स्तोत्र
३ कारण तो तुला फासेपारध्याच्या सापळ्यापासून;
जीवघेण्या रोगापासून वाचवेल.
५ तुला रात्रीच्या वेळी घडणाऱ्या भयानक गोष्टींची,+
किंवा दिवसा सुटणाऱ्या बाणाची भीती वाटणार नाही.+
६ काळोखात पाठलाग करणाऱ्या साथीच्या रोगाला,
किंवा भरदुपारी होणाऱ्या नाशाला तू भिणार नाहीस.
७ तुझ्या बाजूला हजार माणसं
आणि तुझ्या उजव्या हाताला दहा हजार माणसं मरून पडतील,
पण तुझ्यावर मात्र यांपैकी कोणतंही संकट येणार नाही.+
११ कारण तू जिथेही जाशील, तिथे तुझं संरक्षण करावं,+
अशी तो आपल्या स्वर्गदूतांना+ तुझ्याबद्दल आज्ञा देईल.
१३ तू तरुण सिंहावर आणि नागावर पाय देशील;
तू आयाळ असलेल्या सिंहाला आणि मोठ्या सापाला पायांखाली तुडवशील.+
१४ देव म्हणाला: “मी त्याला वाचवीन, कारण त्याला माझ्याबद्दल जिव्हाळा आहे.*+
मी त्याचं रक्षण करीन, कारण त्याला माझ्या नावाची ओळख आहे.*+
१५ तो मला हाक मारेल, तेव्हा मी त्याला उत्तर देईन.+
संकटाच्या वेळी मी त्याच्यासोबत असेन.+
मी त्याला वाचवीन आणि त्याचा सन्मान करीन.