वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ३७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • साक्षपेटी बनवणं (१-९)

      • मेज (१०-१६)

      • दीपवृक्ष (१७-२४)

      • धूपवेदी (२५-२९)

निर्गम ३७:१

तळटीपा

  • *

    एक हात म्हणजे ४४.५ सें.मी. (१७.५ इंच). अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:२-५; ३८:२२
  • +निर्ग ४०:३; गण १०:३३
  • +निर्ग २५:१०-१५

निर्गम ३७:२

तळटीपा

  • *

    किंवा “नक्षीदार पट्टी.”

समासातील संदर्भ

  • +इब्री ९:४

निर्गम ३७:४

समासातील संदर्भ

  • +२इत ५:९

निर्गम ३७:५

समासातील संदर्भ

  • +यहो ३:८

निर्गम ३७:६

समासातील संदर्भ

  • +लेवी १६:२, १४; १इत २८:११
  • +निर्ग २५:१७-२०

निर्गम ३७:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:२०
  • +उत्प ३:२४

निर्गम ३७:९

समासातील संदर्भ

  • +इब्री ९:५
  • +१शमु ४:४; स्तो ८०:१

निर्गम ३७:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:४
  • +निर्ग २५:२३-२८

निर्गम ३७:११

तळटीपा

  • *

    किंवा “नक्षीदार पट्टी.”

निर्गम ३७:१२

तळटीपा

  • *

    सुमारे ७.४ सें.मी. (२.९ इंच). अति. ख१४ पाहा.

  • *

    किंवा “नक्षीदार पट्टी.”

निर्गम ३७:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:२९

निर्गम ३७:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:२४; लेवी २४:४; २इत १३:११
  • +निर्ग २५:३१-३९

निर्गम ३७:२३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +गण ८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२४

निर्गम ३७:२४

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

निर्गम ३७:२५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:७; ४०:५; स्तो १४१:२; प्रक ८:३
  • +निर्ग ३०:१-५

निर्गम ३७:२६

तळटीपा

  • *

    किंवा “नक्षीदार पट्टी.”

निर्गम ३७:२७

तळटीपा

  • *

    किंवा “नक्षीदार पट्टीच्या.”

निर्गम ३७:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३०:२५, ३३; ४०:९
  • +निर्ग ३०:३४, ३५; स्तो १४१:२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ३७:१निर्ग ३१:२-५; ३८:२२
निर्ग. ३७:१निर्ग ४०:३; गण १०:३३
निर्ग. ३७:१निर्ग २५:१०-१५
निर्ग. ३७:२इब्री ९:४
निर्ग. ३७:४२इत ५:९
निर्ग. ३७:५यहो ३:८
निर्ग. ३७:६लेवी १६:२, १४; १इत २८:११
निर्ग. ३७:६निर्ग २५:१७-२०
निर्ग. ३७:७निर्ग ४०:२०
निर्ग. ३७:७उत्प ३:२४
निर्ग. ३७:९इब्री ९:५
निर्ग. ३७:९१शमु ४:४; स्तो ८०:१
निर्ग. ३७:१०निर्ग ४०:४
निर्ग. ३७:१०निर्ग २५:२३-२८
निर्ग. ३७:१६निर्ग २५:२९
निर्ग. ३७:१७निर्ग ४०:२४; लेवी २४:४; २इत १३:११
निर्ग. ३७:१७निर्ग २५:३१-३९
निर्ग. ३७:२३गण ८:२
निर्ग. ३७:२५निर्ग ३०:७; ४०:५; स्तो १४१:२; प्रक ८:३
निर्ग. ३७:२५निर्ग ३०:१-५
निर्ग. ३७:२९निर्ग ३०:२५, ३३; ४०:९
निर्ग. ३७:२९निर्ग ३०:३४, ३५; स्तो १४१:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ३७:१-२९

निर्गम

३७ त्यानंतर, बसालेलने+ बाभळीच्या लाकडापासून साक्षपेटी+ बनवली. ती अडीच हात लांब, दीड हात* रुंद आणि दीड हात उंच होती.+ २ त्याने ती आतून व बाहेरून शुद्ध सोन्याने मढवली आणि तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनवली.+ ३ मग त्याने पेटीच्या चार पायांच्या वरती बसवण्यासाठी, साच्यांमध्ये ओतून सोन्याच्या चार कड्या बनवल्या. त्याने एका बाजूला दोन कड्या आणि दुसऱ्‍या बाजूला दोन कड्या बसवल्या. ४ यानंतर, त्याने बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवले आणि ते सोन्याने मढवले.+ ५ मग त्याने साक्षपेटी उचलण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कड्यांमध्ये ते दांडे घातले.+

६ त्याने शुद्ध सोन्याचं झाकण बनवलं.+ ते अडीच हात लांब आणि दीड हात रुंद होतं.+ ७ मग, झाकणाच्या दोन टोकांवर+ त्याने हातोडीने ठोकून सोन्याचे दोन करूब*+ घडवले. ८ एका टोकावर एक करूब, तर दुसऱ्‍या टोकावर दुसरा करूब होता. त्याने झाकणाच्या दोन्ही टोकांवर करूब बनवले. ९ त्या करुबांचे दोन पंख वरच्या बाजूला पसरलेले होते. त्यांनी आपल्या पंखांनी झाकणाला झाकलं होतं+ आणि ते एकमेकांच्या समोरासमोर होते. त्यांचे चेहरे खाली झाकणाकडे वळलेले होते.+

१० त्यानंतर त्याने बाभळीच्या लाकडाचं एक मेजही बनवलं.+ त्याची लांबी दोन हात, रुंदी एक हात आणि उंची दीड हात होती.+ ११ त्याने त्याला शुद्ध सोन्याने मढवलं आणि त्याच्यासभोवती सोन्याची किनार* बनवली. १२ मग त्याने मेजाला चार बोटं रुंदीची* एक चौकट बनवली आणि त्या चौकटीला सोन्याची किनार* बनवली. १३ नंतर, त्याने त्याच्यासाठी साच्यांमध्ये ओतून सोन्याच्या चार कड्या बनवल्या आणि त्याच्या चार कोपऱ्‍यांवर त्याच्या पायांच्या वरती त्या बसवल्या. १४ त्या कड्या चौकटीजवळ होत्या; मेज उचलून नेताना त्या कड्यांमधून दांडे घातले जायचे. १५ मग त्याने मेज उचलून नेण्यासाठी, बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवले आणि ते सोन्याने मढवले. १६ यानंतर त्याने मेजावर ठेवण्याची भांडी, म्हणजेच ताटं व प्याले आणि पेयार्पणं ओतण्यासाठी सुरया आणि वाट्या शुद्ध सोन्यापासून बनवल्या.+

१७ मग त्याने शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष+ बनवला. त्याने तो हातोडीने ठोकून घडवला. त्याचा तळ, बुंधा, फुलं, कळ्या आणि पाकळ्या एकाच अखंड तुकड्याचे होते.+ १८ दीपवृक्षाच्या बुंध्याला सहा फांद्या होत्या. एका बाजूला तीन फांद्या आणि दुसऱ्‍या बाजूला तीन फांद्या होत्या. १९ एका बाजूच्या प्रत्येक फांदीवर बदामाच्या फुलाच्या आकाराची तीन फुलं होती आणि आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या होत्या. दुसऱ्‍या बाजूच्या प्रत्येक फांदीचीही अशीच रचना होती. दीपवृक्षाच्या सर्व सहा फांद्यांची रचना अशीच होती. २० दीपवृक्षाच्या बुंध्याला बदामाच्या फुलासारखी चार फुलं होती आणि त्याला आलटूनपालटून कळ्या आणि पाकळ्या होत्या. २१ दीपवृक्षाच्या बुंध्यातून निघणाऱ्‍या सहा फांद्यांपैकी पहिल्या दोन फांद्यांखाली एक कळी, त्यानंतरच्या दोन फांद्यांखाली एक कळी आणि त्यानंतरच्या दोन फांद्यांखालीही एक कळी होती. २२ कळ्या, फांद्या आणि संपूर्ण दीपवृक्ष हा शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून हातोडीने ठोकून घडवलेला होता. २३ मग त्याने त्याचे सात दिवे+ आणि त्यांचे चिमटे, त्याची धूप जाळण्याची पात्रं* शुद्ध सोन्यापासून बनवली. २४ त्याने ही सर्व भांडी आणि दीपवृक्ष एक तालान्त* वजनाच्या शुद्ध सोन्यापासून बनवला.

२५ मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी+ बनवली. ती चौकोनी होती; तिची लांबी एक हात, रुंदी एक हात आणि उंची दोन हात होती. वेदी आणि तिची शिंगं एकाच तुकड्यापासून बनवलेली होती.+ २६ त्याने तिला शुद्ध सोन्याने मढवलं. वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू आणि तिची शिंगं त्याने शुद्ध सोन्याने मढवली. त्याने तिच्यासभोवती सोन्याची किनार* बनवली. २७ वेदीच्या दोन बाजूंना, किनारीच्या* खाली त्याने सोन्याच्या दोन कड्या बनवल्या; वेदी उचलून नेताना या कड्यांमधून दांडे घातले जायचे. २८ मग त्याने बाभळीच्या लाकडापासून दांडे बनवले आणि ते सोन्याने मढवले. २९ तसंच त्याने अभिषेकाचं पवित्र तेल बनवलं,+ आणि कुशलपणे मिश्रण तयार करून शुद्ध सुगंधित धूप बनवला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा