वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • प्रत्येक जण स्वतःच्या पापासाठी स्वतःच जबाबदार (१-३२)

        • जो कोणी पाप करतो, तोच मरेल (४)

        • वडिलांच्या अपराधांचा दोष मुलावर नाही (१९, २०)

        • दुष्ट माणसाच्या मृत्यूने देवाला आनंद होत नाही (२३)

        • पश्‍चात्ताप केल्यामुळे जीवन (२७, २८)

यहेज्केल १८:२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:२९, ३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. ५३

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १८

यहेज्केल १८:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “जीव.” शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९७, पृ. १९

    ११/१/१९८८, पृ. १८

यहेज्केल १८:६

तळटीपा

  • *

    इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

समासातील संदर्भ

  • +अनु १२:२; यिर्म ३:६
  • +लेवी २०:१०
  • +लेवी १८:१९; २०:१८

यहेज्केल १८:७

समासातील संदर्भ

  • +नीत १४:२१
  • +अनु २४:१२, १३
  • +लेवी ६:२, ४
  • +अनु १५:११
  • +यश ५८:६, ७; याक २:१५, १६

यहेज्केल १८:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२५; स्तो १५:५; लूक ६:३४, ३५
  • +लेवी १९:३५
  • +लेवी १९:१५; २५:१४; अनु १:१६

यहेज्केल १८:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:५

यहेज्केल १८:१०

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१३
  • +उत्प ९:६; निर्ग २१:१२

यहेज्केल १८:१२

समासातील संदर्भ

  • +अनु १५:७, ८
  • +लेवी २६:३०
  • +२रा २१:११

यहेज्केल १८:१३

समासातील संदर्भ

  • +यहे २२:१२

यहेज्केल १८:१९

समासातील संदर्भ

  • +अनु १६:२०; रोम १०:५

यहेज्केल १८:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “जीव.” शब्दार्थसूचीत “जीव” पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु २४:१६; यिर्म ३१:३०; यहे १८:४
  • +यश ३:१०, ११; गल ६:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. २८-२९

    १०/१/१९९७, पृ. १९

    २/१/१९८९, पृ. ६

यहेज्केल १८:२१

समासातील संदर्भ

  • +यश ५५:७; यहे ३:२१; ३३:१२, १९; प्रेका ३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    ७/२०१७, पृ. १

यहेज्केल १८:२२

तळटीपा

  • *

    शब्दशः “अपराधाची आठवण ठेवली जाणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +२इत ३३:१२, १३; स्तो २५:७; यश ४३:२५
  • +यहे ३३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    ७/२०१७, पृ. १

यहेज्केल १८:२३

समासातील संदर्भ

  • +विल ३:३३; यहे ३३:११; १ती २:३, ४; २पेत्र ३:९
  • +मीख ७:१८

यहेज्केल १८:२४

तळटीपा

  • *

    किंवा “अन्याय.”

समासातील संदर्भ

  • +यहे ३३:१२, १८; इब्री १०:३८; २यो ८
  • +नीत २१:१६; यहे ३:२०

यहेज्केल १८:२५

समासातील संदर्भ

  • +ईयो ३५:२; नीत १९:३; यहे ३३:१७, २०
  • +अनु ३२:४
  • +यश ५५:९; यिर्म २:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१०, पृ. ३-४

यहेज्केल १८:२७

समासातील संदर्भ

  • +यश ५५:७; १ती ४:१६

यहेज्केल १८:२९

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:२५; स्तो १४५:१७; यश ४०:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. ११

यहेज्केल १८:३०

समासातील संदर्भ

  • +ईयो ३४:११; रोम २:६

यहेज्केल १८:३१

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१४; यश १:१६
  • +स्तो ५१:१०; यिर्म ३२:३९; यहे ११:१९; इफि ४:२३, २४
  • +अनु ३०:१५; नीत ८:३६; प्रेका १३:४६

यहेज्केल १८:३२

समासातील संदर्भ

  • +यिर्म २९:११; विल ३:३३; यहे ३३:११; लूक १५:१०; २पेत्र ३:९
  • +अनु ३०:१६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. १८:२यिर्म ३१:२९, ३०
यहे. १८:६अनु १२:२; यिर्म ३:६
यहे. १८:६लेवी २०:१०
यहे. १८:६लेवी १८:१९; २०:१८
यहे. १८:७नीत १४:२१
यहे. १८:७अनु २४:१२, १३
यहे. १८:७लेवी ६:२, ४
यहे. १८:७अनु १५:११
यहे. १८:७यश ५८:६, ७; याक २:१५, १६
यहे. १८:८निर्ग २२:२५; स्तो १५:५; लूक ६:३४, ३५
यहे. १८:८लेवी १९:३५
यहे. १८:८लेवी १९:१५; २५:१४; अनु १:१६
यहे. १८:९लेवी १८:५
यहे. १८:१०लेवी १९:१३
यहे. १८:१०उत्प ९:६; निर्ग २१:१२
यहे. १८:१२अनु १५:७, ८
यहे. १८:१२लेवी २६:३०
यहे. १८:१२२रा २१:११
यहे. १८:१३यहे २२:१२
यहे. १८:१९अनु १६:२०; रोम १०:५
यहे. १८:२०अनु २४:१६; यिर्म ३१:३०; यहे १८:४
यहे. १८:२०यश ३:१०, ११; गल ६:७
यहे. १८:२१यश ५५:७; यहे ३:२१; ३३:१२, १९; प्रेका ३:१९
यहे. १८:२२२इत ३३:१२, १३; स्तो २५:७; यश ४३:२५
यहे. १८:२२यहे ३३:१६
यहे. १८:२३विल ३:३३; यहे ३३:११; १ती २:३, ४; २पेत्र ३:९
यहे. १८:२३मीख ७:१८
यहे. १८:२४यहे ३३:१२, १८; इब्री १०:३८; २यो ८
यहे. १८:२४नीत २१:१६; यहे ३:२०
यहे. १८:२५ईयो ३५:२; नीत १९:३; यहे ३३:१७, २०
यहे. १८:२५अनु ३२:४
यहे. १८:२५यश ५५:९; यिर्म २:१७
यहे. १८:२७यश ५५:७; १ती ४:१६
यहे. १८:२९उत्प १८:२५; स्तो १४५:१७; यश ४०:१४
यहे. १८:३०ईयो ३४:११; रोम २:६
यहे. १८:३१स्तो ३४:१४; यश १:१६
यहे. १८:३१स्तो ५१:१०; यिर्म ३२:३९; यहे ११:१९; इफि ४:२३, २४
यहे. १८:३१अनु ३०:१५; नीत ८:३६; प्रेका १३:४६
यहे. १८:३२यिर्म २९:११; विल ३:३३; यहे ३३:११; लूक १५:१०; २पेत्र ३:९
यहे. १८:३२अनु ३०:१६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल १८:१-३२

यहेज्केल

१८ मग यहोवाकडून परत मला संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “इस्राएलमध्ये ती कुठली म्हण वापरली जाते? हीच ना, की ‘आंबट द्राक्षं वडिलांनी खाल्ली, पण दात मात्र मुलांचे आंबले’?+

३ ‘पण, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, यापुढे इस्राएलमध्ये ही म्हण वापरली जाणार नाही,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ४ ‘पाहा! सगळ्यांच्या जिवावर माझा हक्क आहे. जसा वडिलांच्या जिवावर, तसाच मुलाच्या जिवावरही माझा हक्क आहे. जो कोणी* पाप करतो, तोच मरेल.

५ समजा एक नीतिमान माणूस आहे. तो नेहमी न्यायाने वागतो आणि योग्य ते करतो. ६ तो डोंगरांवर मूर्तींपुढे अर्पण केलेली बलिदानं खात नाही.+ इस्राएलच्या घराण्याच्या घृणास्पद मूर्तींकडे* आशेने पाहत नाही. शेजाऱ्‍याच्या बायकोसोबत व्यभिचार करत नाही,+ किंवा मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीसोबत शरीरसंबंध ठेवत नाही.+ ७ तो कोणालाही वाईट वागणूक देत नाही.+ उलट, कर्जदाराने त्याच्याकडे जे काही गहाण ठेवलं होतं ते तो परत करतो.+ तो कोणालाही लुबाडत नाही.+ उलट, तो भुकेल्या माणसाला आपल्या घासातला घास देतो+ आणि ज्याच्या अंगावर कपडे नाहीत त्याचं अंग झाकतो.+ ८ तो व्याज घेत नाही किंवा कोणाचाही गैरफायदा घेऊन नफा कमवत नाही;+ तो अन्यायाने वागत नाही.+ दोन व्यक्‍तींमध्ये तो योग्य न्याय करतो.+ ९ मला विश्‍वासू राहण्यासाठी तो माझ्या कायद्यांप्रमाणे चालतो आणि माझे न्याय-निर्णय* पाळतो. असा हा नीतिमान माणूस नक्की जिवंत राहील,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.

१० ‘पण समजा, त्याला असा एक मुलगा आहे, जो चोऱ्‍यामाऱ्‍या करतो,+ खून करतो+ किंवा यांपैकी कुठलीही गोष्ट करतो. ११ म्हणजे, (त्याच्या वडिलांनी जरी यांपैकी कुठल्याही गोष्टी केल्या नसल्या, तरी) तो डोंगरांवर मूर्तींपुढे अर्पण केलेली बलिदानं खातो, शेजाऱ्‍याच्या बायकोसोबत व्यभिचार करतो, १२ गोरगरिबांना आणि गरजूंना वाईट वागणूक देतो,+ लोकांना लुटतो, एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू परत करत नाही, घृणास्पद मूर्तींकडे आशेने पाहतो,+ किळसवाणी कामं करतो,+ १३ व्याज घेतो आणि एखाद्याचा गैरफायदा घेऊन नफा कमवतो.+ अशी सगळी घृणास्पद कामं केल्यामुळे तो मुलगा जिवंत राहणार नाही; त्याला नक्कीच ठार मारलं जाईल. आणि त्याच्या मृत्यूसाठी तोच जबाबदार असेल.

१४ पण समजा असा एक मुलगा आहे, ज्याने आपल्या वडिलांनी केलेली सगळी पापं पाहिली आहेत. पण तो स्वतः तशी कामं करत नाही. १५ तो डोंगरांवर मूर्तींपुढे अर्पण केलेली बलिदानं खात नाही, इस्राएलच्या घराण्याच्या घृणास्पद मूर्तींकडे आशेने पाहत नाही, शेजाऱ्‍याच्या बायकोसोबत व्यभिचार करत नाही. १६ तो कोणालाही वाईट वागणूक देत नाही, कर्जदाराने गहाण ठेवलेली वस्तू बळकावत नाही किंवा कोणालाही लुबाडत नाही. उलट, तो भुकेल्या माणसाला आपल्या घासातला घास देतो आणि ज्याच्या अंगावर कपडे नाहीत त्याचं अंग झाकतो. १७ तो गोरगरिबांवर जुलूम करत नाही, व्याज घेत नाही आणि कोणाचाही गैरफायदा घेऊन नफा कमवत नाही. उलट, तो माझ्या कायद्यांप्रमाणे चालतो आणि माझे न्याय-निर्णय पाळतो. असा मुलगा नक्की जिवंत राहील; वडिलांनी केलेल्या अपराधांमुळे तो मरणार नाही. १८ त्याच्या वडिलांनी मात्र लोकांची फसवणूक केली, आपल्या भावाला लुटलं आणि आपल्या लोकांमध्ये वाईट कामं केली. म्हणून त्याचे वडील नक्की मरतील; ते स्वतःच्या अपराधांमुळे मरतील.

१९ पण तुम्ही म्हणाल: “वडिलांच्या अपराधांचा दोष मुलावर का येणार नाही?” कारण, मुलगा नेहमी न्यायाने वागला आणि योग्य ते करत राहिला. त्याने माझे कायदे पाळले आणि त्यांप्रमाणे तो चालला. म्हणून तो नक्की जिवंत राहील.+ २० जो कोणी* पाप करतो, तोच मरेल.+ वडिलांच्या अपराधाचा दोष मुलावर येणार नाही, आणि मुलाच्या अपराधाचा दोष त्याच्या वडिलांवर येणार नाही. जो नीतीने वागतो त्यालाच त्याच्या नीतिमत्त्वाचं फळ मिळेल. आणि जो दुष्टपणे वागतो त्यालाच त्याच्या दुष्टपणाचं फळ मिळेल.+

२१ पण जर एखाद्या दुष्ट माणसाने आपली सगळी पापं सोडून दिली आणि तो माझ्या कायद्यांप्रमाणे चालला, नीतीने आणि न्यायाने वागला, तर तो मरणार नाही; तो नक्की जिवंत राहील.+ २२ त्याने केलेल्या कोणत्याही अपराधांचा हिशोब ठेवला जाणार नाही.*+ नीतीने वागत असल्यामुळे तो जिवंत राहील.’+

२३ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘एखादा दुष्ट माणूस मरतो, तेव्हा मला आनंद होतो का?+ त्याने आपला दुष्टपणा सोडून द्यावा आणि जिवंत राहावं, असंच मला वाटत नाही का?’+

२४ पण जर एखादा नीतिमान माणूस नीतीने वागायचं सोडून वाईट कामं* करायला लागला, दुष्ट माणसासारखी घृणास्पद कामं करायला लागला, तर तो जिवंत राहील का? त्याने केलेली कोणतीही नीतीची कामं आठवली जाणार नाहीत.+ त्याच्या अविश्‍वासूपणामुळे आणि त्याने केलेल्या पापामुळे तो मरेल.+

२५ पण तुम्ही म्हणाल: “यहोवा अन्यायाने वागतो.”+ पण हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! मी अन्यायाने वागतो,+ की तुम्ही अन्यायाने वागता?+

२६ एखादा नीतिमान माणूस नीतीने वागायचं सोडून वाईट कामं करू लागला, तर तो मरेल; तो आपल्याच दुष्टपणामुळे मरेल.

२७ पण जर एखाद्या दुष्ट माणसाने आपली सगळी पापं सोडून दिली आणि तो नीतीने आणि न्यायाने वागू लागला, तर तो आपला जीव वाचवेल.+ २८ आपल्या अपराधांची जाणीव होऊन तो जर मागे वळला, तर तो नक्की जिवंत राहील; तो मरणार नाही.

२९ पण इस्राएलचं घराणं म्हणेल: “यहोवा अन्यायाने वागतो.” पण इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! मी अन्यायाने वागतो,+ की तुम्ही अन्यायाने वागता?’

३० ‘म्हणून हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, ऐका! मी तुमच्यापैकी प्रत्येकाचा त्याच्या कामांप्रमाणे न्याय करीन,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ‘तुमचे अपराध तुमच्यासाठी अडखळण ठरू नयेत आणि तुमच्यावर दोष येऊ नये, म्हणून तुम्ही तुमच्या सगळ्या अपराधांपासून मागे वळा. ३१ तुम्ही जे अपराध करत होता, ते सोडून द्या.+ तुमची विचार करायची पद्धत आणि तुमचं मन बदला.+ हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! तुम्ही का उगाच आपला जीव गमावता?’+

३२ ‘कोणाच्याही मृत्यूने मला आनंद होत नाही,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ‘म्हणून मागे वळा आणि जिवंत राहा.’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा