वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-2 पृ. २६-२७
  • “बहुमूल्य वेळ” त्याचे प्रमाण घटले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “बहुमूल्य वेळ” त्याचे प्रमाण घटले
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • आपली मुले—मोलाची संपत्ती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • बालपणापासून मुलांना वळण लावणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
gbr13-2 पृ. २६-२७

“बहुमूल्य वेळ” त्याचे प्रमाण घटले

अलीकडील काळात थोडकेच पालक आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देतात. अनेक एकटे आहेत व पती किंवा पत्नीच्या मदतीविना ते आपल्या मुलांना जे हवे ते पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. तसेच, अधोगतीला जाणाऱ्‍या आर्थिक परिस्थितीमुळे, कुटुंबाची आर्थिकदृष्ट्या पुरवणूक करण्यासाठी अनेक विवाहीत दापंत्यातील दोघांनाही म्हणजे आईवडिलांना घराबाहेर कामासाठी जावे लागते. यामुळे, बहुमूल्य वेळेची कल्पना झपाट्याने वाढत आहे, यात काही आश्‍चर्याचे नाही.

बहुमूल्य अशी वेळेबद्दलची समज खासकरून मुलांसोबत व्यतित करण्यात आखलेली असते, त्यात खास हालचालींची योजना असते जसे की,—खास सहल, उदाहरणार्थ, प्राणीसंग्रहालयास भेट देणे वगैरे. खरे म्हणजे ही कल्पना चांगली आहे. त्यांना मिळेल अशा कोणत्याही खास काळजीची मुलांना आवश्‍यकता असते. तथापि, लेकरांची काळजी वाहण्यात तरबेज होण्यामध्ये या बहुमूल्य वेळेच्या कल्पनेत काही उणीवा जास्त स्पष्ट होत आहेत.

असे दिसून येते की, कामात व्यग्र असणारे, ध्येयाच्या पाठीस लागणारे पालक, मुलांसोबत आराखडा करून अथवा वेळेची बांधणी करून वेळ घालविला तर त्यांच्या सर्व गरजांकडे पालकांचे लक्ष राहील अशा फसव्या कल्पना स्वीकारत आहेत. म्हणून, न्यूयॉर्क डेली न्यूज डॉ. ली साल्क, कॉर्नेल युनिव्हर्सिटी मेडीकल स्कूल येथील प्रोफेसर यांचा संदर्भ देते, जे म्हणतात की: “बहुमूल्य वेळेची ही कल्पना मूर्खपणाची आहे.” ते स्पष्ट करतात की: “हा शब्दप्रयोग अस्तित्वात येण्यामध्ये पालकांचा दोष आहे. लोक स्वतःच त्यांच्या मुलांना कमी वेळ देण्यास अनुमती देत आहेत.”

पण, पालकांचे मुलांवर असणारे एकसारखे लक्ष, यासोबतच मोलाची वेळ यामुळे गुणवत्तेची कमतरता भरुन निघणार नाही का? नाही, एक साधे कारण म्हणजे—पालक आपल्या मुलांना उदाहरणाद्वारे जास्त प्रभावीपणे शिकवू शकतात. या सर्वपरिचित सत्याच्या असुखावह बाजूचे भयंकर चित्रण शहरातील युवकांच्या अलिकडील निरीक्षणाने दिले. ज्यांचे कौटुंबिक सदस्य कैदेत असतात ते पुढे स्वतःला देखील दुप्पटीने कैद करून घेतात. त्याचप्रमाणे, जे मद्याच्या अथवा मादक द्रव्याधिन असणाऱ्‍यांच्या संगतीत वाढत आहेत ते जवळजवळ दुप्पटीने ह्‍या घातक सवयांना लावून घेतात.

पालकांचे चांगले उदाहरण हे सर्वात प्रभावी ठरते. समस्या ही आहे की चांगले उदाहरण मांडण्यास वेळ लागतो, यासाठी वेळेचा कालावधी लागतो, हा बहुमूल्य वेळ सुव्यवस्थित असलेल्या एखाद्या छोट्या पाकीटासारखा नाही. जसे न्यूयॉर्क डेली न्यूज ह्‍याला असे मांडते: “बहुमूल्य वेळेच्या सर्वसाधारण कल्पनेतील उणीवेचे कारण पालक व मुले यांच्यातील दुवा साधणारा क्षण—म्हणजेच संभाषण व निर्णय याद्वारे संरक्षण, मूल्य व स्वप्रशंसा हे मनावर बिंबवले जाते—जे की स्वयंप्रेरीत असते.” अशा स्वयंस्फूर्त क्षणाची कोणीही आखणी करु शकत नाही. पालक बहुमूल्य वेळेची १५ मिनिटे मुलांसोबत घालविण्यास राखून ठेवू शकतात, पण या वेळेदरम्यान पालक व मुलांमध्ये चांगले जवळचे संबंध बनतील हे कोण सांगू शकेल? आणि पालकांसोबत ज्याने दिवसातील काही मिनिटेच घालविली असतील ते मूल त्यांच्या उदाहरणावरून काय शिकू शकेल?

जर पालकांना फावला वेळ अगदीच अल्प असेल, तर मग यावर काही उपाय आहे का? याची केवळ साधी उत्तरे नाहीत. या जगाने मुलांचे संगोपन हे जिकरीचे काम बनविले आहे, या सत्याला कोणीही बदलू शकत नाही. काही पालक कदाचित त्यांच्या कामाकडे जास्त लक्ष देण्यात घट करु शकतील. असे करु शकणाऱ्‍या पालकांना मुलांची काळजी घेण्यासंबंधी अलिकडील विषयाच्या पुस्तकाचा लेखक आर्जवितो की—मुलांसोबत घरी राहा. पण पुष्कळ पालकांसाठी, असे निवडण्याचा कोणताही मार्ग नाही. आणि ज्यांचे बदलणाऱ्‍या आराखड्याचे काम असते किंवा ज्यांना स्थिर अशी पगारी नोकरी नाही अशांना त्यांच्या मुलांसोबत पुरेसा वेळ देणे हे आणखीनच कठीण होते.

काही पारंगत लोक पालकांना आर्जवितात की त्यांनी घराभोवती करु शकता येईल अशी कामे शोधावीत, उदाहरणार्थ, स्वच्छता, स्वयंपाक करणे, मेंटेनन्स्‌, वाहनांची काळजी घेणे, कपडे धुणे, बाजारहाट करणे अशी कामे आपल्या मुलांसोबतदेखील करता येतील का याची त्यांनी पाहणी करावी. काही ऐहिक काम एकत्रितपणे केल्याने अथवा फक्‍त एकत्र आराम करीत असताही, पालकांना तो वेळ दळणवळणाचा मार्ग खुला करण्याच्या गरजेस व सकारात्मक उदाहरण राखण्यास मुभा देईल. ख्रिस्ती पालक तर आपल्या मुलांसोबत करु शकतील अशी इतरही कामे आहेत. ख्रिस्ती सभा, सेवाकार्य, कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास, सहविश्‍वासूं सोबतचा सहवास—हे सर्व पालकांना त्यांच्या मुलांसाठी महत्त्वाचा वेळ देण्यास मुभा देते.

चित्तवेधकपणे, जवळजवळ ३,००० वर्षांपूर्वी इस्राएल राष्ट्राला देखील अशाच प्रकारचा नियम देण्यात आला होता. अनुवाद ६:६, ७, मध्ये आपण वाचतो: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलांबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा.” प्राचीन काळी जीवन हे असावे तेवढे सोपे नव्हते. सर्व वेळ हा दररोजच्या गरजा पुरविण्याच्या काळजीत जाई याचा विचार करा—एका पित्याला त्याच्या कुटुंबाची पुरवणूक करण्यास किती काम करावे लागत होते, किंवा स्वयंपाक करणे अथवा कपडे धुणे यासारख्या कामाला किती श्रम लागत होते! पण यहोवावर प्रीती करणाऱ्‍या पालकांनी त्यांच्या मुलांना आपल्या बरोबर ठेवून होता होईल तितके केले आणि यामुळे त्यांच्या तरुण हृदयावर देवाचे नियम बिंबविण्यात त्यांना दिवसातील कितीतरी मिनिटे मिळाली.

ख्रिस्ती पालकांनी हेच करण्याची आज आवश्‍यकता आहे. त्यांच्या मुलांसोबत वेळ घालविण्याची गोष्ट सामोरी येते तेव्हा त्यांना जे सोयीचे वाटते त्याचा विरोध करावयास हवा. “संख्या नव्हे तर दर्जा,” ही जुनी म्हण मुलांची काळजी घेण्या बाबतीत लागू होत नाही. खासकरुन त्यांच्या मुलांच्या वाढीच्या वर्षात, त्यांना केवळ खास वेळच नव्हे तर “एकत्र” वेळ हवा असतो. (g93 5/22)

[२७ पानांवरील चित्र]

घरामध्ये व्यस्त असलेले कुटुंब, मुलांचा देखील समावेश

[२७ पानांवरील चित्र]

यहोवाची सेवा एकत्र करणे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा