वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • विलापगीत ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

विलापगीत रूपरेषा

      • यरुशलेमच्या वेढ्याचे भयानक परिणाम

        • अन्‍नाचा तुटवडा (४, ५, ९)

        • स्त्रिया स्वतःच्या मुलांना उकळतात (१०)

        • यहोवाने आपल्या क्रोधाचा वर्षाव केला (११)

विलापगीत ४:१

समासातील संदर्भ

  • +१रा ६:२२
  • +१रा ५:१७; ७:९-१२
  • +यिर्म ५२:१२, १३

विलापगीत ४:२

तळटीपा

  • *

    किंवा “सोन्याइतकी मौल्यवान होती.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ४:३

समासातील संदर्भ

  • +ईयो ३९:१४-१६
  • +लेवी २६:२९; अनु २८:५३-५७; यिर्म १९:९; विल ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. १०

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ४:४

समासातील संदर्भ

  • +विल १:११; २:११, १२
  • +यिर्म ५२:६

विलापगीत ४:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “उजाड.”

समासातील संदर्भ

  • +आम ६:४, ७
  • +यिर्म ६:२, २६

विलापगीत ४:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “अपराध.”

समासातील संदर्भ

  • +यहे १६:४८
  • +उत्प १९:२४, २५; दान ९:१२

विलापगीत ४:७

समासातील संदर्भ

  • +गण ६:२

विलापगीत ४:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “काळेपणा.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०२:५

विलापगीत ४:९

समासातील संदर्भ

  • +यिर्म २९:१७; ३८:२

विलापगीत ४:१०

तळटीपा

  • *

    किंवा “शोकाचं अन्‍न.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२९; विल २:२०; ४:३
  • +अनु २८:५४-५७

विलापगीत ४:११

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:११; ७:२०; यहे २२:३१
  • +अनु ३२:२२; २रा २५:९, १०

विलापगीत ४:१२

समासातील संदर्भ

  • +अनु २९:२४; १रा ९:८

विलापगीत ४:१३

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५:३१; १४:१४; मीख ३:११; सफ ३:४
  • +यिर्म २६:८; मत्त २३:३१; प्रेका ७:५२

विलापगीत ४:१४

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२८; सफ १:१७
  • +यश १:१५; यिर्म २:३४

विलापगीत ४:१५

तळटीपा

  • *

    किंवा “विदेशी म्हणून इथे राहू शकत नाहीत.”

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२५, ६५

विलापगीत ४:१६

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३३; अनु २८:६४; यिर्म २४:९
  • +२रा २५:१८, २१
  • +विल ५:१२; यहे ९:६

विलापगीत ४:१७

समासातील संदर्भ

  • +विल १:१९
  • +यिर्म ३७:७; यहे २९:६

विलापगीत ४:१८

समासातील संदर्भ

  • +२रा २५:५; विल ३:५२

विलापगीत ४:१९

समासातील संदर्भ

  • +अनु २८:४९, ५०; यश ५:२६; यिर्म ४:१३; हब १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९६, पृ. ९-१०

विलापगीत ४:२०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३७:१
  • +२रा २५:५, ६; यिर्म ३९:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ४:२१

समासातील संदर्भ

  • +स्तो १३७:७; ओब १२
  • +यिर्म २५:१७, २०; ओब १६
  • +यिर्म ४९:१०, १२

विलापगीत ४:२२

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:४४; यश ५२:१; ६०:१८
  • +यश ३४:५; यहे २५:१३; ३५:१५; आम १:११; ओब १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

विलाप. ४:११रा ६:२२
विलाप. ४:११रा ५:१७; ७:९-१२
विलाप. ४:१यिर्म ५२:१२, १३
विलाप. ४:३ईयो ३९:१४-१६
विलाप. ४:३लेवी २६:२९; अनु २८:५३-५७; यिर्म १९:९; विल ४:१०
विलाप. ४:४विल १:११; २:११, १२
विलाप. ४:४यिर्म ५२:६
विलाप. ४:५आम ६:४, ७
विलाप. ४:५यिर्म ६:२, २६
विलाप. ४:६यहे १६:४८
विलाप. ४:६उत्प १९:२४, २५; दान ९:१२
विलाप. ४:७गण ६:२
विलाप. ४:८स्तो १०२:५
विलाप. ४:९यिर्म २९:१७; ३८:२
विलाप. ४:१०लेवी २६:२९; विल २:२०; ४:३
विलाप. ४:१०अनु २८:५४-५७
विलाप. ४:११यिर्म ६:११; ७:२०; यहे २२:३१
विलाप. ४:११अनु ३२:२२; २रा २५:९, १०
विलाप. ४:१२अनु २९:२४; १रा ९:८
विलाप. ४:१३यिर्म ५:३१; १४:१४; मीख ३:११; सफ ३:४
विलाप. ४:१३यिर्म २६:८; मत्त २३:३१; प्रेका ७:५२
विलाप. ४:१४अनु २८:२८; सफ १:१७
विलाप. ४:१४यश १:१५; यिर्म २:३४
विलाप. ४:१५अनु २८:२५, ६५
विलाप. ४:१६लेवी २६:३३; अनु २८:६४; यिर्म २४:९
विलाप. ४:१६२रा २५:१८, २१
विलाप. ४:१६विल ५:१२; यहे ९:६
विलाप. ४:१७विल १:१९
विलाप. ४:१७यिर्म ३७:७; यहे २९:६
विलाप. ४:१८२रा २५:५; विल ३:५२
विलाप. ४:१९अनु २८:४९, ५०; यश ५:२६; यिर्म ४:१३; हब १:८
विलाप. ४:२०यिर्म ३७:१
विलाप. ४:२०२रा २५:५, ६; यिर्म ३९:५
विलाप. ४:२१स्तो १३७:७; ओब १२
विलाप. ४:२१यिर्म २५:१७, २०; ओब १६
विलाप. ४:२१यिर्म ४९:१०, १२
विलाप. ४:२२लेवी २६:४४; यश ५२:१; ६०:१८
विलाप. ४:२२यश ३४:५; यहे २५:१३; ३५:१५; आम १:११; ओब १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
विलापगीत ४:१-२२

विलापगीत

א [आलेफ ]

४ शुद्ध, चकाकतं सोनं+ कसं निस्तेज झालंय!

पवित्र ठिकाणाचे दगड+ कसे शहराच्या कोपऱ्‍या-कोपऱ्‍यावर पडले आहेत!+

ב [बेथ ]

 २ सीयोनची प्रिय मुलं, ज्यांची उत्तम प्रतीच्या सोन्याशी तुलना केली जायची,*

त्यांना मातीच्या मडक्यांसारखं;

कुंभाराने घडवलेल्या भांड्यांसारखं लेखण्यात आलंय!

ג [गिमेल ]

 ३ कोल्हीणसुद्धा आपल्या पिल्लांना पाजते,

पण माझ्या लोकांची मुलगी ओसाड रानातल्या शहामृगींसारखी+ निर्दय झाली आहे.+

ד [दालेथ ]

 ४ तान्ह्या बाळाची जीभ तहानेमुळे त्याच्या टाळूला चिकटते.

मुलंबाळं भाकरीसाठी भीक मागतात,+ पण कोणी त्यांना तुकडासुद्धा देत नाही.+

ה [हे ]

 ५ जे एकेकाळी चमचमीत पदार्थ खायचे, ते रस्त्यांवर उपाशी* पडले आहेत.+

जे लहानपणापासून महागाचे कपडे घालायचे,+ त्यांनी राखेच्या ढिगाऱ्‍यांचा आश्रय घेतलाय.

ו [वाव ]

 ६ माझ्या लोकांच्या मुलीला मिळालेली शिक्षा,* सदोमच्या पापाबद्दल+ देण्यात आलेल्या शिक्षेपेक्षा भयंकर आहे;

त्या शहराचा एका क्षणात नाश झाला होता आणि कोणीही त्याला साहाय्य केलं नाही.+

ז [झाइन ]

 ७ तिचे नाझीर+ बर्फापेक्षा स्वच्छ, दुधापेक्षा शुभ्र होते.

त्यांची त्वचा पोवळ्यांपेक्षा लाल होती; ते चमकवलेल्या नीलमण्यांसारखे होते.

ח [हेथ ]

 ८ आता तर त्यांचे चेहरे काजळापेक्षा* काळे झाले आहेत;

रस्त्यांवर त्यांना कोणीही ओळखत नाही.

त्यांची सुरकुतलेली कातडी, त्यांच्या हाडांना चिकटली आहे;+ ती सुकलेल्या लाकडासारखी झाली आहे.

ט [तेथ ]

 ९ ज्यांना तलवारीने मारण्यात आलं, ते दुष्काळाला बळी पडलेल्यांपेक्षा;+

खंगत चाललेल्या आणि उपासमारीने घात झालेल्यांपेक्षा बरे आहेत.

י [योद ]

१० कोमल मनाच्या स्त्रियांनी आपल्या हातांनी स्वतःच्या मुलांना उकळलं.+

माझ्या लोकांच्या मुलीचा विनाश झाला, तेव्हा त्यांची मुलंच त्यांचं अन्‍न* झाली.+

כ [खाफ ]

११ यहोवाने आपला क्रोध प्रकट केलाय;

त्याने त्याच्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केलाय.+

सीयोनमध्ये त्याने अशी आग पेटवली, जिने तिचे पाये भस्म केले आहेत.+

ל [लामेद ]

१२ शत्रू यरुशलेमच्या फाटकांतून आत गेला,

यावर पृथ्वीच्या राजांचा आणि सर्व रहिवाशांचा विश्‍वास बसला नाही.+

מ [मेम ]

१३ तिच्या संदेष्ट्यांच्या पापांमुळे, तिच्या याजकांच्या अपराधांमुळे हे घडलं;+

त्यांनी तिच्यात नीतिमान लोकांचं रक्‍त सांडलं.+

נ [नून ]

१४ ते रस्त्यांवर आंधळ्यांसारखे भटकत आहेत.+

ते रक्‍ताने माखले आहेत,+

त्यामुळे कोणीही त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करू शकत नाही.

ס [सामेख ]

१५ लोक त्यांना म्हणतात, “अशुद्ध झालेल्यांनो, निघून जा! चालते व्हा! चालते व्हा! आम्हाला स्पर्श करू नका!”

ते बेघर झाले आहेत आणि भटकत राहतात.

राष्ट्रांतले लोक म्हणतात: “ते आमच्यामध्ये राहू शकत नाहीत.”*+

פ [पे ]

१६ यहोवाने त्यांची पांगापांग केली आहे;+

तो यापुढे त्यांच्यावर कृपा करणार नाही.

लोक याजकांचा आदर करणार नाहीत+ आणि वडीलजनांची कदर करणार नाहीत.+

ע [आयन ]

१७ साहाय्यासाठी आम्ही उगीच वाट पाहत राहिलो आणि आमचे डोळे थकून गेले.+

आम्ही एका राष्ट्राकडून मदतीसाठी खूप वाट पाहिली, पण ते आम्हाला वाचवू शकलं नाही.+

צ [सादे ]

१८ त्यांनी सतत आमचा पाठलाग केला;+ आम्ही आपल्या चौकांतून चालूही शकत नाही.

आमचा अंत जवळ आला आहे; आमचे दिवस संपले आहेत, कारण आमचा शेवट आला आहे.

ק [खुफ ]

१९ आमचा पाठलाग करणारे आकाशातल्या गरुडांपेक्षाही वेगवान होते.+

त्यांनी डोंगरांवर आमचा पिच्छा पुरवला; ओसाड रानात ते आमचा घात करण्यासाठी टपून बसले.

ר [रेश ]

२० “त्याच्या छत्रछायेत आपण राष्ट्रांमध्ये राहू,” असं ज्याच्याबद्दल आम्ही म्हणायचो,

तो आमच्या नाकपुड्यांतला श्‍वास, यहोवाचा अभिषिक्‍त,+ बंदी होऊन त्यांच्या मोठ्या खळग्यात अडकलाय.+

ש [शिन ]

२१ ऊस देशात राहणाऱ्‍या अदोमच्या मुली,+ आनंदी होऊन जल्लोष कर!

पण संकटाचा प्याला तुझ्या हातातही येईल+ आणि तू धुंद होऊन आपली नग्नता उघड करशील.+

ת [ताव ]

२२ हे सीयोनच्या मुली, तुझ्या अपराधाची शिक्षा पूर्ण झाली आहे.

तो तुला पुन्हा बंदिवासात नेणार नाही.+

पण हे अदोमच्या मुली, तुझ्या अपराधाकडे तो आपलं लक्ष वळवेल.

तो तुझी पापं उजेडात आणेल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा