वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-1 पृ. १७-१९
  • बलात्कार कसा टाळता येईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बलात्कार कसा टाळता येईल
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शीघ्र हालचाल करा
  • प्रतिकार करा
  • बलात्काराचा यशस्वी लढा कसा देता येऊ शकतो?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • बलात्काराची वास्तविकता
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
gbr13-1 पृ. १७-१९

बलात्कार कसा टाळता येईल

एरीक ऊंच, देखणा व एका श्रीमंत कुटुंबातला होता. लोरी १९ वर्षांची होती आणि तिला एरीकने निमंत्रण दिले होते. याच खोलीत त्याचा मित्रही राहात होता व त्यानेही त्याच्या मैत्रिणीला येण्याचे आमंत्रण दिले होते. एरीकच्या घरात ती आली, परंतु तिच्या नकळत, दुसऱ्‍या जोडप्याने त्यांच्या योजना रद्द केल्या. त्यामुळे पार्टीचा विरस झाला.

“मी विचार करु लागले, ‘कोठे तरी घोटाळा दिसतोय, काहीतरी संशयास्पद घडतय,’ पण त्याकडे मी दुर्लक्ष केले,” असे ती म्हणाली.

एकदा त्याने लोरीला एकटे गाठले एरीकने तिच्यावर बलात्कार केला. लोरीने याविषयी पोलिसांना कळविले नाही, आणि नंतर एरीकला टाळण्यासाठी ती २४० कि.मी दूर गेली. एका वर्षानंतरही, ती भेटीगाठी करण्यासाठी घाबरत होती.

बलात्कार वाढती धमकी आहे, आणि स्त्रीचे उत्तम संरक्षण म्हणजे तिने जागृत आणि तयारीत असले पाहिजे. सर्वच बलात्काराचे प्रसंग अपेक्षित नसतात, परंतु बलात्कारी व्यक्‍ती कसा विचार व योजना करुन हल्ला करतो हे तुम्हाला इशारा देणाऱ्‍या चिन्हांना ओळखण्यास मदत करु शकते.a एक पुरातन नीतिसूत्र असे म्हणतेः “विवेकी मनुष्य अरिष्ट पाहून लपतो, परंतु भोळवट मनुष्य पुढे चालत जातात आणि त्यामुळे दंड भोगतात.”—नीतिसूत्रे २७:१२, पंडिता रमाबाई भाषांतर.

बलात्काराचा प्रसंग टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बलात्कारी व्यक्‍तींपासून दूर रहणे. एखाद्या पुरुषाच्या वर्तणुकीपासून—जरी तुम्ही त्याला ओळखत असला तरी तुम्ही सावध असले पाहिजे—ज्यामुळे तो संभवनीय बलात्कारी आहे हे समजून येईल. (पृ. ७ वरील चौकोन पहा.) काही पुरुष स्त्रीचा पेहराव किंवा त्याच्याबरोबर एकटे राहण्याची तिची इच्छा हीच सबब तिच्यावर बलात्कार करण्साठी देतील एका पुरुषाच्या या विकृत दृष्टीकोनाला स्त्री जबाबदार नसली तरी असा दृष्टीकोन ओळखण्यास तिने सुज्ञ असले पाहिजे.

ज्या पुरुषाला तुम्ही ओळखत नसाल त्याच्याबरोबर एकांतात राहू नका. (ज्याला तुम्ही ओळखता त्याच्याबरोबरही बुद्धिमानीने वागा.) एखादा अनोळखी बलात्कारी तुमच्या घरी दुरुस्तीचे काम करणारा असे सोंग घेऊन येऊ शकतो. त्याचे शिफारसपत्रे तपासा. ओळखीचा बलात्कारी अशी काही कामे काढतो की ज्यामध्ये त्याच्या घरी एकांतवासात संधी उपलब्ध होते किंवा असेही खोटे सांगतो की तो जेथे तुम्हाला भेटणार आहे तेथे पुष्कळ लोक वस्ती असतील. अशा पाशात पडू नका.

भेटीगाठीच्या प्रसंगी समस्या टाळण्यासाठी, गटा गटात भेटा, किंवा एक पाठीराखीण असू द्या. तुम्ही ज्याच्याबरोबर भेटीगाठी करणार आहात त्याला व्यवस्थीत ओळखा, आणि शारिरीक जवळीकेसाठी काही दृढ मर्यादा ठेवा, जर तुम्ही असे करत असाल तर. कोणतेही मादक पेय पिण्यापासून सावध रहा. जर तुमच्या विचार शक्‍तिलाच इजा पोंहचलेली असेल तर तुम्ही सावध राहू शकणार नाही. (नीतीसूत्रे २३:२९-३५ पडताळा.) तुमच्या उपजत-बुद्धिवर विश्‍वास करा. तुम्हाला जर कोणासोबत राहताना अस्थिर वाटत असेल तर असे गृहीत धरु नये की त्याचे हेतु नाहीत. तेथून दूर निघून जा.

पालकांनी त्यांच्या युवकांबरोबर, बलात्कार कसा टाळावा यासंबंधाने चर्चा करावी, विशेषकरुन धोकादायक प्रसंगांची कारण बहुतेक बलात्कारी आणि बळी पडलेले युवक आहेत.

शीघ्र हालचाल करा

सर्वच बलात्काराचे प्रसंग अपेक्षित नसतात. अजाणतेत, तुमच्यासमोर एखादा पुरुष असेल जो तुमच्यापेक्षा शक्‍तिमान आहे आणि जो तुमच्याबरोबर लैंगिक संबंध जोडण्यासाठी बळजबरी करत आहे. मग काय?

शीघ्र हालचाल करा, आणि तुमचा हेतू लक्षात ठेवाः तेथून निसटणे. एक बलात्कारी नेहमी त्याच्या भक्ष्यावर हल्ला करण्याआधी त्याची परिक्षा घेतो, यास्तव, ह्‍या कृत्यासाठी त्याचा आत्मविश्‍वास पूर्ण होण्याच्या आत त्याच्या योजनांना हाणून पाडणे महत्त्वाचे आहे. बलात्कार तज्ज्ञ दोन हालचाली करण्यास सांगतातः निष्क्रिय प्रतिकार किंवा कार्यकारी प्रतिकार. प्रथमत: निष्क्रिय प्रतिकार करा, आणि जर तो निष्फळ असेल तर कार्यकारी प्रतिकार करा.

निष्क्रिय प्रतिकार यामध्ये म्हणजे हल्ला करणाऱ्‍या बरोबर बोलणे, किंवा तुम्हाला गुप्तरोग आहेत असे म्हणणे, किंवा मला मळमळते असे म्हणून वेळ काढणे या पैकी काहीही गोवलेले असू शकते. (१ शमुवेल २१:१२, १३ पडताळा) जेराड व्हिटमोर यांनी त्यांच्या स्ट्रीट विसडम फॉर वुमन: ए हॉन्डबुक फॉर अरबान सरवाईवल या पुस्तकात असे लिहिले कीः “युकत्या एखाद्याच्या कल्पना शक्‍तीवर अवलंबून असतात.”

निष्क्रिय युक्‍ति—यात सर्व काही सामावलेले आहे पण शरीरिकरित्या बलात्कारी पुरुषासोबत झटण्यास—स्पष्ट विचार करण्याची जरूरी आहे व याचा हेतु हल्ला करणाऱ्‍याला विचलित करणे किंवा शांत करणे हा असावा. तुमचा प्रतिकार हल्ला करणाऱ्‍याला आणखीनच चिडखोर आणि हिंसक करत असेल तर दुसऱ्‍या युक्‍तिचा प्रयत्न करा. तथापि, तुम्ही विचार करता तेव्हा स्वत:ला एकाएकी असलेल्या क्षेत्रात जाण्यास अनुमती देऊ नका. आणि लक्षात ठेवा की निष्क्रिय प्रतिकारातील प्रभावकारी प्रकार आहे—किंचाळणे.—अनुवाद २२:२३-२७ पडताळा.

आणखी एक निवडीची गोष्ट म्हणजे नकारात्मक आणि जोरदारपणे प्रतिकार करणे. तुमच्यावर हल्ला करणाऱ्‍यास सांगा की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्याच्या इच्छांना वश होणार नाही. भेटीगाठीच्या बलात्कार प्रसंगी, धक्कादायक युक्‍तिचा वापर करुन सांगू शकता की ह्‍या हल्ल्याचा काय अर्थ होतो. “हा बलात्कार आहे! मी पोलिसांना बोलवते!” असे ओरडून म्हटल्यामुळे तुमच्यावर बलात्कार करु इच्छिणारा पुढे जाण्याआधी लक्षपूर्वक विचार करील.

प्रतिकार करा

जर एवढे बोलूनही काही उपयोगाचे नाही तर कार्यकारी प्रतिकार करण्यास घाबरु नका. याचा अर्थ तुम्हाला काही इजा होण्याची किंवा ठार मारले जाण्याची शक्यता जास्त आहे, असे आणि वश झाल्यावर तुमच्या सुरक्षिततेची हमी मिळेल असेही नाही. यास्तव, बहुतेक बलात्कार तज्ज्ञ असा सल्ला देतात की होता होईल तितका कार्यकारी प्रतिकार करत रहा.

जन्मापासूनच त्यांची निर्मिती सभ्य, निष्क्रिय आणि आज्ञाधारक असल्यामुळे शारीरिक दबावाने घाबरविले जाऊनही स्त्रियांना प्रत्युत्तर देणे कठीण वाटते. म्हणूनच, तुम्ही याचा निर्णय फार पूर्वीच घेतला पाहिजे की तुम्ही प्रतिकार करणार म्हणजे तुमच्यावर हल्ला होताना तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काकू करत वाया घालवणार नाही.

कोणही तुम्हाला धमकी देत असेल किंवा तुमच्यावर दबाव आणत असेल तर तुम्हाला ते अपमानित वाटले पाहिजे. तुम्ही हे ओळखले पाहिजे की हा हल्ला पूर्वसंकल्पित आहे, आणि तुम्ही अधीन होण्यासाठी तो बलात्कारी तुमच्यावर अवलंबून आहे. घाबरुन जाऊ नका तर चिडा. “तुमची भीति हे हल्ला करणाऱ्‍याचे शक्‍तिमान शस्त्र आहे” असे संशोधक लिंडा लेडरे यांनी म्हटले. तुम्ही फाजिल प्रतिक्रिया करीत आहात किंवा तुम्ही मूर्ख दिसत आहात याची काळजी करु नका. एका महिला तज्ज्ञाने म्हटल्यानुसार, “बलात्कार होण्यापेक्षा उद्धट असणे बरे.” ज्या स्त्रियांनी यशस्वीरित्या बलात्कारी पुरुषांचा प्रतिकार केला त्यांनी हे कार्यशीलतेने केले आणि एकापेक्षा अधिक युक्त्यांचा वापर केला जसे की चावाणे, लाथा मारणे, आणि किंचाळणे.

आणि जर तुम्हाला त्या पुरुषाविरुध्द लढता आले नसेल, तर नंतर तुमच्या हल्लेखोराला ओळखण्याची तयारी ठेवा. शक्य झाल्यास, त्याला बोचखरल्यामुळे किंवा त्याचे कपडे फाडल्यामुळे रक्‍ताचे डाग आणि त्याला ओळखण्यासाठी काही वस्तु तुमच्या बरोबर राहतील. परंतु अशा वेळी, पुढे लढण्यास तुमची क्षमता नसेल. अशा प्रसंगी, “तुम्ही त्याला तुमच्यावर बलात्कार करण्यास, अनुमती दिली असे समजून स्वत:वर चिडू नका” असे रॉबिन वॉरशॉ यांनी आय नेव्हर कॅल्ड इट रेप ह्‍या पुस्तकात म्हटले. “तुमच्यावर बलात्कार झाला आहे हे ‘सिद्ध’ करण्यासाठी तुम्हाला इजा किंवा मृत्यू सहन करण्याची गरज नाही.”

[तळटीपा]

a दोन प्रसंग कदापि सारखे नसतात, आणि कोठलाही प्रतिबंधक सल्ला मूर्खालासुद्धा बिनधोक टाळता येण्यासारखा नाही. हल्ला होताना बळी पडलेल्याने केवढ्या प्रमाणात व कोणत्या प्रकारच्या प्रतिकाराचा वापर करायला हवा यावर बलात्कार तज्ज्ञांनी देखील असहमत दाखवले आहे.

[१८ पानांवरील चौकट]

संभाव्य बलात्कारी व्यक्‍तिचे वर्णन

▫ तुमच्या बरोबर गैरवर्तन करुन, तुमच्या दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करुन किंवा तुमच्या केलेल्या सूचनेवर रागावून मानसिकरित्या तुमचा अपमान करतो.

▫ तुमच्या जीवनाच्या प्रत्येक घटकाला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो जसे की तुम्ही कशाप्रकारे वस्त्र घालता आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत. भेटीगाठीच्या वेळीच सर्व निर्णय करण्यास इच्छितो जसे की कोठे खायचे किंवा कोणता चित्रपट पहावा.

▫ काही कारण नसताना त्याला हेवा वाटतो.

▫ सर्वसाधारणपणे स्त्रियांना कमी लेखतो.

▫ मादक पेय पिऊन तर्र होतो किंवा मतिगुंग होतो व तुम्हीही तसे करावे याची गळ घालतो.

▫ त्याच्याबरोबर एकटे राहण्यास किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास तुमच्यावर दबाव आणतो.

▫ भेटीगाठीच्या वेळी कोणताही खर्च करु देणार नाही आणि तसे केल्यास तुमच्यावर रागावतो.

▫ लहान-सहान गोष्टींमध्ये शारीरिकरित्या हिंसक आहे, जसे की ओरबडणे किंवा ढकलणे.

▫ त्याच्या जवळ बसण्याची धाकदपशा देतो, तुमच्या मार्गात अडथळा आणतो, तुम्ही नाही म्हटलेले असतानाही तुम्हाला हात लावतो, किंवा तो तुम्हाला खरोखरी ओळखत नसला तरी तुमच्याबरोबर खूप ओळख असल्यासारखे बोलतो.

▫ रागाविना निराशेला आवरु शकत नाही.

▫ समानभावाने तुमच्याकडे पाहत नाही.

▫ शस्त्रे फार आवडतात आणि ज्यांना दमदाटी करुन घाबरवू शकतो असे प्राणि, मुले किंवा लोक यांच्या बरोबर क्रुरतेने वागतो.

[१८ पानांवरील चित्र]

ज्या स्त्रियांनी यशस्वीरित्या बलात्कारी पुरुषांचा प्रतिकार केला त्यांनी हे कार्यशीलतेने केले आणि एकापेक्षा अधिक युक्त्यांचा वापर केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा