वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ३५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • शब्बाथाविषयी सूचना (१-३)

      • उपासना मंडपासाठी दान (४-२९)

      • बसालेल आणि अहलियाब यांना भरपूर प्रमाणात पवित्र शक्‍ती मिळते (३०-३५)

निर्गम ३५:१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:३२

निर्गम ३५:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:९, १०; लेवी २३:३
  • +निर्ग ३१:१४, १५; गण १५:३२, ३५

निर्गम ३५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९५, पृ. २९

निर्गम ३५:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:२-७; ३५:२९
  • +२कर ८:१२; ९:७

निर्गम ३५:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २६:७; ३६:८

निर्गम ३५:७

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत तहश  हा शब्द एका समुद्री प्राण्याला सूचित करतो. इंग्रजीत या प्राण्याला सील  म्हणतात. हा डॉल्फीन  माशाच्या आकाराचा असतो.

निर्गम ३५:८

तळटीपा

  • *

    काही झुडपांपासून आणि वृक्षांपासून बनवलं जाणारं सुगंधी तेल. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:३, ६

निर्गम ३५:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:१५
  • +निर्ग २८:९; ३९:१४

निर्गम ३५:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “बुद्धिमान हृदयाचे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:६; ३६:१

निर्गम ३५:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:१०
  • +निर्ग २५:१३
  • +निर्ग २५:१७
  • +निर्ग २६:३१

निर्गम ३५:१३

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:२३
  • +निर्ग २५:३०; लेवी २४:५, ६

निर्गम ३५:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:३१
  • +निर्ग २७:२०

निर्गम ३५:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:१; ३७:२५; ४०:५
  • +निर्ग ३०:३४, ३५

निर्गम ३५:१६

तळटीपा

  • *

    किंवा “गंगाळ.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २७:१
  • +निर्ग ३०:१८; ३८:८

निर्गम ३५:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २७:९

निर्गम ३५:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग २७:१९

निर्गम ३५:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:६, १०; ३९:३३, ४१
  • +निर्ग ३९:१

निर्गम ३५:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:२; ३६:२; २कर ८:१२; ९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२०००, पृ. २८-२९

    ४/१/१९९५, पृ. १८

निर्गम ३५:२२

तळटीपा

  • *

    कदाचित, या कपड्यांना लावण्याच्या शोभेच्या पिना असाव्यात.

  • *

    किंवा “ओवाळण्याची अर्पणं.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३८:२४

निर्गम ३५:२५

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:३; ३१:६; ३६:८

निर्गम ३५:२७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:१५, २८; ३९:१५, २१

निर्गम ३५:२८

तळटीपा

  • *

    काही झुडपांपासून आणि वृक्षांपासून बनवलं जाणारं सुगंधी तेल. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:२३-२५
  • +निर्ग ३०:३४, ३५

निर्गम ३५:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३६:५; २कर ९:७

निर्गम ३५:३०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:२-६

निर्गम ३५:३१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

निर्गम ३५:३४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३६:१

निर्गम ३५:३५

तळटीपा

  • *

    म्हणजे, हाताने कापड विणण्याचं साधन.

  • *

    शब्दशः “हृदयाची बुद्धी.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ३५:१निर्ग ३४:३२
निर्ग. ३५:२निर्ग २०:९, १०; लेवी २३:३
निर्ग. ३५:२निर्ग ३१:१४, १५; गण १५:३२, ३५
निर्ग. ३५:५निर्ग २५:२-७; ३५:२९
निर्ग. ३५:५२कर ८:१२; ९:७
निर्ग. ३५:६निर्ग २६:७; ३६:८
निर्ग. ३५:८निर्ग २५:३, ६
निर्ग. ३५:९निर्ग २८:१५
निर्ग. ३५:९निर्ग २८:९; ३९:१४
निर्ग. ३५:१०निर्ग ३१:६; ३६:१
निर्ग. ३५:१२निर्ग २५:१०
निर्ग. ३५:१२निर्ग २५:१३
निर्ग. ३५:१२निर्ग २५:१७
निर्ग. ३५:१२निर्ग २६:३१
निर्ग. ३५:१३निर्ग २५:२३
निर्ग. ३५:१३निर्ग २५:३०; लेवी २४:५, ६
निर्ग. ३५:१४निर्ग २५:३१
निर्ग. ३५:१४निर्ग २७:२०
निर्ग. ३५:१५निर्ग ३०:१; ३७:२५; ४०:५
निर्ग. ३५:१५निर्ग ३०:३४, ३५
निर्ग. ३५:१६निर्ग २७:१
निर्ग. ३५:१६निर्ग ३०:१८; ३८:८
निर्ग. ३५:१७निर्ग २७:९
निर्ग. ३५:१८निर्ग २७:१९
निर्ग. ३५:१९निर्ग ३१:६, १०; ३९:३३, ४१
निर्ग. ३५:१९निर्ग ३९:१
निर्ग. ३५:२१निर्ग २५:२; ३६:२; २कर ८:१२; ९:७
निर्ग. ३५:२२निर्ग ३८:२४
निर्ग. ३५:२५निर्ग २८:३; ३१:६; ३६:८
निर्ग. ३५:२७निर्ग २८:१५, २८; ३९:१५, २१
निर्ग. ३५:२८निर्ग ३०:२३-२५
निर्ग. ३५:२८निर्ग ३०:३४, ३५
निर्ग. ३५:२९निर्ग ३६:५; २कर ९:७
निर्ग. ३५:३०निर्ग ३१:२-६
निर्ग. ३५:३४निर्ग ३६:१
निर्ग. ३५:३५निर्ग ३१:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ३५:१-३५

निर्गम

३५ नंतर मोशेने सर्व इस्राएली लोकांना एकत्र बोलावून त्यांना असं म्हटलं: “यहोवाने या सर्व गोष्टी करण्याची आज्ञा दिली आहे:+ २ सहा दिवस तुम्ही काम करू शकता, पण सातवा दिवस तुमच्यासाठी पवित्र असेल; तो यहोवाला समर्पित केलेला पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ असेल.+ त्या दिवशी जर कोणीही काम केलं, तर त्याला ठार मारलं जाईल.+ ३ शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या वस्त्यांमध्ये कुठेही आग पेटवू नका.”

४ मग मोशे सर्व इस्राएली लोकांना म्हणाला: “यहोवाने आज्ञा दिली आहे की, ५ ‘यहोवासाठी दान गोळा करा.+ ज्या कोणाला मनापासून इच्छा असेल,+ त्याने यहोवासाठी दान म्हणून या गोष्टी आणाव्यात: सोनं, चांदी, तांबं, ६ निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत, चांगल्या प्रतीची मलमल, बकरीचे केस,+ ७ लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची* कातडी, बाभळीचं लाकूड, ८ दिव्यांसाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधित धूपासाठी बाल्सम,*+ ९ गोमेद रत्नं, तसंच, एफोद* व ऊरपटात*+ बसवण्यासाठी इतर रत्नं.+

१० तुमच्यापैकी ज्यांच्याजवळ कौशल्य आहे,*+ अशा सर्वांनी येऊन यहोवाने आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी बनवाव्यात. ११ म्हणजेच, उपासना मंडप आणि तो झाकण्यासाठी असलेली कापडं, त्याचे आकडे, चौकटी, दांडे, खांब आणि खाच असलेल्या बैठका; १२ साक्षपेटी+ आणि तिचे दांडे,+ तिचं झाकण+ आणि पडदा;+ १३ मेज+ आणि त्याचे दांडे, त्याची सगळी भांडी आणि अर्पणाच्या भाकरी;+ १४ उजेड देण्यासाठी दीपवृक्ष+ आणि त्याची भांडी, त्याचे दिवे आणि दिव्यांसाठी तेल;+ १५ धूपवेदी+ आणि तिचे दांडे; अभिषेकाचं तेल आणि सुगंधित धूप;+ उपासना मंडपाच्या प्रवेशासाठी पडदा; १६ होमार्पणाची वेदी+ आणि तिची तांब्याची जाळी, तिचे दांडे आणि तिची सगळी भांडी; तांब्याचं मोठं भांडं* आणि त्याची बैठक;+ १७ अंगणाभोवती लावायचे पडदे,+ त्यांचे खांब आणि खाच असलेल्या बैठका; अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा; १८ उपासना मंडपाच्या खुंट्या, तसंच अंगणाच्या खुंट्या आणि त्यांचे दोर;+ १९ उपासनेच्या ठिकाणी सेवा करणाऱ्‍यांसाठी कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं,+ अहरोन याजकाची पवित्र वस्त्रं,+ तसंच याजक म्हणून सेवा करणाऱ्‍या त्याच्या मुलांची वस्त्रं.’”

२० तेव्हा सर्व इस्राएली लोक मोशेसमोरून निघून गेले. २१ मग, ज्या कोणाच्या हृदयाने त्याला प्रेरणा दिली+ आणि ज्या कोणाला अंतःकरणापासून वाटलं तो आला, आणि त्याने भेटमंडपासाठी, तिथल्या उपासनेच्या सगळ्या कामांसाठी, तसंच पवित्र वस्त्रं तयार करण्यासाठी लागणाऱ्‍या सर्व वस्तू यहोवासाठी दान म्हणून आणल्या. २२ ज्यांना मनापासून इच्छा झाली असे सगळे स्त्रीपुरुष येतच राहिले; आणि त्यांनी सोन्याचे कानातले, आकडे,* अंगठ्या आणि इतर दागिने, तसंच सोन्याच्या सर्व प्रकारच्या वस्तू आणल्या. त्या सर्वांनी आणलेल्या सोन्याच्या या वस्तू* त्यांनी यहोवाला अर्पण केल्या.+ २३ ज्यांच्या ज्यांच्याजवळ निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत, चांगल्या प्रतीची मलमल, बकरीचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तसंच तहशाची कातडी होती, त्यांनी त्यांनी ती आणली. २४ चांदी आणि तांबं अर्पण करणाऱ्‍या सर्वांनी यहोवासाठी ते दान म्हणून आणलं, आणि ज्यांच्याजवळ बाभळीचं लाकूड होतं, त्यांनी ते वेगवेगळ्या कामांसाठी आणलं.

२५ सगळ्या कारागीर स्त्रियांनी+ हाताने सूत कातलं आणि त्यांनी ते कातलेलं सूत, म्हणजेच निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल आणली. २६ ज्या कारागीर स्त्रियांच्या हृदयाने त्यांना प्रेरित केलं, त्या सर्व स्त्रियांनी बकरीचे केस कातून सूत तयार केलं.

२७ मग प्रधानांनी एफोद आणि ऊरपटावर+ बसवण्यासाठी गोमेद व इतर रत्नं, २८ तसंच दिव्यांसाठी, अभिषेकाच्या तेलासाठी+ आणि सुगंधित धूपासाठी+ बाल्सम* व तेल आणलं. २९ ज्या स्त्रीपुरुषांच्या हृदयाने त्यांना प्रेरित केलं, त्या सर्वांनी मोशेद्वारे यहोवाने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी तयार करण्यासाठी काही ना काही आणलं; इस्राएली लोकांनी त्या वस्तू यहोवाला स्वेच्छेने अर्पण केल्या.+

३० मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला: “पाहा, यहोवाने यहूदा वंशातल्या हूरचा नातू, म्हणजे उरीचा मुलगा बसालेल याला निवडलं आहे.+ ३१ त्याने त्याला भरपूर प्रमाणात पवित्र शक्‍ती* दिली आहे, तसंच सर्व प्रकारची कौशल्याची कामं करण्यासाठी बुद्धी, समजशक्‍ती आणि ज्ञान दिलं आहे, ३२ म्हणजे त्याला कलाकौशल्याची कामं करता येतील; सोनं, चांदी आणि तांबं यांच्या वस्तू बनवता येतील; ३३ तसंच, रत्नांना आकार देऊन ती कोंदणात बसवता येतील आणि लाकडापासून सर्व प्रकारच्या कलात्मक वस्तू बनवता येतील. ३४ आणि देवाने बसालेल आणि दान वंशातल्या अहिसामाकचा मुलगा अहलियाब+ या दोघांना शिकवण्याची क्षमता दिली आहे. ३५ त्याने त्यांना कारागिराचं, भरतकाम करणाऱ्‍याचं, तसंच, निळं सूत, जांभळी लोकर, गडद लाल रंगाचं सूत आणि चांगल्या प्रतीची मलमल विणणाऱ्‍याचं आणि हातमागाच्या* कारागिराचं कौशल्य* दिलं आहे.+ ती दोघं सर्व प्रकारची कामं करतील आणि नमुने तयार करतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा