स्तोत्र
स्तुतिगीत. शब्बाथाच्या दिवशी गाण्याचं गीत.
२ पहाटे तुझ्या एकनिष्ठ प्रेमाचं+
आणि रात्री तुझ्या विश्वासूपणाचं वर्णन करणं;
३ दहा तारांचं तंतुवाद्य आणि सरोद यांच्या साथीने,
४ कारण हे यहोवा, तुझ्या कार्यांमुळे तू मला आनंदित केलं आहेस;
तुझ्या हाताच्या कार्यांमुळे मी आनंदाने जयजयकार करतो.
५ हे यहोवा, तुझी कार्यं किती महान आहेत!+
तुझे विचार खरंच किती खोल आहेत!+
६ अविचारी माणूस ते जाणून घेऊ शकत नाही.
मूर्ख माणूस हे समजू शकत नाही:+
७ जेव्हा दुष्ट लोक जंगली गवतासारखे वाढतात
आणि वाईट कृत्यं करणाऱ्यांची भरभराट होते,
तेव्हा त्यांचा कायमचा सर्वनाश ठरलेला असतो!+
८ पण हे यहोवा, तू सर्वकाळासाठी सर्वोच्च देव आहेस.
९ हे यहोवा, तुझ्या शत्रूंना पाहा,
तुझ्या शत्रूंचा नक्कीच नाश होईल.
वाईट कृत्यं करणाऱ्या सर्वांची पांगापांग होईल.+
११ मी आपल्या वैऱ्यांचा पराभव झालेला पाहीन;+
माझ्यावर हल्ला करणाऱ्या दुष्ट माणसांच्या नाशाबद्दल मला ऐकायला मिळेल.
१२ पण नीतिमान लोक खजुराच्या झाडांसारखे बहरतील.*
आणि लबानोनच्या उंच देवदार वृक्षांसारखे वाढतील.+
१३ त्यांना यहोवाच्या मंदिरात लावण्यात आलंय;
आपल्या देवाच्या अंगणांत ते जोमाने वाढतात.+
१५ ते यहोवाच्या खरेपणाचं वर्णन करत राहतील.
तो माझा खडक आहे,+ त्याच्यात कोणतीही अनीती नाही.