वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-2 पृ. ३०-३१
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्राणनाशक नसलेली शस्त्रे
  • सुंता आणि एडस्‌
  • अशिक्षित मुले
  • मुले आणि बाटलीने पाजणे
  • महागनीच्या धोक्याची पूर्वसूचना
  • विषजन्य घाण निर्यात करणे
  • मध—आरोग्यदायक
  • अक्रियाशील मेंदूला गंज चढतो
  • समुद्र-कासवांची समस्या
  • दूरदर्शन आधीच लावून ठेवणे?
  • तुमचे हात धुवा!
  • खगोलशास्त्रज्ञांची आशा
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—२००३
  • रोगराई नाहीशी करण्यात विज्ञानाला यश येईल का?
    सावध राहा!—२००७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
सावध राहा! माहितीपत्रक १३-२ (gbr13-2)
gbr13-2 पृ. ३०-३१

जगावरील दृष्टिक्षेप

प्राणनाशक नसलेली शस्त्रे

द वॉल स्ट्रिट जर्नलप्रमाणे, युद्धात प्राणनाशक नसलेल्या शस्त्रांचा वापर सुरू करण्याच्या शक्यतेबद्दल, अमेरिकेचे शासन अभ्यास करीत आहे. लोकांना न मारता शत्रूंची रडार, दूरसंचार, संगणक आणि इतर काही महत्त्वाची साधने निकामी करण्यासाठी भविष्यातल्या सैनिकांना आधुनिक तंत्रज्ञान मदत करील. जर्नल पुढे असे म्हणते की “चालत्या गाडींची इंजिने बंद करणारी ‘ज्वलन प्रतिरोधी साधने’, त्याचप्रमाणे काही प्रकारच्या टायरना नाश करणाऱ्‍या आणि त्यांचे स्फटीकीकरण करणाऱ्‍या रसायनांचा” शोध लावण्यात प्रयोगशाळा काम करीत आहेत. तरीसुद्धा, त्यातील काही शस्त्रे मानवी जीवनाला धोकादायक असू शकतात. पुढे जर्नल असे म्हणते की “शत्रूंच्या रणगाड्याच्या डोळ्यांना नाश करण्यासाठी जी शक्‍तीमान प्रकाशकिरणे उत्पन्‍न करणारी साधने आहेत ती एका सैनिकाच्या बुबुळांनादेखील उडवू शकतात. अमेरिकेच्या खास दलाद्वारे रणांगणावर तपासणी केलेल्या सहज हातातून नेता येण्यासारखे अतिलघु रेडियो लहरींचे शस्त्र गुपचुपपणे शत्रूंच्या संदेशांना तोडू शकते पण अन्तर्गत अवयवांना शिजवूही शकते.” (g93 6/8)

सुंता आणि एडस्‌

ला रावॉ फ्रॉनसाझ डॉ लॉबॉरॉतवॉर हे फ्रेंच मासिक असे म्हणते की एडस्‌सारख्या रोगाला टाळण्यात पुरूषांच्या सुंतेमुळे फायदा प्राप्त झालेला आहे. त्या मासिकामध्ये तीन वेगवेगळ्या वैद्यकीय अभ्यासांचा उल्लेख केलेला आहे जे दाखवतात की पुरूषांची सुंता (पुरूषांच्या जननेंद्रियावरची त्वचा काढणे) ही एडस्‌च्या फैलावाला ताब्यात ठेवणारे एक घटक आहे. प्रयोगशाळेतील माकडांवर केलेल्या संशोधनाने असे दाखवून दिले आहे की इतर कोणत्याही ऊतींपेक्षा पुरूषाच्या जननेंद्रियाच्या त्वचेमध्ये अशा अधिक पेशी आहेत ज्यांची एडस्‌ वाणूद्वारे संसर्गदूषित होण्याची शक्यता असते. शिवाय, आफ्रिकाच्या १४० वेगवेगळ्या भागांमध्ये केलेल्या एका कॅनेडियन अभ्यासाने प्रकट केले की सुंता करणाऱ्‍यांपेक्षा सुंता न करणाऱ्‍या गटांमध्ये एडस्‌ हा रोग झाला होता. एका दुसऱ्‍या अभ्यासाद्वारे असे सापडले की सुंता झालेल्या अमेरिकी व्यभिचारी पुरूषांमध्ये अशा फारच कमी घटना आढळल्या. (g93 6/8)

अशिक्षित मुले

हजारो बोलिव्ही मुलांना बरोबरचे शिक्षण मिळत नाही. प्रेझेन्स्यॉ नावाच्या बोलिव्ही वृत्तपत्रानुसार, १९९२ च्या खानेसुमारीने प्रकट केले की बोलिव्हीया मध्ये २२,६८,६०५ शाळकरी मुले होती. तरीसुद्धा, शिक्षण खात्यामध्ये असणाऱ्‍या अहवालानुसार फक्‍त १६,६८,७९१ मुलांना राष्ट्राच्या शाळांमध्ये प्रवेश दिला. याचा अर्थ ६,००,००० मुलांना बरोबरचे शिक्षण मिळाले नाही. पुढे प्रेझेन्स्यॉ असे म्हणते शाळेत दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी १,०२,६५२ विद्यार्थ्यांनी त्या वर्षी मध्येच शाळा सोडून दिली. (g93 6/8)

मुले आणि बाटलीने पाजणे

जपानची जवळजवळ २५ टक्के मुले खाण्याच्या समस्या अनुभवत आहेत. बाटलीने पाजणे कदाचित त्याचे कारण असेल. ऑसॉही इव्हनींग न्यूजच्या अहवालाप्रमाणे २० वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून बालवाडी शाळेतल्या शिक्षकांनी याचे निरीक्षण केले की चावायला कठीण असणारे अन्‍न खाताना काही मुलांना त्रास होतो. काही मुलांना ते गिळताना त्रास होतो, इतर ते बाहेर थुंकून टाकतात, आणखी काहींची दुपारची झोप झाल्यावरही ते त्यांच्या तोंडात असते. डॉक्टरांनी असे निरीक्षले आहे की या मुलांचे जबडे कमजोर असतात आणि त्यांच्या हनुवटी लहान असतात. नॉहीको इनोऊए या दन्तवैद्याने आणि सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ रेको सॉकॉश्‍ते यांनी बालपण त्याचे कारण आहे असा दावा केला आहे आणि बाटलीने पाजणे ह्‍याला दोष दिला. असे म्हटले जाते की जेव्हा मुले बाटलीने पितात तेव्हा त्यांना त्यांचे जबडे न हलवता चोखावे लागते. परंतु, मुले स्तनपान करतात तेव्हा ते जोमाने त्यांच्या जबड्यांचा उपयोग करतात आणि नंतर अन्‍न चावण्यासाठी लागणाऱ्‍या स्नायुंना बळकट करतात. (g93 5/22)

महागनीच्या धोक्याची पूर्वसूचना

अमेझोन जंगलातील अडीच लाख ब्राझीलचे भारतीय, त्यांची पारंपारिक घरे गमावण्याच्या धोक्यात आहेत. शासनाच्या भारतीय सेवेच्या अध्यक्षांच्या मते, “सर्वात मोठा धोका” महागनीच्या व्यापाराकडून येतो. बेकायदेशीरपणे महागनीच्या झाडांना पाडल्यामुळे पॅरा राज्यात ३,००० किलोमीटर जागेचे बेकायदेशीर रस्ते बांधण्यात आले, असे लंडनचे द गार्डियन अहवाल देते. प्रत्येक वेळी एक महागनीचे झाड पाडले जाते तेव्हा, कमीतकमी २० इतर जातींना नुकसान पोहोंचते. जंगल साफ केले जात आहे तसे, लोभी व्यापारी, वसाहतवाले आणि सोन्याच्या खाणींच्या कामगारांना त्याचवेळी हजारो वखारींसाठी मार्ग मोकळा करतात. सध्याच्या वापराच्या दरात अजून फक्‍त ३२ वर्षांसाठीचा पुरवठा असणारे महागनी, भारतीयांप्रमाणे, सध्या एक अनिश्‍चित भविष्याचा सामना करीत आहे. (g93 6/8)

विषजन्य घाण निर्यात करणे

घाणीचा नाश करण्यासाठी वाढलेल्या किंमतींमुळे ब्राझीलच्या पर्यावरण आणि भौगोलिक संपत्तीचे नूतनीकरण या संस्थेचे सेबॉस्ट्यून पीनयारो असे म्हणतात की, “श्रीमंत रा त्यांची विषजनक घाण गरीबांना निर्यात करतात.” वेजा मासिकात सांगितल्याप्रमाणे, एका अभ्यासाने दशर्वले की “विकसनशील देशांना दर वर्षी जवळजवळ दशलक्ष टन धोकादायक घाण निर्यात केली जाते.” या आयात केलेल्या विषजनक घाणीचे काय केले जाते? नवीन विद्युत केंद्रांच्या यंत्रसंचात त्याचा इंधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. ब्राझीलच्या पर्यावरणाच्या कार्यालयाचे सल्लागार असे म्हणतात की, “प्रगतीशील रा या प्रबंधाचे समर्थन करतात की येथे कोणत्याही परिस्थितीत काम निर्माण करणे आवश्‍यक आहे.” तरी जगभरात याबद्दल प्रश्‍न उठतात. लंडनचे फायनॅन्शीयल टाईम्स्‌ असे विचारते: “मानवी जीवनाला कोठे कमी लेखले जाते याच्या अंदाजांवरून कंपन्यांचे ठिकाण कोठे असावे याबद्दलच्या निर्णयांना निश्‍चित केले जावे का? वेजा उपरोधिकपणे म्हणते: “उत्तर होय आहे असे दिसते.” (g93 6/8)

मध—आरोग्यदायक

प्राचीन काळापासून, मधमाशीच्या मधाला त्याच्या बऱ्‍या करण्याच्या गुणधर्मासाठी वापरले जाते. ला प्रेस मेडिकॉल हे फ्रेंच मासिक, असा अहवाल देते की आधुनिक वैद्यकीय विज्ञान आता मधाच्या बऱ्‍या करण्याच्या शक्‍तींचा पुन्हा शोध लावीत आहेत. एका अलिकडच्या अभ्यासामध्ये, डॉक्टरांनी भाजलेल्या आणि वेगवेगळ्या खोल जखमांवर, शुद्ध नैसर्गिक मधाने उपचार करण्याचा प्रयोग केला. जखमांवर प्रत्यक्षात मध लावला व त्यांना कोरड्या निर्जंतुक पट्ट्यांनी झाकले. ह्‍या पट्ट्या प्रत्येक २४ तासाला बदलण्यात आल्या. परिणामांवरून दिसून आले की मध हे शुद्धीकरण करणारे व बरे करणारे परिणामकारक साधन आहे. संपर्कात येणाऱ्‍या बहुतेक जतुंचा ते नाश करते आणि नवीन ऊतीच्या वाढीसाठी उत्तेजन देते. ला प्रेस मेडिकॉल शेवटी असे म्हणते: “ते सोपे व स्वस्त असल्यामुळे, मधाची माहिती असावयास हवी आणि जन्तुनाशक उत्पादनांच्या यादीत त्याला समाविष्ट करायला हवे.” (g93 5/22)

अक्रियाशील मेंदूला गंज चढतो

अक्रियाशीलतेचा दीर्घ काळ मेंदूसाठी फायदेकारक आहे का? नक्कीच नाही, असे प्रोफेसर बर्न्ट फिशर यांनी डुसेलडॉर्फ, जर्मनीमध्ये एका वैद्यकीय व्यापारी मेळाव्यात सांगितले. डेर स्टायगरवॉल्ट-बोटच्या अहवालाप्रमाणे त्याच्या शोधांनी असे दर्शवले की “प्रयोगांद्वारे असे दाखवण्यात आले की काही तासांसाठी प्रोत्साहन देणाऱ्‍या गोष्टींच्या संपूर्ण अभावामुळे एका व्यक्‍तीची विचार करण्याची क्षमता पुष्कळ कमी झाली.” त्या प्रोफेसरांनी मंदपणे अक्रियाशीलतेची सुट्टी घालविणाऱ्‍यांना असा सल्ला दिला की त्यांनी पुनर्विचार करावा. वृत्तपत्राने त्यावर असे टिपण केले की, “तालीम न दिलेल्या स्नायुप्रमाणे, अक्रियाशीलतेच्या एखाद्या दीर्घ सुट्टीनंतर, मेंदूला त्याच्या पूर्वीच्या कार्य करण्याच्या पातळीवर आणण्यासाठी तीन आठवड्यांची गरज लागली.” सुट्टीच्या दरम्यान क्रिडा, खेळ आणि आवडणाऱ्‍या साहित्याचे वाचन अशा गोष्टी मेंदूला गंज चढण्यापासून सुरक्षित ठेवतात. (g93 6/8)

समुद्र-कासवांची समस्या

जरी पाणी हे समुद्रकासवांसाठी घर असले, तरी कोरड्या जमिनीवर ते त्यांची अंडी घालतात. जगाच्या समुद्रांमध्ये प्रचंड अंतर भटकल्यावर, समुद्रकासव विशिष्ट किनाऱ्‍यावर प्रजोत्पादनासाठी परतात. पाण्यात झालेल्या समागमानंतर पाण्यातून हळूहळू व फार बेडौलपणे मादी किनाऱ्‍याच्या एका जागेवर येते—कदाचित ती जन्मली त्याच जागेवर—आणि काळजीपूर्वकतेने निवडलेल्या ठिकाणी शांतपणाने अंडी घालते. जोपर्यंत सर्व अंडी—बहुतेक हजार—घातली जात नाहीत तोपर्यंत असे काही दिवसांसाठी केले जाते आणि मग कष्टाने त्यांना झाकण्यात येते. पण मग समस्या उद्‌भवते. दक्षिण आफ्रिकेचे वर्तमानपत्र त्याबद्दल माणसाच्या “अद्वितीय लोभामुळे आणि पर्यावरणाबद्दल उघड दुष्ट असलेल्या उपेक्षेमुळे व्यवस्थितपणे घरट्यांना मोकळे करणे” असे म्हणते की जे “कासवांच्या पुनरूत्पादनाच्या पद्धतींमध्ये गंभीररित्या आड येते.” काही जाती आता लोप पावत आहेत. (g93 5/22)

दूरदर्शन आधीच लावून ठेवणे?

द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासाप्रमाणे अमेरिकेचे बालरोगचिकित्सा विद्यापीठ असे म्हणते, “मुलांसाठी कमी दूरदर्शन चांगले आहे, खासकरून हिंसक दूरदर्शन.” त्या लेखात असे सांगितले होते की, “१४ महिन्यांइतकी लहान मुलेसुद्धा दूरदर्शनचे प्रत्यक्षात निरीक्षण करतात आणि त्यावर दाखवलेल्या वागणूकींना शोषून घेतात.” ते पाहत असलेल्या बहुतेक गोष्टी हल्लेखोर आणि हिंसक प्रकारच्या असतात. पालकत्वाच्या अधिकाराला पुनर्स्थापित करण्याच्या प्रयत्नात, तो अहवाल असा सल्ला देतो की दूरदर्शनवर ऋण विद्युतकणाच्या वेळ-वाहिनीचे कूलुप लावावे, की ज्यामुळे कार्यक्रम, वाहिन्या आणि वेळ आधीच लावून ठेवता येतात. अशाप्रकारे, पालक घरी नसतानाही, दूरदर्शनवर त्यांची मुले काय पाहतात व कधी पाहतात ह्‍या गोष्टींना ते ताब्यात ठेऊ शकतात. (g93 5/22)

तुमचे हात धुवा!

आधुनिक शासकीय विज्ञानाने रोगाविरुद्ध लढण्यास पुष्कळ तांत्रिक प्रगत्या केल्या आहेत, तरी वैज्ञानिक असे म्हणतात की साध्या साबणाने व पाण्याने हात धुणे हा अजूनही संसर्गजन्य रोगांचा फैलाव न होण्यासाठी सर्वात प्रभावकारी मार्ग आहे. ले फिगारो हे फ्रेंच वृत्तपत्र असा अहवाल देते की फ्रान्स, जर्मनी, नेदरलँन्डस्‌ आणि स्वितझरलँडमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्यविषयक सवयींबद्दलच्या एका अलिकडील अभ्यासाप्रमाणे हॉटेल, उपहारगृह, कार्यालय, शाळा आणि कंपन्यांच्या सार्वजनिक शौचालयात संशोधकांनी दुरूस्त करणाऱ्‍या व्यक्‍तींचे किंवा स्वच्छ करणाऱ्‍या कामगारांचे सोंग घेतले. त्यांना हे सापडले की ४ व्यक्‍तींपैकी १ व्यक्‍ती शौचालयाचा उपयोग केल्यावर आपले हात धुत नाही आणि एक चतुर्थांश जे हात धुतात ते साबणाचा वापर करत नाहीत. वैज्ञानिक असे म्हणतात की जगभरात रोगाचा फैलाव होण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे मानवी हात होय. (g93 6/8)

खगोलशास्त्रज्ञांची आशा

यु.एस नॅशनल एरोनॉटीक्स ॲन्ड स्पेस ॲडमिनीस्ट्रेशनने केलेल्या १० वर्षीय कार्यक्रमात, दुसऱ्‍या ग्रहांवरच्या बुद्धिमान प्राण्यांकडून रेडिओद्वारे मिळणाऱ्‍या संदेशांचा शोध लावण्याच्या प्रयत्नात, खगोलशास्त्रज्ञ १० कोटी डॉलर्स खर्च करण्याची योजना करत आहेत. इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यूनप्रमाणे, एकाच वेळी रेडिओ लहरींद्वारे ताऱ्‍यांचा वेध घेणाऱ्‍या दुर्बीणीमध्ये लाखो अतिलघु रेडिओ लहरींच्या वाहिन्यांच्या अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, भारत, रशिया, प्यूरटो रीको आणि अमेरिकेत परकीय आकाशवाणींचे अहवाल देण्याची योजना ते करत आहेत. काही वैज्ञानिक लवकरच प्राप्त होणाऱ्‍या यशाबद्दल आशावादीपणाने भाकीत करत असताना, इतर हे दर्शवतात की १९६० पासून घेण्यात आलेले ५० शोध निष्फळ ठरले आहेत. (g93 5/22)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा