वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ३२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • सोन्याच्या वासराची उपासना (१-३५)

        • मोशेला विचित्र गाण्याचा आवाज येतो (१७, १८)

        • मोशे नियमांच्या पाट्या फोडतो (१९)

        • लेवी यहोवाला एकनिष्ठ (२६-२९)

निर्गम ३२:१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २४:१८; अनु ९:९
  • +प्रेका ७:४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. ११

निर्गम ३२:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:३५, ३६

निर्गम ३२:४

तळटीपा

  • *

    किंवा “ओतीव मूर्ती.”

समासातील संदर्भ

  • +अनु ९:१६; यश ४६:६; प्रेका ७:४१
  • +निर्ग २०:४; नहे ९:१८; स्तो १०६:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४४

निर्गम ३२:६

समासातील संदर्भ

  • +१कर १०:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९५, पृ. १६

निर्गम ३२:७

समासातील संदर्भ

  • +अनु ४:१५-१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४४

निर्गम ३२:८

तळटीपा

  • *

    किंवा “ओतीव मूर्ती.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १८:२०; २०:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४४

निर्गम ३२:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “कठोर मानेचे.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३४:९; अनु ९:६; प्रेका ७:५१

निर्गम ३२:१०

समासातील संदर्भ

  • +गण १४:१२; अनु ९:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१०, पृ. ५-६

निर्गम ३२:११

समासातील संदर्भ

  • +स्तो १०६:२३
  • +अनु ९:१८, १९

निर्गम ३२:१२

तळटीपा

  • *

    किंवा “पस्तावा कर.”

समासातील संदर्भ

  • +अनु ९:२८

निर्गम ३२:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:१५-१७; ३५:१०, ११; इब्री ६:१३, १४
  • +उत्प १३:१४, १५; २६:३, ४

निर्गम ३२:१४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याला पस्तावा झाला.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १०६:४५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१८, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१०, पृ. ५-६

निर्गम ३२:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४०:२०; अनु ५:२२
  • +अनु ९:१५

निर्गम ३२:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३१:१८; अनु ९:१०

निर्गम ३२:१८

तळटीपा

  • *

    किंवा “पराक्रमाच्या.”

निर्गम ३२:१९

समासातील संदर्भ

  • +नहे ९:१८; स्तो १०६:१९, २०; प्रेका ७:४१
  • +अनु ९:१६, १७

निर्गम ३२:२०

समासातील संदर्भ

  • +अनु ७:२५
  • +अनु ९:२१

निर्गम ३२:२२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:२४; १६:२; १७:२; अनु ९:७; ३१:२७

निर्गम ३२:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:१; प्रेका ७:४०

निर्गम ३२:२६

समासातील संदर्भ

  • +यहो २४:१५; २रा १०:१५

निर्गम ३२:२७

समासातील संदर्भ

  • +गण २५:५

निर्गम ३२:२९

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपला हात भरा.”

समासातील संदर्भ

  • +गण २५:११; अनु १३:६-९
  • +अनु ३३:८, ९

निर्गम ३२:३०

समासातील संदर्भ

  • +गण १६:४७; २१:७; अनु ९:१८

निर्गम ३२:३१

समासातील संदर्भ

  • +निर्ग २०:२३

निर्गम ३२:३२

समासातील संदर्भ

  • +गण १४:१९
  • +फिलि ४:३; प्रक ३:५

निर्गम ३२:३४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:२०; ३३:२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ३२:१निर्ग २४:१८; अनु ९:९
निर्ग. ३२:१प्रेका ७:४०
निर्ग. ३२:२निर्ग १२:३५, ३६
निर्ग. ३२:४अनु ९:१६; यश ४६:६; प्रेका ७:४१
निर्ग. ३२:४निर्ग २०:४; नहे ९:१८; स्तो १०६:१९, २०
निर्ग. ३२:६१कर १०:७
निर्ग. ३२:७अनु ४:१५-१८
निर्ग. ३२:८निर्ग १८:२०; २०:३
निर्ग. ३२:९निर्ग ३४:९; अनु ९:६; प्रेका ७:५१
निर्ग. ३२:१०गण १४:१२; अनु ९:१४
निर्ग. ३२:११स्तो १०६:२३
निर्ग. ३२:११अनु ९:१८, १९
निर्ग. ३२:१२अनु ९:२८
निर्ग. ३२:१३उत्प २२:१५-१७; ३५:१०, ११; इब्री ६:१३, १४
निर्ग. ३२:१३उत्प १३:१४, १५; २६:३, ४
निर्ग. ३२:१४स्तो १०६:४५
निर्ग. ३२:१५निर्ग ४०:२०; अनु ५:२२
निर्ग. ३२:१५अनु ९:१५
निर्ग. ३२:१६निर्ग ३१:१८; अनु ९:१०
निर्ग. ३२:१९नहे ९:१८; स्तो १०६:१९, २०; प्रेका ७:४१
निर्ग. ३२:१९अनु ९:१६, १७
निर्ग. ३२:२०अनु ७:२५
निर्ग. ३२:२०अनु ९:२१
निर्ग. ३२:२२निर्ग १५:२४; १६:२; १७:२; अनु ९:७; ३१:२७
निर्ग. ३२:२३निर्ग ३२:१; प्रेका ७:४०
निर्ग. ३२:२६यहो २४:१५; २रा १०:१५
निर्ग. ३२:२७गण २५:५
निर्ग. ३२:२९गण २५:११; अनु १३:६-९
निर्ग. ३२:२९अनु ३३:८, ९
निर्ग. ३२:३०गण १६:४७; २१:७; अनु ९:१८
निर्ग. ३२:३१निर्ग २०:२३
निर्ग. ३२:३२गण १४:१९
निर्ग. ३२:३२फिलि ४:३; प्रक ३:५
निर्ग. ३२:३४निर्ग २३:२०; ३३:२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ३२:१-३५

निर्गम

३२ इकडे, लोकांनी पाहिलं की मोशेला पर्वतावरून खाली यायला बराच वेळ लागत आहे.+ म्हणून ते अहरोनच्या भोवती जमले आणि त्याला म्हणाले: “आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणाऱ्‍या त्या माणसाचं, मोशेचं काय झालं काय माहीत? म्हणून आता ऊठ आणि आमच्यासाठी एक देव बनव, म्हणजे तो आमच्यापुढे चालेल.”+ २ यावर अहरोन त्यांना म्हणाला: “तुमच्या बायकांचे आणि मुलामुलींचे सोन्याचे कानातले+ काढा आणि माझ्याकडे घेऊन या.” ३ म्हणून सर्व लोक आपले सोन्याचे कानातले काढून अहरोनकडे आणू लागले. ४ तेव्हा, त्याने ते सोनं घेतलं आणि एक कोरण्याचं हत्यार वापरून त्यापासून वासराची मूर्ती* बनवली.+ मग लोक म्हणू लागले: “हे इस्राएल, तुला इजिप्त देशातून बाहेर आणणारा हाच तुझा देव आहे.”+

५ हे पाहून अहरोनने त्या मूर्तीसमोर एक वेदी बांधली. मग त्याने अशी घोषणा केली: “उद्या यहोवासाठी उत्सव आहे.” ६ म्हणून ते दुसऱ्‍या दिवशी पहाटे उठून होमार्पणं आणि शांती-अर्पणं देऊ लागले. मग, लोक खायला-प्यायला बसले आणि त्यानंतर उठून मौजमजा करू लागले.+

७ तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “खाली जा, कारण ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर आणलंस, ते तुझे लोक दुष्टपणे वागले आहेत.+ ८ मी त्यांना ज्या मार्गाने चालायला सांगितलं होतं, त्यापासून ते लगेच भरकटले आहेत.+ त्यांनी स्वतःसाठी वासराची मूर्ती* बनवली आहे आणि ते तिच्यापुढे वाकून तिला बलिदानं अर्पण करत आहेत. ते म्हणत आहेत: ‘हे इस्राएल, तुला इजिप्त देशातून बाहेर आणणारा हाच तुझा देव आहे.’” ९ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: “मी पाहिलंय, की हे लोक हट्टी* आहेत.+ १० म्हणून आता मला अडवू नकोस; माझ्या क्रोधाच्या आगीने मी त्यांचा सर्वनाश करतो आणि तुझ्यापासूनच एक मोठं राष्ट्र बनवतो.”+

११ पण मोशे आपला देव यहोवा याला याचना करून म्हणाला:+ “हे यहोवा, तू तुझ्या शक्‍तिशाली हाताने आणि मोठ्या पराक्रमाने तुझ्या या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणलंस. मग आता तू त्यांच्यावर आपला क्रोध का भडकू देतोस?+ १२ कारण तू असं केलंस, तर इजिप्तचे लोक म्हणतील, ‘त्यांना इथून बाहेर काढताना त्याचा दुष्ट हेतू होता. त्याला त्यांना डोंगरांमध्ये नेऊन मारून टाकायचं होतं आणि पृथ्वीवरून त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकायचं होतं.’+ म्हणून आता आपल्या क्रोधाची आग आवर आणि तुझ्या लोकांवर संकट आणण्याच्या तुझ्या निर्णयावर पुन्हा विचार कर.* १३ अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या तुझ्या सेवकांची आठवण कर; तू त्यांना स्वतःची शपथ घेऊन म्हणाला होतास: ‘मी तुमची संतती* आकाशातल्या ताऱ्‍यांसारखी वाढवीन,+ आणि तुमच्या संततीसाठी* राखून ठेवलेल्या देशाचा तिने कायमचा ताबा घ्यावा, म्हणून हा संपूर्ण देश तिला देईन.’”+

१४ तेव्हा, आपल्या लोकांवर संकट आणण्याबद्दल यहोवा जे बोलला होता, त्यावर तो पुन्हा विचार करू लागला.*+

१५ मग मोशे पर्वतावरून खाली जायला निघाला. साक्षलेखाच्या दोन पाट्या+ त्याच्या हातात होत्या.+ त्या पाट्यांच्या मागेपुढे दोन्ही बाजूंवर लिहिलेलं होतं. १६ त्या पाट्या स्वतः देवाने बनवल्या होत्या आणि त्यांवरचं लिखाणही देवाने कोरलं होतं.+ १७ जेव्हा यहोशवाला लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा तो मोशेला म्हणाला: “छावणीतून लढाईचा आवाज ऐकू येतोय.” १८ पण मोशे म्हणाला:

“हा आवाज विजयाच्या* गीताचा नाही,

किंवा पराजयाच्या शोकगीताचाही नाही;

मला तर वेगळ्याच प्रकारच्या गाण्याचा आवाज ऐकू येतोय.”

१९ छावणीजवळ येताच मोशेने वासराची मूर्ती+ आणि लोकांचं नाचगाणं पाहिलं, तेव्हा तो खूप संतापला. त्याने आपल्या हातातल्या पाट्या खाली फेकून दिल्या आणि पर्वताच्या पायथ्याशी त्या फोडून टाकल्या.+ २० लोकांनी बनवलेलं ते वासरू घेऊन त्याने आगीत जाळून टाकलं आणि त्याचा चुरा केला;+ मग त्याने तो चुरा पाण्यावर टाकला आणि इस्राएली लोकांना ते पाणी प्यायला लावलं.+ २१ त्यानंतर, मोशे अहरोनला म्हणाला: “या लोकांनी तुला असं काय केलं, की तू त्यांना इतकं मोठं पाप करायला लावलंस?” २२ अहरोनने उत्तर दिलं: “माझ्या प्रभू, रागावू नकोस. या लोकांची वृत्ती वाईट आहे हे तुला चांगलं माहीत आहे.+ २३ ते मला म्हणाले, ‘आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणणाऱ्‍या त्या माणसाचं, मोशेचं काय झालं काय माहीत? म्हणून आता आमच्यासाठी एक देव बनव, म्हणजे तो आमच्यापुढे चालेल.’+ २४ म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘ज्या कोणाकडे सोनं असेल त्यांनी ते काढून मला द्या.’ मग मी ते आगीत टाकलं आणि हे वासरू बाहेर आलं.”

२५ मोशेने पाहिलं की अहरोनने लोकांना बेलगाम वागू दिलं आहे आणि यामुळे त्यांच्या शत्रूंसमोर त्यांची लाजिरवाणी स्थिती झाली आहे. २६ मग मोशे छावणीच्या फाटकाजवळ उभा राहिला आणि म्हणाला: “यहोवाच्या बाजूने कोण आहे? त्यांनी माझ्याकडे या!”+ तेव्हा, सर्व लेवी त्याच्याभोवती गोळा झाले. २७ मग तो त्यांना म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा याने असं म्हटलं आहे, ‘तुम्ही प्रत्येक जण आपापली तलवार कंबरेला बांधा आणि छावणीच्या या फाटकापासून त्या फाटकापर्यंत जाऊन आपले भाऊ, शेजारी आणि जवळचे मित्र यांना मारून टाका.’”+ २८ मोशेने सांगितल्याप्रमाणे लेव्यांनी केलं. त्या दिवशी जवळजवळ ३,००० पुरुष मारले गेले. २९ तेव्हा मोशे म्हणाला: “आज यहोवासाठी स्वतःला वेगळं करा,* कारण तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वतःच्याच मुलाच्या आणि भावाच्या विरोधात गेला आहे;+ म्हणून आज देव तुम्हाला आशीर्वाद देईल.”+

३० दुसऱ्‍याच दिवशी, मोशे लोकांना म्हणाला: “तुम्ही फार मोठं पाप केलंय, म्हणून आता मी यहोवाकडे पर्वतावर जातो आणि तुमच्या पापाचं प्रायश्‍चित्त करता येईल का, हे पाहतो.”+ ३१ तेव्हा मोशे यहोवाकडे परत गेला आणि म्हणाला: “हे लोक किती मोठं पाप करून बसलेत! त्यांनी आपल्यासाठी सोन्याचा देव बनवला!+ ३२ तरी, तुझी इच्छा असेल तर त्यांना क्षमा कर.+ नाहीतर, कृपा करून तुझ्या पुस्तकातून माझं नाव पुसून टाक.”+ ३३ पण यहोवा मोशेला म्हणाला: “ज्याने माझ्याविरुद्ध पाप केलं असेल, त्याचं नाव मी माझ्या पुस्तकातून पुसून टाकीन. ३४ आता जा, आणि ज्या देशाबद्दल मी तुला सांगितलं तिथे या लोकांना ने. बघ, माझा स्वर्गदूत तुझ्यापुढे चालेल+ आणि ज्या दिवशी मी हिशोब घेईन, त्या दिवशी त्यांच्या पापाची शिक्षा मी त्यांना देईन.” ३५ त्यानंतर, यहोवाने लोकांवर पीडा आणली, कारण त्यांच्याच सांगण्यावरून अहरोनने ते वासरू बनवलं होतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा