होशेय
२ तुमच्या भावांना, ‘माझे लोक!’*+
आणि तुमच्या बहिणींना, ‘देवाने दया दाखवलेली स्त्री!’* असं म्हणा.+
२ आपल्या आईला दोष द्या; तिला दोष द्या,
कारण ती माझी बायको नाही+ आणि मी तिचा नवरा नाही.
तिने वेश्येसारखं वागायचं* थांबवलं पाहिजे
आणि आपल्या स्तनांच्या मधून व्यभिचार दूर केला पाहिजे,
३ नाहीतर ती तिच्या जन्माच्या दिवशी होती, तशी मी तिला नग्न करीन,
मी तिची अवस्था ओसाड रानासारखी,
आणि निर्जल भूमीसारखी करीन,
म्हणजे ती तहानेने तडफडून मरेल.
४ मी तिच्या मुलांना दयामाया दाखवणार नाही,
कारण ती वेश्येची* मुलं आहेत.
५ त्यांच्या आईने वेश्येसारखी कामं* केली आहेत.+
त्यांना आपल्या गर्भात वाढवणारी त्यांची आई निर्लज्जपणे वागली आहे,+ कारण ती म्हणाली,
‘मी माझ्या प्रियकरांमागे जाईन;+
जे मला अन्नपाणी पुरवतात,
जे मला लोकर, मलमल, तेल आणि द्राक्षारस पुरवतात, त्यांच्यामागे मी जाईन.’
६ म्हणून मी काट्यांचं कुंपण घालून तिला अडवीन;
मी तिच्यासमोर दगडांची भिंत रचीन
म्हणजे तिला मार्ग सापडणार नाही.
७ ती आपल्या प्रियकरांच्या मागे धावेल, पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही;+
ती त्यांना शोधेल, पण तिला ते सापडणार नाहीत.
मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईन,+
कारण माझी आधीची स्थिती आतापेक्षा चांगली होती.’+
८ तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल देणारा मीच होतो, हे तिने ओळखलं नाही,+
मीच तिला भरपूर चांदी दिली,
आणि सोनंही दिलं. पण, तिने ते बआलच्या उपासनेसाठी वापरलं.+
९ ‘म्हणून मी कापणीच्या वेळी परत येऊन माझं धान्य घेईन,
मी द्राक्षांच्या हंगामात माझा नवीन द्राक्षारस परत घेईन,+
आणि तिचं उघडं अंग झाकण्यासाठी असलेली लोकरीची आणि मलमलीची वस्त्रं मी हिसकावून घेईन.
११ मी तिचे सगळे आनंदाचे सोहळे बंद करीन,
तिचे उत्सव,+ नवचंद्राचे दिवस,* शब्बाथ आणि नेमलेले सण मी बंद करीन.
१२ तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडं मी उद्ध्वस्त करीन; त्यांविषयी ती म्हणाली होती:
‘माझ्या प्रियकरांनी मला दिलेली ही कमाई आहे’;
पण, मी त्यांचं जंगल करून टाकीन,
आणि जंगली जनावरं ती खाऊन टाकतील.
१३ मी त्या सर्व दिवसांचा तिच्याकडून हिशोब मागीन, जेव्हा ती बआलच्या मूर्तींना बलिदानं अर्पण करायची,+
आणि नथ आणि दागदागिने घालून आपल्या प्रियकरांमागे जायची;
पण मला मात्र ती विसरून गेली,’+ असं यहोवा म्हणतो.
१५ मग, तिचे द्राक्षमळे मी तिला परत देईन,+
आणि अखोरचं खोरं*+ तिच्यासाठी आशेचं द्वार ठरेल;
इजिप्त* देशातून ती बाहेर आली होती, त्या दिवसाप्रमाणे,+
तिच्या तारुण्याच्या दिवसांप्रमाणे, ती तिथे माझं ऐकेल.’
१६ यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी
तू मला, “माझा मालक”* नाही, तर “माझा नवरा” म्हणून हाक मारशील.’
१७ ‘मी तिच्या तोंडून बआलच्या मूर्तींची नावं काढून टाकीन,+
त्यांच्या नावांची पुन्हा कधी आठवण केली जाणार नाही.+
१८ त्या दिवशी मी माझ्या लोकांसाठी रानातल्या पशूंशी,
आकाशातल्या पक्ष्यांशी आणि जमिनीवर रांगणाऱ्या जिवांशी करार करीन;+
मी देशातून धनुष्य, तलवार आणि युद्ध नाहीसं करीन,+
आणि ते तिथे निर्भयपणे राहतील.+
१९ मी लग्नाचं वचन देऊन तुला आपली वधू म्हणून कायमचं स्वीकारीन,
आणि तुझ्याशी नीतीने, न्यायाने,
एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने+ वागण्याचं मी तुला वचन देईन.
२० मी तुला विश्वासू राहण्याचं वचन देईन,
आणि मी जो यहोवा, त्याला तू नक्कीच ओळखशील.’+
२१ यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी मी ऐकेन,
मी आकाशाचं ऐकेन
आणि आकाश पृथ्वीचं ऐकेल;+
२२ पृथ्वीही धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांचं ऐकेल;