होशेय
१ यहूदाचे राजे+ उज्जीया,+ योथाम,+ आहाज+ आणि हिज्कीया,+ तसंच इस्राएलचा राजा, म्हणजे योवाशचा+ मुलगा यराबाम यांच्या शासनकाळात,+ बैरीचा मुलगा होशेय* याला यहोवाकडून* संदेश मिळाला. २ यहोवाने होशेयद्वारे आपला संदेश सांगायला सुरुवात केली, तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: “जा, आणि अशा एका स्त्रीशी लग्न कर जी वेश्येसारखी वागेल* आणि तिच्या व्यभिचारामुळे* तुला मुलं होतील. कारण या देशानेही अशाच प्रकारे वेश्येसारखं वागून* यहोवाला पूर्णपणे सोडून दिलंय.”+
३ तेव्हा त्याने जाऊन दिब्लाइमची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केलं. ती गर्भवती झाली आणि तिने त्याच्या मुलाला जन्म दिला.
४ मग यहोवा होशेयला म्हणाला: “त्याचं नाव इज्रेल* ठेव. कारण थोड्याच काळाने मी इज्रेलच्या रक्तपाती कृत्यांसाठी येहूच्या घराण्याकडून हिशोब मागीन.+ आणि इस्राएलच्या घराण्याच्या राज्याचा मी अंत करीन.+ ५ त्या दिवशी, मी इज्रेलच्या खोऱ्यात* इस्राएलचा धनुष्य मोडून टाकीन.”
६ ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. तेव्हा देवाने त्याला सांगितलं: “तिचं नाव लो-रुहामा* ठेव, कारण मी इस्राएलच्या घराण्याला यापुढे दया दाखवणार नाही.+ मी त्यांना नक्कीच हाकलून लावीन.+ ७ पण मी यहूदाच्या घराण्याला दया दाखवीन.+ मी धनुष्य, तलवार, युद्ध, घोडे किंवा घोडेस्वार यांच्याद्वारे त्यांना वाचवणार नाही.+ तर मी यहोवा, त्यांचा देव, मी त्यांना वाचवीन.”+
८ लो-रुहामा हिचं दूध तुटल्यावर, गोमर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. ९ तेव्हा देव म्हणाला: “त्याचं नाव लो-अम्मी* ठेव, कारण तुम्ही माझे लोक नाही आणि मीही तुमचा देव नाही.
१० आणि इस्राएलच्या लोकांची* संख्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी होईल; तिचं मोजमाप करता येणार नाही.+ आणि ‘तुम्ही माझे लोक नाही,’+ असं जिथे त्यांना म्हणण्यात आलं होतं, तिथे ‘तुम्ही जिवंत देवाची मुलं आहात,’ असं त्यांना म्हणण्यात येईल.+ ११ आणि यहूदाच्या व इस्राएलच्या लोकांना जमवून एकतेत आणलं जाईल.+ ते स्वतःसाठी एक पुढारी नेमतील आणि देशातून बाहेर निघतील, कारण इज्रेलचा दिवस महान असेल.+