तुम्हाला दातांच्या कवळीची आवश्यकता आहे का?
बनावट दात, हे नेहमी विनोदाचा विषय असतात, पण त्याचा वापर करणाऱ्यासाठी ही गंमतीची गोष्ट नाही. तुमचे नैसर्गिक दात जर चांगल्या स्थितीत असतील तर तुम्हाला बनावट दातांच्या कवळीच्या प्रश्नांचे इतके महत्त्व वाटणार नाही. जरी तुम्हाला याला सामोरे जावयाची गरज नसली तरी या लेखाद्वारे तुमच्या निरोगी व धट्याकट्या दातांची गुणग्राहकता बाळगण्यास तसेच जितके तुमच्या आटोक्यात आहे तितके—त्यांना सांभाळण्यास मदत होईल.
आपल्या दातांची आपण इतकी चांगली निगा घेतली असतानाही एके दिवशी आपले दात पडत आहेत असे पुष्कळ लोकांना का आढळून येते बरे? कोणताही दंतवैद्य तुम्हाला यासबंधी पुढीलप्रमाणे सांगेल. एकदा वयाची ३०शी ओलांडली, की दात पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हिरड्यांचे रोग (ठराविक काळात संभवणारा रोग). तरीही, एखादी व्यक्ती काही अपघाताने अथवा किडण्याने आपले दात गमावू शकते.
काही किंवा सर्व दात गमावल्यामुळे तुम्हाला खरोखरच बनावट दातांच्या कवळीची आवश्यकता आहे का?a त्याच्याशिवाय काही लोक का भागवून घेत असल्याचे दिसतात? दातांची कवळी ही लोकांवर लबाडीने घुसडून देणारी व्यापारी उत्पादनाची बाब झाली आहे का?
दातांची कवळी कशासाठी?
वरील प्रश्नांच्या उत्तरासाठी, आपण आपल्या दातांच्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकू. आपल्या स्वरूपावरील प्रभावापेक्षा आणखी काही कार्य ते करतात. जेव्हा आपण अन्न चावतो, तेव्हा त्या अन्नाचे तुकडे करुन ते लाळेमध्ये मिसळले जाते जेणेकरून आपल्या शरीराला पौष्टिक आहार पुरविला जातो. जर आम्हाला थोडेच दात असतील किंवा काहीच नसतील तर अन्नाचे व्यवस्थित तुकडे केले जाणार नाहीत. अस्थिमय अशी बळकट हिरडीही हे कार्य पुरेशा प्रमाणात करु शकणार नाही. याच कारणास्तव ज्या लोकांना दात नाहीत ते कॉफी, चहा किंवा इतर पेयांद्वारे अन्नपदार्थ गिळतात अशांना पचनाच्या समस्या उद्भवतात. केवळ काही दात गमावले असतील तरीही, आहारावर निर्बंध येतो कारण तंतूमय अन्न किंवा जड अन्न यात जास्त चावण्याची गरज असते त्यामुळे ते सहसा टाळण्यात येते.
बोलण्याकरताही दातांची मदत होते, हे त्यातील काही पडल्याशिवाय त्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. जीभ व ओठ यापासून समजण्यास आवश्यक ते बोल निर्माण होण्यास दातांची मदत होते. उदाहरणार्थ, बोलताना व्यंजनाचा उच्चार दातांच्या अस्तित्त्वाशिवाय व्यवस्थित करता येत नाही. ज्यांना दात नाहीत अशा व्यक्तिचे बोलणे तुम्ही ऐकल्यास तुम्हाला हे दिसून येईल. बनावट दातांची कवळी वापरत असलेल्या व्यक्तिला जीभ अशी साजेशी ठेवावी लागते की ज्याद्वारे बोलण्यात योग्य उच्चार येऊ शकेल. याकरिता काही वेळ लागतो, पण दात नाहीत त्यापेक्षा याचा परिणाम चांगला ठरतो.
ज्याला दातांची कवळी आहे अशी व्यक्ती गात असेल अथवा काही संगीताचे उपकरण वापरीत असेल तर काय? अशी कामे प्रभावीपणे करता यावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दातांच्या कवळ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. गायक, काही कलाकार, वाऱ्याने होणारे वादन (बासरी वादक), मंत्री, काही फोटोग्राफर मॉडेल यांना दातांशिवाय आपले कार्यक्रम करणे जरी अशक्य नसले तरी अवघड जाते.
दातांच्या अभावी व्यक्तिमत्त्व स्वरुपावरही परिणाम होतो. त्यामुळे तोंडाभोवतीचे व नाक आणि हनुवटी यांच्यामधील पेशी एकत्र आल्यामुळे किंवा आंकूचन पावल्यामुळे एखादी व्यक्ती आहे, त्यापेक्षा वयाने मोठी दिसते. याचा परिणाम एखाद्याचा आत्मविश्वास गमावण्यात होतो किंवा काहींच्याबाबतीत मानसिक अडथळा निर्माण होतो.
दातांच्या पडण्यामुळे दातांच्या कमानीवरही परिणाम होतो. आपले दात हे जसे रोमी लोकांच्या कमानीतील बांधकामात दगड असतात त्याप्रमाणे एकमेकांवर अवलंबून असतात, “शेजार”च्या दाताच्या पडण्याचा परिणाम त्याच्या लगतच्या दाताच्या पडण्यातही होतो. यामुळे उरलेल्या दातांमध्ये फट पडत जाते व हिरड्यांच्या रिकाम्या जागेत अन्न कण साठले जातात व त्यामुळे पुढे हिरड्यांना सूज येणे व दाह सुटणे सुरु होते. दात पडण्यामुळे दातांची सरळ रेषेतील मांडणी बिघडते व चावण्यामध्ये समस्या उद्भवू शकतात.
नैसर्गिक व बनावट कवळीतील फरक काय?
नैसर्गिक व बनावट दातांच्या कवळीतील मूलभूत फरक म्हणजे नैसर्गिक दात हे जबड्यांच्या हाडांना अगदी खोलवर मजबुतीने मुळावलेले असल्यामुळेच अन्नपदार्थ चांगल्यारितीने तोडण्यास, बारीक करण्यास व कोरण्यास ते जास्त प्रभावीपणे कार्य करु शकतात. खालचे दात हे वरच्या दातांवर मजबूतीने फिरतात ज्यामुळे कापण्याची व दळण्याची कृती होते.
तथापि, संपूर्ण कवळी केवळ हिरड्यांवर किंवा कणावर असते. जीभेद्वारे, गाल, यांच्यापासून मिळणाऱ्या पदार्थामुळे तग धरुन राहण्यास दातांना मदत होते. नैसर्गिक दातांप्रमाणे बनावट दातांची कवळी ही भक्कम नसते, तिचे सहज उच्चाटन होऊ शकते.
भिन्न व्यक्तींमध्ये दातांच्या कवळीचा प्रभावीपणा निरनिराळा असतो. कोणत्याही कवळीची कार्यक्षमता ही नैसर्गिक दातांप्रमाणे नसते. दातांची कवळी ही किती प्रभावी आहे हे जबड्यांचा आकार व ढंग, पेशीची रचना, तसेच वापरणाऱ्याची मनोवृत्ती, त्यासोबत ते वापरण्याची कला शिकून घेण्याची क्षमता या सर्वांवर आधारित असते. त्याची मुख्य मर्यादा म्हणजे त्याठायी स्थैर्य नसते. तथापि, बनावट दात हे असे बनविले जातात की ते नैसर्गिक दातांपेक्षा भिन्न आहेत हे ओळखून येत नाही.
काही वेळा, दुर्दैवाने दातांची कवळी वापरावयास लागल्यानंतर त्या व्यक्तीला नैसर्गिक दातांची उमज, कल्पना व फायदा कळून येतो. मानव काही प्रमाणात मुळच्याची प्रतिकृती बनवू शकतात पण कधीही त्याच्या अद्भुत कार्यक्षमतेपर्यंत पोहचू शकणार नाहीत.
तुम्हाला संपूर्ण अथवा काही प्रमाणात दातांच्या कवळीची आवश्यकता भासेल का याचा गंभीरपणे विचार करण्यासारखी परिस्थिती तुमच्यावर येऊ शकेल. याचा निर्णय तर तुमचा स्वतःचा असणार, पण त्यापासून मिळणाऱ्या फायद्याचा विचार करणे समंजसपणाचे ठरेल. ते तुम्हाला पचनाच्या अडथळ्यावर मात करण्यास उपयोगी होतील, पुरेसा आहार घेण्यास मदत होईल, तसेच तुमची बोलण्याची क्षमता सुधारेल. आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासही मदत होईल.
खरे पाहता, दातांची कवळी वापरणारे नेहमी त्यांचे खरे दात गमावल्याचे दुःख करीत बसतात. पण बनावटी दातांच्या कवळीमध्ये झालेल्या प्रगतीने पुष्कळांना वैयक्तिक समाधान पुरविले आहे. तसेच जगातील लाखो लोकांचे कल्याण केले आहे.
[तळटीपा]
a या लेखामध्ये, “दातांची कवळी” हा शब्द गमावलेल्या दातांच्या जागी आरोपण करणाऱ्या उपकरण योजनेला अनुलक्षून केला आहे. जर सर्वच नैसर्गिक दात पडले असतील तर, संपूर्ण दाताच्या कवळीची आवश्यकता भासते. तथापि, काही दात शिल्लक असतील तर, त्याप्रकारची दातांची कवळी वापरता येते. हा लेख संपूर्ण दातांची कवळी व निघू शकणाऱ्या अर्धवट दातांची कवळी यावर प्रकाशझोत टाकतो.
[११ पानांवरील चौकट]
तुमच्या दाताच्या बिलामध्ये कपात करणे
दंतवैद्याची किंवा दातांची रचना व्यवस्थित करणाऱ्याची (ऑरथोडॉनिस्ट) भेट घेणे ही खुपच महागडी गोष्ट होऊन बसली आहे. तरीही तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की यातील काही पाहणी तुमच्या मुलांसाठी फायदेशीर होऊ शकेल.
“अमेरिकन लोकांमध्ये अव्यवस्थित रचना व बेढब दात असलेल्यांची संख्या खूप आहे, हे कदाचित आमच्या अतिशय शुद्ध केलेल्या (औद्योगिक प्रक्रियेत सत्व नष्ट झालेले नरम अन्न) आहारामुळे असावे,” असा द न्यु यार्क टाईम्स् अहवाल देते. सिद्धांत असा आहे की ज्या आहाराला जोराने चावून चावून खाण्याची गरज असते त्या आहारामुळे “जबड्याची वाढ नीट होण्यास (दातांच्या वाढीमध्ये गर्दी न होता पुरेशी जागा असण्यास), पक्क्या दातांची वाढ योग्य होण्यास चेहरा व तोंडाच्या पोकळीची वाढ योग्य होण्यास मदत होते.”
या सिद्धांताची खात्री करण्याकरता शास्त्रज्ञांनी माकडांना नरम व जड अन्न देऊन पाहिले. याचा परिणाम? ज्यांना जड अन्न दिले होते (असे अन्न ज्यात चावण्याची गरज आहे) ते “ऑरथोडॉनटिकपासून लांब” असलेले असे अल्प होते. यावरुन हे दिसते की तुमच्या मुलाला जर आहार चावून खाण्याची सवय लावली तर हा, दाताच्या बीलाच्या कपातीतील एक मार्ग होईल. तुमच्या मुलांना मदत होईल असा आणखीन एक मार्ग म्हणजे नियमितरित्या दात घासण्याची व चूळ भरण्याची सवय लावणे. (g93 2/22)
[१२ पानांवरील चित्र]
आपले दात हे एकमेकांवर अवलंबून असतात. “शेजारी”ल दात पडल्याने त्याच्या बाजूचा दात जागेवर ठेवणे कठिण होते, त्यामुळे दात पडतात व त्याचा इतर दातांवरही परिणाम होतो