त्या आकर्षक शिंपल्या
फिलिपाईन मधील आमच्या स्तंभलेखकाकडून
हे १९३७ मध्ये फिलिपाईन्स मधील बाहोल बेटावर घडले. त्या खळबळजनक घटनेने एका ब्रिटीश गृहस्थास आनंदाने भावनावश केले. ते गृहस्थ ह्युज कमिंग हे होते, जे शंखशिंपल्यांचा शोध घेणारे होते, व या प्रसंगी कमिंगला “कोनस ग्लोरीया मारीस” नामे तीन शिंपल्या सापडल्या. या नावाचाच अर्थ “ग्लोरी ऑफ द सी” असा होतो.
तीन शिंपल्याबद्दल एवढी खळबळ उडण्याचे प्रयोजन? होय, कारण ह्युज कमिंगने सर्व शिंपल्या संशोधकांचे स्वप्न पुरे केले होते. “ग्लोरी ऑफ द सी”—समुद्र वैभव—या शिंपल्या अगदी दुर्मिळ व शिंपल्यांच्या प्रकारातील बहुमोल प्रकारातील ठरतात. फिलिपाईन्स मधील संग्राहलयात त्यांची संख्या मोठी आहे. जरी खडकातील अवशेषासारख्या दिसतात तरी त्यांच्यातील एका नगाची किंमत हजार अमेरिकन डॉलर पेक्षा अधिक असते.
फिलिपाईन्स हे शंख शिंपल्याच्या संग्राहकांचे नंदनवन आहे. जगात ज्या १३ अनमोल शिंपल्या आहेत त्यातील तीन या देशांतील आहेत. शिंपल्या आणि फिलिपाईन्स या प्रकाशनात म्हटले आहे: “शिंपल्याचे कवच असलेल्या प्राण्यांचे विविध प्रकार ज्या अफाट जलाशयांत सांपडतात त्याला इंडो-पॅसिफिक म्हणतात. याच्या सीमेला तांबड्या समुद्रापासून सुरवात होऊन पूर्वेकडे आफ्रिकेतनू हिन्दी महासागरात वळते व तेथून पॅसिफिकमधून हवाई व पूर्वेकडील बेटाकडे जाते . . . तरी या विशाल जलाशयचा मध्यबिंदू किंवा शिपल्या संग्रहित करण्याचा मक्का म्हटले म्हणजे फिलिपाईन्स आर्चपिलॅगी आहे. ज्याच्या सभोवतालच्या हजारो बेटांवर, पाण्याखालील खडक, पन्हाळ्या, उपसागर, सामुद्रधुनी आणि किनाऱ्यापासून काही अंतरावरील खळग्यात सांपडतात.
मुख्यत्वेकरून हे शिंपले अस्थिविना मांसल शरिराच्या प्राण्याचे आश्रयस्थान असतात. त्यात गोगलगाय, क्यॅम, मोठ्या शिंपल्यातील किडा, कालव, या सर्व जाती आहेत. अस्थिविरहीत प्राण्यांना अंतर्गत अवयव, डोके आणि पाय व त्वचेसमान आच्छादन असते. या आच्छादनात असा एक पदार्थ असतो जो शिंपली बनतो. तो द्रव थरावर थर जमत जातो व ते थर सुकून कांचेपेक्षाही टणक बनतात. त्यांना कापण्यासाठी विशिष्ट हत्यारे लागतात.
कोणत्याही दोन शिंपल्या परस्परासमान नसतात. प्रत्यके प्राण्याच्या अनुवंशीय, मूलभूत नमुना आणि वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होतो. रंग व भूषणे ही आच्छादनातील खास ग्रंथीनी तयार होतात. बाहेरील शिंपलीविना सर्वांत मोठे अस्थिविना प्राणी क्लॅम (ट्रायडक्ना गीगास) नावाने ओळखले जातात. ते लांबीने पाच फुटांपर्यंत (१.५ मि) लांबीने वाढतात. तथापि खडकांतील प्राण्यांच्या शिंपल्या १५ फूट लांब (४.६ मि) वाढल्याचे आढळतात.
पाच मुख्य गट
सर्व साधारणपणे या अस्थिविरहीत प्राण्यांची प्रमुख पाच प्रकारात विभागणी होते. एक, ऑफिन्युअरा आहे, हे नाव ज्या ग्रीक शब्दाचा अर्थ “आसमंतात” आणि “पंखातील दांडी” असा होतो त्यावरून आहे. या प्राण्यांना दोन मज्जा रेषा असतात ज्या शरीरभर पसरलेल्या असतात. ते “पोस्ट पिशवी” समान शिंपली सृष्ट करितात, व एका भक्कम तुळईसमान एकावर एक अशा शिंपल्याचे आठ थर तयार करितात. शिंपल्याला त्याचे नाव पुरातन काळातील शस्राच्या सदृश्यतेमुळे दिलेले आहे. “ऑफिन्युअरा” हा ताब्यात राहणारा प्राणी आहे; जो खडकावर चढून खाण्याकरिता हिरवळ खरवडतो. त्यांच्याठायी युद्धकुशलतेचा एकच गुण असतो की शत्रुला फसविणे.
अस्थिविरहीत प्राण्यातील सर्वात मोठा गट “गॅस्ट्रो पाडा” आहे, जे नाम ग्रीक भाषेत ज्याचा अर्थ “पोट” आणि “पाय” असा होतो त्या शब्दापासून आहे. हे प्राणी पोटाला चिटकून असलेल्या पायांनी चालतात. या मुख्य गटांत सुमारे ५०,००० वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यात ग्लोरी ऑफ द सी या मशहूर प्रकाराचा समावेश आहे. या प्रकारात गोगलगाय, लिम्पेटस्, व्हेल्क, आणि स्लग्ज हे प्रकार आहेत.
गॅस्ट्रो पाडा प्रकारात एकच शिंपली असते, म्हणून त्यांना ‘व्हाल्व्ह’ म्हणतात. कदाचित तुमच्या पाहाण्यात आले असेल की त्यांच्या शिंपल्या वेटोळे असलेल्या चक्राकार असतात. गॅस्ट्रोपाडा प्रकारातील बहुतेक प्रकार एकदिशा घड्याळाच्या चावी प्रमाणे डावीकडे वळण घेत वाढतात. गॅस्ट्रोपाडा, हिरवळ तसेच मांसही खातात. जर धोका वाटला तर आपल्या शिंपल्यात आकुंचित होतात, व ज्याला “ओपर क्युलम” म्हणतात ते कवचाचे दार लावून घेतात.
अस्थिविना प्राण्यांचा पेलेसैपोडा नामे आणखीन एक प्रकार आहे. हे नाम ग्रीक भाषेतील ज्या शब्दाचा अर्थ “छोटी कुऱ्हाड” असा होतो त्यापासून आहे. त्यांना कुऱ्हाडीच्या आकाराचे मांसल पाय असतात, जे रूजविण्याच्या कामी येतात. या प्रकारातील अस्थिविरहीत प्राण्यांना, दोन समान शिंपल्या असल्यामुळे ते “बायव्हॉल्व” नामाने ओळखले जातात. या गटांत क्लॅम्स्, कालव हे प्रकार असतात; या सर्व प्रकारातील स्कॅलॉप, व इतर हजारो जाती सर्वपरिचीत आहेत. सर्व प्रकारातील बायव्हॉल्व जात शाकाहारी असते. त्यांच्यातील बहुतेक प्राणी खडकात किंवा वाळूमातीत विवरे करून वस्तीस असतात.
चवथ्या प्रकारास “स्कॅफोपाडा” म्हणतात; जे नांव अशा ग्रीक शब्दापासून आहे ज्याचा अर्थ—“पडाव” आणि “पाय” असा होतो. या गटात ३५० प्रकार आहेत. ते समुद्रांत राहतात आणि यांना पडावाप्रमाणे दिसणारे पाय आहेत. त्यांनी ते वाळूत वारूळ तयार करितात व पाण्याकडे टोक राहील अशा प्रकारे त्यात शिंपले ठेवितात. त्यांच्या शरीरावर दोन्ही बाजूला उघडे असणारे नळकांडे समान शिंपले असतात. यामुळेच अनेक त्यांना “दांत” किंवा “हस्तीदंत” म्हणतात. त्यांना हा जो सोंडेसमान अवयव असतो त्याने ते शिकार करतात.
पांचवा वर्ग प्रत्यक्षात अस्थिविरहित प्राणी वर्गात मोडत नसलेला वाटेल. त्यांना सिफालपाडा संबोधतात जे नाव “डोके” आणि “पाय” अर्थी ओळख देणाऱ्या ग्रीक शब्दापासून आहे. हा वर्ग डोक्यावर व तोंडापाशी जो सोंडेसमान अस्थिविरहित अवयव (आठ ते दहा) असतो त्यावरून ओळखला जातो. यांचेमध्ये स्क्विड, ऑक्टोपस आणि कटलफिश हे प्राणी समाविष्ट आहेत. सिफालो पाडा प्रकारातील ८०० ग्रंथीत केवळ चेंबर नॉटीलस या प्रकाराला बाहेरील शिंपलीचे कवच असते.
मौजेखातर शिंपल्या गोळा करणे
शिंपल्या गोळा करणे हे आनंदाचे असेल असे तुम्हास वाटते का? जर होय, तर समुद्रकिनाऱ्यावर सुरवात केलेली बरी! किनाऱ्यावरील उथळ जागी खोलगट पाण्यात सुंदर शिंपल्या सांपडतात. वाईट हवामानास तुम्हास निराश करू देऊ नका कारण तुफान किनाऱ्यावर बरीच घाण टाकीत असते त्यातच चकाकणाऱ्या शिंपल्या सापडतात.
तथापि आकर्षक शिंपल्या मिळविण्यास थोडे परिश्रमही करावे लागतात. वाळू खोदून आत विवरात, खाड्यात शोध घेतला पाहिजे. तसेच लाटा उसळून परतल्यावर व बुळबुळीत गवतात जाऊन शोधले पाहिजे. थोडे अंतर पोहून व मृत प्रवाळ तसेच खडकांचे दगड उलट करून पाहिल्यास कदाचित चकीत करणारे अनेक नवीन शोध लागतील. तसेच नदीकाठी आणि जवळपासच्या जमीनीवरही विविध प्रकारच्या शिंपल्या मिळतील. उदाहरणार्थ, अशा काही जागा व झाडे आहेत ज्यांवर आकर्षक आणि मोठमोठ्या गोगलगायी आढळतात.
पण सावधान, काही शिंपल्या, जसे कोन नामे शिंपल्यात जहाल विष ओकणारे प्राणी असतात. तर काही मांस भक्षक असतात व शिकारीस हतबल करण्यास त्यांना पाच सहा अणकुचीदार सुळके मांसल त्वचेखाली असतात. संभाव्य भक्ष्य किंवा मानवी हातावर ते तारतम्य न पाहता हल्ला करतात. यातील सत्य, काही शिंपल्या संग्राहाकाच्या अपघाती मरणाच्या अहवालावरून पटते. कोन, प्राण्यांना जाळ्यात किंवा पात्रात धरावे. त्याच्या निमूळत्या शेपटीस कधीही धरू नका.
अगदी काळजीपूर्वक, कुशलतेने केलेली सफाई तुमच्या वस्तुंना अधीक चमकवील. काहीं पद्धती अशा आहेत: “पाण्यात उकळवणे, लायमध्ये भिजवणे. ब्लिचींग पावडरने साफ करणे. अधिक भाग असेल तर तिचे टवके उडविणे. त्यावरील मांस निघत नसेल तर अधिक उकळवणे किंवा एखाद्या धारदार चाकूने तासावे किंवा मुंग्या अगदी सफाईदार कामगिरी करीतात. कोणत्याही प्रकारे साफ केल्यानंतर खास करून ॲसीडने साफ केल्यानंतर सर्व शिंपल्या साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. आता तुम्हापाशी प्रदर्शनार्थ काही सुंदर शिंपल्या असणार.
तथापि, जेव्हा शिंपल्याना स्वच्छ करण्याचे ठरविता, तेव्हा त्या कामातील ज्यांना नको म्हटले आहे त्या गोष्टी टाळाव्या. शिंपल्याना कधीहि ॲसीड मध्ये भिजत ठेऊ नये. सूर्यप्रकाशात किंवा कडक उन्हात ठेवणे टाळा जाड शिंपल्या उकळ्त्या पाण्यात टाकू नका. त्यांना कदाचित भेगा पडतील.
अस्थिविना प्राणी जगात चोहोकडे आहेत. ते उघड्या जागेवर तसेच समुद्र धुनीत व खांचखळग्यात सापडतात. आज अनेकांकरिता शिंपल्या गोळा करणे हा एक आनंदविणारा छंद बनला आहे.
[पानांवरील चित्रं]
जायन्ट क्लॅम
कॉमन वेन्टलट्रॅप
टस्क शेल
चेंबर्ड नॉटीलस