वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ३३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • देवाकडून ताडनाचा संदेश (१-६)

      • छावणीबाहेर भेटमंडप (७-११)

      • यहोवाचं तेज पाहण्याची मोशेची विनंती (१२-२३)

निर्गम ३३:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:७; २६:३

निर्गम ३३:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२०; ३२:३४
  • +अनु ७:१, २२; यहो २४:११

निर्गम ३३:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “कठोर मानेचे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:८; अनु ८:७-९
  • +निर्ग ३२:९; अनु ९:६; प्रेका ७:५१
  • +निर्ग ३२:१०; गण १६:२१

निर्गम ३३:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “कठोर मानेचे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:९; अनु ९:६; प्रेका ७:५१
  • +गण १६:४५

निर्गम ३३:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “उतरवून टाकले.”

निर्गम ३३:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:२५, २६; गण २७:१-५

निर्गम ३३:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:२१; स्तो ९९:७
  • +गण ११:१६, १७; १२:५

निर्गम ३३:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३३:२२, २३; गण १२:८; अनु ३४:१०; योह १:१८; ६:४६; प्रेका ७:३८
  • +निर्ग १७:९; २४:१३
  • +गण ११:२८; अनु १:३८; यहो १:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. २७

    १२/१/२००२, पृ. १०-११

    १०/१/१९९७, पृ. ४-५

निर्गम ३३:१२

तळटीपा

  • *

    किंवा “मी तुला निवडलं आहे.”

निर्गम ३३:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:४; २७:११; ८६:११; ११९:३३; यश ३०:२१
  • +अनु ९:२६

निर्गम ३३:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:२१; ४०:३४; यहो १:५, १७; यश ६३:९
  • +यहो २१:४४; २३:१

निर्गम ३३:१६

समासातील संदर्भ

  • +गण १४:१३, १४; अनु ४:३४; २शमु ७:२३; स्तो १४७:२०

निर्गम ३३:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:१३; ६:३; ३४:६
  • +रोम ९:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१९, पृ. २६

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९१, पृ. ४

निर्गम ३३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९९, पृ. १९-२०

निर्गम ३३:२३

समासातील संदर्भ

  • +योह १:१८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ३३:१उत्प १२:७; २६:३
निर्ग. ३३:२निर्ग २३:२०; ३२:३४
निर्ग. ३३:२अनु ७:१, २२; यहो २४:११
निर्ग. ३३:३निर्ग ३:८; अनु ८:७-९
निर्ग. ३३:३निर्ग ३२:९; अनु ९:६; प्रेका ७:५१
निर्ग. ३३:३निर्ग ३२:१०; गण १६:२१
निर्ग. ३३:५निर्ग ३४:९; अनु ९:६; प्रेका ७:५१
निर्ग. ३३:५गण १६:४५
निर्ग. ३३:७निर्ग १८:२५, २६; गण २७:१-५
निर्ग. ३३:९निर्ग १३:२१; स्तो ९९:७
निर्ग. ३३:९गण ११:१६, १७; १२:५
निर्ग. ३३:११निर्ग ३३:२२, २३; गण १२:८; अनु ३४:१०; योह १:१८; ६:४६; प्रेका ७:३८
निर्ग. ३३:११निर्ग १७:९; २४:१३
निर्ग. ३३:११गण ११:२८; अनु १:३८; यहो १:१
निर्ग. ३३:१३स्तो २५:४; २७:११; ८६:११; ११९:३३; यश ३०:२१
निर्ग. ३३:१३अनु ९:२६
निर्ग. ३३:१४निर्ग १३:२१; ४०:३४; यहो १:५, १७; यश ६३:९
निर्ग. ३३:१४यहो २१:४४; २३:१
निर्ग. ३३:१६गण १४:१३, १४; अनु ४:३४; २शमु ७:२३; स्तो १४७:२०
निर्ग. ३३:१९निर्ग ३:१३; ६:३; ३४:६
निर्ग. ३३:१९रोम ९:१५
निर्ग. ३३:२३योह १:१८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ३३:१-२३

निर्गम

३३ मग यहोवा मोशेला म्हणाला: “ज्या लोकांना तू इजिप्त देशातून बाहेर आणलंस, त्यांना घेऊन आता पुढे जा. मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना ज्या देशाबद्दल असं म्हणालो होतो, की ‘तुमच्या संततीला* मी तो देईन,’ त्या देशाकडे जा.+ २ मी तुझ्यापुढे एका स्वर्गदूताला पाठवीन+ आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांना हाकलून लावीन.+ ३ तुम्ही दूध आणि मध वाहत असलेल्या देशाकडे जा.+ पण मी तुमच्यासोबत येणार नाही, कारण तुम्ही हट्टी* लोक आहात+ आणि कदाचित मी वाटेतच तुमचा सर्वनाश करीन.”+

४ ही वाईट बातमी ऐकून लोक शोक करू लागले आणि त्यांच्यापैकी एकानेही आपले दागिने घातले नाहीत. ५ यहोवा मोशेला म्हणाला: “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही हट्टी* लोक आहात.+ मी एका क्षणात तुमच्या छावणीतून जाऊन तुमचा सर्वनाश करू शकतो.+ म्हणून आता तुमच्यासोबत काय करावं हे मी ठरवेपर्यंत तुमचे दागिने घालू नका.’” ६ यामुळे होरेब पर्वतापासून पुढे जाताना इस्राएली लोकांनी दागिने घातले नाहीत.*

७ यानंतर मोशेने आपला तंबू छावणीबाहेर काही अंतरावर नेऊन उभा केला. त्याने त्याला भेटमंडप म्हटलं. कोणालाही यहोवाला काही विचारायचं असेल,+ तर तो छावणीबाहेर असलेल्या त्या भेटमंडपाजवळ जायचा. ८ जेव्हा जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जायचा, तेव्हा तेव्हा लोक उठून आपापल्या तंबूच्या दाराजवळ उभे राहायचे आणि मोशे मंडपात जाईपर्यंत ते त्याच्याकडे पाहत राहायचे. ९ मोशे मंडपाच्या आत जाताच ढगाचा खांब+ खाली उतरायचा आणि देव मोशेसोबत बोलत असताना, तो खांब मंडपाच्या प्रवेशाजवळ असायचा.+ १० जेव्हा सर्व लोक मंडपाच्या प्रवेशाजवळ तो ढगाचा खांब पाहायचे, तेव्हा प्रत्येक जण आपापल्या तंबूच्या दाराजवळ वाकून नमन करायचा. ११ दोन माणसं जशी एकमेकांशी बोलतात, तसंच यहोवा मोशेसोबत समोरासमोर बोलायचा.+ मोशे छावणीत परत आल्यावर त्याचा सेवक आणि सहायक+ असलेला, नूनचा मुलगा यहोशवा+ मंडपातच थांबायचा.

१२ मग मोशे यहोवाला म्हणाला: “बघ, तू मला म्हणतोस, की ‘या लोकांना ने;’ पण माझ्यासोबत तू कोणाला पाठवणार हे तू मला अजून सांगितलेलं नाहीस. शिवाय, तू म्हणतोस, ‘मी तुला नावाने ओळखतो* आणि तुझ्यावर माझी कृपा आहे.’ १३ जर माझ्यावर तुझी खरंच कृपा असेल, तर मला तुझे मार्ग दाखव.+ म्हणजे मला तुझी ओळख होईल आणि पुढेही तुझी कृपा माझ्यावर राहील. बघ, हे राष्ट्र शेवटी तुझेच लोक आहेत.”+ १४ तेव्हा देव म्हणाला: “मी स्वतः तुझ्यासोबत येईन+ आणि तुला विश्रांती देईन.”+ १५ मग मोशे देवाला म्हणाला: “जर तू आमच्यासोबत येणार नसशील, तर आम्हाला इथून पाठवू नकोस. १६ माझ्यावर आणि माझ्यासोबतच तुझ्या लोकांवरही तुझी कृपा आहे, हे सर्वांना कसं कळेल? मी आणि तुझे लोक पृथ्वीवरच्या इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे आहोत, हे तू आमच्यासोबत आल्यामुळेच दिसून येणार नाही का?”+

१७ मग यहोवा मोशेला म्हणाला: “तुझी ही विनंतीही मी मान्य करीन, कारण तुझ्यावर माझी कृपा आहे आणि मी तुला नावाने ओळखतो.” १८ तेव्हा मोशे म्हणाला: “कृपा करून मला तुझं तेज पाहू दे.” १९ पण देव म्हणाला: “मी तुझ्या समोरून जाईन आणि माझा चांगुलपणा तुला पाहायला मिळेल. आणि मी तुझ्यापुढे यहोवाच्या नावाची घोषणा करीन;+ माझी इच्छा असेल, त्याच्यावर मी कृपा करीन आणि माझी इच्छा असेल, त्याच्यावर मी दया करीन.”+ २० पण तो पुढे म्हणाला: “तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण कोणीही माणूस मला पाहून जिवंत राहू शकत नाही.”

२१ मग यहोवा म्हणाला: “ही जागा माझ्या जवळ आहे. तू त्या खडकावर उभा राहा. २२ माझं तेज जवळून जात असताना, मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन आणि मी निघून जाईपर्यंत तुला माझ्या हाताने झाकून ठेवीन. २३ त्यानंतर मी माझा हात काढून घेईन आणि तुला माझी पाठ दिसेल. पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा