गर्भपाताचा पेचप्रसंग—६ कोटी खून हा याचा उपाय आहे का?
गोंधळलेली, घाबरलेली, अश्रूंनी डबडबलेली १५ वर्षीय मुलगी तिच्या प्रियकराला अस्वस्थ होऊन परत जात असलेली पाहते. गरोदर राहिल्यामुळे त्याने तिला मूर्ख असे म्हटले. तिला वाटले ते प्रेमात होते.
आपल्याला पुन्हा एकदा गर्भ राहिला आहे व आता होणारे मूल सहावे आहे असे एका स्त्रीला जेव्हा कळते तेव्हा ती निराशीत होते. तिचा नवरा बेरोजगार आहे, आणि तिची मुले दररोज रात्री उपाशी पोटी झोपी जातात. मग ते आणखी एका मुलाला कसे संभाळू शकतील?
नीट पेहराव केलेली एक स्त्री तिच्या डॉक्टरांना म्हणते: “गरोदरपण पेचप्रसंगी होऊ शकत नाही.” तिने शेवटी तिची इंजिनियरींगची पदवी मिळवली आहे आणि आता तिचा नवीन धंदा सुरू करण्याच्या तयारीत आहे. तिचा नवरा त्याच्या वकीलीच्या कामात पूर्णपणे रमून गेलेला आहे. मग, एका बाळासाठी ते कोठून वेळ काढतील?
ह्या लोकांच्या जीवनाच्या पद्धतींमध्ये बराच फरक आहे व ते वेगवेगळ्या पेचप्रसंगांचा सामना करतात, पण ते एकच उपाय निवडतात: गर्भपात.
गर्भपात हा राजनैतिक, सामाजिक, वैद्यकीय आणि वेदांतीय क्षेत्रात संताप उत्पन्न करणाऱ्या वादविवादांना पेटवणारा ह्या दशकातला सर्वात स्फोटक विषय आहे. अमेरिकेत, गर्भपातास विरोध करणारे न जन्मलेल्या बाळाच्या हक्कांसाठी मोर्चे काढतात. पण, गर्भपातास कायदेशीरपणे संमती दर्शवणारा गट स्वातंत्र्याच्या अतिप्रतिष्ठीत कायद्याच्या आधारावर उभा आहे आणि निर्णय घेण्याचा हक्क स्त्रीचा आहे अशा मताचा आहे. गर्भपाताचे विरोधक निवडणुकींमध्ये, न्यायालयात, चर्चेसमध्ये आणि रस्त्यांवरही सर्वमान्यता हवी असे म्हणणाऱ्यांशी लढतात.
दोन्ही बाजूंनी भावनापूर्ण वादविवादांनी तुटलेल्या या रस्सीखेचात लाखो अडकलेत. “निवड पक्ष” आणि “जीवन पक्ष” ह्या संज्ञाच अनिश्चित जणांना आपल्या बाजूने ओढू पाहणाऱ्या पक्षांचे गुणवैधर्म्य स्पष्ट करण्यासाठी काळजीपूर्वकतेने निवडल्या आहेत. स्वातंत्र्याची पूजा केल्या जाणाऱ्या ह्या युगात निवड करायला कोणाला आवडणार नाही? पण मग परत, जीवन कोणाला आवडणार नाही? असुरक्षित बेकायदेशीर गर्भपात अनुभवलेल्या छळलेल्या स्त्रीयांच्या मृत्यूचे नाटकीकरण करून निवड पक्ष शस्त्र उगारतो. जीवन पक्ष वकील न जन्मलेल्या लाखो बाळांच्या मृत्यूची अत्यंत कठोर आठवण म्हणून गर्भपात केलेल्या गर्भांच्या भरलेल्या बरण्या दाखवतात.
लॉरेन्स एच ट्राईबच्या ॲबोर्शन: द क्लॅश ऑफ ॲबसेल्यूट्स या पुस्तकामध्ये ह्या प्राणघातक दुःखद प्रसंगाबद्दल अगदी योग्य वर्णन दिले आहे. “भ्रूण हा एक मानव प्राणी आहे अशी जाणीव असणारे आणि त्याला अधिक महत्त्व देणारे लोक, त्या भ्रूणाला वाहून नेणाऱ्या स्त्रीकडे आणि तिच्या मानवी दैन्यावस्थेकडे क्वचितच पाहतात. . . . पुष्कळ असे इतर लोक ज्यांना स्त्रीची आणि तिच्या शरीराची जाणीव असते, जे तिच्या भविष्याला ताब्यात ठेवण्याच्या तिच्या हक्कासाठी मागणी करतात, त्यांना स्त्रीमध्ये असणाऱ्या भ्रूणाची क्वचितच जाणीव राहते व खरोखरी त्याला कोणते जीवन जगावयास दिले जाईल याची कल्पनाही करीत नाहीत.”
हे नैतिक युद्ध चालत असता, दर वर्षी जवळजवळ ५ ते ६ कोटी न जन्मलेली बालके हक्कांच्या रणांगणावर पडतात.
ह्या भावनोत्कट विषयात तुम्ही कोठे उभे आहात? तुम्ही ह्या मुख्य प्रश्नांची उत्तरे कशी द्याल: “निर्णय घेण्याचा मूळ हक्क स्त्रीचा आहे का? गर्भपात कोणत्याही परिस्थितींमध्ये न्याय्य आहे का? जीवनाची सुरवात कधी होते? आणि अंतिम पण क्वचितच विचारला जाणारा प्रश्न: “जीवनाचा आणि मुलांना जन्मास आणणारा निर्माणकर्ता गर्भपाताला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
गर्भपाताचा मोठा इतिहास आहे. प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये, गर्भपात एक सामान्य रीत होती. युरोपमध्ये मध्य युगाच्या आणि विद्येच्या पुनरुज्जीवन काळात, मातेला गर्भात जीव आहे असे जाणवूपर्यंत गर्भपात करण्यास अनुमती होती. नको असलेल्या लाखो गर्भधारणा हा परिणाम लैंगिक क्रांतिमुळे दिसून आला.
स्त्रीयांच्या चळवळीच्या सुरवातीला १९६० ह्या वर्षाने चिन्हांकित केले, ज्याचा कोनशिला तथाकथित पुनरुत्पादनाचा हक्क आहे. बलात्काराच्या गरोदर बळींसाठी किंवा अगम्यगमनाच्या बळींसाठी किंवा मातेच्या आरोग्याला धोका असतो तेव्हा गर्भपाताच्या हक्कांची काहीजण मागणी करतात. वैद्यकीय तंत्रज्ञानाने संभाव्य व्यंग किंवा बाळाचे लिंग पाहण्यासाठी गर्भाशयाची तापसणी करणे शक्य बनवले आहे. डॉक्टरांच्या रोगाबद्दलच्या नैराश्यपूर्ण पूर्वनिदानाच्या बळावर गर्भांना नष्ट करण्यात येते. चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रीया व्यंगांबद्दल चिंतातूर असू शकतील.
संतती नियमनाच्या पद्धती सहज उपलब्ध नसतील अशा द्रारिद्य्राने ग्रासलेल्या देशांतील पुष्कळ स्त्रीत्रांना असे वाटते की त्या अधिक मुलांची काळजी घेऊ शकणार नाहीत. निवड पक्षाची व्याख्या त्याच्या मर्यादेपर्यंत विस्तारीत करणाऱ्या काही गरोदर स्त्रीयांना गरोदरपणाची वेळ योग्य नाही असे वाटते किंवा त्यांना न जन्मलेल्या बाळाचे लिंग कळते व ते नको असल्यामुळे त्या भ्रूणाचा गर्भपात करण्यास निवडतात.
ह्या झुंजीत, जीवन कधी सुरू होते त्याबद्दल पुष्कळ क्रोधिष्ट मत प्रकट केले गेले. फलित झालेली अंड पेशी जिवंत आहे याबद्दलची शंका फारच कमी लोकांना आहे. परंतु, प्रश्न असा आहे, काय म्हणून जिवंत आहे? केवळ ऊती म्हणून? का मानव म्हणून? ओक झाडाचे फळ ओक वृक्ष असू शकते का? मग, एखादे भ्रूण व्यक्ती असू शकते का? त्याला नागरिकत्वाचे हक्क आहेत का? शब्दांवरचा हा वाद अंतहीन आहे. एका दवाखान्यात, अपुरी वाढ झालेल्या गर्भाचे जीवन वाचवण्यासाठी डॉक्टर शूरतेने झटतील आणि तरी त्याच वयाच्या भ्रूणाची हत्या करतील, हे किती उपरोधक आहे! गर्भाशयात असणाऱ्या बाळाची हत्या करण्यास कायदा अनुमती देऊ शकतो, परंतु बाळ गर्भाशयाच्या बाहेर असेल तर तो खून मानला जातो.
कायदेशीर गर्भपातासाठी जास्त मागण्या, “मुक्त असलेल्या” आधुनिक स्त्रीयांकडून येतात ज्यांना आधीच गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक पद्धती मिळवण्यास काहीही मर्यादा नाहीत. प्रत्यक्षात गर्भधारणा आणि पुनरुत्पादनाच्या सामर्थ्याचा उपयोग केला असतानाही ते पुनरुत्पादनाच्या हक्कांबद्दल आवेशीपणाने दावा करतात. खरे म्हणजे पुनरुत्पादन व्हायला द्यायचे नाही अशी त्यांची इच्छा असते. त्यांचे समर्थन? “ते माझे शरीर आहे!” पण ते खरेच आहे का?
ॲबोर्शन—ए सिटीझन्स् गाईड टू द इश्यूझ असे व्यक्त करते की गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यांमध्ये “चिकट द्रव्याच्या अवस्थेत छोट्या प्रमाणात असणारी ऊती काढण्यास फारच सोपे असते.” “ऊतीचा एक गोळा काढणे” किंवा “गर्भधारणेद्वारे उत्पन्न झालेल्याचा शेवट करणे” अशाप्रकारे गर्भपाताला संबोधणे योग्य असेल का? का कटू सत्याला रूचकर बनवण्यासाठी आणि त्रस्त विवेकांना धीर देण्यासाठी ह्या गोड संज्ञांचा वापर केला जातो?
त्या नको असलेल्या ऊतीचा भाग वाढत आहे, जीवन जगत आहे, व त्याच्या स्वतःच्या गुणसूत्रांमध्ये ते पूर्ण आहे. एखाद्या भाकीत आत्मकथेप्रमाणे ते एका अतुल्य व्यक्तीच्या तयारीबद्दल सविस्तर माहिती देते. गर्भाच्या अभ्यासाची सुप्रसिद्ध संशोधनाची प्रोफेसर ए. डब्ल्यू. लीली असे वर्णन करतात की: “जीवशास्त्राप्रमाणे कोणत्याही अवस्थेत भ्रूण केवळ मातेचे उपांग आहे ह्या दृष्टिकोनाशी आपण सहमत होऊ शकत नाही. अनुवंशिकतेच्या शास्त्राप्रमाणे, गर्भधारणेपासून माता आणि बाळ या दोन्ही वेगळ्या व्यक्ती असतात.”
बेजबाबदार वर्तणूक
तरीपण, गर्भपात एवढ्या मुबलकतेने उपलब्ध असल्याकारणाने, नको असलेली गर्भधारणा टाळण्याची कोणालाही आवश्यक जरूरी भासत नाही. त्यापेक्षा त्यांना “नको असलेल्या गर्भधारणा” टाळण्याचा उपाय म्हणून गर्भपाताची पद्धत उपयोगात आणणे अधिक सोयीस्कर वाटते.
या शतकात आकडेवारी हे दाखवून देते की वयात येणे लवकर घडते. म्हणूनच, तरुण मुलांना मुले होतात. त्यांच्या त्या विशेषाधिकाराबरोबर असणाऱ्या कठीण जबाबदारीबद्दल त्यांना शिकवले जात आहे का? सर्वसाधारण अमेरिकन त्याचे किंवा तिचे कौमार्य १६ वयातच गमावतात, आणि ५ पैकी १ जण १३ वर्षांचे होण्याआधीच त्यांचे कौमार्य गमावतात. एक तृतीयांश विवाहित पुरूष किंवा स्त्रीयांचे प्रेमसंबंध चालू आहेत किंवा भूतकाळात होते. व्यभिचारी लोकांमध्ये गर्भपाताला इच्छुक ग्राहक मिळतात. हे जणू एडस्ला रोखण्यासाठी वेश्याव्यवसायाला अधिकृत करा अशी जी मागणी अधूनमधून केली जाते त्याप्रमाणे गर्भपाताला अधिकृत केल्याने गर्भपाताची पद्धत वैद्यकीयरित्या काहीशी सुरक्षित दिसेल तथापि, त्याने असे फलदायी वातावरण निर्माण करण्यात अधिक मदत केली आहे, ज्यात नैतिक रोग भरभराटीस येऊ शकतात व येत आहेत.
हिंसेंचे किंवा परिस्थितीचे बळी?
बलात्कारापासून गर्भधारणा होणे फारच क्वचित आहे असे अभ्यासांद्वारे दर्शवले गेले. मीन्नेपॉलिस, अमेरिका, येथे ३,५०० बलात्काराच्या अनुक्रमिक बळींचे परीक्षण केल्यावर त्यात एकही गर्भधारणेची घटना आढळली नाही. आधीच्या झेकोस्लोवाकियामध्ये केलेल्या ८६,००० गर्भपातांपैकी फक्त २२, बलात्कारामुळे केले होते. म्हणजेच, गर्भपात करणारे फारच कमी जण ह्या कारणांमुळे गर्भपात करतात.
बाळामध्ये भयानक व्यंगता असल्याबद्दल आणि उपाय नसलेल्या व्यंगतांबद्दल आगाऊ माहिती मिळाली तर काय? जन्माच्या व्यंगत्वाचे पहिले चिन्ह दिसले की लागलीच गर्भपात करण्यासाठी डॉक्टर आग्रह करण्यास तयार असतील. रोगाच्या परीक्षेबद्दल ते अगदीच निश्चित असू शकतील का? अशा आत्यंतिक भविष्यवाण्या कधीकधी निराधार असू शकतील असे पुष्कळ पालकांनी सिद्ध केले आहे, आणि त्यांची आनंदी व स्वास्थ्यपूर्ण मुले त्याचा पुरावा देतात. इतर अपंग समजली जाणारी मुले पालक बनण्यासाठी तितकीच आनंदी आहेत. खरे म्हणजे, अमेरिकेत गर्भपात मिळवणाऱ्यांपैकी फक्त १ टक्का भ्रूणामध्ये संभाव्य व्यंगत्वाबद्दल सांगितल्यामुळे गर्भपात करतात.
तरीसुद्धा, तुमचा हा लेख वाचून होईपर्यंत शेकडो न जन्मलेल्या बाळांचा गर्भपात झाला असेल. ते काठे घडत आहे? त्यामध्ये गोवलेल्या जणांच्या जीवांवर कसा परिणाम होत आहे?
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
माता: “ते माझे शरीर आहे!”
बाळ: “नाही! ते माझे शरीर आहे!”