वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr8-1 पृ. ३-५
  • दहशतवाद—कोणावर परिणाम होतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दहशतवाद—कोणावर परिणाम होतो?
  • सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दहशतवाद म्हणजे काय?
  • ही नवी गोष्ट नव्हे
  • दहशतवाद—त्यामागे काय आहे व का?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • दहशतवाद—याला उपाय काय?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • रक्‍ताच्या शाईने लिहिलेला इतिहास
    सावध राहा!—२००६
  • सरतेशेवटी पृथ्वीवर शांती!
    सावध राहा!—२००६
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
gbr8-1 पृ. ३-५

दहशतवाद—कोणावर परिणाम होतो?

या माहितीपत्रकाचा व तिच्या प्रकाशकांचा राजकारणाशी संबंध नाही. या जगातील राजकीय तंट्यामध्ये त्यांची तटस्थाची भूमिका आहे. परंतु त्यांच्या उद्देशाला अनुसरुन खोलात शिरुन सध्याच्या घटनांमागील खऱ्‍या अर्थाकडे ते लक्ष वेधतात. तज्ञांना दहशतवादामागे दिसणाऱ्‍या हेतूंचे परिक्षण ते करतात. त्यावरुन अनुमान काढणे आम्ही आपल्या वाचकांवर सोपवीत आहोत.

“दहशतवाद्यांच्या छोट्या टोळ्या व एकाकी मारेकरी आपली राजकीय ध्येये आत्मसात करीत असताना आज, जगातील मोठमोठ्या शहरातील रस्ते, हवाई तळ व सैनिकी तळ यांचे रुपांतर रणांगणात झाले आहे.”

“१९७३ ते १९८४ पर्यंत जगभर दहशतवादाच्या ५,००० घटनांची नोंद झाली. त्यात ४,००० लोक मेले व त्याच्या दुप्पट जखमी झाले.”

“गेल्या पंधरा वर्षात वेगवेगळ्या १२८ देशात घडलेल्या घटनांमध्ये ११३ देशातील राजदूत दहशतवादाचे लक्ष्य झाले आहेत.”—फायटिंग बॅक—विनिंग द वॉर अगेन्स्ट टेररिझम्‌.

दहशतवादाचा तुम्हावर परिणाम झाला आहे का? दहशतवादाच्या भीतीने तुम्ही आपली प्रवासाची योजना सोडून दिलीत वा बदललीत का? दहशतवाद आज अनेकांच्या जीवनावर जाणते वा अजाणतेपणे दबाव आणीत आहे. इस्राएलचे संरक्षणमंत्री यीत्‌झाक राबिन यांनी लिहिल्याप्रमाणे, “जगभर, दहशतवादाची भीती हा अनेकांच्या सर्वसाधारण जीवनाचा भाग बनला आहे.” दहशतवादामुळे पडणाऱ्‍या खर्चाचा बोजा उचलण्यास बहुधा तुम्ही मदतही करीत असाल. ते कशा रितीने? अधिक चांगली सुरक्षा व जय्यत तयारी ठेवण्यासाठी अनेक सरकारांना करावा लागत असलेला खर्च, तुम्ही भरलेल्या करातील काही हिश्‍शाने भागत असेल.

उत्तर आयर्लंड व मध्यपूर्वेतील देशात गेली काही दशके दहशतवाद चालला आहे. अलिकडील काही वर्षांत दहशतवादाने युरोप तसेच मध्य व दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांवर आपली छाप पाडली आहे. दूरदर्शन, रेडिओ व वृत्तपत्रामुळे दहशतवादी हिंसेशी आपणही परिचित झालो आहोत. तो जवळपास आपला दैनंदिन अनुभव झाला आहे. दहशतवादी बॉम्ब, खून व अपहरणे इतकी वारंवार होतात की, त्यामुळे कदाचित आपण भावनारहित-निष्ठुर झालो आहोत. परिणामी असामान्य ते सामान्य, अतर्क्य ते विचार करण्यास योग्य वाटू लागते. आणि लेबननसारख्या देशात खपवूनही घेतले जाते.

होय, दहशतवाद हे जीवनातील एक सत्य आहे. दहशतवादी पुढारी व त्यांच्या गटाची नावे घरोघर परिचित करणाऱ्‍या वृत्तपत्रांच्या दैनिक बातम्यांचा तो एक भाग झाला आहे. आता दहशतवाद ही एक जागतिक आपत्ती झालेली आहे.—सोबतचा नकाशा पहा.

दहशतवाद म्हणजे काय?

दहशतवादाची व्याख्या सांगणे सोपे वाटेल. पण तुम्ही या विषयाच्या कोणत्या बाजूला आहात यावर ते अवलंबून आहे. एल साल्व्हेडोरमधील विध्वंसक हे दहशतवादी आहेत की ‘जनतेची राष्ट्रीय मुक्‍ती संघटना’? निकारागुआमधील कॉन्ट्राज्‌ दहशतवादी आहेत की ‘स्वातंत्र्यवीर’? सौंदर्याप्रमाणे दहशतवादही बघणाऱ्‍याच्या दृष्टीत असतो. राजकीय पंथानुसार व्याख्येचा विपर्यास होऊ शकतो.

संयुक्‍त राष्ट्रसंघामधील इस्राएलचे प्रतिनिधी बेंजामिन नेतान्याहू यांनी दहशतवादाची ही व्याख्या सादर केलीः “राजकीय ध्येयासाठी भीती उत्पन्‍न करण्यास जाणीवपूर्वक व शिस्तबद्ध खून करणे, पंगू करणे आणि निरपराध्यांना धमक्या देणे.” (टेररिझम—हाऊ द वेस्ट कॅन विन) शिकागो येथील लॉयोला विद्यापिठातील सॅम सारकेसियन याची अशी व्याख्या करतातः “खून, वाहन व व्यक्‍तीचे अपहरण, तिसऱ्‍याच पक्षावर परिणाम करण्यासाठी ‘निरपराध’ लोकांचा बळी घेणे असे विविध डावपेच हे त्याचे गुणविशेष होत. थोडक्यात, दहशतवाद्यांच्या मागण्या व/किंवा ध्येयास विद्यमान व्यवस्थेकडून जबरदस्तीने प्रतिसाद मिळवण्यासाठी जनसामान्यांमध्ये भीती उत्पन्‍न करणे म्हणजेच दहशतवाद होय.”—हायड्रा ऑफ कार्नेज.

उलटपक्षी, कॅथोलिक वेदांतीय प्राध्यापक जेम्स बर्टचेल लिहितातः “दहशतवाद हा आशा संपल्याने जिवावर उदार झालेल्यांचा लढा आहे. . . . [ती] नेहमी आपले नुकसान झाले असल्याची भावना असलेल्या लोकांची कृती असते.”—फाइटिंग बॅक.

कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी दहशतवादाचा बहुधा अर्थ, निरपराध लोकांची हिंसा असाच होतो. जॅन श्रेबर यांनी त्यांच्या द अल्टिमेट वेपन या पुस्तकात लिहिल्याप्रमाणेः “दहशतवादी टोळ्या एखाद्या सैन्याप्रमाणे अमानुषरित्या काम करतात; त्यांनी दुष्कृत्ये, दैनंदिन जीवनाचाच भाग केली आहेत.”

ही नवी गोष्ट नव्हे

दहशतवाद हा शतकानुशतके जुना असला तरी राजकीय पंथाचा प्रकार म्हणून तो विशेषेकरुन अलिकडील काही दशकातच वापरला गेला आहे. मागे १९४५ मध्ये ब्रिटीश मजूर सरकार पॅलेस्टाईन यहुद्यांच्या स्वाधीन करणार नाही असे स्पष्ट झाल्यावर दहशतवादी गट उदयाला आले. त्यात, “इरगुन झ्वा’ई लूमी (एटझल म्हटली जाणारी राष्ट्रीय सैनिकी संघटना) आणि लोहामी हेरत ईस्राएल (इस्राएलच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे वीर) [त्यांनाच लेहि किंवा स्टर्न टोळी असेही म्हटले गेले] या दहशतवादी कृत्ये करणाऱ्‍यांचा समावेश होता. २२ जुलै रोजी जरुसलेममधील सरकारी कार्यालये असलेला किंग डेव्हिड हॉटेलचा एक भाग एटझेलने उडवून लावला व अंदाजे १०० यहुदी, ब्रिटीश व अरब लोक मारले गेले.”—द ज्यूज इन देअर लँड, लेखक डेव्हिड बेन-गुरियन.

१९६० च्या दशकापासून विशेषतः इस्राएल, पॅलेस्टाइनमधील निर्वासित व अरब देशांच्या संदर्भात दहशतवादाला वेग आला आहे.

दहशतवाद हा केवळ आयर्लंड व मध्यपूर्वेपुरता सीमित नाही. स्पेनमध्ये बास्क इ.टी.ए. दहशतवादी आहेत, भारतात शीख विघटनवादींचा त्रास आहे, तामिळ अतिरेक्यांच्या झगड्यामुळे श्रीलंकेमध्ये दुही निमार्ण झाली आहे, पेरुमध्ये माओवादी सेंडेरो लूमिनोसो (उज्ज्वल मार्ग) उग्रवादी आहेत. तथाकथित लोकसत्ताक जगातील यादी, न संपणारी असावी असे वाटते.

परंतु लोकसत्ताक राष्ट्रांवर असा परिणाम का झाला आहे? दहशतवादामागील खरी कारणे कोणती? दहशतवादी हे फक्‍त न्याय व दाद मागणारे जाचलेले गट आहेत का? किंवा त्यात अधिक असे काही आहे? दहशतवाद कायमचा राहील का? पुढील लेख या व इतर प्रश्‍नांचे परिक्षण करील. (g87 1/8)

[५ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

दहशतवादामुळे अलिकडे बातम्यांमध्ये आलेले काही देश

संघराज्य

उ. आयर्लंड

जर्मनी

फ्रान्स

स्पेन

इटली

टर्की

लेबनन

इस्राएल

अफगाणिस्तान

बांगला देश

जपान

द. कोरिआ

भारत

श्रीलंका

फिलिपाईन्स

अँगोला

नैऋत्य आफ्रिका

द. आफ्रिका

अमेरिका

एल साल्व्हेडोर

निकारागुआ

पनामा

व्हेनेझुएला

कोलंबिया

पेरु

अर्जेंटिना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा