बलात्काराची वास्तविकता
हे पृष्ठ तुम्ही वाचून संपविण्याच्या आतच अमेरिकेत कोठेतरी एखाद्या स्त्रीवर बलात्कार झालेला असेल. ती एकटीच असेल व ज्याला ती कदाचित ओळखत असेल त्यानेच तिची जबरीने मानहानी केली असेल. तिला कदाचित मारले असेल. तिने प्रतिकार केला असेल. तिला ठार मारले जाईल याची तिला निश्चितच भीति वाटली असेल.
अमेरिकेत जलदगतीने वाढणारा हिंसाचार बलात्कार आहे, व तो जगामध्ये देखील आधीपासूनच उच्चांक राखून आहे. पोलिसांच्या वृत्तांतानुसार, प्रत्येक तासाला १६ बलात्काराचे प्रयत्न केले जातात, तर सरासरीने १० स्त्रियांवर बलात्कार होतो. याला, ज्यांचे वृत्त दिले जात नाही असे बलात्कार दहा पटीने जास्त असू शकतील ही वस्तुस्थिती देखील जोडा!
ह्या निर्दयी कृत्याची आकडेवार माहिती देणारे राष्ट्र केवळ अमेरिका हेच नाही. फ्रान्स मध्ये १९८५ आणि १९९०च्या दरम्यान बलात्काराला बळी पडलेल्या ६२ टक्क्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. फक्त सहा वर्षात कॅनडाने १९९० पर्यंत २७,००० लैंगिक हल्ल्यांच्या तक्रारींचा दुप्पट अहवाल पाहिला आहे. प्रत्येक सात मिनिटाला एका स्त्रीवर लैंगिक हल्ला होतो असा अहवाल जर्मनीने दिला आहे.
बलात्काराचा, एका सज्जन माणसावर देखील परिणाम होऊ शकतो.a मानसशास्त्र तज्ज्ञ एलीजाबेथ पोवेल असे म्हणाल्या की “ज्या समाजात अर्धी लोकसंख्या चिडखोर, शंकेखोर, व घाबरलेल्या स्थितीत आहे अशा समाजात राहणाऱ्या” पुरुषाला हे सर्व सहन करावे लागते. त्यांना सतत त्यांच्या बायकांची, मातांची, बहिणींची, मुलींची व मैत्रिणींची काळजी लागते, किंवा ज्या व्यक्तिवर ते अतिशय प्रेम करतात तीच व्यक्ति बलात्काराला बळी पडते तेव्हा त्यांना दुःख व चुकल्यासारखे वाटत राहते.
त्याची एवढी वृद्धि का?
बलात्काराची भरभराट अशा समाजात होते जेथे हिंसामय कृतींना व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला सहन केले जाते. अधिकांश राष्ट्रात, पुरुष व स्त्री यांना वेगवेगळ्या माध्यमातून, कुटुंबातून आणि सहमित्रांकडून बालपणापासूनच लैंगिकतेविषयी हानीकारक व चुकीच्या माहितीचा भडिमार केला जातो. स्त्रीच्या इच्छेकडे दुर्लक्ष करुन ती पुरुषांना केवळ संभोग तृप्तीसाठी आहे तसेच लैंगिकता व हिंसा एकमेकांशी जुळलेले आहेत अशा विषारी कल्पना ते शिकतात.
जे नावाच्या २३ वर्षीय कारकूनाच्या प्रतिक्रिया लक्षात घ्या. तो म्हणतोः “खरा पुरुष होण्यासाठी तुम्हाला अनेक स्त्रियांबरोबर स्त्रीसंभोग केला पाहिजे असे समाज म्हणतो. परंतु जर तुम्ही तसे केले नाहीत तर काय? मग तुम्ही खरोखरी एक पुरुष आहात का?” ह्या दबावामुळेच, जर एका स्त्रीने त्याला चिरडीस आणले व निराश केले, तर कदाचित तो तिच्यावर बलात्कार करु शकतो.
बलात्कार-प्रवृत्त संस्कृतिंमध्ये स्त्रियांकडे अशा प्रकारचा हिंसक आणि कुरापत दृष्टीकोन असणे सर्वसाधारण आहे असे संशोधक लिंडा लेडरे मान्य करतात. त्या म्हणाल्याः “बहुतेककरुन, समाजाने नेमलेल्या कथनाप्रमाणेच बलात्कारी व्यक्ती भूमिका घेतो. चित्रपट आणि दूरदर्शन अशा हानिकारक कृतींना हातभार लावतात. बीभत्स चित्रांमध्ये बलात्कार हा सर्वसाधारण विषय आहे, परंतु बीभत्स चित्रच केवळ गुन्हेगार ठरत नाही. अभ्यासातून असे दिसून येते की हिंसा नसलेल्या लैंगिकतेच्या चित्रपटांपेक्षा, लैंगिकता नसलेल्या हिंसामय चित्रपटांच्या परिणामामुळेच स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हल्लेखोर वृत्तीचा बनतो. पोवेल असे म्हणतात “कोठेही सहज मिळणाऱ्या कावेबाज लैंगिकतेचे ते चित्रण करत असल्यामुळे” दूरदर्शनचाही यात संबंध आहे. तसेच, माध्यमातून कोणता संदेश मिळतो? “रागावलेले असता तेव्हा, कोणाचे तरी नुकसान करा.”
ह्याच संदेशाचा, दैनंदिन संबंधात, दुःखी परिणामांनी अर्थ लावला जातो. ह्या लैंगिक स्वैराचारी जगात, पुरुषांना असेच वाटते की स्त्रीने त्यांना समागम करु द्यावा, विशेषकरुन जेव्हा तो पुरुष त्या स्त्रीसाठी पैसे खर्च करत असेल किंवा पुरुषाने त्या स्त्रीला संभोग करण्यासाठी दिलेल्या पहिल्या आमंत्रणाला तिने संमती दर्शवली असेल.
एक पत्रकार रॉबिन वॉरशॉ म्हणालेः “लैंगिक संबंधांचा प्रश्न येतो तेव्हा स्त्रीने ‘नाही’ म्हणणे नेहमीच अर्थपूर्ण ठरत नाही.” आणि मग सरतेशेवटी, बलात्कार हा त्याचा परिणाम आहे.
“दुसरा बलात्कार”
कॅथीवर तिच्या माध्यामिक शालेय हॉकी संघामधील तीन सदस्यांनी बलात्कार केला तेव्हा ती १५ वर्षांची होती. जेव्हा तिच्या कुटुंबाने कोर्टापुढे ही गोष्ट मांडली, तेव्हा तिला समाज बहिष्कृत करण्यात आले व तिच्या मित्र-मैत्रिणींनी, शेजाऱ्यांनी आणि अनोळखी लोकांनी तिचा छळ केला. तिच्या कुटुंबाला सांगण्यात आले की, “मुलांनी मुलासारखे वागण्याची अपेक्षा तुम्ही करु शकता.” शाळेत, कॅथीला घाणेरड्या नावांनी बोलवले जाऊ लागले, तिच्या शाळेच्या लॉकरवर धमकी देणारे संदेश ठेवले जात होते. तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांना सुधरण्यासाठी परिक्षाकालाची आणि सामाजिक सेवा करण्याची शिक्षा दिली गेली आणि ते शाळेचे खेळाडू बनले. कॅथीला पुष्कळ महिने छळले गेले. आणि शेवटी तिने आत्महत्या केली.
कॅथीची घटना दुःखद उदाहरण आहे जे दाखवते की बलात्काराला बळी पडलेल्यांवर बलात्कारी पुरुष शारिरीक हल्ला करतो, आणि भावनात्मकपणाने इतरांकडून नंतर होतो. अनेक स्त्रियांना असे आढळते की बलात्काराविषयीचा दृष्टीकोन व गैरसमजांमुळेच बळी पडलेल्यांना दोषी ठरवले जाते. मित्र, कुटुंब, पोलिस, डॉक्टर्स, न्यायाधीश आणि कायदातज्ज्ञ—ज्यांनी बळी पडलेल्या व्यक्तीची मदत केली पाहिजे—चुकीच्या कल्पना करु लागतात व बळी पडलेल्याला जसे बलात्काऱ्याने इजा पोंचवली त्यासारखीच अगदी खोलवर इजा पोंचवतात. ही दोष देण्याची समस्या इतकी गंभीर आहे की काहींनी त्याला “दुसरा बलात्कार” असेच म्हटले आहे.
बलात्कार विषयीच्या काल्पनिक कथा असुरक्षिततेची खोटी भावना निर्माण करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, तुम्हाला बळी पडलेल्या व्यक्तिच्या वागणूकीत जर काही चूक आढळून येत असेल की—तिने अंगाला घट्ट बसतील असे वस्त्र घातले किंवा ती रात्रीची एकटीच बाहेर गेली वा तिला खरोखरीच लैंगिक संबंध हवे होते—तर मग तुम्ही किंवा तुमच्या प्रियजनांनी अशी वर्तणूक टाळली तर सुरक्षित राहाल आणि त्यामुळेच तुम्हावर बलात्कार होणार नाही. तिने ज्याप्रकारे पोषाख केला आहे याची पर्वा न करता, बलात्कार हा मूर्खपणाने केलेल्या हिंसेची कृती आहे जी कोणावरही गुदरु शकते, हा विकल्प स्वीकारण्यास भीतीदायक आहे.
एका स्त्रीवर तिला “चांगल्या, सभ्य” वाटणाऱ्या कोणा परिचिताद्वारे बलात्कार घडला गेला त्याबद्दल सांगताना ती म्हणते: “मला हे कधीही होऊ शकणार नाही असे वाटू देणे हीच सर्वात वाईट गोष्ट होय.”
बलात्कार कल्पना आणि वास्तविकता
बलात्काराविषयीच्या काही दीर्घकालीन चुकीच्या कल्पना आहेत ज्यामुळे बळी पडलेल्यांवर दोष दिला जातो आणि दुष्कृत्य करणाऱ्याला प्रोत्साहन देणारी प्रवृत्ती वाढविण्यासाठी चालना मिळते:
कल्पना जेव्हा स्त्रीवर एक अनोळखी व्यक्ति हल्ला करतो तेव्हाच बलात्कार होतो.
वास्तविकता अधिकांश स्त्रियांवर त्यांच्या परिचयाच्या व ज्यांच्यावर त्यांचा भरवसा आहे असेच पुरुष हल्ला करुन बलात्कार करतात. एका अभ्यासामार्फत असे समजले की बळी पडलेल्यांपैकी ८४ टक्के स्त्रिया त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याला ओळखत होत्या तसेच ५७ टक्के बलात्कार भेटीगाठीच्या वेळी घडले. ७ विवाहीत स्त्रियांमधील एकीवर तिचा नवराच बलात्कार करतो.b हल्ला करणारा अनोळखी व्यक्ति, नवरा, किंवा भेटीगाठी करणारा युवक असो, बलात्कार हिंसक व मानसिकरित्या आघातजन्य आहे.
कल्पना जर एका स्त्रीने प्रतिकार केल्याच्या खुणा दाखवल्या असतील जसे की खरचटणे वगैरे तरच तो बलात्कार असेल.
वास्तविकता त्यांनी शरिरीकरित्या प्रतिकार केला असेल किंवा नसेल, फार कमी स्त्रिया झालेल्या इजा व खरचटलेल्याचा दृश्य पुरावा दाखवतात.
कल्पना बलात्काराला बळी पडलेली व्यक्ति, ती जोपर्यंत कार्यशीलतेने प्रतिकार करीत नाही तोपर्यंत तिचा त्या दोषात भाग आहे.
वास्तविकता एका व्यक्तिच्या इच्छेच्या विरुद्धतेत लैंगिक शिरकाव प्राप्त करण्यासाठी कोणत्याही शक्तिचा व धमकीचा बळजबरीने वापर केला जातो तेव्हा त्याला बलात्कार असे म्हटले जाते. अनिच्छीत बळी पडलेल्याच्या विरुद्ध बळजबरीचा उपयोग करणारा स्वत:ला बलात्कारी बनवितो. यास्तव, बळी पडलेली व्यक्ती व्याभिचार करण्याची दोषी नाही. एका अगम्यगमनाच्या बळीप्रमाणे, तिच्यावर दुसऱ्या एका व्यक्तीच्या आक्रमन शक्तिमुळे तिला स्वत:ला अशा कृत्याच्या अधीन व्हावे लागते ज्याचा तिला ठाम विरोध असतो. जेव्हा एक स्त्री भीतिमुळे किंवा भान सुटल्यामुळे बलात्कारी व्यक्तीच्या अधीन होते, तेव्हा त्याचा असा अर्थ होत नाही की तिने ह्या कृत्याला संमती दर्शवली. संमति धमकीविना निवडीवर आधारीत आहे आणि अक्रियाक नसून कार्यकारी असते.
कल्पना बलात्कार वासनेचे एक कृत्य आहे.
वास्तविकता बलात्कार हिंसामय कृत्य आहे. फक्त लैंगिकतेसाठीच नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तो शक्तिने वरचढ आहे असे त्याला वाटत असल्यामुळे पुरुष बलात्कार करतो.c
कल्पना एखादी स्त्री पुरुषाला एथपर्यंत चिडवत राहील किंवा प्रवृत्त करत राहील की त्याला त्याच्या तीव्र लैंगिक इच्छा सहन करता येणार नाहीत.
वास्तविकता जे पुरुष बलात्कार करतात त्यांच्या लैंगिक इच्छा इतर पुरुषांपेक्षा तीव्र नसतात. तथापि, एक तृतीयांश बलात्कारी पुरुष त्यांचे लैंगिक कृत्य पूर्ण करु शकले नाहीत. बहुतेक प्रसंगी, बलात्काराचे कृत्य स्वाभाविक नसून योजिलेले असतात. अनोळखी व्यक्ती त्याच्या भक्ष्याच्या मागे ती एकटी सापडत नाही तो पर्यंत तिचा लपत लपत पिच्छा करतो, तसेच ओळख असणारा बलात्कारी व्यवस्था करुन असा प्रसंग आणतो जेथे ती एकटी असेल.
कल्पना एखाद्या पुरुषाचा बदला घेण्यासाठी किंवा लैंगिक संबंधामुळे तिला अपराध्यासारखे वाटत असल्यामुळे एखादी स्त्री बलात्कार झाला असे खोटे बोलत असेल.
वास्तविकता बलात्काराच्या खोट्या तक्रारी दुसऱ्या हिंसामय गुन्ह्याच्या प्रमाणात घडतातः २ टक्के. दुसऱ्या बाजूला पाहता, संशोधक कबूल करतात की बहुतांश बलात्काराच्या तक्रारी दिल्या जात नाहीत.
कल्पना एखादी स्त्री प्रक्षोभक वस्त्रे घालून, मादक पेय पिऊन, भेटीगाठीचा खर्च करण्यासाठी पुरुषाला परवानगी देऊन, किंवा त्याच्या घरी जाऊन ती त्याला तिच्यावर बलात्कार करण्यास “आमंत्रण” देऊ शकते.
वास्तविकता एखाद्या स्त्रीचा चुकीचा निर्णय घेणे, अतिभाबडी किंवा अज्ञानी असणे याचा असा अर्थ होत नाही की ती बलात्कारासाठी पात्र आहे. बलात्काराबद्दलची जबाबदारी बलात्कारी व्यक्तिचीच आहे.
[तळटीपा]
a प्रत्येक १० बलात्कार बळींपैकी १ बळी पुरुषाचा आहे.
b जेव्हा एक पति त्याच्या पत्नीवर लैंगिक संबंध जोडण्यासाठी तिला बळजबरीने जेरीस आणतो तेव्हा वैवाहिक बलात्कार घडतो. काही पतींचा असा विश्वास आहे की पुरुषाचा त्याच्या पत्नीच्या शरिरावर असणाऱ्या ज्या “अधिकार”बद्दल प्रेषित पौलाने म्हटले तो परिपूर्ण आहे. परंतु, “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी” असेही पौलाने म्हटले. प्रेषित पेत्राने पतींना असे म्हटले की “पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा.” यामुळे हिंसामय आणि जबरी लैंगिकतेला काहीही जागा राहत नाही.—१ करिंथकर ७:३-५; इफिसकर ५:२५, २८, २९; १ पेत्र ३:७; कलस्सैकर ३:५, ६; १ थेस्सलनी ४:३-७.
c “लैंगिक आचार हा गुन्ह्याचा उद्देश नसतो उलट दुष्कृत्य करणारा लैंगिक कृत्याला हिंसाचारी गुन्हा करण्यासाठी साधन म्हणून वापरतो”—वॅन्डा केइज रॉबिनसन, मेरीलॅन्ड मधील, बॉल्टीमोर शहराच्या लैंगिक गुन्हा विभागाच्या प्रमुख.
[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]
अमेरिकेत प्रत्येकी ४ स्त्रियांमधील एक स्त्री बलात्काराला किंवा बलात्काराच्या प्रयत्नाला बळी पडते
[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]
बलात्काराची भरभराट अशा समाजात होते जेथे हिंसामय कृतींना व लैंगिकतेने हाताळण्यासारख्या गोष्टींना सहन केले जाते
[Full page illustration on page 13]