स्तोत्र
९३ यहोवा राजा बनलाय!+
त्याने वैभव पांघरलंय;
यहोवाने सामर्थ्याचं वस्त्र घातलंय;
ते त्याने पट्ट्यासारखं बांधलंय.
पृथ्वीला कायमचं स्थापित करण्यात आलंय,
तिला हलवलं जाऊ शकत नाही.*
३ हे यहोवा, नद्या उसळून वाहत आहेत;
त्या मोठा आवाज करत, उसळून वाहत आहेत;
त्यांच्या लाटांची गर्जना दूरपर्यंत ऐकू येते.
४ यहोवा उंच आकाशात वैभवशाली आहे.+
महासागरांच्या आवाजापेक्षा;
समुद्रात आदळणाऱ्या लाटांपेक्षा तो सामर्थ्यवान आहे.+
५ हे यहोवा, तुझ्या स्मरण-सूचना खूप भरवशालायक आहेत.+
पवित्रता ही सर्वकाळासाठी तुझ्या घराची शोभा आहे.+