वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

अनुवाद रूपरेषा

      • फटक्यांची शिक्षा देण्याबद्दल नियम (१-३)

      • मळणी करणाऱ्‍या बैलाचं तोंड बांधू नका (४)

      • दिराचं वहिनीशी लग्न (५-१०)

      • मारामारी करताना गुप्तांगं पकडणं (११, १२)

      • प्रामाणिक वजनं व मापं (१३-१६)

      • अमालेकी लोकांचा सर्वनाश करण्याची आज्ञा (१७-१९)

अनुवाद २५:१

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१८; १७:८, ९; १९:१६, १७
  • +निर्ग २३:६; २इत १९:६; नीत १७:१५; ३१:९

अनुवाद २५:२

समासातील संदर्भ

  • +नीत १०:१३; २०:३०; २६:३; लूक १२:४८; इब्री २:२

अनुवाद २५:३

समासातील संदर्भ

  • +२कर ११:२४

अनुवाद २५:४

समासातील संदर्भ

  • +नीत १२:१०; १कर ९:९; १ती ५:१८

अनुवाद २५:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:७, ८; रूथ ४:५; मार्क १२:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२३

अनुवाद २५:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:९; रूथ ४:१०, १७
  • +गण २७:१, ४

अनुवाद २५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२१, पृ. ५-६

अनुवाद २५:९

समासातील संदर्भ

  • +रूथ ४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००४, पृ. २६

अनुवाद २५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या घराण्याचं नाव.” शब्दशः “त्याचं नाव.”

अनुवाद २५:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुमचा डोळा.”

अनुवाद २५:१३

समासातील संदर्भ

  • +नीत ११:१; २०:१०; मीख ६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज, २/१५/१९९९, पृ. ३०

अनुवाद २५:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुमच्या घरात एक एफा आणि एक एफा.” अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:३६

अनुवाद २५:१५

समासातील संदर्भ

  • +अनु ४:४०

अनुवाद २५:१६

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:३५

अनुवाद २५:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १७:८; गण २४:२०

अनुवाद २५:१९

समासातील संदर्भ

  • +यहो २२:४
  • +निर्ग १७:१४; १शमु १४:४७, ४८; १५:१-३; १इत ४:४२, ४३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. १६६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

अनु. २५:१अनु १६:१८; १७:८, ९; १९:१६, १७
अनु. २५:१निर्ग २३:६; २इत १९:६; नीत १७:१५; ३१:९
अनु. २५:२नीत १०:१३; २०:३०; २६:३; लूक १२:४८; इब्री २:२
अनु. २५:३२कर ११:२४
अनु. २५:४नीत १२:१०; १कर ९:९; १ती ५:१८
अनु. २५:५उत्प ३८:७, ८; रूथ ४:५; मार्क १२:१९
अनु. २५:६उत्प ३८:९; रूथ ४:१०, १७
अनु. २५:६गण २७:१, ४
अनु. २५:९रूथ ४:७
अनु. २५:१३नीत ११:१; २०:१०; मीख ६:११
अनु. २५:१४लेवी १९:३६
अनु. २५:१५अनु ४:४०
अनु. २५:१६लेवी १९:३५
अनु. २५:१७निर्ग १७:८; गण २४:२०
अनु. २५:१९यहो २२:४
अनु. २५:१९निर्ग १७:१४; १शमु १४:४७, ४८; १५:१-३; १इत ४:४२, ४३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अनुवाद २५:१-१९

अनुवाद

२५ दोन माणसांमध्ये वाद झाला आणि ते न्यायाधीशांपुढे आले,+ तर न्यायाधीश त्यांचा न्याय करतील. ते नीतिमानाला निर्दोष आणि दुष्टाला दोषी ठरवतील.+ २ दुष्ट माणसाला फटक्यांची शिक्षा द्यायची असेल,+ तर न्यायाधीश त्याला पालथं पडायला सांगेल. मग न्यायाधीशासमोर त्या माणसाला फटके मारले जातील. त्याला किती फटके मारायचे, हे त्याने केलेल्या दुष्ट कामाच्या हिशोबाने ठरवावं. ३ त्याला जास्तीत जास्त ४० फटके मारले जावेत.+ त्यांपेक्षा जास्त मारू नयेत. नाहीतर, तुमच्या भावाचा तुमच्या डोळ्यांदेखत अपमान होईल.

४ धान्याची मळणी करणाऱ्‍या बैलाचं तोंड बांधू नका.+

५ भाऊभाऊ एकत्र राहत असतील, आणि त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि त्याला मुलगा नसेल, तर त्याच्या बायकोने आपल्या कुटुंबाबाहेर कोणाशी लग्न करू नये. तिच्या दिराने तिच्याशी लग्न करून, दिराचं कर्तव्य पूर्ण करावं.+ ६ त्याच्यापासून तिला जो पहिला मुलगा होईल, तो त्याच्या मेलेल्या भावाचं नाव पुढे चालवेल.+ अशा रितीने त्या मेलेल्या भावाचं नाव इस्राएलमधून पुसलं जाणार नाही.+

७ पण जर त्याला आपल्या वहिनीशी लग्न करायचं नसेल, तर तिने शहराच्या फाटकाजवळ वडीलजनांकडे जावं आणि म्हणावं, ‘माझा दीर आपल्या भावाचं नाव इस्राएलमध्ये पुढे चालवायला तयार नाही. त्याने माझ्याशी लग्न करून दिराचं कर्तव्य पूर्ण करायला नकार दिलाय.’ ८ मग त्याच्या शहराच्या वडीलजनांनी त्याला बोलावून समजवावं. पण तरी तो असं ठामपणे म्हणाला, की ‘मला तिच्याशी लग्न करायचं नाही,’ ९ तर त्याच्या वहिनीने वडीलजनांसमोर त्याच्याजवळ जाऊन त्याच्या पायातला जोडा काढावा+ आणि त्याच्या तोंडावर थुंकून असं म्हणावं, ‘जो आपल्या भावाचा वंश चालवणार नाही त्याच्यासोबत असंच करावं.’ १० तेव्हापासून इस्राएलमध्ये त्याच्या कुटुंबाचं नाव,* ‘पायातला जोडा काढलेल्याचं कुटुंब,’ असं पडेल.

११ दोन माणसं एकमेकांशी मारामारी करत असताना, त्यांच्यापैकी एकाची बायको आपल्या नवऱ्‍याला मारणाऱ्‍यापासून वाचवण्यासाठी मध्ये पडली आणि तिने आपल्या हाताने त्या माणसाची गुप्तांगं पकडली, १२ तर तिचा हात कापून टाका. तुम्ही* तिला दयामाया दाखवू नका.

१३ तुमच्या थैलीत एकाच मापासाठी, एक मोठं आणि एक लहान अशी दोन वेगवेगळी वजनं ठेवू नका.+ १४ तसंच, तुम्ही आपल्या घरात एकाच मापासाठी एक मोठं आणि एक लहान अशी दोन वेगवेगळी भांडी* ठेवू नका.+ १५ तुम्ही अचूक आणि प्रामाणिक वजनं व मापं वापरा, म्हणजे तुमचा देव यहोवा जो देश तुम्हाला देणार आहे, त्यात तुम्हाला भरपूर आयुष्य लाभेल.+ १६ कारण बेइमानीची कामं करणाऱ्‍या माणसाची, तुमचा देव यहोवा याला घृणा वाटते.+

१७ तुम्ही इजिप्तमधून बाहेर निघालात, तेव्हा अमालेकी लोक तुमच्याशी कसे वागले हे विसरू नका.+ १८ त्यांनी तुम्हाला मार्गात गाठलं आणि तुमच्यापैकी जे थकूनभागून मागे राहिले होते, त्या सर्वांवर त्यांनी हल्ला केला. त्यांनी देवाचं भय मानलं नाही. १९ म्हणून, तुमचा देव यहोवा जेव्हा आसपासच्या राष्ट्रांतल्या तुमच्या सर्व शत्रूंपासून तुम्हाला विश्रांती देईल आणि जेव्हा तुमचा देव यहोवा याने तुम्हाला वारसा म्हणून दिलेल्या देशाचा तुम्ही ताबा घ्याल,+ तेव्हा तुम्ही आकाशाखालून अमालेकी लोकांचं नामोनिशाण मिटवून टाका.+ विसरू नका.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा