पवित्र शास्त्रीय दृष्टिकोन
उदार देणग्या एक ख्रिस्ती बंधन?
कमीतकमी दहा वर्षांपूर्वी, दक्षिण अमेरिकेत मुख्यालय असलेल्या पीटीएल (प्रेज द लॉर्ड) क्लबने एक धर्मादाय संस्था म्हणून देणग्या देण्याची विनंती केली. सॅटेलाईट-टीव्ही, नेटवर्क व पोष्टाचा वापर करून त्यांनी करोडो डॉलर्स गोळा केले, जे सर्व त्यांचा स्वतःचा खजिना भरवू शकले—दिखाऊपणा मात्र शुभवर्तमान पसरविणे याचा होता.
पीटीएलचे माजी अध्यक्ष, जीम बेकर व त्यांची पत्नी टॅमी यांना, “१९८६ मध्ये पगार व बोनस मिळून १६ लाख डॉलर्स देण्यात आले” असा असोसिएशन प्रेसचा अधिकृत अहवाल बातमी पत्रात त्यांना वाचावयास मिळाला, तेव्हा ज्या हजारो जणांनी पीटीएल क्लबला पैसे पाठविले होते त्यांना कसे वाटले असेल त्याचा विचार करा. याच्यापेक्षा वाईट म्हणजे, अहवाल पुढे म्हणतो: “संस्थेचा कारभार ५ कोटी डॉलर्स एवढ्या कर्जात असताना देखील इतका पगार देण्यात आला . . . [जेसीका] हॉन हिचे बेकरशी असलेल्या लैंगिक संबंधाविषयी कोठेही वाच्यता करणार नाही याच्या खात्रीसाठी तिला पीटीएलचा २,६५,००० डॉलर्स इतका पैसा राखून ठेविला होता.”
कारावासात जाण्याआधी बेकर यांनी त्याच्या अनुयायांना लुबाडल्याबद्दल बोलताना, त्यांच्या चौकशीच्या वेळेस न्यायाधीश असे म्हणाले: “आम्ही असा धर्म बाळगून आहोत ज्यात कोणत्याही किळसवाण्या मार्गाने पैसा मिळविणारे प्रचारक व पाळक आहेत.”
देणग्या देण्याची व त्यातील जास्त पैसे खिशात घालण्याची भावना उत्पादित करण्यासाठी एकटा धर्मच केवळ आवेशाने भाग घेत नाही. काही पैसे गोळा करणारे त्यांनी जमविलेल्या पैशातील ९० टक्क्यापेक्षा अधिक पैसा स्वतःकडे ठेवून घेतात यात काही असामान्य नाही.
तर मग, अशा संस्थांची लोकांना चीड येते यात काही आश्चर्य वाटण्यासारखे आहे का? तथापि, ख्रिश्चनांनी काय करावे? अशाप्रकारच्या संघटित संस्थांना देणग्या देण्यासाठी ते अंकित आहेत का? इतरांना मदत करताना पैशाचा सुज्ञतेने वापर करण्याकरता पवित्र शास्त्र कोणते खात्रीशीर मार्गदर्शन पुरविते? इतरांची मदत करण्याकरता कोणता चांगला व व्यावहारिक मार्ग आहे?
देणे—होय आणि नाही
पवित्र शास्त्राचा सल्ला असा आहे की जे गरजवंत आहेत अशांच्याबाबतीत निश्चितपणे दयाळू व उदार असावयास हवे. प्राचीन काळापासूनच देवाच्या लोकांना “परोपकारी व दानशूर असावे,” असे उत्तेजन दिले गेले. (१ तीमथ्य ६:१८; अनुवाद १५:७, १०, ११) वस्तुतः, ख्रिश्चनांना १ योहान ३:१७ मध्ये सांगण्यात आले की: “जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार?”
द्यायचे आहे तर, होय; पण सावध असा! आपल्यावर नियमितरित्या गरीबांसाठी काम करणाऱ्या संस्था, धार्मिक आणि सामाजिक सेवेची मोहीम; यासाठी देणगी देण्याच्या विनंत्याचा भडीमार होत असतो, पुष्कळदा भाग पाडले जाते. तरीही, त्यांची किंमत ठरविताना पवित्र शास्त्राचा बोध आठवणे चांगले ठरेल: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (नीतीसूत्रे १४:१५) दुसऱ्या शब्दात, कोणत्याही संस्थेच्या अभिवचनाचा व दाव्याचा वरकरणी स्वीकार करण्याआधी सावध असा. गोळा केलेला पैसा खरोखर कसा वापरला जातो? ती संघटना अशा गोष्टीला दान करते का ज्याला ख्रिस्ती खरोखरच आधार देऊ शकतो? त्यांच्या हालचाली राजकीय, राष्ट्रीयवादी अथवा खोट्या धर्माशी संबंधीत आहेत का? त्याचे उद्देश व्यावहारिकता प्रकट करतात व शास्त्रवचनीय तत्त्वांना विरोध करीत नाहीत ना?
काही अशा संस्था आहेत ज्या गरजवतांसाठी चांगले ते करतात. नैसर्गिक आपत्ती अथवा अचानक उद्भवणाऱ्या आजाराने परिणामीत झाल्यामुळे पुष्कळ वेळेस ख्रिश्चनांना स्वतःलाही अशा संस्थाद्वारे फायदा झाला. काही संस्थाच्या बाबतीत पाहता, जरी त्यांच्या जवळ प्रशासकीय मूल्य किंवा पैसा खूप प्रमाणात गोळा करण्यात येत असला तरी ते गोळा केलेल्या पैशातील अगदी कमीचा वापर जाहीरात बाजीसाठी करतात. उदाहरणार्थ, अमेरिकेतील अलीकडील ११७ वा सर्वे हे दाखवून देतो की सर्वात मोठ्या नफारहीत संघटना, ज्यात धर्मादाय संस्थांचाही समावेश आहे त्यातील एक चतुर्थांश पेक्षा जास्त त्यांच्या उच्चाधिकाऱ्यांना वर्षाला २,००,००० इतके डॉलर्स किंवा त्यापेक्षाही जास्त पगार देतात असे दिसून आले. जर्माखर्च अहवाल हे दाखवितो की ऐषआरामाच्या वस्तूंसाठी व श्रीमंती जीवन-शैलीसाठी खर्च केला जातो. कोणत्याही संस्थेच्या नावाव्यतिरिक्त, अशा प्रकारच्या योजनांना वर्गणी देणे हे पवित्र शास्त्राची आज्ञा गरजवंतांना मदत करा हिला पुर्ण करते असा विश्वास बाळगणे कठीण आहे.
समतोल दृष्टिकोन
कोणालाही त्यांचा पैसा वाया घालवायला आवडत नाही—किंवा काम करणाऱ्या मधल्या माणसांच्याच खिशात तो पैसा जात असल्याचे पाहणे अगदी वाईट असते—तरीहि देण्याच्या बाबतीत उपहासक बनण्यापासून सांभाळण्याची गरज आहे. एखाद्या मदत करणाऱ्या “संस्थेच्या” अपात्रतेमुळे अथवा अप्रामाणिकपणामुळे गरजवंतांना मदत करण्यास किंवा दयाळूपणाची भावना गोठविण्यास त्याचा वापर करु नका. नीतीसूत्रे ३:२७, २८ सल्ला देते: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यात माघार घेऊ नको. एखादी वस्तु तूजजवळ असता आपल्या शेजाऱ्याला असे सांगू नको की तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन.” (पडताळा १ योहान ३:१८.) सर्वच संस्था ह्या निरूपयोगी अथवा लबाड असतात असे गृहीत धरू नका. वस्तुस्थितीची पाहणी करा, त्यानंतरच द्यायचे की नाही हा वैयक्तिक निर्णय घ्या.
काहीजण गरजू व्यक्तीला अथवा कुटुंबाला वैयक्तिकरित्या, थेट बक्षीसांद्वारे मदत करणे पसंत करतात. त्यामुळे, देणाऱ्याला त्यांनी दिलेल्या देणगीचा व्यावहारिक व लागलीच उपयोग झाल्याची खात्री होते. यामध्येही उभारणीकारक असण्याची संधी मिळते आणि बोलण्याद्वारे तसेच कृतीद्वारे दयाळुपणा प्रदर्शित करता येतो. जरी तुमच्याकडे भौतिकरित्या देण्यासारखे काही नाही, तरी तुम्हाला देण्यातील आनंद लुटता येईल. पुढील वेळी तुम्हाला अशा मदतीच्या गरजेबद्दल कळेल, तेव्हा २ करिंथकर ८:१२ मध्ये दाखविलेल्या आत्म्याने तुम्ही जे आहे ते देऊ शकता: “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.”
पैसा जे करु शकतो त्यापेक्षाही अधिक पैशाविना साध्य करता येऊ शकते हे लक्षात ठेवा. येशूने त्याच्या अनुयायांना सांगितले की “घोषणा करीत जा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे . . . तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या.” (मत्तय १०:७, ८) आज देखील, ख्रिस्ती हे जाणतात की वेळ, शक्ती, व पैसा—गरीबांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्याऐवजी राज्याच्या साक्षीसाठी—जे कार्य जीवन सुधारते व आशा देते त्यासाठी खर्च करणे केव्हाही चांगले आहे.
यास्तव, पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन हा प्रेमळ, उदार, व व्यावहारिक आहे. तो हे आठवण करून देतो की भौतिक गोष्टींची गरज वारंवार उद्भवते, आणि गरज टाळता येत नाही. याच वेळेस जे कोणी तुमच्याकडे पैशासाठी विनंती करतात त्यांना किंवा इतर कोणालाही पैसे देण्यास अधीन आहात असे वाटू देऊ नका. देवाची स्तुती करण्यास आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला व तुमच्या सोबत्यांसाठी तुमच्याकडील पैशाचा उपयोग करणे किती चांगले असेल याचा विचार करा. (१ तीमथ्य ५:८; याकोब २:१५, १६) इतरांच्या आध्यात्मिक व भौतिक गरजांना जाणण्यात व त्या पुरविण्यात येशूचे अनुकरण करा. इब्रीकर १३:१६ या वचनात म्हटले आहे: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (g93 6⁄8)