स्तोत्र
दावीदचं गीत. मिक्ताम.* संचालकासाठी सूचना. “साक्षीचं भुईकमळ” याच्या चालीवर गायलं जावं. शिकवण्यासाठी. दावीद अराम-नहराईम आणि अराम-सोबा यांच्यासोबत लढला आणि यवाबने परत येऊन क्षार खोऱ्यात १२,००० अदोमी लोकांना ठार मारलं,+ तेव्हा दावीदने हे गीत रचलं.
६० हे देवा, तू आमच्याकडे पाठ फिरवलीस; तू आम्हाला चिरडलंस.+
तू आमच्यावर रागावला होतास; पण आता आमचा पुन्हा स्वीकार कर!
२ तू पृथ्वीला हादरवलंस; तू तिला दुभंगून टाकलंस.
तिची खिंडारं बुजव, कारण ती पडणार आहे.
३ तू तुझ्या लोकांना संकट सोसायला लावलंस.
तू आम्हाला द्राक्षारस प्यायला लावलास, त्यामुळे आमचे पाय अडखळू लागले.+
४ तुझं भय मानणाऱ्यांसाठी ध्वज उभार,*
म्हणजे ते त्याच्याकडे धावतील आणि बाण चुकवतील. (सेला )
५ तुझ्या प्रिय लोकांची सुटका व्हावी,
म्हणून तुझ्या उजव्या हाताने आम्हाला वाचव आणि आमची प्रार्थना ऐक.+
६ देव त्याच्या पवित्रतेमुळे* बोलला आहे:
यहूदा माझा राजदंड आहे.+
८ मवाब माझ्यासाठी पाय धुण्याचं पात्र आहे.+
अदोमवर मी माझा जोडा फेकीन.+
पलेशेथला हरवल्यामुळे मी आनंदाने जल्लोष करीन.”+
९ वेढा पडलेल्या शहरात* मला कोण नेईल?
अदोमपर्यंत मला कोण घेऊन जाईल?+
१० हे देवा, तूच नाही का? पण तू तर आमच्याकडे पाठ फिरवली आहेस.
आता तू आमच्या सैन्यांसोबत लढाईला जात नाहीस.+
११ आमच्या संकटात आम्हाला साहाय्य कर,
कारण मानवांकडून मिळणारं तारण व्यर्थ आहे.+
१२ देवच आम्हाला ताकद देईल.+
तोच आमच्या शत्रूंना पायांखाली तुडवेल.+