वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • विलापगीत ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

विलापगीत रूपरेषा

      • परत आणण्यासाठी लोकांची प्रार्थना

        • “आमच्यावर आलेलं संकट आठव” (१)

        • “आम्ही पाप केलंय, आमचा धिक्कार असो!” (१६)

        • “हे यहोवा, आम्हाला तुझ्याकडे परत आण” (२१)

        • “आमचे पूर्वीचे दिवस परत आण” (२१)

विलापगीत ५:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ७९:४; विल २:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. १०

विलापगीत ५:२

समासातील संदर्भ

  • +अनु २८:३०; स्तो ७९:१; यिर्म ६:१२; सफ १:१३

विलापगीत ५:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२४; यिर्म १८:२१

विलापगीत ५:४

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५, ४८; यश ३:१; यहे ४:११, १६

विलापगीत ५:५

समासातील संदर्भ

  • +अनु २८:६५

विलापगीत ५:६

तळटीपा

  • *

    किंवा “मिसरपुढे.”

समासातील संदर्भ

  • +यश ३०:२; यिर्म ४४:१२; यहे १७:१७, १८
  • +२इत २८:१६; यिर्म २:१८, ३६

विलापगीत ५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००७, पृ. १०

    १०/१/१९८८, पृ. ३१

विलापगीत ५:९

समासातील संदर्भ

  • +यहे ४:१०

विलापगीत ५:१०

समासातील संदर्भ

  • +२रा २५:३; विल ४:८

विलापगीत ५:११

समासातील संदर्भ

  • +अनु २८:३०

विलापगीत ५:१२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३९:६
  • +यश ४७:६; यिर्म ६:११; विल ४:१६

विलापगीत ५:१४

समासातील संदर्भ

  • +यहो २०:४
  • +यिर्म २५:१०

विलापगीत ५:१५

समासातील संदर्भ

  • +आम ८:१०

विलापगीत ५:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “आमचं हृदय रोगी आहे.”

समासातील संदर्भ

  • +विल १:२२
  • +अनु २८:६५

विलापगीत ५:१८

समासातील संदर्भ

  • +यिर्म २६:१८

विलापगीत ५:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो १०२:१२; १४५:१३; १४६:१०

विलापगीत ५:२०

समासातील संदर्भ

  • +स्तो ७९:५; यिर्म १४:१९

विलापगीत ५:२१

समासातील संदर्भ

  • +अनु ४:३०; स्तो ८०:३; ८५:४; यिर्म ३१:१८
  • +यिर्म ३३:१३

विलापगीत ५:२२

समासातील संदर्भ

  • +अनु २८:१५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

विलाप. ५:१स्तो ७९:४; विल २:१५
विलाप. ५:२अनु २८:३०; स्तो ७९:१; यिर्म ६:१२; सफ १:१३
विलाप. ५:३निर्ग २२:२४; यिर्म १८:२१
विलाप. ५:४अनु २८:१५, ४८; यश ३:१; यहे ४:११, १६
विलाप. ५:५अनु २८:६५
विलाप. ५:६यश ३०:२; यिर्म ४४:१२; यहे १७:१७, १८
विलाप. ५:६२इत २८:१६; यिर्म २:१८, ३६
विलाप. ५:९यहे ४:१०
विलाप. ५:१०२रा २५:३; विल ४:८
विलाप. ५:११अनु २८:३०
विलाप. ५:१२यिर्म ३९:६
विलाप. ५:१२यश ४७:६; यिर्म ६:११; विल ४:१६
विलाप. ५:१४यहो २०:४
विलाप. ५:१४यिर्म २५:१०
विलाप. ५:१५आम ८:१०
विलाप. ५:१७विल १:२२
विलाप. ५:१७अनु २८:६५
विलाप. ५:१८यिर्म २६:१८
विलाप. ५:१९स्तो १०२:१२; १४५:१३; १४६:१०
विलाप. ५:२०स्तो ७९:५; यिर्म १४:१९
विलाप. ५:२१अनु ४:३०; स्तो ८०:३; ८५:४; यिर्म ३१:१८
विलाप. ५:२१यिर्म ३३:१३
विलाप. ५:२२अनु २८:१५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
विलापगीत ५:१-२२

विलापगीत

५ हे यहोवा, आमच्यावर आलेलं संकट आठव.

आमचा किती अपमान झालाय, ते पाहा.+

 २ आमचा वारसा परक्यांच्या हाती; आमची घरं विदेश्‍यांच्या हाती देण्यात आली आहेत.+

 ३ आम्ही वडील नसलेल्या अनाथ मुलांसारखे झालो आहोत; आमच्या आया विधवांसारख्या झाल्या आहेत.+

 ४ आमचंच पाणी आम्हाला विकत घ्यावं लागतं+ आणि आमच्याच लाकडासाठी आम्हाला किंमत मोजावी लागते.

 ५ आमचा पाठलाग करणारे आमच्या मानेवर बसले आहेत;

आम्ही थकून गेलो आहोत, आम्हाला विश्रांती मिळत नाही.+

 ६ पुरेसं अन्‍न मिळावं म्हणून आम्ही इजिप्तपुढे*+ आणि अश्‍शूरपुढे हात पसरतो.+

 ७ ज्यांनी पाप केलं, ते आमचे वाडवडील आता जिवंत नाहीत, पण त्यांच्या अपराधांची शिक्षा आम्ही भोगतोय.

 ८ आता सेवक आमच्यावर राज्य करत आहेत; आम्हाला त्यांच्या हातून सोडवणारं कोणीही नाही.

 ९ ओसाड रानातल्या तलवारीमुळे, आम्ही आपला जीव धोक्यात घालून अन्‍न मिळवतो.+

१० भुकेने आम्ही व्याकूळ झाल्यामुळे, आमची त्वचा भट्टीसारखी तापली आहे.+

११ सीयोनमधल्या स्त्रियांची, यहूदाच्या शहरांतल्या कुमारींची त्यांनी अब्रू लुटली आहे.+

१२ अधिकाऱ्‍यांना हाताने लटकवण्यात आलं;+ वडीलजनांना जराही आदर दाखवण्यात आला नाही.+

१३ तरुण माणसं जातं उचलतात आणि लाकडांच्या ओझ्यामुळे लहान मुलं अडखळतात.

१४ वडीलजन शहराच्या फाटकांमधून निघून गेले आहेत;+ तरुण आपली वाद्यं वाजवत नाहीत.+

१५ आमच्या मनातला आनंद हरवला आहे; आमचं नाचगाणं शोकात बदललं आहे.+

१६ आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आम्ही पाप केलंय, आमचा धिक्कार असो!

१७ यामुळे आमच्या मनाला यातना होत आहेत,*+

आणि या गोष्टींमुळे आमची दृष्टी अंधूक झाली आहे.+

१८ सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे,+ आता तिथे कोल्हे फिरतात.

१९ हे यहोवा, तू तर तुझ्या राजासनावर सर्वकाळासाठी विराजमान आहेस.

तुझं राजासन पिढ्या न्‌ पिढ्या टिकून राहील.+

२० तू आम्हाला कायमचं का विसरतोस? तू आम्हाला इतका काळ का टाकून देतोस?+

२१ हे यहोवा, आम्हाला तुझ्याकडे परत आण; आम्ही आनंदाने तुझ्याकडे परतू.+

आमचे पूर्वीचे दिवस परत आण.+

२२ पण तू तर आम्हाला पूर्णपणे झिडकारलं आहेस.

तू आमच्यावर खूप संतप्त आहेस.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा