होशेय
३ मग यहोवा मला म्हणाला: “इस्राएलचे लोक दुसऱ्या देवांच्या मागे जातात+ आणि आवडीने मनुकांच्या ढेपा* अर्पण करतात, तरीसुद्धा यहोवा त्यांच्यावर प्रेम करतो;+ तसाच आता तूही, जिच्यावर दुसरा माणूस प्रेम करतो आणि जी व्यभिचार करत आहे,+ अशा स्त्रीवर पुन्हा प्रेम कर.”
२ म्हणून मी चांदीचे १५ तुकडे आणि दीड होमर माप* जव देऊन तिला विकत घेतलं. ३ मग मी तिला म्हणालो: “तू बऱ्याच दिवसांपर्यंत माझी म्हणून राहशील. तू वेश्येसारखी कामं करू नकोस* आणि दुसऱ्या माणसाशी संबंध ठेवू नकोस आणि मीही तुझ्याशी तसाच वागीन.”*
४ कारण इस्राएलचे लोकही बऱ्याच काळापर्यंत* राजाशिवाय,+ राजकुमाराशिवाय, अर्पणाशिवाय, पूजेच्या खांबाशिवाय, तसंच एफोद+ व कुलदैवतांच्या मूर्ती* यांशिवाय राहतील.+ ५ नंतर इस्राएलचे लोक परत येऊन आपला देव यहोवा याचा,+ आणि आपला राजा दावीद याचा शोध घेतील+ आणि येणाऱ्या काळात, ते यहोवाचा चांगुलपणा अनुभवण्यासाठी थरथर कापत त्याच्याकडे येतील.+