जेव्हा भूमी हादरते . . . ते प्रतिकृति करतात
आमच्या चिलेमधील प्रतिनिधीकडून
भूमी अधीकाअधिक तीव्रतेने हादरू लागली. आम्ही आमच्या घराच्या दरवाजाकडे धाव घेतली. जे कोणी स्वयंपाकघरात होते ते कपाटातील सामानांना सावरून दारे लावण्याच्या प्रयत्नात होते तरी पुस्तके, बाटल्या, कुंड्या, कांचेचे सामान व फराळाचे डबे जमीनीवर आदळत असल्याचा वरच्या मजल्यावरून आवाज येत होता. हे किती वेळ चालणार याच विवंचनेत आम्ही सर्व होतो.
हे सांगण्यास नको की आम्ही त्याच्या कालावधीचे मोजमाप करीत नव्हतो पण दुसऱ्या दिवसाचे वर्तमान पत्राने म्हटले तो केवळ दोन मिनिटे राहिला. आता कदाचित तुम्ही म्हणाल, दोन मिनिटे पण केवढ्या लांब मुदतीची वाटली, होय, कारण त्यावेळी तुमच्या पायाखालची भूमी हादरत होती.
ती वेळ, मार्च ३, १९८५ रविवार, सायंकाळ, ७:४५ची होती. ती घटना घडली त्यावेळी आम्ही वॉचटावर संस्थेच्या दप्तरातील आमच्या खोल्यांत आराम करीत होतो व आमच्या सोबतीचे स्वयंपाकघरात चहा पीत होते.
भूमिकंपामुळे कैक तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. यास्तव बॅटरी, मेणबत्त्या आणि द्रान्सीस्टर रेडिओ बाहेर आले. रेडिओ वरील बातम्यानुसार सँटीयागो या पुरातन शहराचा दर्याकिनारा व आंतील काही भागास जबरदस्त तडाखा बसला. मग आम्हाला काळजी वाटू लागली की तेथे असलेले आमचे ख्रिस्ती बंधु कसे असतील? प्रयत्न करूनही त्यांचेशी संपर्क साधता येईना. टेलिफोनचे दळणवळण तुटलेले व जे चालू होते ते सारखे घर्रघर्र करीत होते. आम्हाला जो पहिला संदेश आला तो जेथे नवे शाखा दफ्तर बांधत होते तेथून आला. आम्हाला केवढे समाधान वाटले. नवे बांधकाम भक्कम राहिले होते व केवळ ऑफिस अंगणात कच्च्या विटांची जी भिंत त्याच सकाळी उभारली होती तीच कोसळली होती. त्या रात्री आम्हातील फार थोडक्यांना झोप लागली. आम्ही बिछान्यावर अंग टाकले तोच परत धक्का बसला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात नुकसानीचा अहवाल केवढे धक्कादायक चित्र देत होता. भूमिकंपाची तीव्रता रिचरच्या मोजमापनावर ७.७ निर्देषांक देत होती. शहरातील पाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. पूल कोसळले होते. तर १४० पेक्षा अधीक लोकांची प्राणहानी झाली व १,५०,००० बेघर झाले. एक अब्ज आठशे करोडचे नुकसान झाले! एवढेच नव्हे तर या भूमिकंपाची जाणीव अटलांटीक समुद्रकिनाऱ्यावरील १३५० किं.मि. (८४० मैल) ब्युनोस एअरस, अर्जेंटिना मध्ये झाली. होय, मार्च ३, १९८५ या दिवसाची आठवण लवकर मिटणार नाही.
मदतीची तीव्र गरज
आम्ही तत्काळ शाखादप्तरांतील वेगवेगळ्या बंधुंची मचाली, मेलीपिला, रेंगो सॅन ॲटोनिओ, व्हॅलपॅरायसो आणि विणाडेलमार या गावांना भेटी देण्यास नेमणूका केल्या. कारण आमच्या ख्रिस्ती बंधुची परिस्थिती कशी आहे व सद्य परिस्थितीत त्यांना कशाची ताबडतोब गरज आहे हे पाहणे होते.
उद्ध्वस्ततेचे दृश्य चोहोकडे दिसत होते. अधिक नुकसान जरी जुन्या पडिक बांधकामांचे झाले होते तरी काही आधुनिक इमारतींनाही तडा गेला होता—जशी रोनाका मधील आठ मजली उत्तुंग इमारत एवढ्या भेदकपणे हादरली होती की त्यानंतर पिसामधील बुरुजाप्रमाणे एक बाजूस कलली. तिला पाडावे लागले.
मग आमचे ख्रिस्ती बांधव? जरी शेकडोनी आपली घरे व मालमत्ता गमावली तरिही तेथे जे १६ हजार यहोवाचे साक्षीदार राहात आहेत त्यांचे पैकी एकाच्याही प्राणाला धोका झाला नाही किंवा कोणी जखमी झाले नाही. सँन्टीयागो, तसेच पंटा अरिनास व इक्वीक सारख्या दूरवरच्या भागातील मंडळ्याकडूनही विचारणा होऊ लागली की ते कोणत्या प्रकारची मदत पाठवू शकतात. तत्काळ संदेश रवाना झाले व काही तासातच काही बंधु ब्लँकेट, कपडे, खाण्याच्या वस्तु व इतर उपयुक्त चीजवस्तु घेऊन आले. लवकरच आमच्याकडिल ५.५ टन माल राहील अशा दोन ट्रक भरून तयार केल्या व त्यांना रवाना केले. त्या, त्याच सायंकाळी परतेपर्यंत दुसरी खेप करता येईल एवढी मालमत्ता परत जमा झाली व तिला रवाना केले, व असे सुमारे दोन आठवडे सतत चालू होते.
भूमिकंपाच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपासच्या मंडळ्यातील व बांधकाम करणाऱ्यांपैकी ११० स्वयंसेवक तेथे पोहंचले व त्यांनी लाकडी घरांच्या २४ चाळी उभ्या केल्या व पावसाळयापर्यंत अधिकाधिक पक्की घरे बांधण्याची अपेक्षा व्यक्त केली.
एका मंडळीने आम्हास हे कळविण्यास लिहिले की जी व्यवहारीक मदत पाठविली व घरे उभारली, तोच आमच्या बंधुत्वाचा दृश्य पुरावा आहे. “लॉस हरमानॉस से पासारॉन!” (बंधुनी अतिशयोक्ति केली.) बंधुंनी, खरोखरी हृदगत मार्गी आम्हास याची आठवण दिली की, आंतरराष्ट्रीय बंधुत्व असे असते. कारण भूकंपानंतर अनेक दिवस व अनेक आठवडे अर्जेटिना, जर्मनी, इटली आणि अमेरिका मधील बंधु सतत चिली मधील बंधुची चौकशी करीत होते. या दूरध्वनीच्या चौकशीनंतर आमच्या जे “घरचे” बनलेले त्यांनी आपल्या उदारतेत केवढी मदत पाठविली.
स्वपरिक्षणाचा वेळ
“भूकंप” व त्याचे हानीकारक बळाचे उग्रवादी लोकांस—तत्काळ, देवाबरोबरील त्यांचे नातेसंबंध कसे आहेत याबद्दलचे संशयातीत विचार मनात येतात. प्रत्यक्षात, चिली मध्ये हा भूकंप होताच, काही मिनिटात, अनेक शेजाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ राज्य सभागृहाचा आश्रय घेतला. मेलिपिला मधील एका सर्वपरिचित साक्षीदाराच्या घरी त्यारात्री शेजारचे अनेकजण पाहुणे राहिले होते. त्यानंतर जसजसे अधिक धक्के बसले तसतसे स्वसंरक्षणार्थ आलेल्या त्याच्या घरच्या पाहुण्यांची संख्या वाढत राहिली. शेवटी त्याच्या घरामागील अंगणांत तंबू उभारला, जेथे त्याने रात्रीं बऱ्या उशीरापर्यंत पाहुण्यासोबत येशूने, शेवटल्या दिवसांत “जागोजागी भूकंप होतील” असे जे भविष्यवादीपणे म्हटले होते ते काय आहे याबद्दलची चर्चा केली.—मार्क १३:३-८.
वीना डल मार मध्ये एका गृहस्थाने आपला शास्त्राभ्यास बंद केला होता व म्हटले होते मी परत कधी या राज्यसभागृहात येणार नाही. पण भूकंपानंतर, त्या रात्री तो कोठे जाऊन पोहचला? राज्य सभागृहात. त्याचे व त्याच्या कुटुंबाचे स्वागत झाले व त्यांना तेथे राहण्यास दिले. त्याचा व त्याच्या कुटुंबाचा हा जो उबदार आदरसत्कार झाला त्यामुळे तो एवढा भारावला की त्याने आपला शास्त्राभ्यास परत सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला.
आमचे काही बंधु प्राणघातक संकटातूनही थोडक्यात बचावले. उदाहरणार्थ, विकुना मंडळीतील एक बंधु नुकताच रूग्णालयांतील उपचारानंतर घरी परतला होता व अंथरूणावरच होता. त्या सायंकाळी त्याची बायको व मुलगी सभेला गेले व घरात तो एकटा होता. भूकंप होण्याच्या काही मिनिटे आधी त्याने ठरविले की मी कसेही करून आज स्वयंपाक घरात जाईन व त्यांच्या करिता चहा तयार करून ठेवीन व त्यांना आश्चर्यचकीत करीन. तो मोठ्या प्रयासाने उठून हळूवार स्वयंपाकघरात पोहंचला व पातेल्यांत पाणी घेऊन गरम होण्यास ठेवणार तेवढ्यात भूकंप झाला. जेव्हा तो त्याच्या खोलीत परतला, तर काय पाहतो, त्याचा बिछाना वरून कोसळलेल्या तीन मिटर (९ फुट) उंच भिंतीखाली पूर्ण गाडला गेला. मग मोठ्या प्रयासाने स्वयंपाक घरात जाण्याचा व चहा करण्याचा जो विचार त्याने केला त्याबद्दल त्याला केवढी धन्यता वाटली बरे!
आमचे ख्रिस्ती बंधु संकटाचे वेळी संकटकाळी दिलेल्या हाकेस जो होकार देतात तो केवढा विश्वासास भक्कम करणारा ठरतो बरे! ज्यांनी सर्व काही गमावले ते केवढे आशावादी राहिले, जसे अनेकांनी म्हटले, “जरी आमची घरे कोसळली तरी आमचा विश्वास कोसळला नाही!”