वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद २४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • लग्न आणि घटस्फोट (१-५)

      • जीवनासाठी आदर (६-९)

      • गरिबांना दया दाखवणं (१०-१८)

      • उरलेलं पीक गोळा करण्याबद्दल नियम (१९-२२)

अनुवाद २४:१

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:३१, ३२; मार्क १०:४, ११
  • +मला २:१६; मत्त १:१९; १९:३-८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१८, पृ. ११

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. १०-११

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९३, पृ. ४-५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९५

अनुवाद २४:२

समासातील संदर्भ

  • +लेवी २१:७

अनुवाद २४:३

तळटीपा

  • *

    किंवा “तिला नाकारलं.”

अनुवाद २४:५

समासातील संदर्भ

  • +अनु २०:७; नीत ५:१८; उप ९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. ७

अनुवाद २४:६

तळटीपा

  • *

    किंवा “एखाद्याचा जीव; एखाद्याचं जीवन.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. २६

अनुवाद २४:७

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:२८; ४०:१५
  • +निर्ग २१:१६
  • +अनु १९:१८, १९; २१:२०, २१

अनुवाद २४:८

तळटीपा

  • *

    “कुष्ठरोग” असं भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हा शब्द बऱ्‍याच प्रकारच्या संसर्गजन्य त्वचारोगांना सूचित करू शकतो. कपड्यांना आणि घरांना होणाऱ्‍या काही संसर्गांनाही तो सूचित करू शकतो.

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:२, १५; मार्क १:४४; लूक १७:१४

अनुवाद २४:९

समासातील संदर्भ

  • +गण १२:१०, १५

अनुवाद २४:१०

समासातील संदर्भ

  • +अनु १५:७, ८; नीत ३:२७

अनुवाद २४:१२

समासातील संदर्भ

  • +ईयो २४:९, १०

अनुवाद २४:१३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२६, २७

अनुवाद २४:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “फाटकांच्या आत.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २५:३९, ४३; नीत १४:३१

अनुवाद २४:१५

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१३; यिर्म २२:१३; मत्त २०:८
  • +नीत २२:२२, २३; याक ५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१८, पृ. ३२

अनुवाद २४:१६

समासातील संदर्भ

  • +२इत २५:३, ४
  • +यहे १८:२०

अनुवाद २४:१७

तळटीपा

  • *

    किंवा “वडील नसलेल्या मुलावर.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२१, २२
  • +निर्ग २२:२६, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१९, पृ. २४-२५

अनुवाद २४:१८

समासातील संदर्भ

  • +अनु ५:१५

अनुवाद २४:१९

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:९; २३:२२; रूथ २:१६; स्तो ४१:१
  • +अनु १५:७, १०; नीत ११:२४; १९:१७; लूक ६:३८; २कर ९:६; १यो ३:१७

अनुवाद २४:२०

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१०; अनु २६:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. २४:१मत्त ५:३१, ३२; मार्क १०:४, ११
अनु. २४:१मला २:१६; मत्त १:१९; १९:३-८
अनु. २४:२लेवी २१:७
अनु. २४:५अनु २०:७; नीत ५:१८; उप ९:९
अनु. २४:६निर्ग २२:२६, २७
अनु. २४:७उत्प ३७:२८; ४०:१५
अनु. २४:७निर्ग २१:१६
अनु. २४:७अनु १९:१८, १९; २१:२०, २१
अनु. २४:८लेवी १३:२, १५; मार्क १:४४; लूक १७:१४
अनु. २४:९गण १२:१०, १५
अनु. २४:१०अनु १५:७, ८; नीत ३:२७
अनु. २४:१२ईयो २४:९, १०
अनु. २४:१३निर्ग २२:२६, २७
अनु. २४:१४लेवी २५:३९, ४३; नीत १४:३१
अनु. २४:१५लेवी १९:१३; यिर्म २२:१३; मत्त २०:८
अनु. २४:१५नीत २२:२२, २३; याक ५:४
अनु. २४:१६२इत २५:३, ४
अनु. २४:१६यहे १८:२०
अनु. २४:१७निर्ग २२:२१, २२
अनु. २४:१७निर्ग २२:२६, २७
अनु. २४:१८अनु ५:१५
अनु. २४:१९लेवी १९:९; २३:२२; रूथ २:१६; स्तो ४१:१
अनु. २४:१९अनु १५:७, १०; नीत ११:२४; १९:१७; लूक ६:३८; २कर ९:६; १यो ३:१७
अनु. २४:२०लेवी १९:१०; अनु २६:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद २४:१-२२

अनुवाद

२४ जर एखाद्या माणसाने एका स्त्रीशी लग्न केलं, पण तिच्या वाईट वागणुकीमुळे ती त्याला आवडली नाही, तर त्याने तिला सोडचिठ्ठी लिहून द्यावी+ आणि आपल्या घरातून पाठवून द्यावं.+ २ त्याचं घर सोडल्यावर, ती स्त्री हवं तर दुसऱ्‍या माणसाशी लग्न करू शकते.+ ३ पण तो दुसरा माणूसही जर तिचा द्वेष करू लागला* आणि त्यानेही तिला सोडचिठ्ठी लिहून दिली आणि आपल्या घरातून पाठवून दिलं किंवा जर त्याचा मृत्यू झाला; ४ तर तिला पाठवून देणारा तिचा पहिला नवरा तिच्याशी परत लग्न करू शकत नाही, कारण ती त्याच्यासाठी अशुद्ध झाली आहे. यहोवाला अशा गोष्टींची घृणा वाटते. तुमचा देव यहोवा जो देश तुम्हाला वारसा म्हणून देत आहे, त्यात तुम्ही पाप आणू नका.

५ नुकतंच लग्न झालेल्या माणसाने सैन्यात जाऊ नये किंवा त्याला इतर कोणतीही कामं दिली जाऊ नयेत. त्याला वर्षभर सूट दिली जावी आणि त्याने घरी राहून आपल्या बायकोला खूश करावं.+

६ जातं किंवा त्यावरचा दगड कर्जासाठी तारण म्हणून जप्त करू नका.+ कारण असं केल्यामुळे तुम्ही एखाद्याचं जगण्याचं साधन,* तारण म्हणून घ्याल.

७ जर एखाद्याने आपल्या इस्राएली भावांपैकी कोणाचं अपहरण केलं, त्याला वाईट वागणूक दिली आणि त्याला विकलं,+ तर अपहरण करणाऱ्‍याला ठार मारलं जावं.+ तुम्ही आपल्यामधून अशा वाईट गोष्टी काढून टाका.+

८ कुष्ठरोगाचा* उद्रेक होतो, तेव्हा लेवीय याजक तुम्हाला जे काही सांगतील त्याचं काटेकोरपणे पालन करा.+ मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या अगदी काळजीपूर्वक पाळा. ९ तुम्ही इजिप्तमधून निघालात, तेव्हा यहोवाने मिर्यामसोबत काय केलं ते विसरू नका.+

१० तुम्ही तुमच्या शेजाऱ्‍याला काही कर्ज दिलं असेल,+ तर त्याने तारण म्हणून जे कबूल केलं आहे, ते जबरदस्तीने घेण्यासाठी त्याच्या घरात जाऊ नका. ११ तुम्ही बाहेरच उभे राहा आणि ज्याने कर्ज घेतलं आहे, त्याने तारण म्हणून कबूल केलेली वस्तू तुम्हाला बाहेर आणून द्यावी. १२ जर तो माणूस गरीब असेल, तर त्याने तारण म्हणून दिलेलं वस्त्र तुमच्या ताब्यात रात्रभर ठेवू नका.+ १३ त्याने तारण म्हणून तुम्हाला जे दिलं ते सूर्य मावळताच त्याला परत करा, म्हणजे तो आपलं वस्त्र पांघरून झोपेल+ आणि तुम्हाला आशीर्वाद देईल; आणि तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या नजरेत नीतिमान ठराल.

१४ गरीब आणि गरजू मजुराची फसवणूक करू नका, मग तो तुमचा एखादा भाऊ असो किंवा तुमच्या देशात, तुमच्या शहरांमध्ये* राहणारा विदेशी.+ १५ तो गरीब आहे आणि त्याच्या मजुरीवरच त्याचं जीवन चालतं. म्हणून तुम्ही त्याच दिवशी+ सूर्य मावळायच्या आत त्याची मजुरी त्याला द्या. नाहीतर, तो रडून यहोवाकडे तुमच्याबद्दल तक्रार करेल आणि ते तुमच्यासाठी पाप ठरेल.+

१६ मुलांच्या पापासाठी वडिलांना, किंवा वडिलांच्या पापासाठी मुलांना ठार मारलं जाऊ नये.+ प्रत्येकाला स्वतःच्याच पापासाठी ठार मारलं जावं.+

१७ तुमच्यात राहणाऱ्‍या विदेश्‍यावर किंवा अनाथ मुलावर* अन्याय करू नका.+ तसंच, एखाद्या विधवेने कर्ज घेण्यासाठी तारण म्हणून कबूल केलेलं वस्त्र जप्त करू नका.+ १८ तुम्ही इजिप्तमध्ये गुलाम होता आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला तिथून सोडवलं, हे विसरू नका.+ म्हणूनच मी तुम्हाला आज असं करण्याची आज्ञा देत आहे.

१९ तुम्ही आपल्या शेतातल्या पिकांची कापणी करता, तेव्हा शेतात विसरलेली पेंढी आणायला परत जाऊ नका. तुमच्यात राहणारे विदेशी, अनाथ मुलं आणि विधवा यांच्यासाठी ती राहू द्या;+ म्हणजे तुमचा देव यहोवा तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल.+

२० जेव्हा तुम्ही फळांसाठी आपलं जैतुनाचं झाड हलवाल, तेव्हा पुन्हा त्याच्या फांद्या हलवू नका. उरलेली फळं तुमच्यात राहणाऱ्‍या विदेश्‍यांसाठी, अनाथ मुलांसाठी आणि विधवांसाठी राहू द्या.+

२१ तुम्ही आपल्या द्राक्षमळ्यातली द्राक्षं गोळा कराल, तेव्हा उरलेली द्राक्षं गोळा करायला परत जाऊ नका. ती तुमच्यात राहणाऱ्‍या विदेश्‍यांसाठी, अनाथ मुलांसाठी आणि विधवांसाठी राहू द्या. २२ तुम्ही इजिप्तमध्ये गुलाम होता हे विसरू नका. म्हणूनच मी तुम्हाला आज असं करण्याची आज्ञा देत आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा