स्तोत्र
आसाफचं गीत.+ स्तुतिगीत.
हे देवा, गप्प बसून नुसताच पाहत राहू नकोस!
२ कारण बघ, तुझ्या शत्रूंनी कसा गोंधळ माजवलाय!+
तुझा द्वेष करणारे उद्धटपणे वागतात.*
३ ते गुप्तपणे तुझ्या लोकांविरुद्ध दुष्ट योजना करतात;
तुझ्या मौल्यवान लोकांविरुद्ध* ते कटकारस्थानं रचतात.
४ ते म्हणतात: “चला, आपण या राष्ट्राचा असा सर्वनाश करू,+
की इस्राएलच्या नावाची कोणाला आठवणही राहणार नाही.”
९ तू मिद्यानसोबत+ जसं केलं होतंस;
कीशोनच्या+ ओढ्याजवळ सीसरा आणि याबीन यांच्यासोबत तू जसं केलं होतंस,
तसंच या सर्वांसोबत कर.
१० एन-दोर+ इथे त्यांचा सर्वनाश झाला होता;
ते जमिनीसाठी खत झाले.
११ त्यांच्या प्रतिष्ठित लोकांना ओरेब आणि जेब+ यांच्यासारखं;
आणि त्यांच्या राजकुमारांना* जेबह आणि सलमुन्ना+ यांच्यासारखं कर.
१२ कारण ते म्हणाले: “देव ज्या देशात राहतो, त्या देशाचा आपण ताबा घेऊ या.”
१३ हे माझ्या देवा, त्यांना वाऱ्यासोबत उडणाऱ्या पाल्यापाचोळ्यासारखं कर,+
वाऱ्याने उडवलेल्या सुक्या गवतासारखं त्यांना कर.