पृष्ठ दोन
शांती व स्थैर्यता यावी असे लोकांना मनापासून वाटत आहे. पण आजचा अनुभव झगडे, अन्याय, गरजा व जाच यांनी पुरेपूर भरला आहे. यामुळे दहशतीला उचल मिळाली आहे.
तर मग, हा दहशतवाद नेहमीच शाप राहील का? किंवा मुखपृष्ठातील चित्रात जे प्रवर्तित करण्यात आले आहे तेच सबंध पृथ्वीभर लवकर घडून येईल असे मानण्याजोगे कारण आहे का? पुढील लेख दहशतवादामागील कारणे यांचे परिक्षण करील आणि भविष्याविषयीची उत्तेजनात्मक आशा ते तुम्हास देतील.