गर्भपाताचे दुःखद बळी
गर्भपातामुळे प्रत्येक वर्षी ५ ते ६ कोटी न जन्मलेली अर्भके मरण पावतात. त्या संख्येचे आकलन तुम्ही करू शकता का? हवाई द्विपावरील संपूर्ण लोकसंख्येला प्रत्येक आठवडी नकाशावरून नष्ट केल्याप्रमाणे ते असेल!
काही शासने गर्भापातांचा काळजीपूर्वक अहवाल ठेवत नसल्यामुळे अचूक आकडे मिळणे कठीण आहे. आणि जेथे गर्भपातावर बंदी आहे किंवा ते बेकायदेशीर आहे, तेथे तज्ज्ञ केवळ धोक्याची शक्यता आहे असे गृहीत धरू शकतात. परंतु विश्वामध्ये गर्भपाताची बाजू काहीशी अशी दिसते:
अमेरिकेतच, टॉन्सील काढण्याच्या अगदी पाठोपाठ अशी दुसरी आणि सर्वात सामान्य म्हणजे गर्भपाताच्या शस्त्रक्रियेची पद्धत होय. दर वर्षी, १५ कोटींपेक्षा जास्त गर्भपात केले जातात. याद्वारे, बहुतेक स्त्रीया—५ पैकी ४—अविवाहित आहेत हे स्पष्ट दिसते. अविवाहित स्त्रीयांनी मुलांना जन्म देण्यापेक्षा अधिक गर्भपात केले असे आढळले पण तेच विवाहित स्त्रीयांमध्ये गर्भपाताचे प्रमाण कमी आणि जन्म देण्याचे प्रमाण अधिक दिसले.
जगात गर्भपाताचे नियम मध्य आणि दक्षिण अमेरिकेत—अधिककरून कॅथोलिक भागात—जास्त बंधनकारक आहेत. तरीसुद्धा, बेकायदेशीर गर्भपात विपूल प्रमाणात घडतात, आणि त्यामुळे स्त्रीयांच्या आरोग्याला गंभीर धोके संभावतात. उदाहरणार्थ, ब्राझीलच्या स्त्रीयांनी मागच्या वर्षी जवळजवळ चाळीस लाख गर्भपात केले. बिकट अवस्था झाल्यामुळे ४,००,००० पेक्षा अधिकांना वैद्यकीय उपचार करावे लागले. लॅटिन अमेरिकामध्ये एक चतुर्थांश गर्भांचा अंत केला जातो.
ॲटलॅन्टीकच्या पलिकडे आफ्रिकेच्या खंडातही नियम कडक आहेत. बेकायदेशीर डॉक्टरांकडून मदत घेतल्यामुळे गरीब स्त्रीयांमध्ये हानी आणि मृत्यू ही सामान्य गोष्ट आहे.
मध्यपूर्वेत, पुष्कळशा राष्ट्रांमध्ये कडक असे लेखी कायदे आहेत, पण तरी गर्भपाताची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व मोठी रक्कम देण्याची ताकद असणाऱ्या स्त्रीया त्यांना मिळवतात.
बहुतेक पाश्चिमात्य युरोपमध्ये गर्भपाताला अनुमती दिली जाते, त्यामध्ये स्कॅनडीनेव्हिया सर्वात स्वतंत्र असे आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य खात्याने, १९६७ मध्ये गर्भपाताला अधिकृत केले तेव्हापासूनचे अहवाल ठेवले आहेत. त्याने गर्भपाताचे प्रमाण दुप्पट होत आहे असे निरीक्षले आणि त्याचबरोबर अनौरस जन्म, गुप्तरोग, वेश्याव्यवसाय, आणि पुनरुत्पादनाच्या क्षमतेमधील अव्यवस्था ह्यांमध्ये अधिक वाढ झाली आहे.
पूर्व युरोपप्रमाणे तेथील गर्भपाताचे नियमदेखील बराच बदल अनुभव करीत आहेत. रशियामध्ये प्रत्येक वर्षी १.१ कोटी गर्भपाताचे अंदाज काढले जातात, जो जगभरातला सर्वात मोठा क्रमांक आहे. संतती नियमनाच्या पद्धतींचा अभाव, आणि गरीब आर्थिक परिस्थितींमुळे त्या भागातील सर्वसाधारण स्त्रीच्या जीवनात सहा ते नऊ गर्भपात घडतात.
सबंध पूर्व युरोपात मुक्ततेचा झोक आहे. त्याचे नाट्यमय उदाहरण म्हणजे रोमानिया, जेथे लोकसंख्या वाढविण्यासाठी आधीच्या सरकाराने गर्भपातावर निर्बंध घातला आणि संतती नियमनाच्या पद्धतींवर बंदी घातली. स्त्रीयांना कमीतकमी चार मुले असावीत म्हणून जोर दिला गेला, आणि १९८८ पर्यंत रोमानियाची सर्व अनाथालये त्यागलेल्या युवकांनी भरून गेली होती. म्हणून, १९८९ च्या क्रांतिकारी शासनाने गर्भपातावरची ही बंदी काढली तेव्हा, ४ पैकी ३ बालकांचा गर्भपात केला जाऊ लागला, जे युरोपियातील सर्वात मोठे प्रमाण आहे.
आशियात गर्भपाताचे सर्वात जास्त क्रमांक आहेत. एक मूल असे धोरण असणाऱ्या आणि गर्भपात आवश्यक असणाऱ्या चीनमध्ये सर्वात जास्त गर्भपाताचे प्रमाण आहे, जेथे दर वर्षी १.४ कोटी गर्भपात केल्याचा अहवाल दिला जातो. जपानमध्ये स्त्रीया त्यांच्या गर्भपात केलेल्या मुलांच्या स्मृत्यर्थ छोट्या पुतळ्यांना लाळेरे आणि खेळण्यांनी सजवतात. लोकांना संतती-नियमन गोळ्यांबद्दल फारच अस्वस्थता वाटते, त्यामुळे गर्भपात ही कुटुंब नियोजनाची मुख्य पद्धत आहे असे त्यांना वाटते.
सबंध आशियात, आणि विशेषकरून भारतामध्ये, वैद्यकीय तंत्रज्ञानाने स्त्री-हक्क कार्यकर्त्यांची बिकट अवस्था केली आहे. ॲमनिओसेंटेसीस आणि अल्ट्रासाउंड सारख्या पद्धतींमुळे गर्भधारणेच्या लवकरातल्या लवकर काळात बालकाचे लिंग ओळखले जाते. पूर्वेकडील संस्कृतीने मुलींपेक्षा मुलांना जास्त मूल्य दिले आहे. म्हणून, जेथे लिंग ओळखण्याच्या पद्धती आणि गर्भपात उपलब्ध आहे, तेथे मोठ्या संख्येने बालिका असल्यास त्या भ्रूणाची हत्या केली जाते, ज्यामुळे मुलगा व मुलगी ह्यांच्या जन्म प्रमाणात असमतोल निर्माण होतो. स्त्रीयांची चळवळ आता विरोधाभासात्मक भूमिकेत आहे, व त्यामुळे बालिकेच्या भ्रूणाची हत्या करावी की नाही या स्त्रीच्या हक्काची मागणी ते करत आहेत.
मातेला काय वाटते
इतर वैद्यकीय पद्धतींप्रमाणे, गर्भपातदेखील धोकादायक आणि दुःखदायक आहे. गर्भधारणेच्या काळात बालकाला सुरक्षित ठेवण्याकरता गर्भाशयाचे तोंड घट्ट बंद केलेले असते. गर्भाचे औषधाने द्रवकरण करणे किंवा साधनांना आत घालणे यातनादायक असू शकते किंवा त्यामुळे जखमाही होऊ शकतात. सक्शन गर्भपाताला ३० किंवा त्याहून अधिक मिनिटे लागतील ज्याच्या दरम्यान काही स्त्रीया मध्यम ते तीव्र दुखणे आणि स्नायूत पेटका येणे अशा गोष्टी अनुभवतात. सलाईन गर्भपातामध्ये, प्रोस्टॅग्लेडिनच्या म्हणजेच वेणा उत्पन्न करणाऱ्या पदार्थांच्या सहाय्याने अकालिक वेणा उत्पन्न केल्या जातात. आकुंचन हे काही तासांकरता किंवा दिवसांकरता राहू शकते आणि ते दुःखदायक व भावनोत्कटपणे ऱ्हास करणारे असू शकते.
गर्भपातामुळे लगेचच होणाऱ्या त्रासांपैकी रक्तस्त्राव, गर्भाशयाला चिरा किंवा हानी होणे, गर्भाशयाला छिद्र पडणे, रक्ताच्या गाठी, भूलीची प्रतिक्रिया, आचके, ताप, थंडी, आणि उलट्या ह्या गोष्टींचा समावेश आहे. विशेषकरून, गर्भाशयात बाळाचे काही भाग किंवा अपरा राहिला तर संसर्गाचा अधिक धोका आहे. अपूर्ण गर्भपात ही सामान्य गोष्ट आहे, आणि मग राहिलेल्या कुजणाऱ्या ऊती किंवा गर्भाशयच काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरते. अमेरिका, ब्रिटन आणि पूर्वीच्या झेकोस्लोवाकियामध्ये घेतलेले शासनाचे अभ्यास सुचवतात की भ्रूण हत्येमुळे अफलत्व, बीज वाहिनी गर्भधारणा, गर्भपात, अकालिक जन्म आणि जन्मताच व्यंगत्व ह्यांच्या भविष्यातल्या शक्यता वाढतात.
अमेरिकेचे शस्त्रक्रियेचे माजी प्रमुख एवरेट कूप ह्यांनी निरीक्षले की कोणाही व्यक्तीने “गर्भपात केलेल्या आणि आता मूल हवे असतानाही तिला ते होऊ शकत नाही अशा स्त्रीच्या भावनात्मक प्रतिक्रियेबद्दल किंवा तिच्या दोषीपणाबद्दल अभ्यास केलेला नाही.”
गर्भपाताच्या अभ्यासांच्या संयम राखणाऱ्या गटांमध्ये जीवनाबद्दल आणि देवाच्या कायद्यांबद्दल आदर असल्यामुळे कुमारिका राहणाऱ्या शुद्ध ख्रिस्ती युवतींचा समावेश असायला हवा होता. अशा अभ्यासांमध्ये हे आढळून आले असते की त्या चांगल्या नातेसंबंधांचा आनंद लुटतात, स्वतः विषयीचे त्यांचे चांगले मत असते आणि चिरकाल टिकणारी अशी मनाची शांती असते.
न जन्मलेल्या बाळाला कसे वाटते
मातेच्या उबदार उदरात सुरक्षित असणाऱ्या आणि मग त्यावर झटकन प्राणघातक शक्तीने हल्ला केल्या जाणाऱ्या बाळाला कसे वाटते? आपण फक्त कल्पना करू शकतो, कारण त्या गोष्टीला प्रत्यक्षात कधीही सांगितले जाणार नाही.
बहुतेक गर्भपात पहिल्या १२ आठवड्यांमध्ये केले जातात. ह्या अवस्थेत हे छोटेसे भ्रूण श्वास घ्यायला आणि गिळायला सुरवात करते आणि त्याचे हृदय ठोके देत असते. ते त्याच्या पायांच्या छोट्याशा बोटांना वळवू शकते, मुठ बनवू शकते, त्याच्या पाण्याच्या जगात ते हलू शकते—आणि दुखते हे जाणू शकते.
पुष्कळ भ्रूणांना गर्भाशयातून तीक्ष्ण टोकाच्या निर्वात नळीद्वारे जोराने हिसका देऊन बाहेर ओढले जाते आणि एका बाटलीत शोषले जाते. ह्या पद्धतीला वॅक्यूम ॲस्पीरेशन असे म्हटले जाते. हे शक्तीशाली शोषण (घरातील वॅक्यूम क्लीनरच्या २९ पटीने जास्त शक्ती असलेले) त्या छोट्याशा शरीराचे तुकडे करते. इतर बालकांचे गर्भपात, गर्भाचे औषधाने द्रवकरण केल्याने आणि क्यूरेटेजने केले जातात, ज्यामध्ये गर्भाशयाच्या कडा वर्तुळाकाराच्या सुरीने खरवडल्या जातात ज्यात बाळाचे तुकडे पाडले जातात.
सोळा आठवड्यांपेक्षा जास्त मोठे भ्रूण सलाईन गर्भपात किंवा मीठाने विषकरण करण्याच्या पद्धतीने मरतात. एक लांब सुई द्रवाच्या पिशवीला टोचते, त्यातून काही गर्भाशयाच्या द्रव्याला बाहेर काढते आणि त्याऐवजी त्यात मीठाचे अधिक संहत द्रव भरते. बाळ जसे श्वास घेते आणि गिळते तसे, ते विषारी द्रव त्याच्या नाजूक फुप्फुसांमध्ये भरले जाते, मग ते झटते व आचके देते. त्या विषाच्या जाळणाऱ्या परिणामामुळे त्वचेचे वरचे थर जळतात ज्यामुळे त्वचा कच्ची व वाळून शुष्क होते. त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊ लागतो. काही तासांतच दुःखदायक मृत्यू ओढावतो, तरी कधीकधी जेव्हा एक किंवा त्याही अधिक दिवसांनंतर वेणा सुरू होतात, एक जिवंत पण मरत असलेले बाळ बाहेर येते.
अशा पद्धतींनी मारण्यासाठी जर बाळाची खूपच वाढ झाली असेल तर, एक मार्ग राहतो—गर्भाशय उघडणे, हा दुसरा हेतू असलेला एक सिसेरियन भाग आहे जेथे जीवन वाचवण्याऐवजी त्याचा शेवट केला जातो. मातेचे उदर शस्त्रक्रियेने उघडले जाते, आणि नेहमीच जवळजवळ एका जिवंत बाळाला बाहेर काढले जाते. ते रडतही असेल. पण त्याला मरायला सोडून दिले जोते. काहींचा श्वास कोंडून, पाण्यात बुडवून किंवा इतर मार्गांनी मुद्दाम मारले जाते.
डॉक्टरला कसे वाटते
पुष्कळ शतकांपासून डॉक्टरांनी आदरयुक्त हिपोक्रॅटिक शपथेमध्ये प्रकट केलेल्या मूल्यांना स्वीकारले आहे, तिचा काही भाग असा वाचला जातो: “मला विनवल्यावरही मी कोणाला प्राणघातक औषध देणार नाही, किंवा प्राणघातक औषध घेण्यासाठी कोणाला सल्ला देणार नाही, मी कोणत्याही स्त्रीला नाशकारक औषध [गर्भपात करण्यासाठी] देणार नाही, पण माझ्या कलेला निर्दोष आणि पवित्र ठेवीन.”
गर्भात जीव नष्ट करणाऱ्या डॉक्टरांना कोणत्या नैतिक लढायांचा सामना करावा लागतो? डॉ. जॉर्ज फ्लेश त्याचे ह्याप्रमाणे वर्णन करतात: “वैद्यकाचा प्रगत विद्यार्थी असताना आणि हॉस्पिटलमध्ये राहत असताना मी जे पहिले गर्भपात केले, त्यामुळे मला कोणताही भावनात्मक त्रास झाला नाही. . . . पुष्कळ शेकडो गर्भपात केल्यानंतर मला असंतुष्टता वाटायला लागली. . . . मी का बदललो? माझ्या व्यवसायाच्या अगदी सुरवातीला एक विवाहित जोडपे मजकडे आले व त्यांनी मला गर्भपात करण्यासाठी विनंती केली. रूग्णाचे गर्भाशयद्वार फारच कडक असल्यामुळे, मी ते उघडू शकत नव्हतो. मी तिला एका आठवड्यानंतर परत यायला सांगितले, जेव्हा गर्भाशयद्वार मऊ होईल. ते जोडपे परतले आणि त्यांनी मला सांगितले की त्यांनी त्यांची मने बदलली होती. सात महिन्यानंतर मी त्यांच्या बाळाचे बाळंतपण केले.
“काही वर्षांनंतर मी त्या जोडप्याचे मूल म्हणजेच, जेफरी सोबत टेनीस क्लबच्या स्विमींग पूलमध्ये खेळलो जेथे त्याचे पालक व मी सदस्य होतो. तो खूपच आनंदी आणि सुंदर होता. जेफरीचे संभाव्य जीवन केवळ एका तांत्रिक कारणामुळे नष्ट झाले नाही ह्याचा विचार करताना मी शहारलो . . . मी असा विश्वास करतो की फक्त मातेच्या विनंतीमुळे एका वाढलेल्या भ्रूणाच्या अवयवांचे हिंसकरित्या तुकडे करणे, हे पापाचे एक कृत्य आहे, ज्याला सामाजाने अनुमती देता कामा नये.”
गर्भपातासाठी मदत करण्याचे थांबवलेल्या नर्सने तिच्या गर्भपाताच्या चिकित्सालयामधील कामाबद्दल असे सांगितले: “आमच्या कामांपैकी एक म्हणजे गर्भपात करण्यात आलेल्या बालकाच्या शरीराचे भाग मोजणे. जर एखादी मुलगी तिच्या गर्भाशयात बाळाचे तुकडे तसेच ठेऊन घरी गेली तर, गंभीर समस्या उद्भवू शकतात. मी सगळे तुकडे गोळा करीत आणि त्यामध्ये दोन हात, दोन पाय, धड, आणि डोके आहे का ते मोजत असे. . . . मला चार मुले आहेत. . . . माझ्या व्यावसायिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात एक मोठी झुंज होती जिला मी मिटवू शकत नव्हते. . . . गर्भपाताचा व्यवसाय खूपच कठीण आहे.”
[७ पानांवरील चित्र]
आशियामध्ये, जेथे मुलांना अधिक पसंत केले जाते, डॉक्टर हजारो बालिकांच्या भ्रूणांचा गर्भपात करतात
[चित्राचे श्रेय]
Photo: Jean-Luc Bitton/Sipa Press
[८ पानांवरील चित्र]
गर्भपाताचा विरोध करणाऱ्या प्रदर्शनात पत्रकार कायदेशीरपणे गर्भपात झालेल्या २० आठवड्यांच्या भ्रूणाचे फोटो घेत असताना
[चित्राचे श्रेय]
Photo: Nina Berman/Sipa Press
[८ पानांवरील चित्र]
वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिकेत गर्भपाताला आधार देणाऱ्यांचे प्रदर्शन
[चित्राचे श्रेय]
Photo: Rose Marston/Sipa Press
[९ पानांवरील चित्र]
अमेरिकेत, गर्भपात मिळवणाऱ्या ५ पैकी ४ स्त्रिया अविवाहित आहेत