काळाच्या ओघाशी परिचित असणे
यहोवाच्या साक्षीदारांच्या जर्मनीच्या शाखा दप्तराला एका ७७ वर्षीय कॅथोलिक मठवासीचे पत्र मिळाले. त्याने असे लिहिलेः
“माझ्या मठाला बंद होऊन २५ वर्षे झाली, व मी एका वृध्दाश्रमात राहात आहे. मी तुमच्या सर्व विश्वासांशी मुळीच सहमत नाही, परंतु आज मी द वॉचटावर मध्ये जे काही वाचले त्यामुळे मला कबूल करण्यास भाग पडते की तुम्ही काळाच्या ओघाशी परिचित आहात. तुम्ही खरोखरीच एक टेहळणीचा बुरुज आहात, व पृष्ठ दोनवर जे अभिवचन दिले आहे त्याप्रमाणे, ‘जागतिक घटना पवित्र शास्त्रातील भविष्यवाद पूर्ण करीत असता त्यावर नजर ठेवता.’
“‘शांति आहे निर्भय आहे असे ते म्हणतात . . . तेव्हा त्यांचा अकस्मात नाश होतो’ या १ थेस्सलनीकाकरांस ५:३ मधील पौलाच्या शब्दांचे वर्णन तुम्ही धीटपणे व अधिकृतपणे करता. अशा प्रकारचे वर्णन मी आमच्या चर्च मध्ये कोठेच पाहिले नाही. यहोवाच्या साक्षीदारांवर पवित्र आत्मा काम करतो याचा कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही . . . मला तुमची मासिके नियमितपणे वाचावयास आवडतील.”
ह्या कॅथोलिक मठवासीच्या उदाहरणाचे अनुपालन करुन, तुम्हीसुद्धा जागतिक घटना कशा पवित्र शास्त्रातील भविष्यवाद पूर्ण करतात व कसे देवाचे राज्य लवकरच दुष्टाईचा नाश करुन पृथ्वीला नंदनवन बनवील याबद्दल अधिक शिकून घेऊ शकता. (g93 2/22)
तुम्हाला पुढील माहिती किंवा यहोवाच्या साक्षीदारांसमवेत मोफत गृह पवित्र शास्त्राभ्यास हवा असल्यास, कृपया Watch Tower, H–58 Old Khandala Road, Lonavla 410 401 Mah., India या पत्त्यावर लिहा.
[३२ पानांवरील चित्र]
टेहळणी बुरूज
यहोवाच्या राज्याचा प्रकाशक