जगावरील दृष्टीक्षेप
निंदात्मक टायर?
जपानमधील, योकोहामा येथील एका मोठ्या कंपनीला मोटार गाड्यांसाठी विशिष्ट टायर बनविण्याचे उत्पादन बंद करावे लागले कारण त्यांच्यामुळे मुस्लिमांची मने दुखावली गेली होती. मुस्लिमांनी अशी तक्रार केली की टायरला लावलेल्या खोबणीची रचना अरेबिक शब्द “अल्ला” यासारखा आहे. असाही इव्हनिंग न्यूज याने सांगितले की कंपनीला इस्लामबद्दलचे ज्ञान नसल्याचे सांगून क्षमायाचना मागितली, व स्पष्ट केले की, वाहनाच्या सुरक्षिततेसाठी संगणकाने मोटारच्या टायरच्या खोबणीसाठी तसा आकार निवडला. त्यामागे अल्लाची निंदा अथवा इतराजी करण्याचा अर्थ नव्हता. त्यानंतर ती कंपनी पुन्हा इस्लामी राष्ट्रांना बदली टायरांचा पुरवठा करु लागली. (g93 3/8)
एक चांगला व्यापार
अर्जेंनटिनामध्ये, मानवांचे व प्राण्यांचे अर्पण देणे हा लोकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. क्लॅरेनच्या मते, अर्जेनटिनामध्ये एकूण ५,००० पंथ आहेत, त्यातील पुष्कळसे गट भूतविद्येत, सैतानी गोष्टीत, तसेच गूढप्रकाराच्या इतर गोष्टीत गुंतलेले आहेत. अनेक पंथांमध्ये मूर्तीपूजा प्रमुख आहे. ब्यूनॉस एर्स् येथील दुकानांमध्ये दुरात्म्यांच्या मुर्त्यासोबत येशू ख्रिस्ताच्या व कॅथोलिक “संतांच्या”ही मुर्त्या एकाच फळीवर लावलेल्या दिसतील यात काही वेगळे नाही. सर्वात प्रसिद्ध अशी “लुसीफर, मूर्ती म्हणजे महान कप्तान व सैतानी दैवतांच्या मधली सर्वात भयानक” म्हणून ओळखली जाते. क्लॅरेन यानी निरीक्षले की या सैतानी मूर्त्याचे पुरवठा करणारे, कॅथालिकांच्या मूर्त्याही चांगल्या प्रमाणात पुरवितात. एका दुकान मालकाने हे कबुल केले की कॅथोलिकांच्या मुर्त्या व सैतानी मुर्त्या विकणे हा एक “चांगला व्यापार” आहे. (g93 2/22)
प्राचीन इजिप्त (मिसर) मध्ये मादक पदार्थ
“मुनिच्य व अल्म या [जर्मनीतील] विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी मिसरी लोकांच्या थडग्यात हशीष, कोकाईन व निकोटीन असे पदार्थ आढळल्याचे उघडकीस आणले,” असा अहवाल फ्रँकफर्ट आलजिमायनी झेईटंग यांनी दिला. इ. स. पूर्वी १०७० व इ. स. ३९५ या कालावधीच्या काही थडग्यातील हाडे, केस, व काही पेशींचा नमुना संशोधकांनी परिक्षणासाठी घेतला. हा वैज्ञानिक शोध प्राचीन मिसऱ्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला काय कळवितो? वर्तमानपत्र सांगते, “मिसरी लोक उघडपणे मादक द्रव्यांचा वापर करीत, अगदी रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठीही.” शास्त्रज्ञांना हे कसे कळाले? एक लव्हाळ्यावरचा लेख याचे स्पष्टीकरण देतो की माशांचे मल व पॉपी वनस्पतीच्या बीयां यांचे मिश्रण हे मनावरील ताण कमी करणारे औषध म्हणून वापरात आणले जात होते.
“माश्या नसलेले शहर”
बेजिंग, चीन येथील रहिवाश्यांनी माश्यांविरुद्ध युद्ध पुकारल्याचा अहवाल, इंटरनॅशनल हेराल्ड ट्रीब्यून ने दिला. “आमचे उद्दिष्ट माशांविना शहर बनविण्याचे आहे, पण आम्ही केवळ माश्यांनाच ठार करित नाही. तर एक स्वच्छ शहर बनवू इच्छितो,” असे आरोग्याच्या उच्च अधिकाऱ्याने सांगितले. “सर्वसामान्य लोकांना संघटित” करण्याच्या प्रयत्नात रहिवाश्यांनी बॅनर्स लावली व या मोहिमेला जाहीर करण्यासाठी वीस लाख हस्तपत्रिका वाटण्यात आल्या. खास “हल्ला करण्याचा आठवडा” जाहीर केल्यानंतर १५ टन किटकनाशक व माश्यांना मारण्यासाठी वापरण्यात येणारे २,००,००० सपाट साधन शहरात वाटली. नंतरच्या महिन्याच्या दुसऱ्या हल्याच्यावेळी, वयस्कर माणसे व तरूण मुलांच्या १,०००राच्या टोळीने ८,००० किलोग्रॅम विषाद्वारे माश्यांवर हल्ला केला. जून महिन्यामध्ये काही भागात तर माश्यांची संख्या एका घरामागे ३३ इतक्या प्रमाणावर पोहचली होती. ही संख्या घटवून प्रत्येकी १०० खोल्यांमागे दोन माश्या या प्रमाणावर आणण्याचे ध्येय आहे. (g93 3/8)
हिंसक चित्रपटांचा परिणाम
चित्रपट दिग्दर्शक स्टिव्हन स्पेलबर्ग यांना मनोरंजनातील हिंसाचाराचा प्रेक्षकांवरील होणाऱ्या परिणामाबद्दल व्हेझा या ब्राझिली मासिकाच्या मुलाखतीमध्ये विचारले गेले, तेव्हा स्पेलबर्ग म्हणालेः “हिंसाचार प्रत्यक्ष जीवनातील की टीव्हीमधील बातम्यातील असो. तो चित्रपटातून किंवा टीव्ही कार्यक्रमातून पाहण्याद्वारे प्रेक्षकांना त्याचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. चित्रपटांमध्ये हिंसाचाराला निष्णात रोषणाईने, नेत्रदीपक सजावटीने व मंद हालचालीने चित्रीत केले जाते, त्यामुळे तो अगदी रम्य बनविला जातो. तथापि, बातम्याद्वारे लोकांना हिंसाचार किती भयानक आहे याचे जास्त आकलन होते, आणि त्यामध्ये सत्य परिस्थिती सामोरी मांडली जाते की जी चित्रपटात नसते.” स्पेलबर्ग यांनी सांगितले की, याच कारणास्तव त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट (जॉज, इंडियाना जोनस् मालिका) आपल्या तरुण मुलाला पाहण्याची परवानगी त्यांनी त्यामध्ये जास्तप्रमाणात रक्तपात व हिंसाचार दाखविण्यात आला असल्यामुळे दिली नाही. (g93 3/8)
“विपुलतेचा विरोधाभास”
स्वीर्झलंड, येथील जिनेव्हा येथे नुकतीच जी सभा भरली होती, तेथे यु.एन.च्या दोघा प्रतिनिधींनी असे जाहीर केले की ते “अन्नटंचाईमुळे उद्भवणाऱ्या अवस्थेविरुद्ध कधीही घेतली नाही अशी आक्रमक भूमिका घेण्यासाठी जागतिक स्थरावर” एकत्र येणार आहेत. ली मॉन्ड हे पॅरीसचे दैनिक अहवाल देते की अन्न व शेतकी संघटना तसेच जागतिक आरोग्य संघटना यांनी सांगितले की ज्याला “विपुलतेचा विरोधाभास” म्हणतात त्याच्या विरुद्ध ते कारवाई करतील. काहीही असले तरी मानवी कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या पौष्टिक आहाराची गरज जमीन समाधानकारक प्रमाणात पुरवू शकते, पण साठ्याचा योग्य मार्गाने म्हणजे गरजेप्रमाणे पुरवठा करण्यात मेळ बसत नाही. आफ्रिकामध्ये दररोज चार कोटी लोकांच्या जिवीताला दुष्काळ धमकी देत आहे. अपुऱ्या आहराचा परिणाम १९ कोटी २० लाख मुलांवर परिणामीत झाला व त्यातील ४०,००० प्रत्येक दिवशी मेले. (g93 2/22)
शिशाची किंमत सोन्याच्या भावाला पोहचली
सार्दीयन किनारपट्टीवर दोन हजार वर्षांपूर्वी एक रोमी गलबत जे शिशांची नेआण करीत असे ते बुडून नाश पावलेल्या स्थितीत सापडले ज्याला “सोन्याचा भाव चढला,” असे इल मेसाजेरो या इटालियन वृत्तपत्राने कळविले. त्या मालाचा मूळ उगम असणाऱ्या प्राचीन रोममध्ये याचा वापर “पाईप, डाग लावणे, वजनमापे बनविणे” याकरता बहुमोल मानला जात असावा. परंतु शास्त्रज्ञांना हा शोध अधिक मोलाचा वाटतो. त्या शिशाच्या विटा समुद्राच्या तळाला पसरल्या होत्या, व त्यावर “वाळूचे दाट आच्छादन” पसरल्यामुळे कोणत्याही कॉस्मीक किरणांच्या परिणामापासून ते सुरक्षित राहिले. किरणोत्सर्जनाचा परिणाम हळूहळू काळाने नाहीसा केला. कोठेही मिळू न शकणारे इतके शुद्ध शिशे पदार्थविज्ञान शास्त्रज्ञानां त्याच्या प्रयोगशाळेत खूपच मोलाचे वाटले कारण ते तेथे करण्यात येणाऱ्या नाजूक प्रयोगावर कोणताही विपरीत परिणाम घडवित नव्हते. (g93 3/8)
वयोवृद्धांना कमी आदर
आशियातील वयोवृद्धांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जपानमध्ये वयाची ६५शी ओलांडलेले किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांची संख्या सध्या १ कोटी ५५ लाख आहे, ती पुढील ३० वर्षात ३ कोटी २० लाख पर्यंत पोहचेल असे काहींचे मत आहे. एशियाविक नुसार २०२० व्या वर्षामध्ये ४ जपानी लोकांच्यापैकी १ वयस्कर असेल. “सिंगापुरी लोकांतील ९% लोक आपल्या ६०व्या वाढदिवसापर्यंत पोंहचले आहेत. आणि इ.स. २००० पर्यंत, अंदाजे १५ लाख मलेशियन सेवनिवृत्त झालेले बनतील,” अशी पृष्टी एशियाविकने दिली. ही वाढ आदर व काळजी घेण्याची जुनी रीत संपुष्टात येत असतानाच घडली. सिंगापोर मधल्या वयोवृद्धांसाठीचे एक वकिल, हेन्री लिम, यांनी म्हटलेः “वयस्कर लोकांचा आदर करण्यात कमी होण्याकडे कल जात आहे.” त्यांनी अशीही यात भर घातली की, तरुण लोकांना खासकरुन “त्यांच्या पालकांऐवजी पाळीव कुत्र्यांकरिता जास्त वेळ आहे.” (g93 2/22)
बाल मजूर
ब्राझिलमधील लहान मुलांना व तारुण्यात प्रवेश केलेल्या मुलांकरता “१९८० ते १९८९ पर्यंतचा कालावधी अनुकूल नव्हता असे फौंडेशन ऑफ द ब्राझिलियन इन्स्टिट्यूट ऑफ जिऑग्रॉफी स्टॅटिस्टिक्स् या संस्थेने म्हटले होते,” असा अहवाल जरनल डा ट्रेड याने दिला. निरीक्षण दाखवून देते की, ५.९७ कोटी मुलांपैकी ३.२ कोटी मुले अशा कुटुंबाशी निगडीत आहेत ज्याचे दरडोई वार्षिक उत्पन्न ४० अमेरिकन डॉलरच्या इतके मजुरीपेक्षा जवळजवळ निम्मे आहे. शाळेला जाण्याऐवजी १७.२ टक्के मुले जी केवळ १० ते १४ वयोगटातील—एक करोड इतकी—मुले त्यांच्या दुःखित कुटुंबाच्या मदतीकरता प्रापंचिक काम करीत आहेत. याचा परिणाम? समाजसेविका रोसा रिबेरो सांगतेः “यामुळे चिरस्थायी दारिद्य्राची पसरण होते. पुरेसे शालेय शिक्षण नसल्याने मुलांना त्यांची सामाजिक स्थिती बदलण्याची संधी मिळत नाही.” (g93 3/8)
रुग्णांविषयीचे भय
द न्यू यॉर्क टाइम्स् नुसार, रुग्णांची काळजी घेणाऱ्या कामगारांवर रुग्णांद्वारे रोगाचा संसर्ग होण्याच्या भयाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. एडस् किंवा हेपाटायटीसच्या रुग्णांवर उपचार करताना अनपेक्षितपणे वैद्यकिय साधनाद्वारे त्वचा कापली जाताना अथवा छिद्र पाडताना अनेक डॉक्टरांनाही त्याचा संसर्ग लागण्याची भीति वाटते. आणि हे उघड आहे की हे भय निराधार नाही. न्यूयार्क शहर इस्पितळाचे निरीक्षण दाखविते की, क्षय रोगाच्या रुग्णांना नियमितरित्या उपचार देणाऱ्या ६० टक्के डॉक्टरांना कालांतराने त्याच रोगाची बाधा झाली. तसेच, रुग्णांची काळजी घेणाऱ्या १२,००० कामगारांना त्यांच्या रुग्णाद्वारे प्रत्येक वर्षी हत्तीरोगाचा संसर्ग होतो. एडस्चा फैलाव सुरु झाल्यावर अमेरिकेत ४७ रुग्णांची काळजी घेणाऱ्या कामगारांना त्यांच्या रुग्णाद्वारे संसर्गाची बाधा झाली. (g93 2/22)
सुपारी आणि कॅन्सर
“चघळावे की चघळू नये . . . हा प्रश्न आहे.” सुपारी चघळण्याविषयीचा हा प्रश्न पोस्ट-कुरियर, या पापुआ न्यू गिनिया येथील वृत्तपत्राने सामोरा आणला. सुपारी खाणाऱ्या लोकांची शस्त्रक्रिया करण्यात निष्णांत सर्जनचा डॉ. बेरी मीलरॉय, यांचा अनुभव असा आहे, “खास करुन पापुआ न्यू गिनिया मध्ये सुपारीचे सेवन करणाऱ्यामध्ये दोन प्रकारचे आजार दिसून येतात तो म्हणजे स्थानिकरित्या होणारा मलेरिया व तोंडाचा कॅन्सर.” तरुण मुलांनाही सुपारी चघळण्याची सवय आहे. डॉ. मीलरॉय म्हणतात, ‘जर एखादा सुपारी चघळतो तर त्याला कॅन्सर होईल की नाही यापेक्षा तो केव्हा होईल हा प्रश्न विचाराधीन आहे.’ त्यानंतर त्याने जरी सुपारी खाणे सोडून दिल्याशिवाय, “वैद्यकिय दृष्टया त्याला कोणत्याही मदतीचा फायदा होत नाही.” (g93 2/22)
बनावटी नोटांची लबाडी करणारे
“एखाद्या दुकानदाराकडून किंवा बँकेत भरणा करणाऱ्यांकडून नकळतपणे बनावट नोटांची घुसखारी होणे ही एक गोष्ट आहे पण चालू चलन पुरवठा राखुन ठेवणाऱ्या अनुभवी व्यक्तीस फसविणे ही वेगळी गोष्ट आहे,” असे प्रतिपादन द वॉल स्ट्रीट जर्नल याने काढले. तरीही, कोणीतरी अमेरिकेत १०० डॉलरचे बील बनविण्यास तेच केले. ज्याला “अपवादात्मक चांगले” म्हणतात त्याप्रमाणे चालू चलनातील बनावट संपूर्ण जगभर वापरात येऊ लागली. या नोटांचा ठसा उमटवून छपाई कामासाठी कठीण तंत्राचा वापर केला गेला, लाल व निळ्या रंगाच्या बारीक तंतूचा समावेश असलेल्या कापडाचा वापर केलेला कागद आणि भिन्नत्वदर्शक मोहक शाहीचा वापर यासर्वाद्वारे कुशल अशी प्रतिकृती बनविण्यात आली. ही बनावट नोट इतकी चांगली बनली की बँकेने तिचा स्वीकार करताना सावधगिरीची दरवेळची रीत न वापरता तिला मान्य केले व अमेरिकन सरकारने तोटा पत्करला. काही अधिकाऱ्यांना तर भितीपोटी हे बनावट बील बनविण्याचे काम कोणा अतिरेकी गटाचे किंवा अपकारी सरकारचे असावे असे वाटले. (g93 2/22)
दम्यामुळे मृत्यूची संख्या वाढली
“दम्याच्या विकारामुळे मरणाऱ्या लोकांची संख्या [जर्मनीमध्ये] नाट्यमय रित्या वाढली आहे,” असे स्टीडोएचा स्तायतून या दैनिकाने सांगितले. जर्मन रेस्पीरेटरी ट्रॅक्ट लीग ऑर्गनायझेशन प्रमाणे, १९९१ मध्ये त्या शहरात ५,००० व्यक्ती श्वसनाच्या विकारामुळे मरण पावल्या. एकोनिसशेच्या मध्याला दर वर्षाचा आकडा २,००० इतका होता. जर्मनीतील २ कोटी रहिवाशी ॲलर्जीला तोंड देत आहेत, ३ पैकी १ श्वसनासंबंधीच्या ॲलर्जीला तोंड देत आहेत. (g93 2/22)