचे शेरे मिळायला लागले तर तेथे लक्ष देण्याची गरज आहे, व त्याचप्रमाणे त्रास देणारे मूल अगदीच शांत होते तेव्हा देखील हीच गोष्ट तेथे लागू होते.”
सात वर्षांच्या टीमीची आई तिच्या कामात अगदीच दंग राहू लागली तेव्हापासून त्याने अचानक लबाड बोलायला सुरवात केली. सहा वर्षांचा ॲडम, शाळेत अपुरेपणाच्या भावना अनुभवत असल्यामुळे अचानक त्याचा स्वभाव उद्धट झाला. सात वर्षांच्या कॉर्लच्या धाकट्या बहिणीकडे पालकीय लक्ष वळल्यामुळे ते प्राप्त करण्याच्या इच्छेमुळे तो परत एकदा बिछान्यात मूत्रोत्सर्ग करू लागला.
आत्मनाशक वर्तणूक विशेषकरून अस्वस्थ करणारी आहे. बारा वर्षांच्या साराचे अपघात केवळ निष्काळजीपणामुळे घडत नव्हते. तिच्या पालकांचा घटस्फोट झाल्यापासून, स्वतःला इजा पोहचवून ती तिच्या दूर गेलेल्या पित्याचे प्रेम परत मिळवण्यासाठी बेसावधपणे प्रयत्न करीत असे. स्वतःवर केलेल्या क्षुल्लक जखमा असोत किंवा आत्महत्या करण्यासारखा गंभीर प्रयत्न असो, आतला राग आत्मनाशक वागणूकीद्वारे दाखवणे हे अधिक तणावाचे एक चिन्ह आहे.
हृदयापासून बोलणे
“अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार,” असे येशू ख्रिस्त म्हणाला. (मत्तय १२:३४) नकारात्मक भावनांचे वर्चस्व असणारे हृदय, मुलाच्या बोलण्याद्वारे प्रकट होते.
“जी मुले ‘कोणालाही मी आवडत नाही’ अशी म्हणतात ती तुम्हाला खरेच हे सांगतात की त्यांना स्वतःला ते आवडत नाहीत,” अशा डॉ. लरेन स्टर्न म्हणतात. बढाई मारण्याबद्दल देखील हीच गोष्ट खरी आहे. स्वतः विषयीचे चांगले मत नाही याच्या अगदी विरोधात व्यक्त करत असले तरी, खऱ्या किंवा काल्पनिक साध्य केलेल्या गोष्टींबद्दल फुशारकी मारणे ही अपुरेपणाच्या तीव्र भावनांवर मात करण्यासाठी केलेला एक प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
हे खरे आहे की, सर्व मुले आजारी पडतात, कधीकधी गैरवर्तन आचरतात आणि अधूनमधून स्वतःबद्दल निराशा अनुभवतात. परंतु अशा समस्या एक पद्धत बनते आणि त्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही तेव्हा, पालकांनी त्या चिन्हांचे अर्थ विचारात घ्यायला हवे.
एका हिंसक हल्ल्याचे गुन्हेगार असणाऱ्या सहा युवकांच्या लहानपणाच्या वागणूकीच्या पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर मेरी सुसन मिलर यांनी असे लिहिले: “पुष्कळ चिन्हे दाखवली गेली. त्या मुलांनी पुष्कळ वर्षांसाठी त्यांच्या जीवन पद्धतींमध्ये ती चिन्हे दाखवली, परंतु त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. प्रौढांनी ते पाहिले परंतु ते बेपर्वा होते.”
आता पालकांनी, अगोदर पेक्षा जास्त प्रमाणात लहानपणच्या चिंतेची चिन्हे ओळखण्यात अधिक जागृत असायला हवे व त्यांवर कार्य करायला हवे.
[८ पानांवरील चौकट]
गर्भात तणाव?
माता रक्तप्रवाहाच्या रासायनिक बदलांद्वारे पाठवत असलेल्या चिंता, भय आणि अस्वस्थता याच्या संदेशांना भ्रूण देखील जाणू शकते. “गरोदर स्त्री अनुभवणाऱ्या प्रत्येक मानसिक ताणाचा अनुभव वाढ होत असलेले भ्रूण करते” असे ग्रोइंग अप डिवोर्स्ड या पुस्तकात लिंडा बर्थ फ्राँक लिहितात. “भ्रूणाच्या आणि मातेच्या मज्जासंस्था सरळपणे संबंधीत नसल्या तरी दोघांमध्ये एकच बाजूचा संबध असतो जो तोडून टाकता येत नाही.” या कारणामुळे, टाईम मासिक म्हणते त्याप्रमाणे, १८ महिने आणि त्याहीपेक्षा लहान बालकांपैकीची ३० टक्के मुले भावनिक प्रेम मिळण्याच्या विवंचने पासून ते चिंतेच्या प्रतिक्रियांसारख्या तणावाशी संबंधीत असलेल्या समस्यांना का सोसतात याचे स्पष्टीकरण देऊ शकेल. फ्राँक शेवटी म्हणतात, “दुःखी आणि त्रस्त स्त्रीयांना जन्मलेली बालके देखील दुःखी आणि त्रस्त असतात.”
[९ पानांवरील चौकट]
जेव्हा मूल सर्व गोष्टींचा अंत करू पाहते
लेट्टीने तिच्या वडिलांना विचारले, “मी शंभर वर्षांसाठी झोपी गेले तर काय होईल?” त्यांनी विचार केला की तो एक बालिश प्रश्न आहे. परंतु लेट्टी छिचोरपणाने वागत नव्हती. पुष्कळ दिवसांनंतर तिने एका बाटलीतील झोपेच्या सर्व गोळ्या खाल्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जावे लागले.
तुमच्या मुलाने आत्महत्येचा विचार किंवा प्रत्यक्षात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावर तुम्ही काय करावे? “ताबडतोब व्यावसायिक सल्लागाराची मदत मिळवा” असे डिप्रेशन—व्हॉट फॅमिलीज शूड नो हे पुस्तक आर्जवते. “संभाव्य आत्महत्या करणाऱ्यांचा उपचार करणे हे कौशल्य न मिळवलेल्यांचे किंवा निराशीत व्यक्तीची पुष्कळ काळजी घेणाऱ्याचे काम नाही. तुम्हाला वाटेल की तुमच्या कुटुंबाच्या सदस्याला आत्महत्या न करण्यासाठी तुम्ही समजावून सांगितले आहे, परंतु तो किंवा ती केवळ शांत राहत आहे आणि सर्व भावनांचा भयानक परिणामांसह स्फोट होत नाही तोपर्यंत त्यांना आतच दाबून ठेवत आहे.”
योग्य उपचाराद्वारे, स्वतःचा अंत करू पाहणाऱ्या मुलासाठी काही आशा आहे. “आत्महत्येचा प्रयत्न करू पाहणारे पुष्कळ जण खरोखरीच स्वतःला ठार मारू इच्छित नाहीत” असे वर उल्लेखिलेले पुस्तक म्हणते. “ते केवळ स्वतःला इजा पोहचवण्याचे थांबवू पाहतात. त्यांचे प्रयत्न मदतीसाठी एक विनंती आहे.” ख्रिस्ती मंडळीमध्ये आत्महत्येच्या प्रसंगाला टाळू न शकणाऱ्या पालकांना वडिलांकडून प्रेमळ आधार आणि चांगला शास्त्रीय सल्ला मिळेल.
[तळटीपा]
a काल्पनिक दुखणी असलेल्या विषण्णता यासारखे नसून मानसिक व शारीरिक आजार हा खरा असतो. तरीसुद्धा, शारीरिक कारण नसून त्याचे कारण भावनात्मक आहे.