वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • दोन गरुड आणि एक द्राक्षवेल यांचं कोडं (१-२१)

      • एक कोवळी डहाळी मोठं देवदाराचं झाड बनेल (२२-२४)

यहेज्केल १७:२

समासातील संदर्भ

  • +होशे १२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५

यहेज्केल १७:३

समासातील संदर्भ

  • +अनु २८:४९, ५०; यिर्म ४:१३; विल ४:१९
  • +यिर्म २२:२३
  • +२रा २४:१२; २इत ३६:९, १०; यिर्म २४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १७:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “कनान देश.”

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५-८६

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००७, पृ. १२-१३

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १७:५

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१७; यिर्म ३७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५-८६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १७:६

समासातील संदर्भ

  • +यहे १७:१३, १४
  • +२इत ३६:११

यहेज्केल १७:७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३७:५, ७
  • +यहे १७:१५
  • +२रा २४:२०; २इत ३६:११, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५-८६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १७:८

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३७:१

यहेज्केल १७:९

समासातील संदर्भ

  • +२रा २५:७; यिर्म २१:७

यहेज्केल १७:१२

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१२, १४; यश ३९:७; यिर्म २२:२४, २५; ५२:३१, ३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५-८६

यहेज्केल १७:१३

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१७; यिर्म ३७:१
  • +२इत ३६:११, १३
  • +२रा २४:१५; यिर्म २४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५-८६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १७:१४

समासातील संदर्भ

  • +यिर्म २७:१२; ३८:१७

यहेज्केल १७:१५

समासातील संदर्भ

  • +२रा २४:२०; २इत ३६:११, १३
  • +यिर्म ३७:५
  • +अनु १७:१६
  • +यिर्म ३२:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५

यहेज्केल १७:१६

तळटीपा

  • *

    म्हणजे, नबुखद्‌नेस्सर.

  • *

    म्हणजे, सिद्‌कीया.

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३४:२, ३; ५२:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८५

यहेज्केल १७:१७

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३७:७, ८; विल ४:१७; यहे २९:६

यहेज्केल १७:१९

समासातील संदर्भ

  • +अनु ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १७:२०

समासातील संदर्भ

  • +यहे १२:१३
  • +यहे २०:३६

यहेज्केल १७:२१

समासातील संदर्भ

  • +यहे १२:१४
  • +यहे ६:१३

यहेज्केल १७:२२

समासातील संदर्भ

  • +यश ११:१; यिर्म २३:५
  • +यश ५३:२
  • +स्तो २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८६-८७

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००७, पृ. १२-१३

    ११/१/१९८८, पृ. १८

यहेज्केल १७:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ८६-८७

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००७, पृ. १२-१३

    ११/१/१९८८, पृ. १८

यहेज्केल १७:२४

समासातील संदर्भ

  • +यश ९:६; यहे २१:२६, २७; दान ४:१७; आम ९:११
  • +१शमु २:७, ८; लूक १:५२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. १७:२होशे १२:१०
यहे. १७:३अनु २८:४९, ५०; यिर्म ४:१३; विल ४:१९
यहे. १७:३यिर्म २२:२३
यहे. १७:३२रा २४:१२; २इत ३६:९, १०; यिर्म २४:१
यहे. १७:४२रा २४:१५
यहे. १७:५२रा २४:१७; यिर्म ३७:१
यहे. १७:६यहे १७:१३, १४
यहे. १७:६२इत ३६:११
यहे. १७:७यिर्म ३७:५, ७
यहे. १७:७यहे १७:१५
यहे. १७:७२रा २४:२०; २इत ३६:११, १३
यहे. १७:८यिर्म ३७:१
यहे. १७:९२रा २५:७; यिर्म २१:७
यहे. १७:१२२रा २४:१२, १४; यश ३९:७; यिर्म २२:२४, २५; ५२:३१, ३२
यहे. १७:१३२रा २४:१७; यिर्म ३७:१
यहे. १७:१३२इत ३६:११, १३
यहे. १७:१३२रा २४:१५; यिर्म २४:१
यहे. १७:१४यिर्म २७:१२; ३८:१७
यहे. १७:१५२रा २४:२०; २इत ३६:११, १३
यहे. १७:१५यिर्म ३७:५
यहे. १७:१५अनु १७:१६
यहे. १७:१५यिर्म ३२:३, ४
यहे. १७:१६यिर्म ३४:२, ३; ५२:११
यहे. १७:१७यिर्म ३७:७, ८; विल ४:१७; यहे २९:६
यहे. १७:१९अनु ५:११
यहे. १७:२०यहे १२:१३
यहे. १७:२०यहे २०:३६
यहे. १७:२१यहे १२:१४
यहे. १७:२१यहे ६:१३
यहे. १७:२२यश ११:१; यिर्म २३:५
यहे. १७:२२यश ५३:२
यहे. १७:२२स्तो २:६
यहे. १७:२४यश ९:६; यहे २१:२६, २७; दान ४:१७; आम ९:११
यहे. १७:२४१शमु २:७, ८; लूक १:५२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल १७:१-२४

यहेज्केल

१७ यहोवाकडून मला परत एकदा असा संदेश मिळाला: २ “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या घराण्याला एक कोडं घाल आणि त्यांना एक दाखला सांग.+ ३ तू त्यांना म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मोठे पंख असलेला, लांब पिसारे आणि भरपूर रंगीबेरंगी पिसं असलेला एक भला मोठा गरुड+ लबानोनला+ आला. त्याने येऊन एका देवदाराच्या झाडाचा शेंडा घेतला.+ ४ त्या झाडाची सर्वात वरची कोवळी डहाळी त्याने तोडली, आणि ती व्यापाऱ्‍यांच्या देशात* नेऊन त्याने ती व्यापाऱ्‍यांच्या शहरात लावली.+ ५ मग त्याने देशातलं काही बी घेतलं+ आणि ते एका सुपीक शेतात पेरलं. त्याने ते वाळुंजाच्या झाडासारखं भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी लावलं. ६ पुढे ते बी अंकुरलं आणि त्यातून एक द्राक्षवेल उगवली. ती वेल कमी उंचीची असून जमिनीवर सगळीकडे पसरली होती.+ तिची पानं आतल्या बाजूला वळली होती आणि तिची मुळं तिच्याखाली वाढत गेली. अशा प्रकारे, त्या बीपासून एक द्राक्षवेल उगवली आणि तिला कोवळ्या डहाळ्या आणि फांद्या फुटल्या.+

७ त्यानंतर, मोठे पंख आणि लांब पिसारे असलेला+ दुसरा एक गरुड तिथे आला.+ तेव्हा, त्याच्याकडून पाणी मिळावं म्हणून त्या वेलीने मोठ्या आनंदाने त्याच्याकडे आपली मुळं पसरवली; तिला ज्या ठिकाणी लावण्यात आलं होतं, त्यापासून दूर तिने त्या गरुडाच्या दिशेने आपली मुळं पसरवली. तिने आपली पानं आणि फांद्याही त्याच्या दिशेने पसरवल्या.+ ८ खरंतर, तिला फांद्या फुटाव्यात, फळं यावीत आणि ती एक मोठी वेल व्हावी, म्हणून तिला आधीच भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी, एका सुपीक शेतात लावण्यात आलं होतं.”’+

९ तू लोकांना असं सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “ती खरंच बहरेल का? तिचे अंकुर सुकून जावेत आणि तिची फळं सडून जावीत, म्हणून कोणी तिला मुळासकट उपटून टाकणार नाही का?+ खरंतर ती इतकी वाळून जाईल, की तिला मुळासकट उपटून काढायला मजबूत हाताची किंवा खूप लोकांची गरज पडणार नाही. १० तिला जरी एका जागेवरून काढून दुसऱ्‍या जागी लावण्यात आलेलं असलं, तरी ती खरंच बहरेल का? पूर्वेकडचा वारा वाहू लागला, की ती पूर्णपणे जळून जाणार नाही का? ज्या ठिकाणी ती बहरली होती, तिथेच ती सुकून जाईल.”’”

११ मग पुन्हा एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १२ “जरा त्या बंडखोर घराण्याला जाऊन विचार, ‘या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ होतो हे तुम्हाला समजत नाही का?’ तू त्यांना म्हण, ‘बघा! बाबेलचा राजा यरुशलेमला आला आणि तिथल्या राजाला आणि अधिकाऱ्‍यांना बाबेलला घेऊन गेला.+ १३ पुढे त्याने राजाच्या वंशातल्या एकाला+ घेऊन त्याच्याशी करार केला आणि त्याला शपथ घ्यायला लावली.+ नंतर तो देशातल्या प्रतिष्ठित माणसांना आपल्यासोबत घेऊन गेला.+ १४ देशाने खाली पडावं, पुन्हा कधीच आपलं डोकं वर काढू नये आणि फक्‍त त्याचा करार पाळूनच देशातल्या लोकांचं अस्तित्व टिकून राहावं म्हणून त्याने असं केलं.+ १५ पण यहूदाच्या राजाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केलं.+ त्याने इजिप्तकडून मोठं सैन्य+ आणि घोडे मागवण्यासाठी आपले दूत तिथे पाठवले.+ पण, तो खरंच यशस्वी होईल का? अशा गोष्टी करणाऱ्‍याला शिक्षा होणार नाही का? करार मोडूनही तो वाचेल का?’+

१६ ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, “मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, तो बाबेलमध्येच मरेल; ज्याने* त्याला* राजा बनवलं, ज्याची शपथ त्याने तुच्छ लेखली आणि ज्याचा करार त्याने मोडला, तो राजा जिथे राहतो तिथेच तो मरेल.+ १७ बाबेलचे सैनिक जेव्हा शहरातल्या अनेकांना मारून टाकायला शहराभोवती दगड-मातीचा ढिगारा रचतील आणि भिंत उभारून शहराला वेढा घालतील, तेव्हा फारोची मोठी सेना आणि त्याच्या सैनिकांच्या असंख्य तुकड्या कुठल्याच कामी येणार नाहीत.+ १८ त्याने शपथ तुच्छ लेखून करार मोडला. वचन देऊनही त्याने या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून तो वाचणार नाही.”’

१९ ‘म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “त्याने माझी शपथ तुच्छ लेखली आणि माझा करार मोडला, म्हणून मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, की याचे परिणाम मी त्याच्याच माथ्यावर मारीन.+ २० मी त्याच्यावर माझं जाळं टाकीन आणि तो त्यात अडकेल.+ मी त्याला बाबेलला घेऊन जाईन आणि माझ्याशी अविश्‍वासूपणे वागल्याबद्दल मी तिथे त्याचा न्याय करीन.+ २१ त्याच्या सैन्यातली पळून गेलेली सर्व माणसं तलवारीने मारली जातील, आणि उरलेल्यांची सगळीकडे पांगापांग होईल.+ तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा स्वतः हे बोललोय.”’+

२२ ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “मी मोठ्या देवदार झाडाच्या शेंड्यावरून एक डहाळी घेईन+ आणि ती लावीन; मी त्याच्या अगदी वरच्या छोट्या फांद्यांतून एक कोवळी डहाळी घेईन+ आणि एका मोठ्या, उंच पर्वतावर स्वतः ती लावीन.+ २३ मी इस्राएलच्या एका उंच पर्वतावर ती लावीन; तिला फांद्या फुटतील, फळं येतील आणि ती एक मोठं देवदाराचं झाड बनेल. तिच्याखाली सगळ्या प्रकारचे पक्षी राहतील आणि तिच्या फांद्यांच्या सावलीत ते विसावा घेतील. २४ मग सगळ्या झाडांना कळून येईल, की मी स्वतः यहोवानेच मोठ्या झाडाला खाली पाडलं आणि छोट्या झाडाला उंच केलं.+ मीच हिरव्यागार झाडाला सुकवून टाकलं आणि सुकलेल्या झाडाला बहर आणला.+ मी यहोवा स्वतः हे बोललोय आणि मी स्वतः ते पूर्णही केलंय.”’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा