वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ३४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • दगडाच्या नवीन पाट्या (१-४)

      • मोशे यहोवाचं तेज पाहतो (५-९)

      • करारातल्या बारीकसारीक गोष्टी पुन्हा सांगितल्या जातात (१०-२८)

      • मोशेच्या चेहऱ्‍यातून किरणं निघतात (२९-३५)

निर्गम ३४:१

समासातील संदर्भ

  • +अनु १०:१
  • +निर्ग ३२:१९; अनु ९:१७
  • +अनु ९:१०

निर्गम ३४:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:२०; २४:१२

निर्गम ३४:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१२, १३

निर्गम ३४:५

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:३८
  • +निर्ग ६:३; ३३:१९

निर्गम ३४:६

तळटीपा

  • *

    किंवा “कृपाळू.”

  • *

    किंवा “लगेच न रागावणारा.”

  • *

    किंवा “प्रेमदया.”

  • *

    किंवा “विश्‍वासूपणाने.”

समासातील संदर्भ

  • +लूक ६:३६
  • +निर्ग २२:२७; २इत ३०:९; नहे ९:१७; स्तो ८६:१५; योए २:१३
  • +गण १४:१८; २पेत्र ३:९
  • +यिर्म ३१:३; विल ३:२२; मीख ७:१८
  • +स्तो ३१:५; रोम २:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२१, पृ. २-३

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१७, पृ. ८

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००९, पृ. २८

    ६/१/२००५, पृ. १५-१६

    १/१५/२००२, पृ. १३-१४, १७-१८

    १०/१/१९९८, पृ. ८, १२-१३

    २/१/१९९१, पृ. ४

    ज्ञान, पृ. २८-३०

निर्गम ३४:७

समासातील संदर्भ

  • +दान ९:४
  • +स्तो १०३:१२; यश ५५:७; इफि ४:३२; १यो १:९
  • +अनु ३२:३५; यहो २४:१९; रोम २:५; २पेत्र २:४; यहू १४, १५
  • +निर्ग २०:५; अनु ३०:१९; १शमु १५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००९, पृ. २८

    ६/१/२००५, पृ. १५-१६

    १/१५/२००२, पृ. १३, १५, १७-१८

    २/१/१९९१, पृ. ४, ६-७

    २/१/१९८९, पृ. ६

    ज्ञान, पृ. २८-३०

निर्गम ३४:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “कठोर मानेचे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३३:१४
  • +निर्ग ३२:९; ३३:३
  • +गण १४:१९

निर्गम ३४:१०

तळटीपा

  • *

    किंवा “निर्माण करण्यात आल्या नाहीत.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:२३; स्तो १४७:१९, २०
  • +निर्ग ३३:१६; अनु १०:२१

निर्गम ३४:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५, ६; अनु १२:२८
  • +निर्ग ३:८; ३३:२; अनु ७:१

निर्गम ३४:१२

समासातील संदर्भ

  • +अनु ७:२
  • +निर्ग २३:३२, ३३

निर्गम ३४:१३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२४; अनु १२:३

निर्गम ३४:१४

तळटीपा

  • *

    किंवा “प्रतिस्पर्ध्यांना खपवून न घेणारा.”

  • *

    शब्दशः “यहोवा, त्याचं नाव आहे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:३; १कर १०:१४; १यो ५:२१
  • +यहो २४:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १६४-१६५

    नवे जग भाषांतर, पृ. २५५१-२५५२

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००२, पृ. २८

    ९/१५/१९९५, पृ. ८-९

निर्गम ३४:१५

तळटीपा

  • *

    किंवा “देवांशी व्यभिचार करतील.”

समासातील संदर्भ

  • +१कर १०:२०
  • +गण २५:२; २कर ६:१४

निर्गम ३४:१६

समासातील संदर्भ

  • +एज ९:२
  • +अनु ७:४; ३१:१६; शास २:१७; ८:३३; १रा ११:२; नहे १३:२६; स्तो १०६:२८

निर्गम ३४:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:८; लेवी १९:४

निर्गम ३४:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    अति. ख१५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी २३:६
  • +निर्ग २३:१५

निर्गम ३४:१९

तळटीपा

  • *

    शब्दशः “गर्भाशय उघडणारं सर्वकाही.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:२; लूक २:२३
  • +निर्ग २२:३०

निर्गम ३४:२०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:१५; गण १८:१५, १६

निर्गम ३४:२१

तळटीपा

  • *

    किंवा “शब्बाथ पाळा.”

समासातील संदर्भ

  • +अनु ५:१२

निर्गम ३४:२२

तळटीपा

  • *

    याला मंडपांचा सण असंही म्हणतात.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१६; लेवी २३:३४

निर्गम ३४:२३

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१६

निर्गम ३४:२४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९८, पृ. २०

निर्गम ३४:२५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१८
  • +निर्ग १२:१०; गण ९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९१, पृ. २२

निर्गम ३४:२६

समासातील संदर्भ

  • +गण १८:८, १२; अनु २६:२; नीत ३:९
  • +निर्ग २३:१९; अनु १४:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. २७

निर्गम ३४:२७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:४; अनु ३१:९, ११
  • +निर्ग २४:८; अनु ४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. २६

निर्गम ३४:२८

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याने.”

  • *

    शब्दशः “दहा शब्द.”

समासातील संदर्भ

  • +अनु ९:१८
  • +निर्ग ३१:१८; अनु १०:२

निर्गम ३४:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:१५

निर्गम ३४:३०

समासातील संदर्भ

  • +२कर ३:७

निर्गम ३४:३२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:३; अनु १:३

निर्गम ३४:३३

समासातील संदर्भ

  • +२कर ३:१३

निर्गम ३४:३४

समासातील संदर्भ

  • +२कर ३:१६
  • +अनु २७:१०

निर्गम ३४:३५

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याच्याशी.”

समासातील संदर्भ

  • +२कर ३:७, १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ३४:१अनु १०:१
निर्ग. ३४:१निर्ग ३२:१९; अनु ९:१७
निर्ग. ३४:१अनु ९:१०
निर्ग. ३४:२निर्ग १९:२०; २४:१२
निर्ग. ३४:३निर्ग १९:१२, १३
निर्ग. ३४:५प्रेका ७:३८
निर्ग. ३४:५निर्ग ६:३; ३३:१९
निर्ग. ३४:६लूक ६:३६
निर्ग. ३४:६निर्ग २२:२७; २इत ३०:९; नहे ९:१७; स्तो ८६:१५; योए २:१३
निर्ग. ३४:६गण १४:१८; २पेत्र ३:९
निर्ग. ३४:६यिर्म ३१:३; विल ३:२२; मीख ७:१८
निर्ग. ३४:६स्तो ३१:५; रोम २:२
निर्ग. ३४:७दान ९:४
निर्ग. ३४:७स्तो १०३:१२; यश ५५:७; इफि ४:३२; १यो १:९
निर्ग. ३४:७अनु ३२:३५; यहो २४:१९; रोम २:५; २पेत्र २:४; यहू १४, १५
निर्ग. ३४:७निर्ग २०:५; अनु ३०:१९; १शमु १५:२
निर्ग. ३४:९निर्ग ३३:१४
निर्ग. ३४:९निर्ग ३२:९; ३३:३
निर्ग. ३४:९गण १४:१९
निर्ग. ३४:१०२शमु ७:२३; स्तो १४७:१९, २०
निर्ग. ३४:१०निर्ग ३३:१६; अनु १०:२१
निर्ग. ३४:११निर्ग १९:५, ६; अनु १२:२८
निर्ग. ३४:११निर्ग ३:८; ३३:२; अनु ७:१
निर्ग. ३४:१२अनु ७:२
निर्ग. ३४:१२निर्ग २३:३२, ३३
निर्ग. ३४:१३निर्ग २३:२४; अनु १२:३
निर्ग. ३४:१४निर्ग २०:३; १कर १०:१४; १यो ५:२१
निर्ग. ३४:१४यहो २४:१९
निर्ग. ३४:१५१कर १०:२०
निर्ग. ३४:१५गण २५:२; २कर ६:१४
निर्ग. ३४:१६एज ९:२
निर्ग. ३४:१६अनु ७:४; ३१:१६; शास २:१७; ८:३३; १रा ११:२; नहे १३:२६; स्तो १०६:२८
निर्ग. ३४:१७निर्ग ३२:८; लेवी १९:४
निर्ग. ३४:१८लेवी २३:६
निर्ग. ३४:१८निर्ग २३:१५
निर्ग. ३४:१९निर्ग १३:२; लूक २:२३
निर्ग. ३४:१९निर्ग २२:३०
निर्ग. ३४:२०निर्ग १३:१५; गण १८:१५, १६
निर्ग. ३४:२१अनु ५:१२
निर्ग. ३४:२२निर्ग २३:१६; लेवी २३:३४
निर्ग. ३४:२३अनु १६:१६
निर्ग. ३४:२४निर्ग ३४:११
निर्ग. ३४:२५निर्ग २३:१८
निर्ग. ३४:२५निर्ग १२:१०; गण ९:१२
निर्ग. ३४:२६गण १८:८, १२; अनु २६:२; नीत ३:९
निर्ग. ३४:२६निर्ग २३:१९; अनु १४:२१
निर्ग. ३४:२७निर्ग २४:४; अनु ३१:९, ११
निर्ग. ३४:२७निर्ग २४:८; अनु ४:१३
निर्ग. ३४:२८अनु ९:१८
निर्ग. ३४:२८निर्ग ३१:१८; अनु १०:२
निर्ग. ३४:२९निर्ग ३२:१५
निर्ग. ३४:३०२कर ३:७
निर्ग. ३४:३२निर्ग २४:३; अनु १:३
निर्ग. ३४:३३२कर ३:१३
निर्ग. ३४:३४२कर ३:१६
निर्ग. ३४:३४अनु २७:१०
निर्ग. ३४:३५२कर ३:७, १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ३४:१-३५

निर्गम

३४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू दगड कोरून आधीसारख्या दोन पाट्या बनव,+ म्हणजे तू फोडून टाकलेल्या+ आधीच्या पाट्यांवर जे शब्द होते, ते मी या पाट्यांवर लिहीन.+ २ उद्या सकाळसाठी तयार हो, कारण सकाळी तू सीनाय पर्वतावर जाशील आणि पर्वताच्या माथ्यावर माझ्यासमोर उभा राहशील.+ ३ पण तुझ्यासोबत आणखी कोणीही असू नये आणि पर्वतावर दुसरं कोणीही दिसायला नको. त्या पर्वतासमोर गुराढोरांनी किंवा मेंढरांनीही चरू नये.”+

४ म्हणून मोशेने दगड कोरून आधीसारख्याच दोन पाट्या तयार केल्या; आणि यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे तो पहाटेच, त्या दोन दगडी पाट्या आपल्या हातात घेऊन सीनाय पर्वतावर गेला. ५ मग यहोवा ढगात खाली आला+ आणि तिथे मोशेसोबत उभा राहिला व त्याने यहोवाचं नाव घोषित केलं.+ ६ यहोवाने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली: “यहोवा, यहोवा, दयाळू,+ करुणामय*+ आणि सहनशील*+ देव; एकनिष्ठ प्रेम*+ आणि सत्याने* भरलेला,+ ७ हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करणारा;+ चुका, अपराध आणि पाप क्षमा करणारा.+ पण तो दोषींना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+ तो वडिलांच्या अपराधांसाठी मुलांना आणि नातवांना, तिसऱ्‍या आणि चौथ्या पिढीपर्यंत शिक्षा देतो.”+

८ मोशेने लगेच जमिनीपर्यंत वाकून नमन केलं. ९ मग तो म्हणाला: “हे यहोवा, जर आता माझ्यावर तुझी कृपा झाली असेल, तर हे यहोवा तू आमच्यासोबत ये.+ आम्ही हट्टी* लोक असलो,+ तरी आमचा अपराध आणि पाप क्षमा कर+ आणि तुझे स्वतःचे लोक म्हणून आमचा स्वीकार कर.” १० यावर देव म्हणाला: “मी एक करार करतो: मी तुम्हा लोकांसमोर अशा अद्‌भुत गोष्टी करीन, ज्या पृथ्वीवर किंवा सर्व राष्ट्रांमध्ये कधीच झाल्या नाहीत;*+ आणि ज्या लोकांमध्ये तुम्ही राहता, ते सर्व यहोवाचं कार्य पाहतील, कारण मी तुमच्यासोबत एक आश्‍चर्यकारक गोष्ट करत आहे.+

११ मी आज तुम्हाला जी आज्ञा देत आहे तिच्याकडे लक्ष द्या.+ मी तुमच्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांना हाकलून लावत आहे.+ १२ सांभाळून राहा, ज्या देशात तुम्ही जात आहात तिथे राहणाऱ्‍या लोकांसोबत करार करू नका,+ नाहीतर तुम्ही पाशात अडकाल.+ १३ त्याऐवजी, तुम्ही त्यांच्या वेदी व पूजेचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांचे पूजेचे खांब* कापून टाका.+ १४ तुम्ही दुसऱ्‍या कोणत्याही देवापुढे वाकू नका,+ कारण फक्‍त आपलीच उपासना केली जावी, अशी अपेक्षा करणारा* देव म्हणून यहोवाला ओळखलं जातं.* खरोखर, फक्‍त आपलीच उपासना केली जावी अशी अपेक्षा करणारा तो देव आहे.+ १५ सांभाळून राहा, त्या देशातल्या रहिवाशांसोबत करार करू नका; कारण जेव्हा ते आपल्या देवांची उपासना करतील* आणि बलिदानं देतील,+ तेव्हा कदाचित एखादा तुम्हालाही बोलवेल आणि तुम्ही त्याच्या बलिदानातलं काही खाल.+ १६ मग तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांची लग्नं त्यांच्या मुलींशी करून द्याल;+ आणि जेव्हा त्यांच्या मुली आपल्या देवांची उपासना करून पाप करतील, तेव्हा त्या तुमच्या मुलांनाही त्या देवांची उपासना करून पाप करायला लावतील.+

१७ साच्यात धातू ओतून देव बनवू नका.+

१८ बेखमीर* भाकरींचा सण साजरा करा.+ मी तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, अबीब* महिन्याच्या ठरलेल्या वेळी तुम्ही सात दिवस बेखमीर भाकरी खा.+ कारण अबीब महिन्यातच तुम्ही इजिप्तमधून बाहेर आला होता.

१९ पहिला जन्मलेला प्रत्येक नर* माझा आहे.+ तुमच्या गुराढोरांतलाही पहिला जन्मलेला माझा आहे, मग तो बैल असो किंवा मेंढा.+ २० पहिल्या जन्मलेल्या प्रत्येक गाढवाला सोडवण्यासाठी तुम्ही एक मेंढरू द्यावं. जर तुम्ही त्याला सोडवलं नाही, तर त्याच्या मानेवर वार करून त्याला ठार मारा. आणि तुमच्या मुलांमधून प्रत्येक प्रथमपुत्राला सोडवून घ्या.+ कोणीही माझ्यासमोर रिकाम्या हाती येऊ नका.

२१ तुम्ही सहा दिवस काम करा, पण सातव्या दिवशी विश्रांती घ्या.*+ नांगरणीच्या आणि कापणीच्या काळातही तुम्ही सातव्या दिवशी विश्रांती घेतली पाहिजे.

२२ गव्हाच्या कापणीचं पहिलं पीक अर्पण करून सप्ताहांचा सण साजरा करा आणि वर्षाच्या शेवटी पीक गोळा करण्याचा सण* साजरा करा.+

२३ वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी इस्राएलचा देव, म्हणजे खरा प्रभू यहोवा याच्यासमोर हजर व्हावं.+ २४ कारण मी इतर राष्ट्रांना तुमच्यासमोरून हाकलून लावीन+ आणि तुमच्या देशाच्या सीमा वाढवीन; तुम्ही वर्षातून तीन वेळा तुमचा देव यहोवा याच्यासमोर हजर व्हायला जाल, तेव्हा कोणीही तुमची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणार नाही.

२५ मला बलिदान केलेल्या प्राण्याच्या रक्‍तासोबत तुम्ही खमीर* असलेलं काहीही अर्पण करू नका.+ वल्हांडणाच्या सणाचं बलिदान तुम्ही दुसऱ्‍या दिवशी सकाळपर्यंत राहू देऊ नका.+

२६ तुमच्या जमिनीच्या पहिल्या पिकातला सर्वात चांगला भाग तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या घरात घेऊन या.+

तुम्ही बकरीच्या पिल्लाला त्याच्या आईच्या दुधात उकळू नका.”+

२७ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तू हे शब्द लिहून ठेव,+ कारण या शब्दांनुसार मी तुझ्यासोबत आणि इस्राएलसोबत एक करार करत आहे.”+ २८ मोशे ४० दिवस आणि ४० रात्री तिथेच यहोवासोबत राहिला. त्याने काहीच खाल्लं नाही किंवा तो पाणीही प्यायला नाही.+ आणि देवाने* त्या दगडी पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा* लिहिल्या.+

२९ त्यानंतर मोशे सीनाय पर्वतावरून खाली आला आणि त्याच्या हातात साक्षलेखाच्या दोन पाट्या होत्या.+ तो पर्वतावरून खाली आला, तेव्हा त्याच्या चेहऱ्‍यातून किरणं निघत होती, कारण तो देवाशी बोलला होता. पण आपल्या चेहऱ्‍यातून किरणं निघत आहेत, हे त्याला माहीत नव्हतं. ३० अहरोनने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोशेला पाहिलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्‍यातून किरणं निघत आहेत असं त्यांना दिसलं आणि त्याच्या जवळ जायची त्यांना भीती वाटली.+

३१ पण मोशेने त्यांना बोलावून घेतलं; म्हणून अहरोन आणि इस्राएली लोकांचे सर्व प्रधान त्याच्याजवळ आले आणि मोशे त्यांच्याशी बोलला. ३२ त्यानंतर सर्व इस्राएली लोक मोशेजवळ आले आणि त्याने सीनाय पर्वतावर यहोवाने त्याला दिलेल्या सर्व आज्ञा त्यांना सांगितल्या.+ ३३ त्यांच्याशी बोलून झाल्यावर, मोशे आपला चेहरा पडद्याने झाकून घ्यायचा.+ ३४ पण जेव्हा मोशे यहोवाशी बोलायला त्याच्यासमोर जायचा, तेव्हा बाहेर येईपर्यंत तो आपल्या चेहऱ्‍यावरचा पडदा काढून टाकायचा.+ मग बाहेर आल्यावर तो त्याला मिळालेल्या आज्ञा इस्राएली लोकांना सांगायचा.+ ३५ इस्राएली लोकांना मोशेच्या चेहऱ्‍यातून किरणं निघताना दिसायची, आणि मोशे पुन्हा देवाशी* बोलायला जाईपर्यंत आपला चेहरा परत पडद्याने झाकून घ्यायचा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा