वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ३६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • आवश्‍यकतेपेक्षा जास्त दान (१-७)

      • उपासना मंडपाचं बांधकाम (८-३८)

निर्गम ३६:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “बुद्धिमान हृदयाचा प्रत्येक माणूस.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:९; ३१:६

निर्गम ३६:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३; ३५:१०
  • +निर्ग ३५:२१, २६

निर्गम ३६:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३५:५-९; नीत ३:९; २कर ९:७

निर्गम ३६:८

तळटीपा

  • *

    कदाचित हे बसालेल याला सूचित करत असावं.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:६
  • +निर्ग २५:९; ३९:३२; इब्री ९:९
  • +निर्ग २६:१-६

निर्गम ३६:९

तळटीपा

  • *

    एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

निर्गम ३६:११

तळटीपा

  • *

    आकडे अडकवण्यासाठी सुतापासून बनवलेले वळसे.

निर्गम ३६:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:७-११

निर्गम ३६:१९

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत तहश  हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील  म्हणतात. हा डॉल्फीन  माशाच्या आकाराचा असतो.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:१४

निर्गम ३६:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:१०, २३; २७:१; ३०:५; ३६:३६
  • +निर्ग २६:१५-१८

निर्गम ३६:२२

तळटीपा

  • *

    म्हणजे, लाकडाला एखाद्या वस्तूशी जोडण्यासाठी त्याच्या शेवटी कापून बनवलेलं टोक.

निर्गम ३६:२४

तळटीपा

  • *

    म्हणजे, कुसू बसवता येईल असा खड्डा असलेली वस्तू.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:१९-२१

निर्गम ३६:२७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:२२-२५

निर्गम ३६:३१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:२६-२८

निर्गम ३६:३४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:२९

निर्गम ३६:३५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:२१; इब्री १०:१९, २०
  • +उत्प ३:२४; निर्ग २६:३१, ३२

निर्गम ३६:३७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:३६, ३७

निर्गम ३६:३८

तळटीपा

  • *

    किंवा जोडण्यासाठी “कडे; बंध.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ३६:१निर्ग २५:९; ३१:६
निर्ग. ३६:२निर्ग २८:३; ३५:१०
निर्ग. ३६:२निर्ग ३५:२१, २६
निर्ग. ३६:३निर्ग ३५:५-९; नीत ३:९; २कर ९:७
निर्ग. ३६:८निर्ग ३१:६
निर्ग. ३६:८निर्ग २५:९; ३९:३२; इब्री ९:९
निर्ग. ३६:८निर्ग २६:१-६
निर्ग. ३६:१४निर्ग २६:७-११
निर्ग. ३६:१९निर्ग २६:१४
निर्ग. ३६:२०निर्ग २५:१०, २३; २७:१; ३०:५; ३६:३६
निर्ग. ३६:२०निर्ग २६:१५-१८
निर्ग. ३६:२४निर्ग २६:१९-२१
निर्ग. ३६:२७निर्ग २६:२२-२५
निर्ग. ३६:३१निर्ग २६:२६-२८
निर्ग. ३६:३४निर्ग २६:२९
निर्ग. ३६:३५निर्ग ४०:२१; इब्री १०:१९, २०
निर्ग. ३६:३५उत्प ३:२४; निर्ग २६:३१, ३२
निर्ग. ३६:३७निर्ग २६:३६, ३७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ३६:१-३८

निर्गम

३६ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्र सेवेची सगळी कामं कशी करावीत, हे समजून घेण्यासाठी यहोवाने ज्यांना बुद्धी आणि समजशक्‍ती दिली आहे, अशा प्रत्येक कारागिरासोबत* आणि अहलियाबसोबत बसालेल काम करेल.”+

२ मग मोशेने बसालेल आणि अहलियाब यांना बोलावलं. तसंच, यहोवाने ज्यांचं हृदय बुद्धीने भरलं होतं,+ म्हणजे ज्या कोणाच्या हृदयाने त्याला काम करण्यासाठी स्वेच्छेने पुढे यायला प्रेरित केलं होतं,+ अशा सर्व कारागिरांनाही त्याने बोलावलं. ३ तेव्हा त्यांनी पवित्र सेवेच्या कामासाठी इस्राएली लोकांनी दान म्हणून आणलेल्या सर्व वस्तू मोशेकडून घेतल्या.+ पण तरीही इस्राएली लोक दररोज सकाळी स्वेच्छेने अर्पणं आणतच राहिले.

४ मग त्यांनी पवित्र काम सुरू केल्यावर, सर्व कारागीर एकापाठोपाठ एक येऊ लागले. ५ तेव्हा ते मोशेला म्हणू लागले: “यहोवाने आज्ञा दिलेल्या कामासाठी लागतील त्यापेक्षाही खूप जास्त गोष्टी लोक आणत आहेत.” ६ मग मोशेने सबंध छावणीत अशी घोषणा करण्याची आज्ञा दिली: “आता कोणीही पवित्र दान म्हणून आणखी काहीही आणू नका.” अशा रितीने लोकांना आणखी दान आणण्यापासून थांबवण्यात आलं. ७ सर्व काम पूर्ण करण्यासाठी या गोष्टी पुरेशा होत्या, खरंतर त्यापेक्षाही जास्त होत्या.

८ तेव्हा सर्व कारागिरांनी+ चांगल्या प्रतीची मलमल, निळं सूत, जांभळी लोकर आणि गडद लाल रंगाचं सूत यांपासून उपासना मंडपाची+ दहा कापडं बनवली. त्याने* त्या कापडांवर भरतकामाने करूब* बनवले.+ ९ प्रत्येक कापडाची लांबी २८ हात* आणि रुंदी चार हात होती. सगळी कापडं एकाच मापाची होती. १० मग त्याने पाच कापडं एकापाठोपाठ एक जोडली आणि उरलेली पाच कापडंही तशीच एकापाठोपाठ एक जोडली. ११ यानंतर या कापडांना एकमेकांशी जोडण्यासाठी त्याने एका कापडाच्या कडेवर निळ्या सुताचे फास* बनवले. मग दुसऱ्‍या कापडाला जिथे जोडलं जाणार होतं, तिथेही त्याने कापडाच्या कडेला तसेच फास बनवले. १२ त्याने एका कापडाच्या कडेला ५० फास आणि दुसऱ्‍या कापडाच्या कडेलाही ५० फास बनवले. त्याने ते फास अशा रितीने बनवले, की कापडांना जोडल्यावर ते फास समोरासमोर असतील. १३ शेवटी, त्याने सोन्याचे ५० आकडे बनवले आणि त्या आकड्यांनी दोन्ही कापडांना एकत्र जोडलं. अशा रितीने एकच अखंड उपासनेचा मंडप तयार झाला.

१४ यानंतर त्याने बकरीच्या केसांपासूनही उपासना मंडपावर टाकण्यासाठी कापडं बनवली. त्याने एकूण ११ कापडं बनवली.+ १५ प्रत्येक कापडाची लांबी ३० हात आणि रुंदी चार हात होती. सर्व ११ कापडं एकाच मापाची होती. १६ मग त्याने पाच कापडं एकत्र जोडली आणि उरलेली सहा कापडंही तशीच एकत्र जोडली. १७ यानंतर या कापडांना एकमेकांशी जोडण्यासाठी त्याने एका कापडाच्या कडेवर ५० फास बनवले. मग दुसऱ्‍या कापडाला जोडण्यासाठी त्याने त्या कापडाच्या कडेलाही ५० फास बनवले. १८ तसंच त्याने तांब्याचे ५० आकडे बनवले आणि मंडपाचं कापड जोडून एक अखंड कापड तयार केलं.

१९ त्याने उपासना मंडपाला झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातडीचं; आणि त्याच्यावर टाकण्यासाठी तहशाच्या* कातडीचं आच्छादन बनवलं.+

२० मग त्याने उपासना मंडपासाठी बाभळीच्या लाकडापासून+ उभ्या चौकटी बनवल्या.+ २१ प्रत्येक चौकट दहा हात उंच आणि दीड हात रुंद होती. २२ प्रत्येक चौकटीला दोन समांतर कुसू* होते. अशाच रितीने त्याने उपासना मंडपाच्या सगळ्या चौकटी बनवल्या. २३ मग त्याने उपासना मंडपाच्या दक्षिणेकडच्या भागासाठी २० चौकटी तयार केल्या. २४ त्यानंतर त्याने २० चौकटींच्या खाली ठेवण्यासाठी खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका* बनवल्या; एका चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखालच्या दोन कुसूंसाठी, खाच असलेल्या दोन बैठका बनवल्या.+ २५ उपासना मंडपाच्या दुसऱ्‍या भागासाठी, म्हणजे उत्तरेकडच्या भागासाठी त्याने २० चौकटी बनवल्या, २६ आणि त्यांच्यासाठी खाच असलेल्या चांदीच्या ४० बैठका बनवल्या. त्याने एका चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका आणि त्यानंतर प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका बनवल्या.

२७ उपासना मंडपाच्या मागच्या बाजूसाठी, म्हणजे पश्‍चिमेकडच्या बाजूसाठी त्याने सहा चौकटी बनवल्या.+ २८ उपासना मंडपाच्या मागच्या दोन कोपऱ्‍यांसाठी त्याने दोन चौकटी बनवल्या. २९ त्याने यांपैकी प्रत्येक चौकटीसाठी खालून वरपर्यंत दोन भाग बनवले आणि ते पहिल्या कडीजवळ जोडले. कोपऱ्‍यांवरच्या दोन्ही चौकटी त्याने अशाच प्रकारे बनवल्या. ३० अशा रितीने, आठ चौकटी आणि खाच असलेल्या चांदीच्या १६ बैठका झाल्या. प्रत्येक चौकटीखाली खाच असलेल्या दोन बैठका होत्या.

३१ मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवले. उपासना मंडपाच्या एका बाजूच्या चौकटींसाठी पाच दांडे,+ ३२ आणि त्याच्या दुसऱ्‍या बाजूच्या चौकटींसाठी त्याने पाच दांडे बनवले. तसंच, उपासना मंडपाच्या मागच्या बाजूसाठी, म्हणजे पश्‍चिमेकडच्या चौकटींसाठीही त्याने पाच दांडे बनवले. ३३ चौकटींच्या मध्यभागी लावण्यासाठी त्याने एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत पोहोचेल इतका लांब दांडा बनवला. ३४ त्याने चौकटींना सोन्याने मढवलं आणि दांडे अडकवण्याच्या त्यांच्या कड्या सोन्याच्या बनवल्या. तसंच, त्याने दांड्यांनाही सोन्याने मढवलं.+

३५ मग त्याने निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून एक पडदा बनवला.+ त्याने त्याच्यावर भरतकामाने करूब बनवले.+ ३६ या पडद्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवले आणि त्यांना सोन्याने मढवलं. तसंच, त्याने सोन्याचे आकडे बनवले आणि खांबांसाठी खाच असलेल्या चांदीच्या चार बैठका बनवल्या. ३७ मग त्याने मंडपाच्या प्रवेशासाठी निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल यांपासून विणलेला एक पडदा बनवला.+ ३८ तसंच, त्यासाठी पाच खांब आणि त्यांचे आकडे त्याने बनवले. खांबांच्या वरच्या टोकांना आणि कड्यांना* त्याने सोन्याने मढवलं, पण त्यांच्या खाच असलेल्या पाच बैठका तांब्याच्या होत्या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा