वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • यरुशलेमसाठी देवाचं प्रेम (१-६३)

        • टाकून दिलेल्या बाळासारखी होती (१-७)

        • देव तिला सजवतो आणि तिच्याशी लग्नाचा करार करतो (८-१४)

        • ती विश्‍वासघात करते (१५-३४)

        • व्यभिचार केल्यामुळे तिला शिक्षा (३५-४३)

        • तिची तुलना शोमरोन आणि सदोमशी (४४-५८)

        • देव आपला करार आठवतो (५९-६३)

यहेज्केल १६:२

समासातील संदर्भ

  • +यहे ८:१०; २०:४

यहेज्केल १६:३

समासातील संदर्भ

  • +यहो १०:५; १रा २१:२५, २६; २रा २१:११
  • +१इत १:१३, १४

यहेज्केल १६:७

तळटीपा

  • *

    किंवा “तू वयात येऊन तुझे स्तन दिसू लागले.”

यहेज्केल १६:८

समासातील संदर्भ

  • +रूथ ३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. २५

यहेज्केल १६:९

समासातील संदर्भ

  • +स्तो २३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०२०, पृ. २

यहेज्केल १६:१०

तळटीपा

  • *

    किंवा “तहशाच्या कातडीचे.” गण ४:६ ची तळटीप पाहा.

यहेज्केल १६:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो ४८:२

यहेज्केल १६:१४

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२१
  • +१रा १०:१; स्तो ५०:२; विल २:१५

यहेज्केल १६:१५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ७:४; मीख ३:११
  • +१रा ११:५, ७; स्तो १०६:३५, ३६; यश ५७:७, ८; यिर्म २:२०; याक ४:४
  • +यिर्म ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६५-१६७

यहेज्केल १६:१६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१रा १४:२२, २३; २इत २१:५, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६५-१६७

यहेज्केल १६:१७

समासातील संदर्भ

  • +यश ५७:७, ८

यहेज्केल १६:१८

समासातील संदर्भ

  • +यहे ८:१०, ११

यहेज्केल १६:१९

समासातील संदर्भ

  • +२रा २२:१६, १७

यहेज्केल १६:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:२
  • +स्तो १०६:३७, ३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६७

यहेज्केल १६:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी १८:२१; २०:२; २रा १६:१, ३; २इत ३३:१, ६; यिर्म ७:३१; यहे २०:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६७

यहेज्केल १६:२३

समासातील संदर्भ

  • +यिर्म १३:२७; सफ ३:१

यहेज्केल १६:२५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३:२
  • +यिर्म २:२३, २४

यहेज्केल १६:२६

तळटीपा

  • *

    किंवा “मिसरच्या.”

समासातील संदर्भ

  • +यश ३०:२, ३; यिर्म २:३६

यहेज्केल १६:२७

समासातील संदर्भ

  • +अनु २८:४८
  • +स्तो १०६:४१
  • +यिर्म २:११, १२

यहेज्केल १६:२८

समासातील संदर्भ

  • +२रा १६:७

यहेज्केल १६:२९

तळटीपा

  • *

    शब्दशः “कनान देशाच्या.”

समासातील संदर्भ

  • +यहे २३:१४, १६

यहेज्केल १६:३०

तळटीपा

  • *

    किंवा “रोगी.”

  • *

    किंवा कदाचित, “माझा क्रोध तुझ्यावर किती भडकलाय!”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३:३

यहेज्केल १६:३१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

यहेज्केल १६:३२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३:१, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १२३-१२४

यहेज्केल १६:३३

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:१६
  • +यश ५७:९
  • +२इत १६:२, ३

यहेज्केल १६:३५

समासातील संदर्भ

  • +यश १:२१; यिर्म ३:६

यहेज्केल १६:३६

तळटीपा

  • *

    इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.

समासातील संदर्भ

  • +२रा २१:११
  • +स्तो १०६:३७, ३८

यहेज्केल १६:३७

समासातील संदर्भ

  • +यिर्म १३:२२; विल १:८

यहेज्केल १६:३८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:२४; लेवी २०:१०; अनु २२:२२
  • +उत्प ९:६; निर्ग २१:१२
  • +स्तो ७९:२, ३; यहे २३:२५

यहेज्केल १६:३९

समासातील संदर्भ

  • +यश २७:९; यहे १६:२४
  • +यिर्म ४:३०
  • +यश ३:१८-२३; यहे २३:२६

यहेज्केल १६:४०

समासातील संदर्भ

  • +यहे २३:४६, ४७; हब १:६
  • +अनु २२:२०, २१
  • +२इत ३६:१७; यिर्म २५:९

यहेज्केल १६:४१

समासातील संदर्भ

  • +२रा २५:८, ९
  • +यहे २३:२७

यहेज्केल १६:४२

समासातील संदर्भ

  • +यहे ५:१३
  • +यश ४०:२

यहेज्केल १६:४३

समासातील संदर्भ

  • +यिर्म २:३२

यहेज्केल १६:४४

समासातील संदर्भ

  • +१रा २१:२५, २६; २रा २१:२, ९; स्तो १०६:३५, ३६

यहेज्केल १६:४५

समासातील संदर्भ

  • +अनु २०:१७; यहो १०:५; २रा २१:११; यहे १६:३

यहेज्केल १६:४६

तळटीपा

  • *

    हे आसपासच्या नगरांना सूचित करत असावं.

  • *

    शब्दशः “डावीकडे.”

  • *

    शब्दशः “उजवीकडे.”

समासातील संदर्भ

  • +यहे २३:३३
  • +यिर्म ३:८
  • +उत्प १९:२४, २५
  • +उत्प १८:२०; यश ३:९; यिर्म २३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६७

यहेज्केल १६:४७

समासातील संदर्भ

  • +२रा २१:२, ९; यहे ५:५, ६

यहेज्केल १६:४९

समासातील संदर्भ

  • +यहू ७
  • +नीत १६:५
  • +नीत १:३२
  • +उत्प १३:१०
  • +नीत २१:१३

यहेज्केल १६:५०

समासातील संदर्भ

  • +नीत १६:१८
  • +उत्प १३:१३; १८:२०; १९:४, ५
  • +उत्प १९:२४, २५; विल ४:६; २पेत्र २:६

यहेज्केल १६:५१

समासातील संदर्भ

  • +२रा २१:१३; यिर्म २३:१३; यहे २३:३३
  • +यिर्म ३:११

यहेज्केल १६:५२

तळटीपा

  • *

    किंवा “तू आपल्या बहिणींची वकिली केलीस.”

यहेज्केल १६:५३

समासातील संदर्भ

  • +स्तो १२६:१

यहेज्केल १६:५५

समासातील संदर्भ

  • +यहे ३६:११

यहेज्केल १६:५७

समासातील संदर्भ

  • +यहे २१:२४
  • +२इत २८:१८

यहेज्केल १६:५९

समासातील संदर्भ

  • +यश ३:११; गल ६:७
  • +अनु २९:१२; यिर्म २२:८, ९

यहेज्केल १६:६०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३२:४०; ५०:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६७-१६८

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १७

यहेज्केल १६:६१

समासातील संदर्भ

  • +यहे २०:४३

यहेज्केल १६:६३

तळटीपा

  • *

    शब्दशः “मी तुझ्यासाठी प्रायश्‍चित करीन.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:१२; मीख ७:१८, १९
  • +एज ९:६; यहे ३६:३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. १६:२यहे ८:१०; २०:४
यहे. १६:३यहो १०:५; १रा २१:२५, २६; २रा २१:११
यहे. १६:३१इत १:१३, १४
यहे. १६:८रूथ ३:९
यहे. १६:९स्तो २३:५
यहे. १६:१३स्तो ४८:२
यहे. १६:१४१रा ४:२१
यहे. १६:१४१रा १०:१; स्तो ५०:२; विल २:१५
यहे. १६:१५यिर्म ७:४; मीख ३:११
यहे. १६:१५१रा ११:५, ७; स्तो १०६:३५, ३६; यश ५७:७, ८; यिर्म २:२०; याक ४:४
यहे. १६:१५यिर्म ३:१३
यहे. १६:१६१रा १४:२२, २३; २इत २१:५, ११
यहे. १६:१७यश ५७:७, ८
यहे. १६:१८यहे ८:१०, ११
यहे. १६:१९२रा २२:१६, १७
यहे. १६:२०निर्ग १३:२
यहे. १६:२०स्तो १०६:३७, ३८
यहे. १६:२१लेवी १८:२१; २०:२; २रा १६:१, ३; २इत ३३:१, ६; यिर्म ७:३१; यहे २०:२६
यहे. १६:२३यिर्म १३:२७; सफ ३:१
यहे. १६:२५यिर्म ३:२
यहे. १६:२५यिर्म २:२३, २४
यहे. १६:२६यश ३०:२, ३; यिर्म २:३६
यहे. १६:२७अनु २८:४८
यहे. १६:२७स्तो १०६:४१
यहे. १६:२७यिर्म २:११, १२
यहे. १६:२८२रा १६:७
यहे. १६:२९यहे २३:१४, १६
यहे. १६:३०यिर्म ३:३
यहे. १६:३२यिर्म ३:१, २०
यहे. १६:३३उत्प ३८:१६
यहे. १६:३३यश ५७:९
यहे. १६:३३२इत १६:२, ३
यहे. १६:३५यश १:२१; यिर्म ३:६
यहे. १६:३६२रा २१:११
यहे. १६:३६स्तो १०६:३७, ३८
यहे. १६:३७यिर्म १३:२२; विल १:८
यहे. १६:३८उत्प ३८:२४; लेवी २०:१०; अनु २२:२२
यहे. १६:३८उत्प ९:६; निर्ग २१:१२
यहे. १६:३८स्तो ७९:२, ३; यहे २३:२५
यहे. १६:३९यश २७:९; यहे १६:२४
यहे. १६:३९यिर्म ४:३०
यहे. १६:३९यश ३:१८-२३; यहे २३:२६
यहे. १६:४०यहे २३:४६, ४७; हब १:६
यहे. १६:४०अनु २२:२०, २१
यहे. १६:४०२इत ३६:१७; यिर्म २५:९
यहे. १६:४१२रा २५:८, ९
यहे. १६:४१यहे २३:२७
यहे. १६:४२यहे ५:१३
यहे. १६:४२यश ४०:२
यहे. १६:४३यिर्म २:३२
यहे. १६:४४१रा २१:२५, २६; २रा २१:२, ९; स्तो १०६:३५, ३६
यहे. १६:४५अनु २०:१७; यहो १०:५; २रा २१:११; यहे १६:३
यहे. १६:४६यहे २३:३३
यहे. १६:४६यिर्म ३:८
यहे. १६:४६उत्प १९:२४, २५
यहे. १६:४६उत्प १८:२०; यश ३:९; यिर्म २३:१४
यहे. १६:४७२रा २१:२, ९; यहे ५:५, ६
यहे. १६:४९यहू ७
यहे. १६:४९नीत १६:५
यहे. १६:४९नीत १:३२
यहे. १६:४९उत्प १३:१०
यहे. १६:४९नीत २१:१३
यहे. १६:५०नीत १६:१८
यहे. १६:५०उत्प १३:१३; १८:२०; १९:४, ५
यहे. १६:५०उत्प १९:२४, २५; विल ४:६; २पेत्र २:६
यहे. १६:५१२रा २१:१३; यिर्म २३:१३; यहे २३:३३
यहे. १६:५१यिर्म ३:११
यहे. १६:५३स्तो १२६:१
यहे. १६:५५यहे ३६:११
यहे. १६:५७यहे २१:२४
यहे. १६:५७२इत २८:१८
यहे. १६:५९यश ३:११; गल ६:७
यहे. १६:५९अनु २९:१२; यिर्म २२:८, ९
यहे. १६:६०यिर्म ३२:४०; ५०:४, ५
यहे. १६:६१यहे २०:४३
यहे. १६:६३स्तो १०३:१२; मीख ७:१८, १९
यहे. १६:६३एज ९:६; यहे ३६:३१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
  • ६१
  • ६२
  • ६३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल १६:१-६३

यहेज्केल

१६ मग यहोवाकडून मला पुन्हा एकदा संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला, यरुशलेम नगरीने किती घृणास्पद कामं केली आहेत ते तिला दाखवून दे.+ ३ तू म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा यरुशलेमला असं म्हणतो: “तू मूळची कनान देशातली आहेस. तुझा जन्म त्याच देशातला आहे. तुझे वडील अमोरी होते+ आणि तुझी आई हित्ती होती.+ ४ तुझ्या जन्माविषयी सांगायचं, तर तुझा जन्म झाला त्या दिवशी कोणी तुझी नाळ कापली नाही. तुला अंघोळ घालून कोणी तुला स्वच्छ केलं नाही. कोणी तुझ्या अंगाला मीठ चोळलं नाही आणि तुला कपड्यातही गुंडाळलं नाही. ५ तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्याइतकी कोणालाही तुझी कीव आली नाही. आणि कोणीही तुझ्यावर दया केली नाही. उलट, तू जन्मलीस त्या दिवशी तुझा द्वेष करून तुला खुल्या मैदानात टाकून देण्यात आलं होतं.

६ मी तिथून जात होतो, तेव्हा तू मला आपल्याच रक्‍तात पाय मारत असलेली दिसलीस. तू जेव्हा स्वतःच्या रक्‍तात लोळत पडली होतीस, तेव्हा मी तुला म्हणालो: ‘तू जिवंत राहशील!’ हो, तू रक्‍तात लोळत होतीस तेव्हा मी म्हणालो: ‘तू जिवंत राहशील!’ ७ मग मी तुझी संख्या अनेक पटींनी वाढवली; शेतातल्या बियांना अंकुर फुटून भरघोस पीक येतं तशी मी तुझी संख्या वाढवली. तू उंच झालीस, मोठी झालीस. तू सगळ्यात सुंदर दागिने घातलेस. तू वयात आलीस आणि तुला ऊर फुटले,* तुझे केसही वाढून लांबसडक झाले. पण तरी तुझ्या अंगावर कपडे नव्हते, तू उघडीच होतीस.”’

८ ‘मी तिथून जात होतो, तेव्हा मी पाहिलं की तू प्रेमात पडायच्या वयात आली होतीस. म्हणून मी माझं वस्त्र तुझ्यावर टाकलं+ आणि तुझं अंग झाकलं. मी शपथ घेऊन तुझ्यासोबत एक करार केला आणि तू माझी झालीस,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ९ ‘शिवाय, मी तुला पाण्याने स्वच्छ केलं. तुझ्या अंगावरचं रक्‍त धुऊन मी तुला तेल लावलं.+ १० मी तुला भरतकाम केलेले सुंदर कपडे घातले आणि तुझ्या पायांत चांगल्या प्रतीच्या चामड्याचे* जोडे घातले. मी तुझ्या डोक्याला उत्तम प्रतीचं मलमलीचं कापड गुंडाळलं आणि तुला महागडे कपडे घातले. ११ मी तुला सुंदर दागिन्यांनी सजवलं. तुझ्या हातांत बांगड्या आणि गळ्यात हार घातला. १२ मी तुझ्या नाकात नथ आणि कानांत कुंडलं घातली. आणि तुझ्या डोक्यावर एक सुंदरसा मुकुटही ठेवला. १३ तू सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी नटायचीस. तू भरतकाम केलेले कपडे घालायचीस. महागड्या कापडापासून आणि उत्तम मलमलीच्या कापडापासून बनलेले कपडे तू घालायचीस. तू चांगल्या प्रतीचं पीठ, मध आणि तेल यांपासून बनलेले पदार्थ खायचीस. तू अतिशय देखणी आणि सुंदर दिसू लागलीस.+ तू अगदी राणी बनायच्या योग्यतेची झालीस.’”

१४ “‘तुझ्या अप्रतिम सौंदर्यामुळे सगळ्या राष्ट्रांत तुझं नाव होऊ लागलं.+ तुझं सौंदर्य परिपूर्ण होतं, कारण मी माझं वैभव तुला दिलं होतं,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”

१५ “‘पण तू आपल्या सुंदरतेची घमेंड करू लागलीस+ आणि तुला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तू वेश्‍या बनलीस.+ येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या प्रत्येकासोबत तू उघड-उघड वेश्‍येची कामं केलीस,+ आणि आपलं सौंदर्य त्यांच्यावर उधळत राहिलीस. १६ आपल्या काही कपड्यांपासून तू रंगीबेरंगी उच्च स्थानं* बनवलीस आणि तिथे वेश्‍येची कामं केलीस.+ खरंतर, अशा गोष्टी कधी घडायला नको होत्या, आणि पुढेही त्या कधी घडायला नकोत. १७ मी तुला सोन्या-चांदीचे जे सुंदर दागिने दिले होते, त्यांपासून तू पुरुषांच्या मूर्ती बनवल्यास आणि त्यांच्यासोबत व्यभिचार केलास.+ १८ शिवाय, तू त्यांना आपले भरतकाम केलेले कपडे घातलेस, आणि मी दिलेलं तेल आणि धूप त्यांच्यापुढे अर्पण केलंस.+ १९ तसंच, मी तुला चांगल्या प्रतीच्या पिठापासून, मधापासून आणि तेलापासून बनलेली जी भाकर खायला दिली होती, तीही तू त्यांना दिलीस; त्यांना आनंदी करायला तू ती भाकर सुगंधी अर्पण म्हणून दिलीस.+ हे सगळं अगदी असंच घडलं,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”

२० “‘तुझी वेश्‍येची कामं काय कमी होती, म्हणून तू माझ्यासाठी जन्माला घातलेल्या तुझ्या मुलामुलींचाही+ मूर्तींपुढे बळी दिलास?+ २१ तू माझ्या मुलांची कत्तल केलीस आणि त्यांचा आगीत होम केलास.+ २२ अशी सगळी घृणास्पद आणि अनैतिक कामं करताना तुला तुझे बालपणाचे दिवस आठवले नाहीत का? तुझ्या अंगावर कपडे नव्हते, तू उघडी होतीस आणि तू आपल्याच रक्‍तात पाय मारत लोळत होतीस, ते दिवस तुला आठवले नाहीत का? २३ तू केलेल्या या सगळ्या दुष्ट कामांमुळे तुझा धिक्कार असो!’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. २४ ‘तू स्वतःसाठी टेकडी बांधलीस आणि चौकाचौकांत उच्च स्थानं बांधलीस. २५ तू प्रत्येक रस्त्यावर, मोक्याच्या ठिकाणी उच्च स्थानं बांधलीस. तू स्वतःला येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या प्रत्येकाच्या हवाली करून अनेक वेश्‍येची कामं केलीस.+ असं करून तू आपलं सौंदर्य भ्रष्ट केलंस.+ २६ वासनेने उत्तेजित असलेल्या तुझ्या शेजाऱ्‍यांसोबत, म्हणजे इजिप्तच्या* मुलांसोबत तू वेश्‍येची कामं केलीस.+ अशी असंख्य वेश्‍येची कामं करून तू माझा क्रोध भडकवलास. २७ म्हणून आता मी तुझ्यावर माझा हात उगारीन आणि तुझी अन्‍नसामग्री कमी करीन.+ मी तुला तुझा द्वेष करणाऱ्‍या स्त्रियांच्या हवाली करीन;+ तुझं अश्‍लील वागणं पाहून ज्यांना धक्का बसला त्या पलिष्ट्यांच्या मुलींच्या हवाली मी तुला करीन.+

२८ पण एवढं करूनही तुझं समाधान झालं नाही. म्हणून तू अश्‍शूरच्या मुलांसोबत व्यभिचार केलास.+ पण, तरीही तुझं मन भरलं नाही. २९ त्यामुळे तू स्वतःला व्यापाऱ्‍यांच्या देशाच्या* आणि खास्दी लोकांच्या स्वाधीन करून आणखी जास्त अनैतिक कामं केलीस.+ पण त्यानंतरही तू तृप्त झाली नाहीस. ३० एखाद्या निर्लज्ज वेश्‍येसारखं वागून तू ही सगळी कामं केलीस. तुझं मन किती कमजोर* होतं!’* असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.+ ३१ ‘तू जेव्हा प्रत्येक रस्त्यावरच्या मोक्याच्या ठिकाणी आपली टेकडी उभारलीस आणि चौकाचौकांत आपली उच्च स्थानं* बांधलीस, तेव्हा तू इतर वेश्‍यांसारखी नव्हतीस. कारण तू कोणाकडूनही पैसे घेत नव्हतीस. ३२ तू तर नवऱ्‍याला सोडून परक्या माणसांना जवळ करणाऱ्‍या व्यभिचारी बायकोसारखी आहेस!+ ३३ सहसा लोक वेश्‍यांना बक्षीसं देतात.+ पण तू तर, तुझ्याकडे वासना पूर्ण करायला येणाऱ्‍या पुरुषांनाच बक्षीसं देतेस.+ तू त्यांना लाच देऊन आपल्याशी व्यभिचार करायला सगळीकडून बोलावून घेतेस.+ ३४ तू इतर वेश्‍यांच्या अगदी उलट आहेस! तुझ्यासारखी वेश्‍या कुठेही पाहायला मिळणार नाही! तुझी रीतच वेगळी आहे. तुझ्याकडे येणाऱ्‍या पुरुषांकडून पैसे घेण्याऐवजी तूच त्यांना पैसे देतेस.’

३५ म्हणून हे वेश्‍ये,+ यहोवा काय म्हणतो ते ऐक. ३६ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तू आपली वासना तृप्त करायला सगळ्या मर्यादा ओलांडल्यास. आपल्या प्रियकरांसोबत आणि सगळ्या किळसवाण्या व घृणास्पद मूर्तींसोबत* व्यभिचार करून तू आपली लाज उघडी केलीस.+ त्या मूर्तींना तू स्वतःच्या मुलांचं रक्‍तही अर्पण केलंस.+ ३७ म्हणून बघ! तू ज्यांना खूश केलंस त्या तुझ्या सगळ्या प्रियकरांना मी गोळा करीन; तू ज्यांच्यावर प्रेम केलंस आणि ज्यांचा द्वेष केलास, त्या सगळ्यांना मी गोळा करीन. मी त्यांना चारही बाजूंनी एकत्र करून तुझ्याविरुद्ध आणीन. मी त्यांच्यासमोर तुला नग्न करीन आणि ते तुझी नग्नता पाहतील.+

३८ मी तुला शिक्षा करीन; व्यभिचार करणाऱ्‍या+ आणि खून करणाऱ्‍या स्त्रियांना जी शिक्षा दिली जाते,+ तीच शिक्षा मी तुला देईन. मी मोठ्या क्रोधाने आणि ईर्ष्येने तुझं रक्‍त सांडीन.+ ३९ मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती देईन. ते तुझ्या टेकड्या उद्ध्‌वस्त करतील आणि तुझी उच्च स्थानं पाडून टाकतील.+ ते तुझ्या अंगावरचे कपडे काढून टाकतील.+ ते तुझे सुंदर दागदागिने तुझ्यापासून हिसकावून घेतील+ आणि तुला उघडीनागडी करून टाकतील. ४० ते तुझ्याविरुद्ध लोकांचा मोठा जमाव आणतील.+ तुला दगडमार करून+ ते आपल्या तलवारींनी तुझी कत्तल करतील.+ ४१ ते तुझी घरंदारं जाळून टाकतील+ आणि अनेक स्त्रियांसमोर तुला शिक्षा करतील. मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन,+ आणि त्यानंतर तू आपल्या प्रियकरांना पैसे देऊ शकणार नाहीस. ४२ तेव्हाच तुझ्यावरचा माझा राग शांत होईल,+ आणि तुझ्यावर असलेला माझा क्रोध दूर होईल.+ मी शांत होईन आणि पुन्हा कधी माझा क्रोध तुझ्यावर भडकणार नाही.’

४३ ‘तुला तुझ्या तरुणपणाच्या दिवसांची आठवण राहिली नाही.+ उलट, ही सगळी दुष्ट कामं करून तू माझा राग भडकवलास. म्हणून आता तुझ्या दुष्ट कामांचे परिणाम मी तुझ्याच माथ्यावर मारीन. मग पुन्हा कधीच तू अश्‍लीलपणे वागणार नाहीस आणि घृणास्पद कामं करणार नाहीस,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.

४४ ‘बघ! म्हणी वापरणारा प्रत्येक जण तुला ही म्हण लागू करेल: “जशी आई, तशी मुलगी!”+ ४५ तुझ्या आईने आपल्या नवऱ्‍याला आणि मुलाबाळांना तुच्छ लेखलं; तू तिच्यासारखीच आहेस. तुझ्या बहिणींनी आपल्या नवऱ्‍यांचा आणि मुलाबाळांचा तिरस्कार केला; तू अगदी त्यांच्यासारखीच आहेस. तुझी आई हित्ती होती आणि तुझे वडील अमोरी होते.’”+

४६ “‘शोमरोन ही तुझी मोठी बहीण.+ ती आपल्या मुलींसोबत* तुझ्या उत्तरेकडे* राहते.+ आणि सदोम ही तुझी धाकटी बहीण. ती आपल्या मुलींसोबत+ तुझ्या दक्षिणेकडे* राहते.+ ४७ तू त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या वागणुकीचं आणि घृणास्पद कामांचं अनुकरण तर केलंच, पण काही काळातच तू त्यांच्यापेक्षाही जास्त वाईट वागू लागलीस.’+ ४८ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, तू आणि तुझ्या मुलींनी जी कामं केलीत, ती तर तुझी बहीण सदोम हिने आणि तिच्या मुलींनीसुद्धा केली नाहीत. ४९ पाहा! तुझ्या बहिणीचा, सदोमचा हा अपराध होता: ती आणि तिच्या मुली+ फार घमेंडी होत्या.+ त्या ऐशआरामात राहत असून निश्‍चिंत होत्या.+ त्यांच्याकडे खाण्यापिण्याची रेलचेल होती.+ पण, तरीसुद्धा त्यांनी दुःखी आणि गरीब लोकांना मदत केली नाही.+ ५० त्यांनी आपला गर्विष्ठपणा सोडला नाही.+ त्या माझ्यासमोर आपली घृणास्पद कामं करतच राहिल्या.+ आणि म्हणून मला त्यांचा नाश करावा लागला.+

५१ तू जितकी पापं केलीस त्याच्या अर्धीसुद्धा शोमरोनने+ केली नाहीत. तू तुझ्या बहिणींपेक्षा जास्त घृणास्पद कामं करत राहिलीस; इतकी की त्या घृणास्पद कामांच्या मानाने तुझ्या बहिणी नीतिमान वाटू लागल्या.+ ५२ तुला आता अपमानित व्हावं लागेल, कारण तू तुझ्या बहिणींचं वागणं योग्य ठरवलंस.* तू त्यांच्यापेक्षा जास्त घोर पापं केलीस, त्यामुळे त्या तुझ्या मानाने कमी दोषी आहेत. तुझ्या बहिणी नीतिमान आहेत हे तू दाखवून दिलंस, म्हणून आता लज्जित हो आणि शरमेने आपली मान खाली घाल.’

५३ ‘मी सदोम आणि तिच्या मुलींच्या बंदिवानांना, तसंच शोमरोन आणि तिच्या मुलींच्या बंदिवानांना गोळा करीन. त्यांच्यासोबत मी तुझ्याही बंदिवानांना गोळा करीन,+ ५४ म्हणजे तू अपमानित होशील. तू आपल्या कामांनी त्यांच्या मनाचं समाधान केलंस, म्हणून तुला लज्जित व्हावं लागेल. ५५ तुझ्या बहिणी, म्हणजे सदोम आणि शोमरोन, तसंच त्यांच्या मुली या सगळ्या त्यांच्या पूर्वीच्या स्थितीत येतील. शिवाय, तू आणि तुझ्या मुली तुम्हीसुद्धा तुमच्या पूर्वीच्या स्थितीत याल.+ ५६ तुला जेव्हा घमेंड चढली होती त्या काळात तू तुझ्या बहिणीचं, सदोमचं नावसुद्धा घ्यायची नाहीस. ५७ तुझ्या दुष्टपणाचा पर्दाफाश होईपर्यंत,+ तू अशीच वागलीस. आता सीरियाच्या मुली आणि तिचे शेजारी तुझी बदनामी करतात. तसंच, पलिष्ट्यांच्या मुली+ आणि तुझ्या आसपासचे सगळे लोक तुझी निंदा करतात. ५८ तुला तुझ्या अश्‍लील वागणुकीचे आणि घृणास्पद कामांचे परिणाम भोगावे लागतील,’ असं यहोवा म्हणतो.”

५९ “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तू जसं वागलीस, तसंच मी तुझ्याशी वागीन.+ कारण तू माझा करार मोडून शपथ तुच्छ लेखलीस.+ ६० पण मी मात्र तुझ्याशी केलेला करार विसरणार नाही. तू तरुण असताना मी तुझ्याशी जो करार केला होता, तो मी आठवणीत ठेवीन. आणि तुझ्याशी मी सर्वकाळ टिकणारा करार करीन.+ ६१ तू तुझ्या मोठ्या आणि धाकट्या बहिणींचा स्वीकार करशील, तेव्हा स्वतःचं वागणं आठवून तुला तुझीच लाज वाटेल.+ त्या मी तुला तुझ्या मुली म्हणून देईन. पण तुझ्याशी केलेल्या करारामुळे मी हे करीन असं नाही.’

६२ ‘मी स्वतः तुझ्याशी एक करार करीन. तेव्हा तुला कळून येईल, की मी यहोवा आहे. ६३ तू जी पापं केलीस त्या सगळ्यांची मी जेव्हा तुला क्षमा करीन,*+ तेव्हा तुला तुझ्या कामांची आठवण होईल. आणि तुला स्वतःची इतकी लाज वाटेल, की तू आपलं तोंड उघडणार नाहीस,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा